अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2014 - 10:41

आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

ह्या ओळीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या दोन दिवसांत माझ्या फोनवर कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलात ब्लाऊज माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन विनोद आले.

ह्या ओळीतील 'महाराष्ट्र' ह्या शब्दाऐवजी कोणताही शब्द घेऊन काहीही लिहिता येते.

दोन विनोदः

१. गांधारी जागी होते. मंचकाची एक बाजू मोकळीच असते. ती दचकून पलीकडे पाहाते तर अंधारात दिसत काहीच नाही. फक्त शौचालयाच्या बाजूने एक तपेली गडगडल्याचा आवाज येतो. गांधारी किंचाळून म्हणते:

"अरे कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा"

२. नवरा दारू पिऊन रस्त्यावर लोळून मध्यरात्र उलटून गेल्यावर घरी येतो. भडकलेली बायको विचारते:

"कुठे कडमडला होतात इतक्या रात्री?"

नवरा: महाराष्ट्र शोधायला गेलो होतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

विरंगुळा म्हणून ही ओळ वापरून आपण काय काय लिहू शकतो ते बघू चला.

सध्या निवडणूकीचे वारे आहेतच. क्रिकेटही सुरू झाले आहे. दिवाळी येत आहे. मायबोलीवर नेहमीप्रमाणे एक से एक धागे येतच आहेत. वाव भरपूर आहे.

बघा काय सुचतंय!

====================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुजरात राजस्थान इतकं छान आहे तर पुण्यामुंबईत गुज्जू व मारवाडयांचा इतका सुळसुळाट का? मुंबई पुण्यातला गुजराती माणूस गुजरातच्या विकासाचं कौतुक सांगतो. अरे मग जा ना तू पण तिथेच- पण नाही. मागासलेल्या महाराष्ट्रातच राहणार गर्दी करुन. तेच जर यूएसला यायला मिळालं तर मात्र लगेच तयार!

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.
पुन्हा तो स्मशानात गेला. झाडावर लटकणारे प्रेत खांद्यावर घेऊन मौनव्रत धारण केले. अंधार्‍या रात्री तो पुन्हा मार्ग कापू लागला.
प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला,
राजा, मी तुला एक प्रश्न विचारतो. त्याचे उत्तर तुला ठाऊक असूनही तू दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.
.
.
वेताळाने प्रश्न विचारला :
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?

गुजराती नेत्यांचा महाराष्ट्रावर डोळा का ?
१) इथे लोक्स न भांडता टोल, टॅक्स भरतात गुजराती मुळातच चेंगट मख्खीचूस १-२ रुपयावर भागवत असावेत.
२) इथे लोक्स भरपूर दारु पितात सहाजिकच त्यातून सरकारचे उत्पन्न चांगले (गोव्यात २०० रुपयाचा खंबा महाराष्ट्रात १४०० रुपयाला मिळतो मग विचार करा किती पैसा कमवत असेल महाराष्ट्र सरकार ) , गुजरातमध्ये दारुबंदी आहे आता ती उठविणे शक्य नाही मग उत्पन्न कसे मिळेल ?
३) इथे लोक्स भरपूर पेट्रोल /डिझेल वापरतात मुळातच शौकीन आहे हो आपण, त्या मारवाड्यासारखे अजूनही बजाज स्कूटर वाकडी करुन फिरवत नाही -तर पेट्रोलीयम पदार्थामधून मिळणारे चिक्कार उत्पन्न
४) याव्यतिरिक्त स्टॉक मार्केट, झगमगती मुंबई, वाढते उद्योगधंदे अशा ब-याच गोष्टी आहेतच
हे सारे कॉग्रेसने केले असे अजिबात नाही

माझ्या महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायला मराठी माणूस समर्थ आहे त्या भिकारड्या गुजरात्यांना पहिले हाकलून लावा.

माझ्या महाराष्ट्रातले प्रश्न सोडवायला मराठी माणूस समर्थ आहे, पण हे सारे कॉग्रेसने अजिबात केलेच नाही>>>असे बरोबर आहे

ताईसाहेब तुडतुडकर | 8 October, 2014 - 21:51
बेफिकिर भौ ते महाराष्ट्र खोडुन पाच फुल्या घाला नावात

>>>
नको नको ! वेबवर फुल्या आक्षेपार्ह शब्दांसाठी वापरल्या जातात!
आणि लोकांना समस आधिच माहित आहे.

छान!

मतदान झालयं....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
अरं कुठ नेऊन ठेवल्या मतपेट्या सगळ्यांच्या??

नाही इकडे पडत होता तुरळक .सातारा साईडला ही पडलाय .बहुतेक पुण्याला घाबरला असेल पाउस म्हणुन नसेल पडला. Happy किंवा पुणेरी पाटी पाहीली असेल
--"दिवाळीला पडुन आमच्या रांगोळ्या व कंदिल भिजवू नका " . Happy . Proud .

जोरदार प्रसिद्धी द्या या असल्या दुय्यम वागणुकीला आणि कळू दे दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचा हिसका. :रागः

घरात उंद्र,
स्वर्गात इंद्र,
क्रिकेटमधे महेंद्र,
देशात नरेंद्र,
राज्यात देवेंद्र,
अन् बाहेरून शरदचंद्र,
अरे कुठे नेउन ठेवलाय धर्मेंद्र माझा....?
फ्रॉम ---हेमा मालिनी Happy Happy

LIVE ब्लॉग
07 Nov, 2014 , 07.16AM IST
मटा लाइव्ह ब्लॉगः शुक्रवार, ७ नोव्हेंबर २०१४
07:24 PMशिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली, राज्यात नव्या समीकरणांची चर्चा

आता म्हणा... कु ने ठे म मा

मुंबई महापालिकेवर लक्ष ठेवण्याकरीता सीईओ देणार आहे असे ऐकुन आहे

आता कुठे नेउन ठेवणार मुंबई माझी म्हणा

शिवसेनेनी राष्ट्रवादीची भेट कशाला घेतली?
<<
सत्तास्थापनेसाठी किती लागतात? घड्याळाचे किती आहेत? शिवसेनेचे किती? घाला बोटे??

युती तुटली तर सरकार कुणाचे असा ऋन्मेषचा धागा होता, त्यात मी शिवसेना प्लस राष्ट्रवादी सरकार येईल असं ल्हिहिलं होतं.

भाजपा ला आम्ही मते कशासाठी दीलि होती.. असा प्रश्न पडायला वाव आहे इथे.. भाजपा चा अजंटा फक्त गुजराती आहे की पुर्ण भारत..

Pages