सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्..

Submitted by हिम्सकूल on 7 November, 2014 - 01:37
ठिकाण/पत्ता: 
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे.

सौ. सायली कुलकर्णी ह्यांच्या विद्यार्थीनींचे अरंगेत्रम्.. म्हणजेच भरतनाट्यम् नृत्यप्रकारातील गुरुच्या परवानगीने सादर केलेला पहिला कार्यक्रम.जसा हा विद्यार्थीनींचा पहिला कार्यक्रम आहे तसाच गुरु म्हणून सायलीचा ही पहिलाच कार्यक्रम आहे.

Web Banner_800X500_Design 2.jpg

ह्या कार्यक्रमात साथसंगत पुढील प्रमाणे
नटुवांगम - सौ. सायली कुलकर्णी , गायन - सौ. सौम्या, कु. रश्मी मोघे, मृदुंग - श्री. व्यंकटेश, व्हायोलिन - श्री. बाल सुब्रमण्यम, बासरी - श्री. सुनिल अवचट, निवेदन - सौ. पूनम छत्रे.

सर्वांना हार्दिक निमंत्रण.

कार्यक्रम विनामूल्य आहे..

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, November 14, 2014 - 18:30 to 21:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कार्यक्रमाला यायची खूप इच्छा होती, परंतु जमले नाही. कार्यक्रमाची क्षणचित्रे व वृत्तांत जमल्यास अवश्य टाकणे. Happy

सुरेख झाला कार्यक्रम .
कार्यक्रमात माझ्यापेक्षा कविताला जास्त रस असल्याने ओवी , मी अन कविता तिघेही आलो होतो .
पण ओवीमुळे फक्त तासभरच पाहता आला.
सुदैवाने तेवढ्या वेळात सायली यांचे मनोगत अन काही परफॉर्मन्सेस पाहता आले .
अचानक ओवी बाईसाहेबांचा मूड बदलल्याने अभिनंदन न करता अन कुणालाच न भेटता निघावे लागले Sad
फक्त विवेक देसाईंशी मिनिटभर बोललो (तेही कविताच इतकच )

खरं तर 'बायको'च्या इच्छेखातर मी कार्यक्रमाला आलेलो, कारण 'नाचा'तलं मला काहीही कळत नाही. पण मनापासुन सांगतो, चारही कलाकारांनी जे सादर केलं ते खरोखर अप्र्तीम होतं. चारही कलाकार आणि त्यांच्या मार्गदर्शीका सौ. सायली खरोखर अभिनंदनासाठी पात्र आहेत. सर्वांना पुढील प्रत्येक सादरी करणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...

या कार्यक्रमा मधे अक्षरशः वैताग आणणारा प्रकार म्हणजे...
१> फोटोग्राफरचे कौशल्याचे प्रयोग. संपूर्ण थियेटर मधे या प्राण्याला शेवट पर्यन्त हवा तो अ‍ॅन्गल सापडलाच नाही. विनाकारण स्टेज पासुन प्रेक्षागृहात (आम्ही ज्या दिशेला बसलेलो तिथपर्यन्त) आणि परत अशी त्याची धावपळ सुरु होती. कार्यक्रम पहायला आलेले रसिक या असल्या 'धाव-पळी'ने विनाकारण विचलीत होतात, हे त्याच्या ध्यानात आणुन द्यावेसे वाटत होते, पण अक्षरशः स्वतःला आवरले
२> स्टेजवर कलाविष्कार सुरु असताना, कलाकारांच्या नातेवाईकां बाबत आजुबाजूला सुरु असलेलं 'खाजगी गॉसिपींग' (मागच्या आणि पुढच्या अश्या पकडून एकुण १०-१२ रांगां पर्यन्त सहज ऐकू जाईल अशी कुजबूज), ५ वर्षा खालील मुलांचा 'हल्ला-गुल्ला'...दोष लहान मुलांचा नाही, त्यांना सोबत आणणार्‍या पालकांचा...
३> कलाकारांना 'चिअर-अप' करायला आलेल्या त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे सुरु असलेले (केविलवाणे) Relationship Management.
४> आपण पूर्ण-पणे पारदर्शक आहोत, या अश्या भ्रमात असलेले आणि प्रेक्षागृहात इतर रसिकांची तमा न बाळगता प्रेक्षागृह भर घिरट्या घालत आपले आप्त-स्वकीय शोधणारे, कलाकार आणि कलेशी काहीही देणं-घेणं नसलेले 'मॉडर्न-रसिक' ...

Pages