अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
Submitted by बेफ़िकीर on 8 October, 2014 - 10:41
आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
ह्या ओळीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या दोन दिवसांत माझ्या फोनवर कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलात ब्लाऊज माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन विनोद आले.
ह्या ओळीतील 'महाराष्ट्र' ह्या शब्दाऐवजी कोणताही शब्द घेऊन काहीही लिहिता येते.
दोन विनोदः
१. गांधारी जागी होते. मंचकाची एक बाजू मोकळीच असते. ती दचकून पलीकडे पाहाते तर अंधारात दिसत काहीच नाही. फक्त शौचालयाच्या बाजूने एक तपेली गडगडल्याचा आवाज येतो. गांधारी किंचाळून म्हणते:
"अरे कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा"
शब्दखुणा: