कंस अकेला
प्रौढ 'सा'क्षरवार्ता: कंस अकेला
अकोला ते अमेरिका (व्हाया मुंबई, पुणे आणि सिंगापूर)एकट्याने प्रवास केलेल्या कंसाची ही अकेली कहाणी. 'विशुद्ध प्रेम म्हणजे नक्की काय?' यावर भांडारकर संस्थेतली पुस्तके चाळू जाता नेमकी हवी ती पुस्तके 'इतर लोकां'नी पळवून नेल्याचे त्याला दिसले. त्यामुळे ही संशोधनाची वाट आपल्याला एकट्यानेच काटायची आहे, हे उमगल्यावर त्याच्या जाणिवेत जो लख्ख प्रकाश पडला, त्याचे परावर्तित रूप म्हणजेच 'कंस अकेला'. या परावर्तनाच्या प्रक्रियेत त्याच्या मनाच्या आरशावर विखुरलेले काही कवडसे नाजूक आहेत तर काही काचेरी.. काही दुष्ट तर काही हळुवार. तेजस्वी सूर्याच्या वितळलेल्या तेजाने न्हायलेल्या पाऊलवाटा आपल्याला या कहाणीत ठायीठायी भेटतात. वाटेवरल्या वळणांवर भेटलेल्या राधा, अवनी, रमा, कालिंदी, विनता, प्रियंवदा यांचंही या कहाणीत मोलाचं योगदान आहे. कंस शेवटी अकेलाच असला तरी ही कहाणी त्याच्या अकेल्याची नसून या सहाजणींचीही आहे. सहाजणी भेटूनही एकीलाही आपल्या आयुष्याचा कायमस्वरुपी भाग बनवू न शकलेला कंस 'अस्ति आणि प्राप्ती' यांची तर वाट सदैव पाहत नव्हता ना, असे विचार आपल्या मनात फेर धरून राहतात. कंस एकटाच राहिला हे त्याचे सुदैव आणि हीच त्याची शोकांतिका असे शांग्रिला विद्यापिठातील सहजीवनशास्त्राचे प्राध्यापक प्रा.झिंग ला हा म्हणतात, त्यात काहीसे तथ्य असावे, असे आपल्याला वाटायला लागते. या रंजक, प्रक्षोभक आणि काही अंशी बेधडक पुस्तकातला हा काही भाग:
समोरच्या काचेतून दिसणारा विस्तीर्ण विमानतळ. इमिग्रेशन वगैरे सोपस्कार आटोपून मी अमेरिकेला जाणार्या विमानाची वाट बघत आहे. रात्रीचा दीड वाजलेला. लोक जांभया देत बसले आहेत आजूबाजूला. समोरच्या खुर्च्यांवर एक जोडपे. नवपरिणीत असावे. तिने लाल पंजाबी ड्रेस घातलाय. हातात पंजाब्यांचा टिपिकल लालपांढरा चुडा. तो मधूनच तिला जवळ ओढतो. चिम********. ती लाजते. तिच्याकडे पाहून कालिंदी आठवते. एकदा हातात हिरव्या बांगड्या भरून ती अशीच लाजली होती. तेव्हा माझा वैताग झालेला. 'हे सगळे फालतू आहे कालिंदी. हा चुडा काय, आपले लग्न काय आणि नंतरचे सगळे काय? लग्न हवे कशाला?', मी बोललो होतो फटकन. तिच्या संसाराच्या काचेरी स्वप्नावर मी ओढलेला तो चरचरीत ओरखडा. स्पष्ट दिसणारा, विद्रूप. तिचे काळेभोर डोळे पाण्याने तुडुंब भरून आले असताना, आपण आणखी यात गुंतायला नको म्हणून मी फट्टकन दरवाजा आपटून तिथून निघालो तो कायमचाच. पुढे एका नटाशी लग्न केलेली कालिंदी पेपरातल्या फोटोत जीवघेणी देखणी दिसत होती, तेव्हा हे सौंदर्य आपल्या आसपास ******************** आत्ताआत्तापर्यंत वावरत होते, हे जाणवूनही काही न वाटण्याइतका मी कोडगा झालो होतो. मी कंस... एकटा.. कंस अकेला.
निळ्या मानससरोवरासारखे निळे डोळे असलेली विनता. तिच्या निळ्या डोळ्यांमध्ये मरियाना गर्तेची खोली होती. खेरीज ती व्हायोलिन वाजवत असे. बाहेर निष्पर्ण झाडे हिमवर्षाव झेलीत असता, तिच्या बंगल्यातल्या खोलीत, शेकोटीच्या उबेत तिने छेडलेले ते व्हायोलिनाचे आर्त सूर. शेजारच्या स्वैंपाकघरातून येत असलेला चहाचा मंद दरवळ. समोर टेबलावर ठेवलेले पुष्पपात्र. रिकामेच. माझ्या त्यावेळी असलेल्या मन:स्थितीचे प्रतीकच ते जणू. 'तू जाणार तर...' व्हायोलिन थांबल्याचे मला लक्षात आलेच नाही चटकन. मी मान हलवली तेव्हा तिच्या निळ्या डोळ्यांतून ओघळले खळकन दोन आसवांचे मोती. आणि खोलीभर मग वादळासारखे भरून राहिले ते व्हायोलिनावर छेडलेले 'तू ना जा मेरे बादशाह एक वादे के लिये, एक वादा तोड के..' हे सूर. पण मला अमिताभ किंवा श्रीदेवी कुणीच आवडत नसल्याने माझे जाणे अटळ आहे, हे सत्य वारंवार तिला सांगून मी तिच्या भाळी विरहाची रेषा कायमची रेखून ठेवली. आज माझ्यासोबत आहे ते तिचे शेवटचे वाक्य 'तुला चहा आवडत नाही, हे माझ्या लक्षात राहिलंच नाही रे...' वादळी रात्री झालेल्या आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी तिने कपात ओतलेले ते तपकिरी इत्यादी रंगाचे पेय... तेव्हा मात्र त्या पेयाकडे लक्ष देण्यापेक्षा मला इतर गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या. मी ******************
*****************************************************
*****************************************************
*****************************************************
*****************************************************
प्रियंवदा. नुस्ते नाव घेत रहावे तिचे. तिच्या नि माझ्या त्या पहिल्या भेटीच्यावेळीही मी एवढा एकच शब्द फक्त उच्चारू शकलो. हजारो गुलाब पाकळ्या पाकळ्या होऊन तुमच्यावर उधळले जावेत, तसे तिचे ते अस्तित्व.
'खिल के बिखर जायेगा ये गुलाब, खुशबू भी बिखर जायेगी...
तेरे चारों तरफ हूं मै ही मै, अब मुझसे दूर कहां जायेगी...'
हा अश्रफ गुलाबाबादी (लखनौ से दो मील) यांचा शेर मी तिला ऐकवला तेव्हा आपले काळेभोर डोळे माझ्या तपकिरी डोळ्यांत गुंतवून ती 'कुठेच नाही' असे अस्फुट स्वरांत म्हटली तेव्हा आकाशगंगेचे काठ दिसेनासे व्हावेत, तशी काहीशी माझी स्थिती झाली होती.
'भोवताली लाख मेणबत्त्या, उजेड दिसेना कोठे
परतीची दिसेना वाट, गहन अरण्य मोठे'
तिच्या आठवणींना केवड्याचा सुगंध, तिच्या सहवासाला चंदनाचा वास आहे. आणि मी मलाच विचारतो पुन्हा, प्रियंवदा हे सत्य की भास आहे?
तिच्या भेटींना*********************************************
****************************************************
****************************************************
****************************************************
(*या चिन्हांचा अर्थ: अॅडमिनांच्या विपुमध्ये तक्रार जाऊ नये, म्हणून प्रक्षोभक (आणि अश्लील) भाग गाळला आहे. उत्सुकता असणार्यांनी पुस्तक विकत घेऊन वाचावे. मला आता * टाईप करण्याचा कंटाळा आला आहे. पानेच्या पाने भरून * आहेत.)
टंकलेखन साहाय्य: कुणीच नाही. इतके प्रक्षोभक पुस्तक हातात धरायलाही कुणी तयार झालेले नाही. मी हातमोजे घालून कष्टाने ही पाने टाईप केली आहेत.
मान्यवरांची पुस्तकाबद्दलची मते:
श्री. प्रमोद पत्रे: इतके प्रक्षोभक पुस्तक गेल्या दहा हजार वर्षांत झाले नाही आणि येत्या दहा हजार वर्षांत होणार नाही.
श्रीमती वनमाला रामदेवराय: कुठल्याही थोड्या भल्या माणसाला देवपण सतत चिकटतंच.. कंस शतकाशतकांतून एखादाच होतो. आपल्यातल्या कंसाला ओळखण्याची वृत्ती असणारा आणि बेधडकपणे लोकांसमोर मांडणारा हा कंस मात्र त्यांतही आगळा. पुस्तक संग्रही ठेवावे असे. (मात्र ज्वलनशील पदार्थांपासून लांब ठेवा.)
श्री. स्लार्टी बार्टफास्ट: जनीनामक एकाच प्रेमपात्राशी बाह्यतः तरी एकनिष्ठ असल्याने मला कंसाचे उघड कौतुक करता येत नसले तरी मनातून मला त्याचा आदरच आहे.
श्री. बंटी फातर्पेकर: कंस रॉऑऑऑऑऑऑऑऑक्स... 'कंस अकेला' ज्याम सह्ह्ह्ह्ही आहे. एका बैठकीत वाचून काढली.
*हे लेखन मी एक 'मैलाचा दगड' असलेली कादंबरी माबोकरांपर्यंत पोचावी या उदात्त भावनेने केले असल्याने त्याच्या अश्लीलतेबद्दल चर्चा होऊ नये. त्यामागचा प्रामाणिक हेतू कृपया बघावा.
लालूताई,
लालूताई, अहो असलीच ही दुतप्पी मानसे. पुपु वाचुन हसायचे आनि मग गुपचुप ** वाचयचे ! अहो, हे पुस्तक वचुन माझी तोन्दाचे चव गेली. तुम्हीही नका वाचु.
<>>तिच्या आठवणींना केवड्याचा सुगंध, तिच्या सहवासाला चंदनाचा वास आहे. आणि मी मलाच विचारतो पुन्हा, प्रियंवदा हे सत्य की भास आहे?<>>
असले सुन्दर वाक्य लिहिनार्या श्रे कन्सान्नी नन्तर लगेच जे लिहिले आहे हे वाचवत नाही. त्याच अवस्थेचे वर्नन थोर लेखक कसे करतात बघा - ज्याल प्रेम समजत, शब्द समजतो तो वेळ पाळतो नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.
अशी जीवनद्र्श्टी देनारे काही लिहायच्या ऐवजे श्री कन्स यान्नी जे लिहिले आहे ते साहित्य कसे म्हनावे ? असा मी श्रीश्र यान्ना प्रश्न करते.
मी उल्लेख केलेली पुस्तके 'वपुल वाचा, विपुल वाचा समिती' च्या दुकानात मिळतात.
ए
ए आवरा!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
नीधपताइ, मन
नीधपताइ,
मनालीताइ योग्य सान्गताहेत. हे अष्लील पुस्तक आहे.
हायला ए बस
हायला ए बस आता! वाचून वाचून खुर्चीतून पडायची वेळ आलीय. बघतायेत सगळे ऑफिसमधले.
मनालीताई, तुम्ही फार्च उच्च लिहिता. असेच लिखाण सुरु ठेवावे.
(No subject)
शी_मला, अश्
शी_मला,
अश्लील असं काही नसतं.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
हे राम,
हे राम, महान आत्म्यांनो. तूम्ही सर्वच थोर आहात. माझे प्रणाम स्विकारावे.
--- असं
---
असं एखादं पाखरू वेल्हाळ, त्याला सामोरं जातंया आभाळ!
वपुल वाचा,
वपुल वाचा, विपुल वाचा >>> शी_मला, कुल्लु आणि मनाली ताई/दादा, आज पेटलाय अगदी!
श्र, तूफान!
श्र, तूफान!
---------------------------------------------
यह दिल बन जाये पत्थरका, ना इसमें कोई हलचल हो..
तुम्हा
तुम्हा सर्वे जणांचे आभार. हे पुस्तक नक्की विकत घेऊन वाचा.
मनालीताई, नीधपताई सांगतात ते बरोबरे. अश्लील असं काही नाहीच्चे मुळी जगात. जसं भूत तसं अश्लील. भूत असतं का? नाही ना? मग अश्लील बिश्लील काही नसतं.
आणि एवढंच वाचून अश्लील म्हणता मग कंस आणि रमेचे प्रकरण वाचताना तुमच्या मनाची अवस्था काय होईल ह्याची कल्पनाच करवत नाही. आत्ताच स्तरी लिहिताय, नंतर सतरी लिहायला लागाल. एकही जोडशब्द लिहिताना बोटे वळणार नाहीत. ते प्रकरण एकतर हिमाचल प्रदेशात वादळी रात्री घडते. जे प्रकरण हिंदी सिनेमावाले धगधगती आग, पायांचे शॉट्स, वाळत टाकलेले कपडे, खिडकीवर पडणारा पाऊस एवढ्याच गोष्टींच्या सहाय्याने दाखवतात, त्याचे 'कंस अकेला'मध्ये तपशीलवार वर्णन आहे. आता बोला. नाही बोलू नकाच. जाऊन मोठ्यांची पुस्तके वाचा. वपु, पुल असे अल्पाक्षरी बालसाहित्य वाचणे आता पुरे झाले.
मी वर तरी सूचना दिली होती की हेतू उदात्त आहे. अश्लील वगैरे काल्पनिक गोष्टींचा मुद्दा आणू नाही. तरी तुम्ही आणलाच. ज्याचं जसं मन तसं तो लिहिणार शेवटी, असं बाबा सद्गुरु जग्गूजी महाराज लेखणीवाले म्हणतात, ते खरंच आहे म्हणायचं. हे तुम्हाला उद्देशून नक्कीच नाही. राग मानू नका. शेवटी आपण सर्वे माबोकर. गुण्यागोविंदाने इथे राहायचे! (आता गोविंदा अश्लील गाणी करतो म्हणून 'गोविंदाने इथे नाही राहायचे' असाही पाईंट तुम्ही मांडणार. रागाऊ नका हां. कोटी करायचा प्रयत्न केलाय. तो गोड मानून घ्या.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
There is no charge for awesomeness... or attractiveness.
इथे अजून
इथे अजून दिनेश आणि चाफा कसे काय नाही आले?
आणि
आणि ट्युलिप पण .. कोण कुठला चष्मा लावून पुस्तकं वाचतात ह्याची सखोल आणि रंजक चर्चा व्हायलाच हवी .. :p
कसेही असेना पण केव्हढी प्रसिद्धी मिळतेय .. मलाही वाचायची उत्सुकता लागुन राहिलीये आता .. आधी एकात नायिकेचे मित्र आता मित्राच्या नायिका ..
ह्या
ह्या पुस्तकाचा प्रौढ साक्षरवार्तेपेक्षा "साक्षरांना प्रौढ" करण्याशी जास्त संबंध असावा असं वाटतय.
मनाली हा
मनाली हा कोणाचा डु. आय. डी आहे ते सांगा आधी....
तू फा न हे
तू फा न
हे पुस्तक सध्या मुंबईमधे फारच गाजत आहे. यावर सुप्रसिध्द्द सिनेदिग्दर्शक एल जी पेटवानी सिनेमा काढणार् असल्याचे गॉसिप नुकतेच समजले आहे. नायिकाची निवड ही एका रीएलिटी शोजमधून करण्यात येइल असे समजते. नायकाचे काम पेटवानीचा मुल्गा जिमी पेटवानी करणार आहे.
--------------
नंदिनी
--------------
हे वाचायचं राहिलंच कसं
हे वाचायचं राहिलंच कसं काय...
एकदम फंडू पुस्तक आहे हे... श्रने त्यातील घेतलेले उतारे पण पुस्तकाची पुरेशी ओळख करुन देणारे आहेत.. इतक्या सुंदर पुस्तकाची ओळख करून दिल्या बद्दल धन्यचवाद...
कुणाचं वाचायचं राहिलं असल्यास
कुणाचं वाचायचं राहिलं असल्यास वाचा.
बाफ वर काढतेय! तुफान!!!!!
बाफ वर काढतेय!
तुफान!!!!!
कहर
कहर
हे वाचायचं राहुन गेलम होतं .
हे वाचायचं राहुन गेलं होतं . धम्माल आहे.
नक्की कोणते पुस्तक आहे हे?
नक्की कोणते पुस्तक आहे हे?
Pages