फडे
पुण्याला आमच्याकडे तीन गॅलर्या आहेत. एका गॅलरीत आम्ही झाडे लावलीत. कुंडीतील गाळ फरशांना चिकटून राहतो. इथली माती लाल आहे. आमच्याकडे अकोल्यात मातीचा रंग असा आहे की लगेच आठवण होते - काळ्या मातित मातित तिफण चालते. तो गाळ बघून मी केरसुनी घेतली पण केरसुनी ओलीचिंब होऊन आठ दिवस सुकवत ठेवावी लागली. एक खराटा होता त्यानीही गाळ निघत नव्हता. आई म्हणाली फडा घेऊन ये.
मी मंडईत हरेक गल्ली .. हरेक बोळ फिरलो पण कुठेच फडा मिळाला नाही. काही जणांना विचारुन पाहिले की इथे फडा कुठे मिळेल तर मुळात फडा म्हणजे काय हेच इथे कुणाला ठावूक नाकी. आमच्या शेजारी गेलो ते मराठवाड्याचे आहेत त्यांनाही हा फडा कसा असतो माहिती नव्हत. एक शेजारी रत्नागिरीचे आहेत त्यांनाही माहिती नव्हत. अनायाचे अकोल्याला जाणे झाले. गाडीतून खाली उतरत नाही तर समोरच एक फडेवाली बाई दिसली. तिला बघून खूप छान वाटल आणि तिच्याकडून तिथल्या तिथेच दोन फडे विकत घेतले. ४० रुपये जोडी.
आमच्याकडे टोपली, फडे, सुप ह्या तिन्ही गोष्टी आम्ही दिवाळीला आणि लग्नाकार्याला विकत घेतो. त्याची पुजा करुन मगच त्या वापरायला लागतो. माझी आई पोळ्या भाकरी कधीकधी वाटीभर भाजी देखील दुरडीत ठेवते. पुण्याला अशा दुरड्या मिळतच नाही.
अकोल्याहून पुण्याला मी फडे घेऊन गेलो. एका फटक्यात गाळ निघून गेला. आमच्या वरचे शेजारी कुतुहलाने हातातील फड्याकडे बघत होते. मग मी तिथल्या लोकांना फडा कसा असतो ह्याची ओळख करुन दिली.
आमच्याघरी केरसुनी हा अलिकडला प्रकार घरी आलेला आहे. अकोल्यात आम्ही फडेच वापरतो. केरसुनीचे कण कण कित्येक दिवस खाली सांडत असतात. फडा घर अंगण ओटे ओसरी नाहणी सगळ्या घराची स्वच्छतेला उपयोगी पडतो. त्यातुलनेनी केरसुनी अगदी नाजूक आहे. खरटा फक्त पाने गोळा करायचा उपयोगी आहे. असो. फडा विकत घेऊन त्याची पुजा करुन घरात लक्ष्मी आली असे म्हणतात. पण फडा हा पुलिंगी आणि लक्ष्मी ही स्त्रिलिंगी. पण तरीही फड्याला जुन्या बायका लक्ष्मी माणतात. आपण नाही का संत ज्ञानेश्वराला माऊली म्हणत तसेच आहे आहे. पण बुद्धीमान लोकांना ह्यावर विश्वास बसणार नाही. अशावेळी अंधश्रद्धाळू होणे मला आवडते. फडा घेऊन घरदार लखलख झाले मी तन मन प्रसन्न होते. दरवेळी लक्ष्मी म्हणजे पैसा सोने हेच नव्हे. मनाची शांती ही सुद्धा लक्ष्मीचीच देण आहे. पण अगेन.. हे बुद्धीमान लोकांना पटणार नाही. त्यांचे असे आहे ना की. .बळी गेलेली बकरी ही श्रद्धेमुळे बळी गेली म्हणून आंकात असतो. आणि पोटात मांस गेले की ते अन्न म्हणून गेलेले त्यांना चालते. पण दोन्ही गोष्टीमुळे शेवटी एक जीव जातो ना.. असो. ही शेवटची दोन वाक्य विसंगत जरी तरी लिहावीशी वाटली म्हणून लिहिली. मनातील फड्यानी ती काढून टाका.
उदा: फडे.
उदा: फडे.
अकोल्यात अकोला नक्कीच मिळेल
अकोल्यात अकोला नक्कीच मिळेल परंतु पुण्यात अकोला मिळणार नाही पुण्यात फक्त पुणेच मिळेल
माणसाचा स्वभाव बाबतीत म्हणत आहे गैरसमज नसावा
मला वाटतं ४ ही पानांवर हे
मला वाटतं ४ ही पानांवर हे पुण्यात मिळतात असे तुला अनेकांनी सांगितलेय. पण केवळ तुला शोधता आले नाही किंवा फडे या नावाने मिळाले नाही म्हणून मिळत नाही म्हणतोयस.
बी तुला पुण्यात येऊन किती
बी तुला पुण्यात येऊन किती वर्षे झाली? तू शिक्षण की नोकरीनिमीत्त पुण्यात होतास ना पूर्वी? मग त्या वेळी पुणे काहीच पाहीले नाहीस? नसशील पाहीले तर आता बघ जरा शनीवार-रविवार हिन्डुन. कॅम्पात जा, तुळशी बाग मन्डई बघ. जूना-नवा दोन्ही बाजार-पूल बघ. सगळ्या पेठा पालथ्या घाल. आणी मग पुण्यात काय मिळत नाही ते सान्ग.
मी माबोवर लिहीले होते की नाही माहीत नाही. पण माझी एक मैत्रिण होती, तिचे आजोळ आणी काकाकडले सगळे धुळ्यातले. ती कायम म्हणायची आमचे गाव लई मोठ. ( तिचे गाव धुळ्याजवळ होते) तुमच पुण काहीच नाही. म्हणल चल, एकदा नेतेच. मग आणले पुण्यात. मामाकडे जाताना स्वारगेट्वर थाम्बलो, तेव्हाच तिची बोलती बन्द, नजर भिरभिरत होती. तोन्डातुन शब्द फुटेना. काय झाले विचारले तर म्हणाली आमचे गाव या स्वारगेट आणी सातारा रोड एवढे पण नाही.:स्मित:
पण केवळ तुला शोधता आले नाही
पण केवळ तुला शोधता आले नाही किंवा फडे या नावाने मिळाले नाही म्हणून मिळत नाही म्हणतोयस.>>> हो ना हे तुम्ही नगर रोडवरच्या एखाद्या भल्या मोठ्या मॉल मधे शोधले असेल तर नाहीच मिळनार. योग्य ठिकाणी शोधा ना.
जाउ दे.. कदाचित मला जे
जाउ दे.. कदाचित मला जे म्ह्णायचे आहे हे मला नीट व्यक्त करता येत नसेल ...
मला १९९७ पर्यंतच पुण माहिती आहे नंतर काय काय बदल झालेत माहिती नाही.
नताशाजी फडे आणि मॉलमधे
नताशाजी फडे आणि मॉलमधे ग्रेट आयडीया!
मला १९९७ पर्यंतच पुण माहिती
मला १९९७ पर्यंतच पुण माहिती आहे नंतर काय काय बदल झालेत माहिती नाही. <<
अरे देवा.. आम्ही सगळे ९७ नंतर जन्मलेले किंवा त्यानंतर पुण्यात दाखल झालेले आहोत की काय?
की तुळशीबाग, मंडई, जुनाबाजार, क्याम्पातल्या गल्ल्या वगैरे सगळे ९७ नंतर डेव्हलप वगैरे झालेय पुण्यात?
किती आडमुठेपणा!
मला १९९७ पर्यंतच पुण माहिती
मला १९९७ पर्यंतच पुण माहिती आहे नंतर काय काय बदल झालेत माहिती नाही. <<
अरे देवा.. आम्ही सगळे ९७ नंतर जन्मलेले किंवा त्यानंतर पुण्यात दाखल झालेले आहोत की काय?
की तुळशीबाग, मंडई, जुनाबाजार, क्याम्पातल्या गल्ल्या वगैरे सगळे ९७ नंतर डेव्हलप वगैरे झालेय पुण्यात?
किती आडमुठेपणा!
>>
जाउ द्या...त्यांना पुणे माहित नाहिये.ते फडे म्हणजेच केरसुनी अजुनपण दारावर येतात वीकायला...आणि मंडईत तर १२ महीने असतात्...काही मोठ्या उपनगरांम्ध्ये सुद्धा मिळतात १२ महिने...
तर, अशा प्रकारे फड्यांनी
तर, अशा प्रकारे फड्यांनी शंभरी गाठली................
पुढच्या वेळी पुण्यातल्या
पुढच्या वेळी पुण्यातल्या सगळ्या दुकानदाराना, फेरीवाल्याना आणी किरकोळ विक्री करणार्याना वैदर्भीय शब्द / पर्याय सान्गुन ठेव. म्हणजे ते तुला प्रत्यक्ष दाखवुन वाद घालतील. नाहीतर एखादा नागपूरकर्/ अकोलेकर पुण्यात आला असेलच कायमचा रहायला. त्यालाच गाठ, मजेने नाही सिरीयसली सान्गतेय. निदान तो तरी तुला समजावेल.
(No subject)
आता यापुढे अॅडमिन झाडूकाम
आता यापुढे अॅडमिन झाडूकाम करून धाग्यांची साफसफाई करतील तेव्हा त्यांना 'फडेकाम' करताहेत असे म्हणूया आपण.
(शुद्ध कापसाच्या वातीचा) दिवा घेणे
(No subject)
Pages