Submitted by सायो on 15 March, 2012 - 12:53
पावभाजी करताना उत्तम जमण्याकरताा टिप्स, कोणते मसाले वापरावेत ह्याबद्दल चर्चा करा. जर पावाभाजी करण्याची मुख्य पाककृती हवी असेल तर ती पावभाजी रेसिपी इथे आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दुसर्या दिवशी थोडी गरम केली
दुसर्या दिवशी थोडी गरम केली की भाजी छान लागते
म्हणजे बिन्-कांद्याची पण बनते
म्हणजे बिन्-कांद्याची पण बनते का पाभा?
अंजली फोटो मस्त आलाय .. त्या
अंजली फोटो मस्त आलाय .. त्या व्हिडीयो मध्ये धन्याजीर्याची पूडही आहे का? माझ्या लक्षात नाही .. मी पाहिलेल्या व्हिडीयोत शेवटी कसुरी मेथीही घातली होती ..
माझी पाभाजी कधी सरसरीत (पळीवाढे) होत नाही .. कितीही प्रयत्न केला तरी घट्ट होते शेवटी .. :|
>>माझी पाभाजी कधी सरसरीत
>>माझी पाभाजी कधी सरसरीत (पळीवाढे) होत नाही .. कितीही प्रयत्न केला तरी घट्ट होते शेवटी .. :|>> पावभाजी ला 'जी' संबोधल्यासारखं वाटतंय.
का होत नाही पळीवाढी? खूप शिजवतेस का? ज्यामुळे घट्ट घट्ट होत जाते. अगदी नंतर पाणी वाढवलंस तर मग पुन्हा पांचट लागू नये म्हणून उकळी काढावी लागेल. तेव्हा कुकरला भाज्या शिजवून घेत असशील तर जास्त शिजवायची गरज नाही.
पुण्यात अनेक ठिकाणी पावभाजी
पुण्यात अनेक ठिकाणी पावभाजी चाखलेली आहे, घरीही केली. पण चवीत तोचतोच पणा येऊ लागल्याने एक दिवस बटाट्याऐवजी रताळे वापरून पाहीले. सुरुवातीला गडबड झाली. पण गोड भाजी बनली. चवीतला हा बदल पचनी पडल्यानंतर सर्वांना रुचीपालट पसंत पडला. काय काय केलं होतं हे लिहून ठेवलेली वही हाती आल्यावर इथे रेसिपी देईन.
पावभाजी करतांना फ्लवर,ढबू
पावभाजी करतांना फ्लवर,ढबू मिरची, मटार आणि बटाटा यांचे नक्की प्रमाण किती घ्यायचे? साधरण ४ जणासाठी बनवायाची आहे.
प्रमाण असं काही नाही. मी
प्रमाण असं काही नाही. मी जनरली बटाटा थोडा कमी घेते बाकी भाज्यांच्या तुलनेत. आणि बाजारात कोणती भाजी स्वस्त, कोणती महाग ह्यावरही प्रमाण अवलंबून आहे.
इथल्या टिप्स वाचून आणि बरीच
इथल्या टिप्स वाचून आणि बरीच वेगवेगळी प्रमाणं ट्राय केल्यावर मी या प्रमाणावर स्थिरावले आहे- एक मोठ्ठी लाल शिमला मिर्ची, ३ मध्यम बटाटे, २ बाळ गाजरं किंवा अर्धा इंच बीटाचा तुकडा, १ मध्यम कांदा, १ टोमॅटो, अर्धी-पाऊण वाटी वाटाणे.
http://kha-re-kha.blogspot.com/2011/02/blog-post.html इथे पण प्रमाण दिलं आहे.
मस्त आहे हा धागा. पण मी पाव
मस्त आहे हा धागा. पण मी पाव भाजीत फ़्लॉवर, श्रावण घेवडा दुधी भोपळा गाजर सुद्धा घालते. कच्चा कान्दा आणि कच्ची ढब्बू मिरची वापरून बघते आता
Pages