जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या चित्राचा चेहरा इतका दु:खी कॅटगरीत येतो ना... काहींचे चेहरे तसेच असतात वाटतं.
आदर्शपणाचा कळस (की किळस) यावा असे वागतात कधी काधी देसाईंची फॅमिली.

तो मनोज कसल सॅडो होता. चित्रा पण रडकीच आहे म्हणा.

मनोजचा मोबाईल हरवला म्हणून तो विचित्राला फोन करू शकला नाही. मोबाईल आल्यापासून PCO बंद झालेत का Uhoh

मोबाईल आल्यापासून PCO बंद झालेत का >>> हो नताशा.. माझाच अनुभव आहे.. मी एकदा मोबाईल घरी विसरुन फॅमिलीबरोबर बाहेर गेले होते.. नवरा आणि साबांना एक ठीकाणी जायच होत तर त्यांच काम होईपर्यंत मी इकडे तिकडे करणार होते.. त्यांच काम झाल्यावर त्यांनी मला फोन केला तर नुसतीच रिंग वाजत होती आणि मी त्यांना फोन करण्यासाठी जवळपा ३० मिनिट PCO शोधत होते.. शेवटी एका दुकानदाराला विनवण्या करुन त्याच्या दुकानातल्या लॅण्डलाईनवरुन फोन केला..

मागे मी लिहिलं होतंना चित्राबाई आणि पिंट्या ह्यांची एकत्र जोडी होती. तो हा फोटो. तिथे चित्रा आधुनिक आणि बरीच बरी होती. पिंट्या नेहेमीच चांगलं काम करतो,

धन्यवाद मुग्धा.

अरे हा पिन्ट्या, मनोज बनुन आला आहे का? काय कराव ह्या कर्माला. त्या माझे मन तुझे झाले मध्ये याचे त्या सिरीयल मधल्या या चित्रा-पात्राशी सूत जुळु शकले नाही म्हणून इथे जमवतोय वाटते.

बाकी कैरी (चित्रा )आणी लिम्बु ( मनोज ) एकत्र आले की आम्बटपणा जास्त वाढणार.:फिदी:

मला कुठल्याही channel किंवा मालिकेची जाहिरात करायची नाहीये फक्त ह्या दोघांचा फोटो द्यायचा होता.

Happy

अन्जू पण फोटो छान आलाय या पात्रान्चा.:स्मित: धन्यवाद मुग्धा.

अरे असे आहे होय. मला वाटले की फोटो आहे, म्हणून हा पण आला की काय.

ए प्लीज यार थँक्स काय म्हणता.. अन्जुला प्रॉब्लेम येत होता मी मदत केली.. इतकच..

ओके.:स्मित:

एलतिगो मध्ये शास्त्रद्न्य दाखवलेला सागर यात बेकार मनोज बनून आला आहे. गेटप, हावभाव तेच. विसंगती असली तरी सत्य असू शकते. Lol

सॉरी माझा फोटो का जात नव्हता हे बघण्यासाठी परत मी चेक केले तर चुक कळली मला.

त्यामुळे फोटो दोनदा दिसेल आता.

नुकताच याच्या एका रिपीट एपिसोडचा एक सीन दिसला -

माई मेघनाला नातवंडाबद्दल सूचित करतात, फार उशीर करू नका वगैरे सांगतात, की लगेच त्या रात्री आदित्य-मेघना बेडरूममधे कामाला लागतात Uhoh तेवढ्यात चित्राचा फोन येतो आणि काम थांबतं Uhoh

Lol

म्हणजे, माझं म्हणणं असं, की माईंनी सूचित केलं नाही, तर हे काही करणार नाहीत का? Uhoh काय वाट्टेल ते दाखवतात Angry

या मालिकेतलं एकत्र कुटुंब सुंदर दाखवलंय - असं घरचे ज्ये.ना. फार कौतुकानं म्हणत असतात.
कुटुंबात आई-वडिलांना धरून असावं, मान्य, पण इतकं? असं अर्ध्या वचनात? आज्ञाधारक? Uhoh

विचित्राच्या अण्णांचे काम कोणी केले आहे? आधी कधी बघितले नाही त्यांना.

बाय द वे, काल ऑफीसात गेल्या गेल्या विचित्रा आदेला म्हणाली की संध्याकाळी कोणता ड्रेस घालू? कोणत्या ड्रेस मधे मी चांगली दिसते. Uhoh ती कोणत्याही ड्रेस मधे रडीच दिसते Angry

विचित्राच्या अण्णांचे काम कोणी केले आहे? आधी कधी बघितले नाही त्यांना. >> बर्‍याच मराठी मालिकांमध्ये असतात की हे! हिंदी मध्ये ही पाहील्याचं स्मरतंय! मनापासून पटणारं हे एकच पात्र आहे सध्या मालिकेत! मेदे पण सुखद रित्या पटतेय!

आबासाहेब.... Proud

वर चित्राही पाठंगुळीला लटकलेली दाखवायची होती ना वेताळासारखी!! आधीच आपलं थोडं होतं तर ह्यानं त्या मनोजचं घोडं पण घेतलंय शिरावर!

Pages