Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46
घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्याकडे
माझ्याकडे एक पुस्तक आहे '१४ मिनिटांत सैपाक'.. त्यात भरपुर युक्त्या आहेत वेळ वाचवण्याच्या... मी अजुन् वापरल्या नाहीत
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
१.
१. शोनूच्या भाषेत आ.स्व.पू ला पर्याय नाही (आठवड्याच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी)
भारतात तरी बायका मिळतात स्वयंपाकाला/ किंवा आस्वपूलाही / रोजच्या भाजी चिरायला वगैरे(हव्या असतील तर). आमच्याकडे पोळ्यांना बाई आहे. सकाळी ६:३० ला येते (माझ्या वेळात).
शिस्तीला पर्याय नाही. शक्य असेल तर विकली मेन्यू आठवड्याच्या भाज्या आणतानाच योजून ठेवावा.
खवलेला नारळ. किसलेलं खोबरं, वेगवेगळ्या भाज्यांच्या मसाल्यांच्या पूडं फ्रिजर मध्ये व्यवस्थित राहतात. भाजलेल्या दाण्याचा कूट, रवा भाजून ठेवणे, ति़ळकूट, जिरे पूड वगैरे सर्व वेळ मिळेल तसं करुन ठेवणे.
चिकट वेळखाऊ पदार्थ (कितीही मोह झाला तरी) विकांताला. चटण्या आठवड्याच्या. लोणची वार्षिक.
साधारण हलकं डिनर आणि व्यवस्थित दुपारचे जेवण अशी तयारी आरोग्याच्या दृष्टीने चांगली.
नोकरी आणि कम्युट सोडून माझ्याकडे दिवसाचे ३ तास असतात फक्त. ते लेकीसाठीच राखीव आहेत. घरी सगळ्यांना खाण्याची भलतीच आवड (मलाही). तर वेळेचं तंत्र प्राणपणाने जपावं लागतं. पूर्वी जपानला आमचे दोघांच्याही नोक-या वेळखाऊ, त्यात नव-याचे एक्झेक एमबिए. तो आठवड्याचे साती दिवस गायब. अशा वेळेला फक्त (अंगभूत नसलेल्या पण अतीव कष्टाने कमावलेल्या) व्यवस्थितपणामूळे तग धरता आला.
२. दुसरं- आपल्या प्रायॉरिटीज ठरवल्याने जीवाची घालमेल कमी होते. तुम्ही ब्येष्ट मदर,एम्प्लॉयी, बायको, गृहिणी सून वगैरे सर्वच होऊ शकत नाही. हे अत्यंत ठराविक वाक्य वाटलं तरी ही जाण येणे फार महत्वाचे.
मी फक्त गृहकृत्यदक्षपणा प्रुव्ह करायला रात्री एकेक वाजता दुस-या दिवशीचा स्वयंपाक/ लाडू वगैरे केलेले आहे. आता वयानुसार थोडे शहाणपण येते आहे हळूहळू. म्हणजे काही स्वयंपाक/लाडू वगैरे करु नयेत असं नाही, पण आपले काम खूप वाढले की काही काळापुरता पर्याय शोधावा. हे मला नव-याने शिकवले (खरंच).
३. घरातील इतर सदस्यांची मदत घेणे ही एक बहूत चातुर्यानी साध्य करावी लागणारी कला आहे. सुज्ञास सांगणे न. लगे आणि अज्ञास सांगून उपयोग काय अशा प्रकारचे हे विधान. ज्याला ज्याची आवड आहे ते काम त्याला सोपवावे (सरळसरळ). आमच्याकडील सर्व कपाटं ७५% वेळा आवरलेली असतात (खरंच). घरात कायम पाहूणे आणि माणसांचा राबता असताना देखील.कारण अर्थातच मी नाही. फ्रिजवर बाईंसाठी आठवड्यातून १दा व्यवस्थित कामं डिटेलवार लिहून ठेवते. ती तिनी आठवड्याभरात कधीही करावी. ७० टक्के तरी होतात (भलेही मी स्वतः केली तर अजून व्यवस्थित होतील) पण तरीही- खूप मागे लागणे सोडून द्यावे लागते. नव-याला स्वच्छतेची भलतीच आवड आहे, तर तो ती जवाबदारी बरीचशी घेतो.
४. ज्या वेळेला पाहूणे असतात त्यावेळेला बाईंना त्याचे वेगळे पैसे मी सरळसरळ देते. हे नणंदेकडून शिकले. (घरी कुरकुर होते म्हणून त्याबद्दल सासुबाईंना/आईला सांगत नाही. त्यांनी घर चालवलं तेवढ्या पैशात मी ते चालूच शकवत नाही हे मी मनोमनी मान्य केले आहे.) मी सुट्ट्या घेऊन किंवा रात्री अपरात्री घरकाम पुरे करण्यापेक्षा, आता हा मार्ग मी अवलंबला आहे. घरी ५ पोरं आठवडाभर एकावेळेस असल्यास ते घर टोर्नेडो आल्यासारखे दिसणारच. त्याबद्दल खूप गिल्टी वाटून घेऊन उपयोग नाही/नसतो. ह्यानी मार्केट प्रॅक्टिस बिघडते असं शेजारणी म्हणतात, पण ते बोलणे कानाआड करायचे. यु कांट मेक एवरीवन हॅपी ऑल द टाईम. माझ्याही लिमीट्सबाहेर गोष्टी गेल्या की स्वच्छ नाही म्हणते.
हे काही फार चांगल आहे असं नाही, पण सध्या मला एवढेच शक्य आहे. बाकीच्याजणी काय करतात याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
हे फार व्यक्तिगत होतेय का? तसं असेल तर उडवते.
हे बर्याच
हे बर्याच जणी करत असतील.
बटाटे शिजवून फ्रीझमधे ठेवावेत .... २-४ दिवस तरी टिकतात... ऐनवेळी कोणत्याही भाजीत व्यंजन म्हणुन खपतात. ओले खोबरेही असेच शनिवार- रविवार खोवुन फ्रीझरमधे ठेवता येते. ओला मसाला (वाटण) करुन ठेवणे.शक्यतो भाज्या चिरुनच , पालेभाज्या निवडुन ठेवता येतात जर एकदम आठवड्याची भाजी आणत असु तर. मी रवा पण भाजुन ठेवते टिकतो पण आणि ऐनवेळी शिरा , उपमा लवकर होतो.
रैना अगदी
रैना अगदी अगदी मी ही तेच तंत्र शिकतेय पर्यायांच
बाकी आठवड्याच्या भाज्या इतर पदार्थ ह्यांच प्लॅनिंग ह्याला पर्याय नाही. रैना ने लिहील्या प्रमाणे काही भाज्यांची तयारी आधीच करुन ठेवण, दाण्याच कुट, नारळ खोवण्/किसण, रवा भाजण तत्सम गोष्टी विकांताला करुन ठेवण. रोज रात्री कणीक मळुन ठेवण.
मला उपयोगी ठरलेल्या गोष्टी
फुड प्रोसेसर - कणीक मळण, कोबी चिरण (पावभाजीसाठी/ पिझ्झा साठी कांदा, कोबी, सिमला मिरची ५ मि. चिरुन होते) गाजर, काकडी छान चिरली जाते एकदा तंत्र जमल की
सुप करायला मायक्रोवेव्ह ची खुप मदत होते (१० मि. टोमॅटो+बिटरुटसेल तर कोबी, दुधी घालुन मस्त सुप होत)
हॅन्ड ब्लेंडर - हेच सुप ब्लेंड करायला मिक्सर पेक्षा सोयीच पडत, आंब्याचा रस ब्लेंड करायला, ताक करायला खुप मदत होते.
वेळ खाऊ भाज्या जस भरली वांगी, इ. भरल्या मसाल्याच्या भाज्या, वांग्याच भरीत आदल्या रात्री भाजुन ठेवल/ भरल्या साठीचा मसाला तयार करुन ठेवला तर दुसर्या दिवशी पटकन होते भाजी.
कांदा देखील स्टिलच्या डब्यात कापुन ठेवला रात्री तरी ५ मि. वाचतात सकाळची
दु.दिवशीचे कपडे, मुलांची शाळेची तयारी रात्री केली की सकाळची धावपळ कमी होते.
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
ओले खोबरे
ओले खोबरे एअर्टाईटच्या डब्यात भरून फ्रीझरमधे ठेवलं तर सहा महिने टिकते. मी घरून खवून आणते. सुके खोबरे पण असेच फ्रीझरमधे ठेवता येते.
बटाटे फ्रीझमधे ठेवल्यास त्याला वास येतो का? वाटण कसे करायचे??
--------------
नंदिनी
--------------
नंदिनी तू
नंदिनी तू खोबर, कांद्याच्या वाटणा विषयी विचारत्येस अस गृहित धरुन
कांदा उभा चिरुन भाजुन घ्यायचा, तो बाजुला काढुन खोबर (ओल) भाजुन घ्यायच .सुक घ्यायच असेल तर तसच घेऊ शकतो जर आधी भाजल असेल तर
लसुण पाकळ्या भाजुन घ्यायच्या
हे सगळ कोरड भाजल किंवा किंचित तेलावर भाजल तरी चालत. ते मिक्सर मधुन फिरवताना त्यात गोडा मसाला/ गरम मसाला (आवडी प्रमाणे), जिर पावडर, चिंच, लाल मिरचीच तिखट घालून थोड पाणी घालुन एकदम मऊसुत पेस्ट करायची. ही पेस्ट मसल्याची वांगी, मसाल्याची उसळ ह्यात चालते. शिजल्यावर थोडा गुळ घालायचा नी मिठ बस.
-------------------------------------------------------------------------
इतक्या सुंदर ववी करिता संयोजकांचे व सांस्कृतिक समितीचे आभार
हो टिकतो
हो टिकतो बटाटा फ्रीझमधे .. मी एअरटाईटच्या डब्यात ठेवते.
रैना,
रैना, चांगली पोस्ट.
<<दुसरं- आपल्या प्रायॉरिटीज ठरवल्याने जीवाची घालमेल कमी होते. तुम्ही ब्येष्ट मदर,एम्प्लॉयी, बायको, गृहिणी सून वगैरे सर्वच होऊ शकत नाही.>> हे सगळ्यात महत्वाचं.
आपल्या लिमिट्स ओळखुन त्या प्रमाणे अन तितकच काम करणे. जे काम आपल्याला करणं शक्य नाही ते घरातल्या इतरांकडुन करुन घेणे व ते शक्य नसेल तर बाहेरुन करुन घेणे. कामवाली बाई आपल्याएवढे स्वच्छ काम करणार नाहीच (भांडी, बर्याचदा पाण्याचा प्रश्ण असेल तर कपडे धुणे, बाथरुम्स स्वच्छ करणे, रोजची झाडणे-पुसण्याची कामे इ). पण आपल्यासाठी ही कामं करणे महत्वाचं आहे का ऑफिसातल्या जबाबदार्या, मुलांना वेळ देणे व आपली तब्येत हे ओळखणं गरजेचं आहे, आणि त्याप्रमाणे दुसर्यांकडुन करुन घेतलेल्या कामातील अव्यवस्थित्पणाकडे थोडेसे दुर्लक्ष करणे पण. ...
हे लग्नानंतर माझ्या मोठ्या जावेने मला समजावले.
आणि शिस्तीला व आठवड्याच्या पूर्वतयारीला पर्यायच नाही.
वाह.. मला
वाह.. मला फार उपयोगी पडणारा बीबी आहे हा..
वाचत आहे.. होपफुली उपयोग होईल माझ्यासारख्या आळशी मुलीला!
मला एक प्रश्न आहे : मसाले धने जिरे वगैरे पूड फ्रीझ मधे ठेवावी का? मी बाहेरच ठेवते नेहेमी.. पण बर्याच जणांकडे पाहीलेय की सर्व मसालेदेखील फ्रीझ मधे असतात..
www.bhagyashree.co.cc/
बटाटे
बटाटे फ्रीझमधे ठेवल्यास त्याला वास येतो का? >>> नाही. बटाट्याला पण वास येत नाही आणि फ्रीझला पण येत नाही. माझा रोजचा स्वयंपाक वाटणाचा नसल्याने फक्त खोबरं खवून फ्रीझरमधे ठेवलेले असते. तसे १०-१२ लिंबाचा रस काढून त्यात चमचाभर मीठ टाकून काचेच्या बाटलीत भरुन फ्रिझ मधे ठेवायचा (फ्रिझर मधे नव्हे) भरपुर टिकतो. धने, जीरे पावडर रविवारी भरपुर करुन डब्या फ्रिझरमधे ठेवाव्यात. वास जस्साच्या तस्सा रहातो.
रात्री घरी यायला उशीर झाला तर पटकन व्हावं म्हणून कुळीथ किंवा बेसनाचं पिठलं करतो तसंच गोळ्यांचं सांबार करावे.
उसळीसाठी मटकी थोडी जास्त भिजवायची. सगळ्याची उसळ केली तर दुसर्या दिवशी कांदा फरसाण घालून नाष्त्याला मिसळ होते. मोड आलेली जास्तीची मटकी वगळून ठेवली तर २ दिवसांनी रात्रीसाठी मटकीची परतून भाजी करायची किंवा फरसबीच्या भाजीत भरीला घालावी (फरसबी कमी लागते त्यामुळे तीचे दोर काढून चिरण्याचा वेळ कमी लागतो).
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
फरसबी कमी
फरसबी कमी लागते त्यामुळे तीचे दोर काढून चिरण्याचा वेळ कमी लागतो).
>> याला म्हणतात उपाय!!!
सर्वाना धन्यवाद.
मी एक स्पाँजचा तुकडा ओट्याजवळ ठेवते. गॅसवर जर रस्सा किंवा तेल वगैरे काही पडले तर पुसून घ्याय्चे आणि बेसिन मधे पाण्याखाली थोडा वेळ धरायचे. गॅस स्वच्छ करायचा त्रास राहत नाही.
--------------
नंदिनी
--------------
मी तरी
मी तरी धण्याची जिर्याची पावडर अन कोरडे मसाले वैगरे फ्रिझमध्ये ठवत नाही. माझ्याकडे धण्याची पुड वर्षाची, मसाले वर्षाचे केलेले असतात. जीर्याची पुड, मिर्याची पुड वैगरे पंधरा दिवसाला करते. अजुनतरी कधीच मसाला खराब झाला नाही. पण हे त्या त्या भागातल्या वातावरणावर अवलंबुन असते. इथे दिल्लीत किंवा घरी औरंगाबादला बर्यापैकी कोरडे हवामान असल्यामुळे टिकतात बाहेरही पदार्थ. मुंबईसारख्या दमट हवामानाच्या ठिकाणी बरेचसे मसाले फ्रिझमध्ये ठेवावे लागतात.
रैना,
रैना, तुझ्या टिप्स मस्तच. अंगी बाणवाव्या लागतील. अजुन लिही ग...
तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...
नन्दिनीने
नन्दिनीने एकूणच संसार फारच सिरियसली घेतलेला दिसतोय
लसूण सोलणे
लसूण सोलणे या प्रकाराला काही शॉर्टकट आहे का?
हो आहे. एक
हो आहे. एक रबराची नळी (२/३ इंच डायमिटर असलेली. आतून किंचीत पर्फोरेशन असलेली)टाईप येते, त्यात लसूण ठेवून रगडायचे. ब-यापैकी सोलून निघतात. काय म्हणतात कोण जाणे, कोणीतरी भेट दिलं होतं.
कविता- अगदी अगदी. हँड ब्लेन्डर आणि फु.प्रो बद्दल हेच मत.
अल्पना/भाग्यश्री- होगं- मुंबईत अजिबात बाहेर राहत नाहीत मसाले वगैरे. सर्वच फ्रीझरमध्ये.
हे बटाट्यांच माहीत नव्हतं. आता नक्की करणार.
ती रबरी
ती रबरी नळी आतून रेघावाली असते. त्याला लसूण घासला जाऊन सालं निघतात.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
लसूण सोलणे
लसूण सोलणे या प्रकाराला काही शॉर्टकट आहे का?>> दुसर्याकडुन सोलुन घ्यायचे
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.
अगदीच जर
अगदीच जर ते लसूणसोलणं नसेल तर घरातल्या छोट्या बत्त्याने (लहान खलबत्ता घरात असेल तर )त्यावर हळूच मारायचे. पटापट सालं निघतात आणि आपोआप अर्धवट ठेचलाही जातो.
आशु,
आशु, माझापण हाच उपाय. रॉबिनहूडा, संसार सीरीयसली घ्यावाच लागतो त्याचबरोबर जॉब पण सेरीयसली घ्यायला लागतो. त्यामुळे मग असे उपाय शोधावे लागतात.
फूप्रो मधे कांदा चिरण्यासठी कुठले ब्लेड वापरायचे?
--------------
नंदिनी
--------------
कंगोरे
कंगोरे धारवालं वापर. जास्त फिरवलंस तर कांद्याचा रस निघेल. अंदाज घेवून बटण दाब.
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
लसूण
लसूण सोलायचा उपाय इथे बहुतेक रेचेल रे च्या शो मधे पाहीला होता..
लसणाची पाकळी ओट्यावर ठेवून, त्यावर सुरी किंवा पट्टी धरायची.. आणि वरून बुक्की घातली, की मस्त सोलला जातो लसूण.. मी असंच करते!
www.bhagyashree.co.cc/
अगं बीएसके
अगं बीएसके ती सुरी/ पट्टी लागणार नाही का हाताला?? (हे सगळं वाचतेय मी माझ्या भविष्यकाळासाठी )
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.
यो, उभी
यो, उभी नाही गं धरायची. आडवी धरायची. आडवी पण तुझ्या हाताला लागली तर खरं नाही गं तुझं
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
लसणाची
लसणाची पाकळी ओट्यावर ठेवून, त्यावर सुरी किंवा पट्टी धरायची.. आणि वरून बुक्की घातली, की मस्त सोलला जातो लसूण.. मी असंच करते >>>> अग, रागवू नको पण हसू आवरलं नाही.. एकेक पाकळी ठेवून इतकं करण्यापेक्षा सोलण सोप नाही का?
हेहे
हेहे वाटलंच मला, विचित्र वाटतंय ते जरा वाक्य वाचायला!
चक्क व्हीडिओ मिळाला मला! हे बघा
http://www.bhg.com/videos/m/21895623/separating-and-peeling-garlic-clove...
अॅना_मीरा, एकेक कशाला, ओळीने लावून सामुहीक बुक्की मारायची! हाय काय अन नाय काय! :))
www.bhagyashree.co.cc/
लसुण न
लसुण न सोलता तसाच ठेचुन घातला फोडणीला तरी चालते.. मी काही पदार्थांमध्ये पाहिलाय असा लसुण...
शिवाय कोण काय बोलले तर म्हणायचे, आमच्याकडे असेच करतात...
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
ती रबरी
ती रबरी नळी माझ्याकडे आहे. पन काही लसूण चिवट असतो तो निघून येत नाही आणि फार रगडले तर लसून खूपच चिरडला जातो...
हो, पण
हो, पण शक्तीप्रयोगच की. आई/सासू/नवरा किंवा बाईकडून घ्यावी, टीव्ही पहात असाल तर तो मजेत न पहाता लसूण सोलावी.:( मुळात कमी खाणं असल तर कमी कष्ट. साधनाने सांगितल्याप्रमाणे एकनेक सालं काढण्याचे कष्ट घेऊ नयेत.
स्वैपाकघराच्या कॅलेंडरावरच्या रिकाम्या चौकटीत जिरेपूड्,धनेपूड्,शेंगदाणा चटनी करणे इ.इ. लिहून ठेवावे. तसेच रेघांवर पदार्थ जसा संपला तसा लिहीत जावा.
मी
मी आशूडी/बस्के सारखच करतो पूर्ण लसून ठेचून घेतो थोडा , वरच्या पाकळ्या व्यवस्थित निघतात मग स्वयपाकात लसूण सोलणे व कांदा कापने ह्या सारख्या कंटाळवाण्या गोष्टी नाहीत दुसर्या. 'मोअर' मधे रेडीमेड पॉकेट मिळते लसूण सोललेले तेच घेऊन येतो, कटकट नाही लसूण सोलायची.
Pages