मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे 'हंगर गेम्स'चे कोणी फॅन्स आहेत का? >> हो. इथून मुंबईला येताना पहिला, तिथे दुसरा नि परत येताना तिसरा वाचलेले. जेनिफर लॉरेन्स च्या वाक्याला अनुमोदन. सिनेमा पाहिल्यानंतर पुस्तके परत वाचायला हवीत फक्त शेवट तोच केला आहे कि काहि बदलले आहे ते बघायचे आहे म्हणून.

मी वाचली आहे शिवा ट्रिलजी. इथे पण त्यावर चर्चा झाली आहे असं वाटतय.
फन आणि फरगेटेबल आहे माझ्या मते.

उप्स Happy ..खरच पाठवणार होते? टोटली विसरले. पत्ता पाठवला होतास तू मला?
पण आता मला अंधूक आठवतय की तू राहुदे म्हणालास असं Uhoh
हवी तर सांग. पाठवीन मी नक्की.

भारतातील इंग्रजी वाचणार्‍या वर्गात सध्या स्युडो-धार्मिक (हा शब्द बहुधा बरोबर नसावा, पण तरीही वापरायचा मोह आवरला नाही :)) पुस्तकांचा खप वाढतो आहे का? शिवा ट्रिलजीसोबतच अलीकडे देवदत्त पटनाईक नावाच्या लेखकाच्याही काही पुस्तकांची नावं ऐकली (उदा. महाभारतावरचं जय).

देवदत्त पटनाइक बरे आहेत म्हणे इतर बर्‍याच पौराणिक लेखकांपेक्षा. बरं वाचणार्‍या वाचकांकडून मिळालेला प्रतिसाद आहे हा.

देवदत्त पटनाईक यांचा जॉन्र वेगळा आहे. त्यांचं बरंच लेखन ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यावरून कल्पना येऊ शकेल.

हंगर गेम्स मी पुतण्याकडे वाचलं गेल्या सुट्टीत. तिसरा भाग मलाही थोडासा जास्त लांबवल्यासारखा वाटला होता.

फन आणि फरगेटेबल आहे माझ्या मते. >>> हो. आमिशची लेखनशैली पकड घेते आणि पुस्तक वाचावे वाटते. नंतर (वाचल्यानंतर) त्यात फारसे काही नाही असे वाटते. शिवाय ते "फिक्शन" आहे त्यामुळे अनेक फिक्शनल गोष्टी आहेत.

थोडक्यात तुने मारी एन्ट्री गाणं कसं ऐकताना मजा देते आणि आपण ऐकतो तसेच आहे. त्याची तुलना जलते है जिसके लिये सोबत करू नये. दोन्हीची मजा वेगळी. Happy

थोडक्यात तुने मारी एन्ट्री गाणं कसं ऐकताना मजा देते आणि आपण ऐकतो तसेच आहे. त्याची तुलना जलते है जिसके लिये सोबत करू नये. दोन्हीची मजा वेगळी.>>> करेक्ट. Happy

थोडक्यात तुने मारी एन्ट्री गाणं कसं ऐकताना मजा देते आणि आपण ऐकतो तसेच आहे. त्याची तुलना जलते है जिसके लिये सोबत करू नये. दोन्हीची मजा वेगळी. >> छान वाक्य.

नंदन - हो, सध्या अशा पुस्तकांची लोकप्रियता वाढते आहे असं आसपासच्या लोकांच्या मतांवरून दिसतं. अमिष झाला आता अश्विन संघी का कोण एकजण लोकप्रिय दिसतोय.
खरं तर अशी पुस्तकं अधूनमधून वाचायला बरी असावीत पण मी अमिषचं पुस्तक दीडपानापेक्षा वरती वाचू शकले नाही. शैली आणि भाषा यामुळे. चाणक्यावर असंच काहीतरी पुस्तक मधे दिसलेले - तेही चाळलं तर भाषा आवडली नाही. इंडियन इंग्लिश ही वेगळी धाटणी असली तरीही त्या लिखाणाला काही चव ना ढव असं माझं मत आहे. आणि अतर्क्य अर्थसंगती लावणारे प्लॉट्स आवडले नाहीत (व्यवसायाचा दुष्परिणामही असेल पण माझ्या व्यवसायाबाहेरच्या इतर मित्रमैत्रिणींपैकीही बर्‍याच जणांचे मत माझ्यासारखे आहे)

देवदत्त पटनाईक तज्ज्ञ असल्याचा आव आणत स्यूडो-अ‍ॅकेडेमिक पुस्तके लिहितात, पण दुर्दैवाने त्यांचा एकूणच आवाका, समज आणि अभ्यास अतिशय तोकडा आहे. पण काये ना, सध्याच्या बदलत्या सांस्कृतिक वातावरणात आणि लोकांच्या ऑनलाईन साहित्यावर जास्त विसंबून रहाण्याच्या वाढत्या सवयीमधे अशा लोकांचे नाव बरे/चांगले/उत्तम अभ्यासक अशी ख्याती मिळवू लागले आहे असे दिसते Happy

नंदन, हो. सध्या इंडियन मायथॉलॉजीवर आधारित पुस्तकांची डीमांड आहे. मी शिवाची तीन्ही पुस्तकं वाचली. ठिकच आहेत, पण अश्विन संघीचं क्रिश्ना की पाच पानाहून जास्त वाचू शकले नाही. अतिशय बाळबोध पुस्तक आहे.

<<भारतातील इंग्रजी वाचणार्‍या वर्गात सध्या स्युडो-धार्मिक (हा शब्द बहुधा बरोबर नसावा, पण तरीही वापरायचा मोह आवरला नाही स्मित) पुस्तकांचा खप वाढतो आहे का? शिवा ट्रिलजीसोबतच अलीकडे देवदत्त पटनाईक नावाच्या लेखकाच्याही काही पुस्तकांची नावं ऐकली (उदा. महाभारतावरचं जय).>>

फार काही ट्रेन्ड आहे असं नाही वाटत. इतरही अनेक विषयांवरची पुस्तकं येतच असतात. अलीकडे महाभारत माझे इंडियातले नातलग, मित्र तर बघायचेच पण इथले अमेरिकेतले फ्रेन्ड्सही बघायचे. इथे माबोवर बाफही खूप गाजला होता. पण त्यावरुन 'सध्या धार्मिक मालिकांचे दिवस आहेत' असं नाही म्हणणार. ही मालिका लोक मुख्यत्वे प्रेझेन्टे शन, बजेट, अभिनय आणि फास्ट-पेस स्टोरी यामुळे बघायचे.

मी शिवा सिरीज वाचली आहे. मला खूप आवडली पहिली दोन पुस्तकं. तिसरं (ओथ ऑफ वायुपुत्राज) जरा बोअर झालं. पुन्हा वाचण्याइतकी नाही आवडली पण वन टाईम रीड म्हणून चांगलं आहे.
देवदत्त पटनाईकांचं एक पुस्तक आणून ठेवलंय पण अजून वाचलं नाहीये.

वरदा सहमत. माझ्या माहितीप्रमाणे दाक्षिण्य हा शब्द पारंपारिक मराठीत आहे पण स्त्रीदाक्षिण्य ही संकल्पना -शिव्हॅलरी- आयातच झालेली आहे.

@ वरदा, मी मागेही कुठेतरी लिहिले होते या भारतीय इंग्रजीबद्दल. बरीच पुस्तके विशेषतः चेतन भगत स्टाइल ही भाषेच्या सौंदर्यात फारच मागे असतात. भारतीय इंग्रजीला एक फार मोठा कृत्रीमपणा आहे. कदाचित पुढच्या ५० वर्षात जेव्हा आपली (भारतीयांची) भाषाच इंग्रजीमिश्रीत होइल (उदा: वापर शब्द जाऊन युज हाच शब्द रूढ होणे असे) तेव्हा त्या भाषेतली पुस्तके अधिक सच्ची होतील (देशी?).

अगदी रोहिंटन मिस्त्रींची भाषासुद्धा कृत्रिम येते असे मला वाटले होते जेव्हा त्यांची पुस्तके वाचली होती. एक कथाकथनकार (म्हणजे वाचकाला कथा सांगणारा या अर्थाने) मला मिस्त्री आवडतात. विक्रम सेठचे सुद्धा तेच. पण सेठची इंग्रजी भाषा अधिक सोपी व सरळ आहे. त्यात कृत्रिमपणा कमी आहे, भारतीय इंग्रजी असले तरी. नुकतेच an equal music पुन्हा वाचले. का कोण जाणे पण त्यातला नायक हा ब्रिटिश वंशाचा न वाटता दुसर्‍या पिढीचा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरीक वाटत राहिला. म्हणजे त्याच्या भावविश्वावर भारतीय छाप ठळक दिसत राहिली. की सेठ भारतीय वंशाचे लेखक असल्याने माझ्या डोक्यात ती ओळख तशी राहिली कोण जाणे (पुस्तक प्रथम पुरुषी निवेदनात आहे).

भारतीय इंग्लिशबद्दल माझं प्रतिकूल मत अजिबात नाही. त्यात्या देशाप्रदेशाची भाषिक शैली थोडीफार वेगळी होणारच. विशेषतः इंग्लिश प्रथमभाषा नसताना.

चेतन भगत आणि तत्सम वाईट्ट लिहितात. पण अगदी आर के नारायणपासून बघितलं तर अतिशय समर्थ आणि आवडण्यासारखी इंग्लिश वापरलेली आहे. नारायण यांची तर अगदीच भारतीय छापाची साधी, सोपी पण तिला स्वत:चं सौष्ठव आहे. विक्रम सेठ मला एरवी फिक्शनसाठी आवडत नाही पण 'फ्रॉम हेवन्स लेक' मनापासून आवडलं. अमिताव(भ) घोषची भाषा अतिशय सुरेख आहे - मला त्याची 'इन अ‍ॅन्टिक लॅन्ड' आवडली, बाकीच्या आवडल्या नाहीत, फोफश्या वाटतात. पण त्याचंच 'डान्सिंग इन कम्बोडिया...' हे रिपोर्ताज पुस्तक मनापासून आवडलं. रोहिंटनची पण भाषा बर्‍यापैकी भावते. 'इंग्लिश ऑगस्ट'ची भाषा चपखल वाटली होती, जरी 'मॅमरीज..' कंटाळवाणं झालं. तसंच अरुंधती रॉय. मला गॉड ऑफ द स्मॉल थिंग्ज अतिशय भंपक वाटलं पण भाषाशैली सुरेखच आहे. या सगळ्या लेखकांना जे म्हणायचं आहे, पोचवायचं आहे त्यासाठी इंग्लिशचा अचूक, सुरेख, शक्य तिथे धारदार, असा वापर करण्यात आला आहे. तिथे ते ते लेखन दुसर्‍या भाषेत संभवत नाही असं निदान मला तरी वाटतं या सगळ्या लेखकांच्या पुस्तकांच्या साहित्यिक मूल्यांबद्दल मतभेद असूच शकतात (विक्रमसेठ च्या कादंबर्‍या वाचण्यापेक्षा मी हिंदी मालिका बघितलेल्या काय वाईट?) पण त्यांची भाषा मला तरी फार कृत्रिम वाटत नाही.

चेतन भगत, अमिष, संघी वगैरेंची भाषा फार 'पेडेस्ट्रियन' वाटते. तिला स्वत:चं रंगरूप नाही, त्या शब्दयोजनेमागे कुठले ठोस विचार, योजना वा उत्स्फूर्तता नाही - असं निदान मी जे काही छुटपुट वाचलं त्यावरून माझं मत झालं. म्हणजे धड कन्टेन्टही नाही, आणि बेचव सपक लिखाण. कशातच काही नाही.

अर्थातच टू ईच हिज ओन... कारण मला आवडत, वाचवत नसल्या तरी त्यांच्या कादंबर्‍या बेस्टसेलर्स आहेतच/

वरदा, तुझी निरीक्षणं पटली! साहित्य, संगीत सगळ्यात जे क्लासिक असतं ते इतर प्रकारांपेक्षा वेगळं कळून येतंच! हे थोडसं खाद्यपदार्थांसारखं आहे. भेळ वेगळी, श्रीखंड वेगळं आणि पोळी भाजी वेगळी. भेळेची भूक भेळच भागवू शकते पण श्रीखंडाला भेळेहून अधिक महत्व आहे. चांगलं वाईट ह्या खूप सापेक्ष कल्पना आहेत पण तरीही मला वाटतं उत्तम दर्जाचं पुस्तक वाचणं हे श्रीखंड खाण्यासारखं आहे! भेळेची श्रीखंडाशी तुलना करणं व्यर्थ आहे!

सध्या मी एक मस्त पुस्तक वाचत्येय! Graduates in wonderland नावाचं. कॉलेजमधून बाहेर पडल्यावर पुढची ३ वर्ष दोन घट्ट मैत्रिणींनी एकमेकींना लिहिलेल्या खऱ्याखुऱ्या इमेल्स आहेत. प्रत्येकीने आपल्या आयुष्यात काय घडतं आहे हे दर आठवड्याला दुसरीला कळवायचं असं त्यांनी कॉलेज संपताना ठरवलेलं असतं. जर अमेरिकन कॉलेज लाईफशी तुमचा कधी तरी संबंध आला असेल तर तुम्ही हे पुस्तक खूपच एन्जॉय कराल! अर्थात the book is more for girls than guys.

सध्या Max Hastings चे "Catastrophe 1914: Europe Goes to War" वाचत आहे. या लेखकाचे मी वाचत असलेले हे दुसरे पुस्तक. अत्यंत ओघवती भाषा आणि युद्धकाळातील सामान्य जनतेचे शब्दचित्रण यामुळे पुस्तक आत्ताच आवडले आहे(आता २३% पूर्ण झाले आहे). याआधी Inferno: The World at War, 1939-1945(अमेरिकन शीर्षक) हे पुस्तक वाचले होते. तेदेखील याच कारणांमुळे आवडले होते. तत्कालीन आणि सद्यस्थितीतील इतिहासकारांचा आढावा लेखनात घेतला आहे त्यामुळे पुस्तक अजूनच उत्तम झाले आहे.

जिज्ञासा, मला स्वतःला भेळ श्रीखंडापेक्षा 'क्लासी' वाटते Proud

गै.स नसावा, पण मला इथे क्लासिक्/उच्च अभिरुची अशा दृष्टीकोनातून चर्चा करायची नव्हती. मुळात लिखाणात माझ्यामते दोन गोष्टी अंतर्भूत असतात, एक कन्टेन्ट आणि दुसरं प्रेझेन्टेशन. लिखाणात जबरदस्त ताकद असेल तर ते वाचकाला स्वतःबरोबर फराफरा ओढत घेऊन जातं. पण बरेचदा लेखन - विशेषतः फिक्शन - हे बाजारपेठ बघून तसं केलेलं असतं. तेव्हा त्यात थोड्या गिमिक्स पण असणार ना. गैर काहीच नाही, कारण प्रत्येक लेखकालाच वाचकवर्ग हवा असतो. पण अशा वेळेला कन्टेन्ट साधारण असेल तर निदान भाषाशैली तरी आकर्षक पाहिजे. ती चे.भ., अ.सं, अमिष आणि त्यांच्या आसपासच्या कुणाचीच नाही वाटत सध्या. मधे एक कुणीतरी झोया (आडनाव आठवत नाही) तिचं चिक-लिट मधलं पुस्तक वाचलं होतं. एक क्रिकेटर हीरो होता. पुस्तक अगदीच सोसो होतं, पण तिची शैली चटकदार वाटली.
इंग्लिश पल्प फिक्शन बघ - टॉपचे बेस्टसेलर लेखक खरंच भाषा उत्तम रीतीने वापरतात. तसं सध्या आपल्याकडच्या लेखकांमधे दिसत नाही एवढंच निरीक्षण नोंदवायचं होतं. भारतीय वंशाच्या लेखकांच्या भाषेवर, पात्रांवर, त्यातल्या विश्वावर त्यांच्या अनुभवांचे संस्कार होतच रहाणार. फार क्वचित लेखकांना ते ओलांडता येतील - मग तो सिद्धहस्त वैश्विक लेखकच असेल. माझ्यामते नारायण त्याच्या खूप जवळ जाणारे आहेत. इतर एवढे महान नसले तरी त्यांच्या लेखनप्रभुत्वाविषयी मला आदर आहे - पुस्तकं मात्र बहुतेक सगळी फोफशी आणि/किंवा भंपक वाटतात. पण तो माबुदोस.

चे,भ च्या धाग्यावर चर्चा होते आहे तसं कोण काय वाचतं यावरून प्रत्येक वेळेला त्याचं पॅकेज नाहीच काढता येत. उगाचच उच्च अभिरुची, एलीटिसिझम वाचनात दाखवणं खूपदा हास्यास्पद वाटतं. जे आवडेल ते मनापासून वाचावं, सगळं ट्राय करून बघावं. एखाद्याची रेन्ज मिल्स अ‍ॅन्ड बून ते मुराकामी अशी असली म्हणून काय बिघडतं?? (मी त्या रेन्जमधे नाही, दोन्ही टोके वाचलेली नाहीत Wink )

शिवा ट्रायॉलॉजी मी वाचली आहे. गुड टीपी. काही काही गोष्टी छान जोडल्या आहेत त्यांनी, म्हणजे मला छान वाटल्या Happy मी अतिकल्पनाविलास करू शकत नाही. त्यामुळे तो कोणी केला आणि बर्‍यापैकी धागे जुळले, विशेषतः माहित असलेल्या गोष्टींबद्दल, तर मला आवडतं. तशीच ही पुस्तकं आवडली. केदारला अनुमोदन.

वरदा दोन्ही पोस्ट छान. मला असंच काहीसं म्ह्णायचं होतं. एकदा कमला नेहरू पार्क मध्ये भेळ गटग झालं पाहिजे.

जनरली मी लायब्ररीत जाताना पुढे काय वाचावे ह्या बाबतीत प्रिप्रेअर्ड असतो. पण ह्यावेळी बुक शेल्फ बघून एखादे पुस्तक उचलायचे असे ठरवले. पुस्तक चाळताना " अ गन फॉर सेल" दिसले. आणि त्यातील पहिल्या दोन तीन वाक्यांमुळे मी ते घेतले.

ग्रॅहम ग्रीन ह्यांनी हे पुस्तक १९३६ मध्ये लिहिले आहे आणि त्यावर १९४२ मध्ये द गन फॉर हायर हा पिक्चर देखील आला.

रेवन हा एक प्रोफेशनल असॅसिन आहे. त्याला एका माणसाला मारण्याची सुपारी दिली जाते. तो त्याला सहज मारतो. त्याच्या मारण्याबद्दलचे पैसे मिळतात, ते मात्र ज्याने दिले त्याचे नंबर पोलिसांकडे देऊन हे पैसे चोरीला गेले आहेत अशी तक्रार केलेली असते. रेवनला ते माहिती नसते. तो ते पैसे एका ठिकाणी वापरतो आणि मग पोलीस त्या चोराला पकडण्यासाठी सापळा रचायला सुरूवात करतात. पोलिसांना तो प्रोफेशनल आहे हे माहिती नसते आणि रेवनला माहिती नसते की त्याने ज्याचा खून केला आहे, तो वृद्ध माणूस, मंत्री हा युरोप मधील एक प्रसिद्ध माणूस आहे आणि त्याच्या खूनामुळे युरोप मध्ये युद्ध सुरू होणार असते. त्याला डबल क्रॉस केले गेले हे त्याला लवकरच कळते आणि तो त्याचा बदला घेण्यास सज्ज होतो.

पुस्तकाची सुरूवात पकड घेणारी आहे. "Murder didn't mean much to Raven. It was just a new job. You had to be careful. You had to use your brains. It was not a question of hatred." आणि शेवट पर्यंत ही पकड सुटत नाही.

पुढे काय होते? त्याला कोणी मदत करतं का? डबल क्रॉसर्स पर्यंत तो पोचू शकतो का? युद्ध होतं का? हे सगळं वाचणं इतकं थ्रीलिंग आहे की ते पुस्तक हातातून सोडवत नाही. एका दिवसात ते पुस्तक वाचून काढलं जातच.

अ गन फॉर सेल - ग्रॅहम ग्रीन

टिपिकल ग्रॅहॅम ग्रीन थ्रिलर. पण मला त्याचं थर्ड मॅन जास्त आवडलं होतं. कदाचित त्याचं वाचलेलं पहिलं पुस्तक म्हणून Happy

त्याचं बर्न्ट-आउट केस पण आवडलं होतं (हे थ्रिलर नव्हे).

Pages