माझं समुद्राचं वेड, त्याच्याशी असलेलं नातं तसं खुप जुनं आहे. अगदी सातवी आठवीत असल्यापासुनचं. अगदी सुरुवाती-सुरुवातीला, सकाळच्या वेळी समुद्राच्या कुशीतून हळुवारपणे वर येणार्या किंवा त्याच्या मिठीत सामावून जाणार्या, मालवणार्या दिनकराचे दर्शन हा खरेतर मुळ हेतु असायचा. आणि मग एकदा का सुर्योदय अथवा सुर्यास्त होवून गेला की तेव्हा कुठे त्या समुद्राकडे लक्ष जायचे....
जसं तारुण्याचे वेध लागले तसे सुर्यनारायणाची ओढ कमी व्हायला लागली. एखाद्या विरही प्रियकराच्या ओढीने किनार्याकडे धाव घेणारा सागर, एखाद्या दंतहिन बाळाच्या निरागस हास्याप्रमाणे भासणार्या त्याच्या फेसाळत्या लाटांचं आवेशात किनार्याकडे झेपावून मग हळुच माघार घेणं , आता जास्त आवडायला लागलं होतं. पण तरीही जेव्हा जेव्हा समुद्र आवडला तेव्हा तेव्हा तो का कोण जाणे? पण एकतर सकाळचा असायचा अथवा संध्याकाळचाच...
कारण त्या सहस्त्ररश्मीच्या अनेकविध रंगाचे पदर लेवून तो यायचा तो केवळ सकाळी अथवा संध्याकाळीच. कदाचीत लहानपणापासून 'उन्हं चढायच्या आत परत या रे' किंवा 'उन्ह केवढं आहे, जरा उतरु दे, मग जा म्हणे समुद्रावर' या आणि अशा सुचना ऐकतच मोठे झालेलो असल्यामुळे सागर भेटायचा तो सकाळचा किंवा संध्याकाळचाच.
मग नोकरीधंद्याच्या निमित्ताने भारताबाहेर फिरणे व्हायला लागले. कधी मॉरिशस, तर कधी बाली, कधी हॉलंड तर कधी ऑस्ट्रेलिया... पण या अशा ठिकाणी भर दुपारच्या उन्हात सुर्यप्रकाश अंगावर घेत किनार्यावर पडून राहणारे समुद्रवेडे भेटायला लागले आणि असं लक्षात आलं की...
अरेच्च्या दुपारचा समुद्र सुद्धा तितकाच मनोहारी असतो...
पर्थचा स्क्रारब्रोचा समुद्रकिनारा नेहमी नवनव्या रंगकळा दाखवतो मला. गेल्या वर्षी त्याने निळाईचा अनुभव दिला होता. यावेळी निळ्याबरोबरच चंदेरी वर्खाची जादु अनुभवायला मिळाली ....
नुकतीच, म्हणजे अगदी गेल्या दोन आठवड्यापूर्वीच पर्थची एक चक्कर झाली. तिथे नोव्हेंबर म्हणजे उन्हाळ्याची सुरुवात . सकाळी साडे चार, पाच वाजल्यापासून लक्ख उजेड पडायला सुरूवात होते . एके दिवशी उठून सकाळी सहा-सव्वा सहा वाजता समुद्रकिनारा गाठला.
खालील फोटोतील समुद्राकडे जाणारी पायवाट मला खुप आवडते. ही पायवाट दोन टप्प्यात विभागलेली आहे. तिचा पहिला टप्पा एका टेकाडावर वरच्या दिशेने चढत जावून संपतो आणि तिथून पुढे जणुकाही प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत समुद्राच्या दिशेने उताराला लागतो....
वर जावून प्रकाशाच्या दारात जिथे पायवाट संपते, तिथून सुरू होतो पायवाटेचा दुसरा टप्पा, निळ्या समुद्राच्या दिशेने...
प्रचि ७
पायातले शूज लेसने एकमेकाशी जखडून कंबरेच्या पाऊचला अडकवतो आणि मग अनवाणी पायाने त्या पांढर्या शुभ्र रेतीत, घोट्यापर्यंत पाय रुतवीत मी किनार्यावर येवून पोचतो. पायवाटेवरून खाली किनार्यावर उतरले की माझा नेहमीच गोंधळ उडतो. आता कुठल्या दिशेला जायचे कारण कुठेही जा, आपण त्या बाजुला का गेलो नाही असे राहून राहून वाटायला लागते. मग अर्ध्यातच मागे वळून त्या दिशेला लागायचे. परत लगेचच मागच्या बाजुचा , दिशेचा किनारा खुणवायला लागतो
कधी-कधी त्या सागरापेक्षा त्याच्या किनार्यावर दुरवर पसरलेल्या त्या पांढर्या रेतीतून पाय रुतवत चालणे जास्त मजा देवून जाते...
दिवस डोक्यावर यायला लागला (इथल्या उन्हाळ्यात ती उष्णता सकाळी आठ, साडे-आठ वाजल्यापासूनच जाणवायला सुरूवात होते) की मग ब्रेक फास्टसाठी म्हणुन मी हॉटेलकडे परत फिरतो. परतता परतता सहजच किनार्याकडे लक्ष जाते आणि कित्येकदा असे साठी-सत्तरीचे कितीतरी तरूण सागरावर स्वारी करायच्या तयारीत सज्ज दिसतात..
ब्रेकफास्ट करुन ऑफिसला रवाना व्हायचे आणि संध्याकाळी साडे चार, पाच वाजता परत आले की फ्रेश होवून परत किनार्याच्या दुसर्या बाजू धुंढाळायला निघायचे हा माझा तिथला बहुतांश दिनक्रम असतो. अशाच एका संध्याकाळच्या भटकंतीत सापडलेला हा जादुई समुद्रकिनारा...
इथे किनार्यावरच एक सुरेखसे हॉटेल कम फिशपब आहे. तिथे साल्मन नाहीतर बारामुंडी ऑर्डर करायचा आणि व्हाईट वाईनचे घुटके घेत मस्त आकाशाचे बदलते रंग अनुभवत बसायचे हा माझा आवडता छंद आहे....
कंटाळा येइपर्यंत बसायचे. सोबत मोबाईलमध्ये आणि मनामध्येही ठाण मांडून बसलेला तलत असतोच...
सुख म्हणजे दुसरे काय असते ?
विशाल
हेच!!!! मस्त.
हेच!!!!
मस्त.
मस्त प्रचि !
मस्त प्रचि !
आरारारारा... धुरळा उडवलाय
आरारारारा... धुरळा उडवलाय नुसता.. गेम खल्लास!!!!
वा ! मस्त फोटोज
वा ! मस्त फोटोज
खूप सुंदर
खूप सुंदर
विकु... केव्हढे सुंदर
विकु... केव्हढे सुंदर फोटोज.. आधी आवडलेल्या प्रचिंचे नंबर टाकणार होते..पण नाही आले निवडता..सर्वच्यासर्व खू>>>प आवडले..
खरंच सुख म्हणजे वेगळं काही
खरंच सुख म्हणजे वेगळं काही असूच शकत नाही.
फोटो पाहूनच इतकं सुखी असल्यासारखं वाटतंय.
अजुन थोडे फोटो असते तर तुझा हेवा वाटायला लागला असता.
मी महिन्यापुर्वी पर्थलाच
मी महिन्यापुर्वी पर्थलाच होतो, तुमी कीती दिवस होता तिथे?
मस्तच!
मस्तच!
सर्वच जबरदस्त आहेत प्रचि
सर्वच जबरदस्त आहेत प्रचि
लिखाण आणि फोटो दोन्हीही अतिशय
लिखाण आणि फोटो दोन्हीही अतिशय सुंदर. समुद्र किती गडद निळा आहे तिथे. आपल्याकडे हिरवट दिसतो.
मस्त फोटो आहेत
मस्त फोटो आहेत
खूप सुंदर
खूप सुंदर
धन्यवाद मंडळी ! धिरज, मी ८ ते
धन्यवाद मंडळी !
धिरज, मी ८ ते १८ नोव्हेंबर या दरम्यान पर्थमध्ये होतो. माझी जुलै आणि नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात एक चक्कर असते दर वर्षी.
मस्त रे. आता एक पोलरायजिन्ग
मस्त रे.
आता एक पोलरायजिन्ग फिल्टर घेच. आणि अजुन मजा येइल फोटो काढताना?
सलाम....नमस्ते!!!!!!!!!!!!!!!
सलाम....नमस्ते!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वा! मस्तच फोटो!
वा! मस्तच फोटो!
मस्त आहेत फोटो!
मस्त आहेत फोटो!
सगळेच फोटो छान आहेत.
सगळेच फोटो छान आहेत.
सुरेख टिपलेत प्रचि सगळे! इथे
सुरेख टिपलेत प्रचि सगळे!
इथे भारतीताईच्या माझ्या अत्यंत आवडत्या निळाई कवितेच्या काही ओळी देण्याचा मोह आवरत नाहीये.
किती धीरगंभीर लाटा उसळल्या
कुणी आत्मघाती तटाशी विखुरल्या
कुणी सोज्वला कोमला उर्मिला त्या
तरंगात काही उसासून गेल्या. .
कुणी मत्त कोणी जिव्हारीमनस्वी
कुणी मुक्त कोणी उदासीतमस्वी
कुणी चंद्रसाक्षी - धरे बिंब वक्षी
कुणी ऐन मध्यान्ही तळपे तपस्वी
निळ्या वैभवाच्या तर्हा वेगळाल्या>>> !!
अजूनही टिपत रहा त्याला वेगवेगळ्या रुपात. त्याच्या लाटांचे सौंदर्य पहायला आवडेल असे!
छान रंग टिपलेत !
छान रंग टिपलेत !
मस्त फोटो आहेत. उन्हाने
मस्त फोटो आहेत. उन्हाने चकाकणारा समुद्र खरच छान दिसतो. शेवटचे वाक्य खरं आहे.
विशालजी, सुंदर फोटो, कृपया
विशालजी,
सुंदर फोटो,
कृपया डायरेक्ट सुर्याकडे लेन्स मधुन फोटो काढु नका.
लेन्स व सेंन्सर खराब होण्याची शक्यता असते.
काळजी घ्या.
धन्यवाद
धन्यवाद मंडळी _/\_ टिडिके,
धन्यवाद मंडळी _/\_
टिडिके, तुमचे खास आभार. मी शक्यतो ती काळजी घेतोच. पण यावेळी तेच हवे असल्याने दुसरा पर्याय नव्हता. धन्यवाद
अतिशय सुर्रेख फोटो .......
अतिशय सुर्रेख फोटो ....... आणि वर्णनही मस्तच ....
अप्रतिम ! 'क्षणाक्षणाला जें
अप्रतिम !
'क्षणाक्षणाला जें नाविन्य धारण करतं, तेंच सौंदर्य', ही संस्कृतमधली व्याख्या लावली तर समुद्रालाच 'विश्वसुंदर' मुकूट कायमचाच बहाल करावा लागेल !
<< सुख म्हणजे दुसरे काय असते ? >> माझ्या चांगल्याच परिचयाचे एक गृहस्थ कामानिमित्त प्रथमच ऑस्ट्रेलियात तीन-चार दिवसांकरतां गेले होते. परतल्यावर अगदीं उल्हसित होत मला म्हणाले, ' काम दोन-तीन तासांचच होतं. त्यामुळें, उरलेला सर्व वेळ तिथल्या एका ब्रिज असोसिएशनच्या क्लबमधे ब्रिज खेळायला मिळालं. धमाल आली !!'. सुख हें खूपच व्यक्तिनिष्ठ असावं.
[ अवांतर : मालवण-देवबागच्या सात-आठ किलोमीटर लांबीच्या वाळूच्या किनार्यावरून समुद्राचे सर्व रंग, मूड अनुभवण्याचं सुख इथल्या बर्याच जणांच्या भाग्यात होतंच. आपणही त्यातलेच एक, हें वाचून अधिकच आपुलकी वाटली !]
धन्यवाद.
विशालराव, कुठे गायब होतात
विशालराव, कुठे गायब होतात बरेच दिवस ?
ते निळे फोटो पाहिल्यावर मला पहिला प्रश्न पडला की निळा फिल्टर तर नाहीना टाकला ?
आता लक्षात आल की भारतात असा निळा समद्र नसतो किंवा क्वचितच असेल/ असतो.
छान ! मजा आहे मित्रा. काम का काम और टुर का वरदान
छान आहेत फोटोज!!
छान आहेत फोटोज!!
खरंय विशाल.... सुखाची
खरंय विशाल....
सुखाची व्याख्या दुसरी काही असूच शकत नाही.....त्यातही तुझ्या सोबतीला 'तलत' असतो म्हटल्यावर उद्या गोबीच्या वाळवंटातही तुला गारवा वाटू शकेल....इथे तर आख्खा समुद्र.
धन्यवाद मंडळी
धन्यवाद मंडळी
Pages