अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2014 - 10:41

आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

ह्या ओळीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या दोन दिवसांत माझ्या फोनवर कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलात ब्लाऊज माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन विनोद आले.

ह्या ओळीतील 'महाराष्ट्र' ह्या शब्दाऐवजी कोणताही शब्द घेऊन काहीही लिहिता येते.

दोन विनोदः

१. गांधारी जागी होते. मंचकाची एक बाजू मोकळीच असते. ती दचकून पलीकडे पाहाते तर अंधारात दिसत काहीच नाही. फक्त शौचालयाच्या बाजूने एक तपेली गडगडल्याचा आवाज येतो. गांधारी किंचाळून म्हणते:

"अरे कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा"

२. नवरा दारू पिऊन रस्त्यावर लोळून मध्यरात्र उलटून गेल्यावर घरी येतो. भडकलेली बायको विचारते:

"कुठे कडमडला होतात इतक्या रात्री?"

नवरा: महाराष्ट्र शोधायला गेलो होतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

विरंगुळा म्हणून ही ओळ वापरून आपण काय काय लिहू शकतो ते बघू चला.

सध्या निवडणूकीचे वारे आहेतच. क्रिकेटही सुरू झाले आहे. दिवाळी येत आहे. मायबोलीवर नेहमीप्रमाणे एक से एक धागे येतच आहेत. वाव भरपूर आहे.

बघा काय सुचतंय!

====================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगल केलं की गुजरातच्या विकासचित्राबद्दलही बरंच काही मिळतं. प्लानिंग कमिशनचे आकडेही आहेत साक्षीला. याबद्दल १० वर्षांच्या लेख्याजोख्यात किंवा अन्यत्र लिहिलं होतं.

"डालड्याचे रिकामे डबे टमरेलं म्हणुन वापरता येत होते ,आता पिशवीत डालडा मिळतो" आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

Whatsapp वर आलेली अजून एक कविता

गुजरात मध्ये उभा राहून विचारू नको
कुठे आहे महाराष्ट्र माझा
सह्याद्री पर्वतावर उभा राहून बघ
दिसेल महाराष्ट्र आपला

ढोकळा खाऊन विचारू नको
कुठे आहे महाराष्ट्र माझा
पुरणपोळी खाऊन बघ
दिसेल महाराष्ट्र आपला

दांडिया खेळून विचारू नको
कुठे आहे महाराष्ट्र माझा
लेझीम खेळून बघ
दिसेल महाराष्ट्र आपला

महाराष्ट्राचे तुकडे करणा-यानो
तुम्ही काय विचारताय
कुठे आहे महाराष्ट्र माझा
स्वराज्य स्थापन करणा-या
शिवाजी महाराजांना वंदन करून
बघ दिसेल महाराष्ट्र आपला

Debatable topic indeed.
आणखी एक धक्का मारलेला संदेश:
No doubt maharashtra is much ahead of gujarat, but I don't think question here is which state id better. Question is which state (or govt) is performing better over last 10 years. I would comment on few things I know for sure

Automobile industry:
Telco - didn't even think of increasing investment in maharashtra due to poor policies. Instead tried bengal first & settled finally in gujarat. Also have offloaded huge work to pantnagar, lucknow, jamashedpur & dharwad plants. This has caused huge direct & indirect job losses

Bajaj - almost on the verge of closing aurangabad plant. Not able to provide lightest on pocket vehicles it was known for. Again something to be blamed on taxation policies.

Kinetic -no more working

Force Motors -no growth at all

VW group (Audi, skoda, volkswagon)- Stopped workers intake in pune.

Mahindra - moved whole r&d base to tamilnadu, again due poor policies. Cost 3-4k direct jobs and many more indirect ones

General Motors -moved operations to gujarat & karnataka (not to mention, again due to policies). Only few strategic departments exist in pun

Fiat - struggling to survive

Premier -shut down long ago

No new auto company has come up in maharashtra in last 10 yrs. Tamilnadu got ford, Renault, Nissan, bmw, Daimler, chrysler. Gujarat got tata, gm. AP got Isuzu, hm...

Kuthe ahe maharashtra?

industrialisation -how many new industries came up in maharashtra? Baroda ahmedabad corridor in gujarat, orgadam kanchipuram & padi in Chennai, noida in delhi have grown superfast...

Foreign Investments - has there been an event like vibrant gujarat or easy investment policies like tamilnadu, in maharashtra in last 10 years?

Power generation - congress had promised in 2009 that maharashtra would be load shading free by 2012. Except mumbai, whole state is still getting free load shading. Gujarat have started generating huge solar power while tamilnadu have reduced average load shading from 6 hrs to 2hrs by generating huge tidal power.
What has maharashtra govt done in last 10 yrs on this front?

Irrigation&water supply-don't know about other states but most parts of marathwada & vidarbh still have to depend on rains. And they get drinking water once in 7 or 15 days

Taxes-Latest LBT is driving businesses out. Vehicle taxes at 10-11% in maharashtra. In states like himachal, it is 5-6%
Max cap on multiplex movie tickets at rs120 in tn. That is not even minimum in maharashtra. Thanks to taxes.

Transport-huge taxes on petrol diesel in maharashtra & less on liquor. Reverse in goa. Petrol 80rs/lit in maharashtra, 60rs/lit in goa.
State transport intersity min fare-maharashtra:rs 0.9/km
tn:rs 0.5/km
Gujarat: rs 0.6/km

No doubt there are huge number of medical&engg colleges in maharashtra, but are there enough jobs/business opportunities for scholars going out of these colleges?

Indeed if you Google, u will see many more such facts.

And this is why it is, "kuthe neun thevalay maharashtra maza magchya 10-12 varshat?"
And not "kuthe ahe maharashtra gujarat chya comparison madhe"
One more thing. Those who feel maharashtra has good roads should travel on all roads in tamilnadu, most of the roads in ap, karnataka, rajasthan. And those who think mumbai pune express way is best should travel on Chennai-bangalore, bangalore-hyderabad, Chennai-hyderabad, belgaum-bangalore, hyderabad outer ring road, baroda-ahmedabad, yamuna express way and many more. Most of these roads have been built in last 10-15 years. Do visit them..

शिवसेेनेची जाहीरात पाहिली आहे का कोणी?

बंडू चा आज मुलगी बघायचा कार्यक्रम होता.
मूलगी कांदापोहे घेवुन बाहेर आली

बंडू- तुझं नाव काय?

मुलगी- माझं नाव....

माझं नाव शिवसेना 

What's up वर आलेला एक मेसेज
कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा या भाजपच्या जाहिरातींमुळे मिरची लागलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला, त्यांच्या कार्यकर्त्यांना आत्ता महाराष्ट्राचा अभिमान वाटू लागलाय आणि या जाहिराती म्हणजे त्यांना आता महाराष्ट्राची थट्टा वाटू लागलीये...!

अरे, यांनी मंत्रालय जाळले तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

अजून दहा वेळा क्रूषी कर्जमाफी झाली असती एवढ्या मोठमोठाल्या आकड्यांचे काँमनवेल्थ, सिंचन या सारखे 'आदर्श' घोटाळे केले तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

26/11 ला अतिरेक्यांनी मुंबईत खुलेआम दिवाळी साजरी केली तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

गेल्या 15 वर्षांत 45,000 शेतकर्यांनी आत्महत्या केल्या तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

देशात नाव कमावलेले सहकारी साखर कारखाने आज भंगारात विकायला काढले तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

पुण्यामध्ये होऊ पाहणारे मोठे आयटी पार्क इथल्या पुढार्यांच्या नाकर्तेपनामुळे नोयडा ला गेले तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

भरदिवसा मावळ मध्ये शेतकर्यांवर गोळीबार झाला तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

अरे, नरकात तो जनरल डायर सुद्धा साँडर्स ला म्हणाला असेल लेका ही तर माझ्या बी पुढची निघाली की रं...!

महाराष्ट्रात मुतून धरणे भरली गेली तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

LBT सारखे नाही तसले कर लादले गेले तेंव्हा नाही झाली महाराष्ट्राची थट्टा?

स्वत:च्या अंगलट आले म्हणून भाजपवर काय ढकलताय... येणार्या विधानसभेत सामोरे जा...

टायपिंगचा कंटाळा येतो हो नाहीतर व्हाट्सअँप हँग होईल इतके मुद्दे आहेत...

जेंव्हा ह्या सगळ्यांना महाराष्ट्राची थट्टा होताना दिसली नाही..

4 महिन्यात एकदा गुजरातला आलेला तो फकीर काय नेणार महाराष्ट्र गुजरातला... आणि न्यायला बाकी असं यांनी 15 वर्षांत ठेवलय तरी काय?

त्या जाहिरातीतल्या बिचार्या कलाकारांना नाय नाय ते घाण कशाला बोलता?

बरोबर आहे! कारण थेट भाजपला बोलायला तुम्हाला नाकच नाही राहीलय ना!

म्हणे आपले गड-किल्ले नेतील गुजरातला... इथे मोठे जतन करून दमले तुम्ही?

गड-किल्ले नेतील जणू ते सागरगोटे आहेत, काय बोलावं अन काय नाही हे सुद्धा सुचेनाय आता तुम्हाला तर...

बरं नेऊ द्या नेेले तर... हिंदुत्ववादी गुजरातमधेच नेतील ना?

पाकीस्तानमध्ये तरी नाही न्यायचे ना?

एक गोष्ट लक्षात घ्या हे उद्योगधंदे काय फक्त गुजरातला नाही चालले तेे बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद ला सुद्धा चाललेत..

तिसरा मुद्दा स्वतंत्र विदर्भाचा त्याचेही मी समर्थनच करतो.दरवर्षी विदर्भाला विशेष पँकेज! आणि उर्वरित महाराष्ट्राला काय तर बाबाजी चा थुल्लू...!

खटल्याच्या घरात कसं असतं तसं झालय महाराष्ट्राचं...

ही शिवसेना आजपर्यंत फक्त भावनेचे राजकारण खेळत आलेली आहे. कधी विकास, भ्रष्टाचार यावर बोललीये का सेना...?

म्हणे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करायला निघालेत हे...

अरे मग थांबवा ना, रोका ना त्यांना. मुंबईत तुम्ही आहात का आम्ही?

राज ठाकरेंनी पार कंबरडे मोडले होते या सेनेचे निव्वळ मोदीमुळे नवसंजीवनी मिळाली तर गुरकले लगेच...

ऊठसुठ नुसता जातिवाद, भाषावाद आणि प्रांतवाद
.
.
.
.
.
.
.
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा...???

What's up वर आलेला एक मेसेज
अरे दिवाळी १५ दिवसावर आली
..
.
.
.
.
.
.
कुठे नेवून ठेवलाय बोनस माझा

मोदीभक्त विरुद्ध मोदीद्वेष्टे वाद सूरू झाला का उअद्या 'अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा?' हे म्हणण्याची वेळ येईल आता

>> रिया.. Rofl

उजनी धरणात दिसेना, भाटघर धरणात दिसेना, पानशेत धरणात दिसेना......

......अरे कुठे नेऊन ठेवलाय उपमुख्यमंत्री माझा?

Rofl अरे बास करा. किती हसवाल.:हाहा:

'अरे कुठे नेऊन ठेवलाय धागा माझा?' हे म्हणण्याची वेळ येईल आता>>>>>>:हहगलो:

उजनी धरणात दिसेना, भाटघर धरणात दिसेना, पानशेत धरणात दिसेना......

......अरे कुठे नेऊन ठेवलाय उपमुख्यमंत्री माझा?
>>>
Rofl

Rofl

Rofl

Rofl

एक भाबडी शंका आहे पेपर मध्ये वाचल आहे की आक्षेप असणारे लिखान असेल तर व्हॉट्सअ‍ॅप च्या अ‍ॅडमीनवर कारवाई होऊ शकते...आपन असे काही करत नाहि ना?

धरणात आक्षेपार्ह कृत्य करू पाहणार्‍यांचा उल्लेख आक्षेपार्ह ठरत नाही.

इतकेही समजत नाही?

अरे कुठे नेऊन ठेवलाय कॉमन सेन्स ह्यांचा?

Light 1 घ्या बरं का! Happy

प्लानिंग कमिशनचे आकडेही आहेत साक्षीला.>> जे कमिशन नीट काम करत नाही म्हणून बरखास्त करण्याची घोषणा झाली त्याचे आकडे कसे विश्वसनीय मानायचे ?

बरं आजपर्यंत कधी कुठे नेऊन ठेवली दिल्ली माझी असं कुणी म्हणलेलं ऐकले का?
का तिथे कांग्रेस नव्हती का अरे का तुम्ही महाराष्ट्राचीच थट्टा करताय
आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर हिम्मत नसती झाली कुणाची असे म्हणण्याची

Pages