Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46
घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आम्ही नवीन
आम्ही नवीन घरात रहायल गेलो आणि त्याच दिवशी ikea मधे जाउन बरण्या, डबे, इत्यादी सामान आणले. स्तेपल्स मधुन लेबलमेकर आणला. सगळ्या डब्यात धान्य घालुन, त्यावर नाव लिहुन मगच नविन कपाटात भरले. बरोबर १५ दिवसानी पाय मोडुन ३ महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. पण नवर्याने एकदाही - ही वस्तू कुठे मिळेल हे विचारले नाही.
मी रविवारी 'शक्यतो' कोणतेही आमंत्रण स्विकारत नाही कारण मग आठवड्याची कामे मार्गी लावता येतात. भाज्या धुवुन ठेवणे. काही काही चिरुन ठेवणे इतके तरी करतेच. पुढचा आठवडा जर अत्यंत धावपळीचा जाणार असेल तर २ भाज्या, एखादी आमटी आणि ५-६ चपात्या करुन ठेवते. माझा देखील साधरण दीड तास वेळ कम्युट्मधे जातोच.
कडधान्य भिजत घालताना २-३ एकदम घालायची. म्हणाजे सतत तेच काम करायचा त्रास रहात नाही. मी मूग, मटकी, मसूर या तिनही गोष्टींचे मोड एकावेळी करते.
काही गोष्टी भारतात जमतात त्या इथे जमतात आणि इथे जमतात त्या देशात जमत नाहीत. इथे दुध तापविणे, दही लावणे, ताक करणे-लोणी काढणे कराव्याच लागतात असे नाही. पण भारतात यातले ७०% टक्के तरी काम रोजचे करावेच लागते.
इथे मिळणारा लसणीचा गड्ड म्हणाजे देशातल्या छोट्या कांद्या एवढा मोठा असतो अर्थात लसूण सोलणे मला इतके जिकिरीचे वाटत नाही पण माझ्या वहिनीला त्रासाचे होते देशात. मम्मी तर रात्री टिव्ही बघते १/२ तास त्यात लसूण सोलणे येवढेतरी करुन ठेवतेच.
मी शक्यतो वाटण घाटाणाच्या भाज्या करत नाही त्यामुळे ते करुन ठेवायचा मला प्रशन येत नाही. टोमॅटो प्युरीचे क्युब करुन ठेवते. ओल्य खोबर्याच्या क्युब्स करुन फ्रीझर मधे ठेवते. माझ्या रोजच्या भाज्याना शक्यतो फक्त कांदा लसूण मसाला किंवा गोडा मसाला येवढेच असते. त्यामुळे बाकिच्या वाटणाची गरज पडत नाही.
माझी एक मैत्रिण कांदे (ते पण इथे तुफान मोठे मिळतात) ४-५ एकदम साल काढुन फक्त मधोमध चिरते. एका पातळ कपड्याच्या खाली १ दिवस पॅटिओमधे सुकवुन झिपलॉकमधे ठेवते. ऐनवेळी तेल तापवाला ठेवले की कापता येतो.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
मी रविवारी
मी रविवारी 'शक्यतो' कोणतेही आमंत्रण स्विकारत नाही >>> ओह म्हणजे रविवारी आमंत्रण देणारे पण असतात तर
स्वयंपाक
स्वयंपाक झाल्यावर किचन नवर्याला आवरायला सांगावं. ह्याला डिव्हिजन ऑफ लेबर म्हणायचं. त्याने स्वच्छ केल्यावर किती छान स्वच्छ केलं आहे, जस काही लक्ष्मीचा हात फिरल्यासारखं वाटतय असं म्हणायचं. जशी आपल्याला आपल्या स्वयंपाकाला दाद दिलेली आवडते तसच. गेली कित्येक वर्ष माझा नवरा हे काम आता आवडीने करतो. मागची आवराआवरीच खरं तर किचकट असते. त्यामुळेस्वयंपाक करतानाचा वेळ नवर्याला मुलांबरोबर आणि जेवणानंतरचा वेळ आपल्याला मुलांबरोबर मिळतो.
सिंडे,
सिंडे, नविन अॅडमिन येतील हा
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
स्वयंपाका
स्वयंपाकाच्या पूर्वतयारीत वेळ किती वाचतो याबाबत माझं जरा दुमत आहे.
नंदिनी तुला माझा अनुभव सांगते. सुरुवातीला म्हणजे जेव्हा आम्ही एकत्र रहायला सुरुवात केली तेव्हापासूनच स्वयंपाकाची विभागणी एकमेकांच्या सोयीने, आवडीने, एक्स्पर्टाईजने केली तरी रोज स्वयंपाक करायचा, किचन आवरायचं, स्टॉक करायचं याचं टेन्शन मलाच उगीच जास्त येत गेलं. त्याभरात मी खूप अशी तयारी वीकेन्ड्सना, रात्रीबेरात्री करुन ठेवायला लागले. पण मग काही गोष्टी लक्षात येत गेल्या.
*आधीपासून खूप तयारी केली की त्याप्रमाणेच मेनू झाले पाहिजेतचं दडपण वाढतं.
*आधीपासून ( सुकं खोबरं किसून ठेवणे, दाण्याचं कुट करुन ठेवणे याव्यतिरिक्त) इतरं वाटणं, पेस्ट्स (विकतच्या सोडून), भाज्या चिरणे, शिजवून ठेवणे आणि ते सगळं फ्रिजमधे ठेवणे हे प्रकार मी बंद केले. एकतर ज्या नवराबायकोंची डिमांडिंग करिअर आहे त्यांना रोज आपण जेवायला घरी असूच याची खात्री आधीपासून देता येत नाही. मेनू ऐनवेळी बदलू शकतो. निदान आमच्या बाबतीत असं होतंच होतं. लंच डीनर ब्रेकफास्ट मिटिंगा क्लायन्ट्सच्या सोयीने ऐनवेळी ठरु शकतात.
*सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचा रिलॅक्सिंगचा महत्वाचा वेळ पूर्वतयारीत जातो.
*फ्रिज मधे किंवा किचन कॅबिनेट्समधे क्लटर वाढते. क्लटर वाढली की स्ट्रेस येतो. पोषणद्रव्ये, चवी यावर परिणाम होतोच होतो आणि वाया जाण्याचं प्रमाणही जास्त असतं.
*स्वयंपाकघर अत्यंत स्वच्छ असणं ही जशी रिक्वायरमेन्ट आहे तशीच कपाटे, फ्रिज, किचन प्लॅटफॉर्म्स अनक्लटर्ड असणेही मस्ट आहे.
*स्वच्छता लगेच स्वयंपाक करुन झाल्यावर करत गेलं की मग वेगळा काही वेळ काढून करण्याची आवश्यकता कमी होते.
*वस्तू योग्य जागांवर ठेवण्याची शिस्त दोघांनीही लावून घ्यायलाच हवी कारण त्यामुळे खूप वेळ वाचतो आणि काय संपलय, वाया जातय हे लक्षात येतं.
*फ्रिज आणि किचनमधली इतर कपाटे भाज्या, फळे, कडधान्ये, अंडी, डाळी, मसाले, प्युरीज आणि पेस्ट्स (विकतच्या), सॉस, सिरिअल्स, पास्ता, नूडल्स वगैरेंनी वेल स्टॉक्ड असावीत नेहमीच आणि त्यासाठी वर पूनमने लिहिलय त्यापद्धतीत इन्वेन्टरी घेत रहावी हे मस्ट.
*आपल्याला रोज ज्या पद्धतीचा स्वयंपाक अपेक्षित आहे त्याच्या मेनूमधे अतिशय सोपेपणा आणणे. ब्रेकफास्ट आणि लंचचा मेनू शक्यतो स्टॅन्डर्ड ठरवून ठेवणे. डिनरचा मेनू फ्लेक्सिबल ठेवणे.
*आपल्याला आवरायला आणि स्वयंपाकाला एकुण किती वेळ लागतो त्याचं गणित पक्कं ठरवणे आणि त्याप्रमाणे 'लवकर उठणे'. हे अतिशय महत्वाचे आहे. रोज फक्त अर्धा तास रोजच्या वेळेच्या आधी उठलं( सवयीने हे सहजशक्य असतं) तर तुम्हाला सकाळचा वेळ योग्य मॅनेज करता येतो. अजिबात धावपळ होत नाही.
*रिलॅक्स रहायचं. वेळ असेल तर मोठा मेनू नाहीतर वन डिश मिल नाहीतर होम सर्व्हिस हे पर्याय तुम्हाला रिलॅक्स करतात.
*पुरुषांची मनोवृत्ती याबाबत फॉलो करावी. कामात सुटसुटीतपणा कसा आणावा यासंदर्भात त्यांच्याकडून काही महत्वाच्या टिप्स मिळू शकतात. त्या लगेच घ्याव्यात. एक पदार्थ तु एक पदार्थ मी किंवा एक दिवस तु एक दिवस मी (स्वयंपाक) असं ठरवूनच टाकावं (आणि खुशाल वाचलेला वेळ टीव्ही/डिव्हिडी/म्युझिक्/पुस्तकं/मायबोली यामधे घालवावा (स्वयंपाकाच्या पूर्वतयारीत नाही.)
मस्त आहे
मस्त आहे हा धागा. खूप उपयोगी! ह्यातल्या बर्याच गोष्टी मी ही करतेच जसे की रविवारी आठवड्याची तयारी करुन ठेवणे, स्वयंपाक करताना ओटा शक्य तेवढा स्वच्छ ठेवणे, नंतर (कितीही कंटाळा आल तरी) लगेच आवरुन टाकणे. डब्यांना लेबल्स मी पण लावली आहेत, नेहेमी वापरात नस्लेल्या गोष्टी पटकन शोधायला बरे पडते.
१-२ आठवडयातून एक दिवस मी आणि नवरा आपाआपल्या कलिग्ज बरोबर लंचला जातो. तेवढेच सोशलाईज पण होते. मग आदल्या दिवशी मी सोप्पेच काहीतरी बनवते (किंवा बाहेरुन आणतो). वीकडे मध्ये स्वयंपाकाला सुट्टी ह्याच्या सारखे दुसरे सुख नाही.
सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये >> पटलं
टयुलिप खुप
टयुलिप खुप मस्त पोस्ट. मी पण शनिवार रविवार काहीच काम करायच ठेवत नाही ग्रॉसरी एक दिवस आणि लाँड्री एक दिवस विक डेज मधेच करते .रोज जरा लवकर उठुन ब्रेक फास्ट, लंच आणि डिनर पण तयार करते, म्हणजे संध्याकाळ माझीच. एक मात्र करते जेव्हा ग्रॉसरी आणते पुढचे ८ दिवस काय करायचं आहे हे डोक्यात ठेऊनच जाते (किंवा लिहीते)
हुश्श..
हुश्श.. सापडलं कोणीतरी माझ्यासारखे..
मी जवळपास प्रीती सारखंच करते..
विकेंडला काहीच नाही लाँड्री सोडून!!
www.bhagyashree.co.cc/
ट्युलिप
ट्युलिप आणि प्रितीला अनुमोदन.
आ.स्व.पू. थोडीशीच करून ठेवते मी (जसं कडधान्य भिजवणे, एखादी भाजी निवडून ठेवणे). ग्रोसरी अठवड्याला एकदा करताना साधारण काय करता येईल आठवडाभरात हे असतं डोक्यात. पण ते बदलूही शकतं कधीकधी. त्यामुळे flexibility महत्त्वाची.
पूर्वी वीकेंडला खूप पूर्वतयारी करताना माझ्या असं लक्षात आलं की आठवड्याचे बाकी दिवस काम आणि पूर्वतयारी व्यतिरिक्त करायचा स्वयंपाक यात जातात. मग या पूर्वतयारीचही दडपण यायला लागलं. १-२ दिवस तरी relaxation चे हवेतच.
रोज अर्धा तास लवकर उठलं तरी वरणभाताचा कुकर, भाजी, कोशिंबीर होते. मग आजकाल तर मी जेवायच्या वेळेसच गरम पोळ्या लाटते. खाणार्यांनाही सुख.
एखाद दिवशी आज जेवायला काय करायचं या प्रश्नाचं उत्तर सापडायला स्वयंपाकापेक्षा जास्त वेळ लागतो म्हणून साधारणपणे आठवड्यात काय करायचं हे डोक्यात असू द्यावं. स्वयंपाकात विविधता आणली की monotony कमी होते.
सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये >> एकदम पटेश.
स्वातीच्या पोस्टलाही अनुमोदन. कुठलीच कामं कायमस्वरूपी संपत नाहीत त्यामुळे आपल्याला उत्साह वाटेल इतकी कामं करावीत.
आपल्याला
आपल्याला रोज ज्या पद्धतीचा स्वयंपाक अपेक्षित आहे त्याच्या मेनूमधे अतिशय सोपेपणा आणणे.
वेळ असेल तर मोठा मेनू नाहीतर वन डिश मिल >>>>
>>>>> या दोन्हीला माझं अनुमोदन. आठवड्याच्या मध्ये स्वयंपाकाकरता रोज २० मिनीटे... फारफारतर अर्ध्या तासाच्या वर वेळ देणे मला शक्य नसतं, आणि आवडतही नाही. तरीही शक्य तितकं 'बॅलन्स्ड' आणि ताजं खायचा प्रयत्न असतो. मी आठवड्यात क्वचितच ३-४ पादार्थ असलेला स्वयंपाक करते. पण वन डिश मील म्हणजे एका पदार्थातून सगळं न्यूट्रीशन मिळणं आवश्यक.
म्हणून मग कधी मिक्स भाज्या घालून खिचडी (आपण नेहमी खिचडीत डाळ कमी, तांदूळ जास्त घलातो त्याऐवजी डाळ-तांदूळ समप्रमाणात घालायचे... आणि एकच मुगाची डाळ घालण्याऐवजी सालीची मुगाची डाळ, मसूर डाळ, तूर डाळ याचे मिश्रण घालावे.. न्यूट्रीशनल व्हॅल्यू अजून वाढते), कधी मिक्स भाज्या घालून पास्ता, कधी मिक्स भाज्या घालून शिजवलेला ओट ब्रान असे वन डिश मील्स करते. इथे किनवा नावाचं धान्य मिळतं, त्याचं मिळतील त्या भाज्या आणि सिझनिंग घालून सॅलड पण चांगलं लागतं. सोबत हवी तर एखादी ब्रेड ची स्लाईस. वेगवेगळी सूप्सही करते, बरीचशी पटकन होणारी असतात. वन डीश किंवा शॉर्टकट मील असलं तरी न्यूट्रीशनच्या बाबतीत कुठेही तडजोड होत नाही.
भाज्या जमतील तशा फ्रेश/फ्रोझन वापरते. काकडी, गाजर, बीट, मुळा, लेट्यूस अशा सॅलडच्या भाज्या आणि वेगवेगळी फळे आहारात ठेवल्याने आहार 'हेल्दी' तर होतोच, पण या या गोष्टी शिजवाव्या लागत नसल्याने वेळही वाचतो. नुसती डाळ शिजवून वरण करण्यापेक्शा त्यात एखादी पालेभाजी घातली तर भाजीही खाल्ली जाते आणि डाळही. दोन्ही वेगवेगळं करत बसायची गरज नाही. आठवड्यात भाजी-पोळी केलीच तर भाजी अगदी साधी करायची. कांदा-बिंदा परतत बसायचं नाही. फ्रीज्/पॅन्ट्री मध्ये चटण्या, स्प्रेडड्स, सॉसेस, एखाद-दुसरं लोणचं वा साखरांबा, दाण्याचा कूट, किसलेलं खोबरं, खोवलेला नारळ, रेडीमेड सिझनिंग्ज/ ड्रेसिंग्स, आवडत असतील तर पापड यांचा व्यवस्थित स्टॉक ठेवल्याने मदत होतेच. वीकांताला मग जरा निवांत वेळ बघून साग्रसंगीत स्वयंपाक करते. स्वयंपाकाची हौसही भागते आणि जिभेचे चोचलेही
अर्थात आपण एकटे/दोघे असू तर असे बॅलन्स्ड शॉर्टकट साधणं सोपं असतं. घरात मुलं, मोठी माणसं किंवा इतर मंडळी असतील तर प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि पथ्यपाण्यानुसार रोजचा स्वयंपाक करणं म्हणजे कसरतच असणार!
आणिक एक म्हणजे ओटा/टेबल पुसण्याकरता cleaning liquid आणि पाणी दोन्हीचा (वेगवेगळा) स्प्रे वापरणे. हवं तेव्हा पटकन हातासरशी पाणी/लिक्वीड मारून थोडंसं काही सांडलं असेल तरी हात फिरवता येतो.
जेवन
जेवन झाल्यावर ईथे लिहु म्हटल तर मला जे लिहायचे होते ते ट्युलीप ने लिहीले
शनिवार / रविवार आजिबात आठवड्याच्या स्वयंपाकाची पुर्वतयारी करु नये. दोन सुखाचे दिवस असतात, ते पण किचन मधे... देवा.
त्यापेक्षा दोन दिवस मस्त आराम करावा, ज्याने बरे वाटेल ते करावे, उ.दा. शॉपींग (विन्डो हो) :), कुणाकडे तरी चहा साठी जावे, किंवा असेच काहीतरी. नाहीतर लोळत दिवसभर फोन फिरवणे...
तयारी कराविशीच वाटत असेल तर ती मंगळवार / बुधवारी करावी, मंगळवारी ऑफिस मधुन 5:30 ऐवजी 5:00 ला निघावे... घरी येवुन नाष्टा करुन ग्रोसरी करावी, बुधवारी जी काय दोन चार दिवसांची तयारी करावीशी वाटते ती करावी. त्यात कांदा नुसता कापुन ठेवण्याएवजी भाजुन, मिस्कर मधुन काढुन ठेवला की अजुन काम सोपे. आणि मग आठवडाभर कसला वास पण नाही.
Costco मधे आता प्रॉपर गव्हाच्या चपात्या मिळायला लागल्यात, त्या कधीतरी try करु शकता.
Trader Joe मधे बरेचसे सॉस मिळतात, ज्यात भाज्या टाकुन थोडा वेळ गरम केले की झाली भाजी तयार
try to be flexible on your food habits, and make sure you leave office by 5:30 or max 6:00
हा प्रश्न
हा प्रश्न खरे तर खेड्यातल्या जाणार्या स्त्रियांचाही आहे /होता. मागच्या पिढीतील स्त्रिया सकाळचा स्वयंपाक करून शेतावर जात. नन्तर दिवसभर शेतावर काम संध्याकाळी पुन्हा स्वयंपाक, तोही बर्याच जणांचा. यात पुन्हा कामाच्या शेअरिंगचा प्रकार अशक्यच. शेतकरी कुटुम्बात वन डिश मील ही तर परम्परा आहे. खेड्यात अगदी सुस्थितीतले लोकही वन डिश मीलचाच अवलम्ब करतात. मुद्दम नव्हे.भाकरी आणि एक भाजी. फार तर लोणचे. पापड चैन. चटण्या चैन. कोशिम्बीर माहीतच नाही. सर्व न्यूट्रिअन्ट च्या बाबतीत म्हणाल तर रोज वेगळा मेनु असल्याने ते सगळे आपोआप बॅलन्स होत असावे.तसेही आपण रोज अगदी ए ,बी,सी, डी. व्हिट्स, लोह, याचा हिशेब करत बसत नाही. खानदेशात आम्ही असताना तिथे शेतकरी कुटुम्बात बाय डिफॉल्ट संध्याकाळी रोज तांदळाची खिचडी असायची. नन्तर तो प्रकार बायकांचे संध्याकाळचे श्रम वाचवण्याचाह प्रकार होता असे लक्षात आले...
सखीप्रिया , फार दिवसातून दर्शन? कुठे होतीस एतके दिवस?
try to be flexible on your
try to be flexible on your food habits >> हे एकदम बरोबर माणुस
शनिवार - रविवार मलाही आवडत नाही स्वयंपाकाची पुर्वतयारी करायला.. त्यापेक्षा नविन-नविन प्रयोग करुन पहावे त्या दिवशी.. प्रयोग फसला तर बाहेर जाउन हादडता येते..
मला स्वयंपाक करायचा कंटाळा नाही.. पण त्यानंतरची भांडी घासायला जाम वैताग येतो
कुणाच्या त्यावर टिप्स ?
आणि मला कच्च्या बटाटाच्या साली सोलायला त्रास पडतो...त्यासाठी काय करावे ?
०-----------------------------०
खगोलशास्त्रावरील मराठी संकेतस्थळ
खानदेशात
खानदेशात आम्ही असताना तिथे शेतकरी कुटुम्बात बाय डिफॉल्ट संध्याकाळी रोज तांदळाची खिचडी असायची. >> अगदी अजुनही. असली तर सकाळची भाजी असते बरोबर अन्यथा काहीही नाही.
माणसा, तू एकटा रहातोस, एकट्याचे कसेही भागते/ वेळ अॅडजस्ट करता येते. २+ लोक असतील तर बराच विचार करावा लागतो. आणि रोज लंच बाहेर घेणे नेहेमीच शक्य नसते त्यामुळे वीकेंडला अगदीच कष्ट उपसत नाही बसायचे पण अगदी लोळुनही नाही काढायचा दिवस.
~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~
स्वयम्पाक
स्वयम्पाक हा CPM & PERT तंत्राचे उत्कृष्ट उदाहरण आहे असे म्हणतात यावर कोणी भाष्य करू शकेल काय?
------------------------------------------------------------------------------------ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...
(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)
बाहेरून
बाहेरून मागवणे याने पोटाची काय वाट लागते इथे देशात त्याला तोड नाही आणि घरच्या अन्नाला पर्याय नाही.
पण मुंबईसारख्या ठिकाणी फ्रिजमधेसुद्धा भाज्यांची expiry date लवकरचीच असते.
आमच्यासारख्या कुठलीच काळवेळ ठरलेली नसलेल्या लोकांसाठी इतकी खूप सारी आठवडी तयारी करून ती सगळीच वाया जाण्याची शक्यता असते. आणि आठवडी तयारी करायला आठवडी सुट्टी मिळतेच असं नाही.
त्यामुळे मी ओला नारळ खवून एअरटाइट डब्यात फ्रीझरमधे ठेवणे, लसूण सोलून एअरटाइट डबीत फ्रीझरमधे ठेवणे यापलिकडे काही करत नाही.
शक्यतो किमान २ ते ३ भाज्या फ्रिझमधे असतील असं बघते. गवार टाईप असेल तर मोडलेल्या आणि पालेभाज्या असतील तर निवडलेल्या. एकदोनदा स्टार बझार, बिग बझार इत्यादी ठिकाणाहून मोडलेली गवार आणली होती जी निवडत बसण्यात माझा वेळ गेला. त्याचे दोरे तर काढलेलेच नव्हते आणि त्यात शेंडेबुडखे सगळंच होतं गवारीचं. तेव्हापासून भरपूर वेळ असेल तर गवार आणायची आणि मोडूनच फ्रिजात टाकायची असं सुरू केलंय.
कणीक एका वेळेला २ दिवसांची भिजवून ठेवते म्हणजे दोघांपुरत्या पोळ्या आयत्यावेळेला करायला काहीच वेळ लागत नाही.
चिरायलाच/ सोलायलाच वेळखाऊ असलेली फळं कलिंगड/ टरबूज अशी किंवा मग डाळींबासारखी एकदाच काय ती करून ठेवणे. म्हणजे मग पाहीजे तशी घेता येतात. सफरचंद, पेअर, संत्री, मोसंबी मात्र आयत्यावेळेलाच.
फळांचं सगळं नवरा बघतो. आणि जेवताना पानं घेणं/ जेवल्यानंतर सगळं आवरणं हे काम नवर्याचं.
बाकी सगळी कामं माझी.
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
भारतात
भारतात राहण्यार्या लोकांसाठी एक चांगला पर्याय म्हणजे उत्तम मेस/थाळी देणारे हॉटेल शोधणे. घरात खाल्लं काय आणि बाहेर खाल्लं काय, एकच. आजकाल जवळपास सगळीकडे अशी हॉटेल/मेस उपलब्ध आहेत. एखाद दिवशी बदल म्हणुन घरात स्वयंपाक करावा. त्यातसुद्धा अशी मेस हुडकावी जिथे फारसा तिखट स्वयंपाक नसेल, रोज तोच मेनु असेल. म्हणजे लॉ ऑफ अॅव्हरेजेसनुसार सुद्धा बरेच दिवस बरे जेवण मिळू शकते. अर्थात मुलं वगैरे झाल्यावर हे चालेल का नाही ते माहिती नाही. पण साधारण मुल पहिली-दुसरीत गेलं की त्याला पण त्या मेसमध्येच न्यायचं. आपल्याला लहानपणापासून उगाचच भरपूर चविष्ट पदार्थ खिलवून बिघडवलेलं असतं. नुसतं सलामी खाउन युरोप जगतोच की. किंवा दुपारी डाळ-कांदा-भाकरी, रात्री चटणी (तिखट)-तेल-भाकरी खाउन आयुष्य काढणारे अनेक लोक आहेतच. थोडक्यात काय तर रोज घरात सर्व स्वयंपाक करणे ही आपली एक प्रकारची मानसिक-सांस्कृतिक गुलामगिरीच आहे
त.टी.: हे भाषण मी घरात अनेकदा दिलेले आहे आणि त्याचा शून्य उपयोग झालेला आहे. तेव्हा इथे होइल अशी अपेक्षा नाही. हे भाषण दिल्यावर मासाहेब म्हणतात की घरचं खाउन-पिउन सोकावला आहेस म्हणुन सुचतय असलं सगळं
ट्युलिप.
ट्युलिप. चांगली पोस्ट.
मला बाहेरून जेवण मागवणे हा प्रकार पटत नाही. आणि नवर्यालातर बिल्कुल आवडत नाही. एक तर त्या सर्व पंजाबी भाज्याची चायनीस डीशेसची चव सारखीच असते. वर त्यामधे कसले तेल वापरलय्/हायजिनची अवस्था काय आहे इत्यादि विचार करून ते नकोसं होतं.
त्यातही मी संध्याकाळी ऑफिसमधून येताना काहीतरी "खाऊ" घेऊनच येते. म्हणजे घरी गेल्या गेल्या मला किचनमधे जायला नको.
मी सकाळी साडेपाचला उठते. फ्रीझमधून कणिक काढणे, भाजी काढणे, दूध तापवणे वगैरे कामे सर्वात आधी. सकाळी चहा पिता पिता पेपर वाचणे आणि आजच्या कामाचे लिस्ट करणे इतकी कामे होतात. त्यानंतर भाजी चिरणे (हे भाजीवर अवलंबून असते, भेंडी वांगी वगैरे रात्री चिरून ठेवता येत नाहीत.) भाजी मी बर्याचदा प्रेशरपॅनला शिजवते. पटकन होते आणी चव पण चांगली लागते, यानंतर माझ्याकडच्या पोळीवाल्या मावशी येतात (साधारण सातपर्यंत) त्या पोळ्या बनवेपर्यंत मी आवरून घेते.
डबा भरणे/कचरा काढणे/ कपडे इस्त्रीकरणे ही नवर्याची कामे आहेत. उरलेली भांडी तोच घासून घेतो. मी स्वयंपाक करत असताना जमेल तित्की भांडी घासते.
मला रोज वेगवेगळा ब्रेकफास्ट लागतो, त्यामुळे कधी ऑर्न फ्लेक्स, कधी पोहे कधी डोसे, कधी फोडणीचा भात कधी पोळीचे रोल असे मी बनवते. सोबत एक ग्लास दूध किंवा फ्रूट असे घेते. ७:४५ ला मी घराबाहेर पडतेच. ७ ५५ किंवा ८ ची ट्रन पकडून ऑफिसमधे.
नवरा साधारण सहापर्यंत घरी येतो. आल्यावर घर आवरणे कपडे मशिनला फिरवून घेणे. गरज असल्यास भाजी चिरणे/ कूकर लावणे ही कामे त्याची. मी आठनंतर येते. आल्यावर थोडंसे काहीतरी खाऊन (शक्यतो सँडविच किंवा फ्रूट ज्युस असे काहीतरी) मी भाजी/आमटी फोडणीला टाकून घेते. सोबत कोशिंबीर किंवा दही असतेच. खूपच उशीर झाला तर वन डिश मिल हा पर्याय असतो. मग खिचडी/वरण फळ किंवा (फ्रीझमधे पीठ असल्यास डोसे/इडले/गुंडपंगला) हे बनवते.
रात्री दिवसभराच्या गप्पा मारत मारत भांडी घासणे. दही लावणे, कणिक कालवणे, पिठ भिजवणे ही सर्व कामे होतात. आमच्या घरात टीव्ही नसल्यामुळे लॅपटोपवर एखादा पिक्चर बघणे (थोडाफार) किंवा पुस्तक वाचणे असे करत साधारण साडेअकराला दिवस संपतो.
वीकेंडला मी पूर्वतयारीचे काहीही टेन्शन घेत नाही. सर्व मसाले मी विकत आणते. आले लसणाची पेस्ट, टोमॅटो प्युरी सर्व विकतचे. चटणी आणि एखादी स्वीट डिश बनवून ठेवते (गुलाब जामुन, बासुंदी, रसगुल्ला इत्यादि) नवरा गोडखाऊ आहे. तो ऑफिसम्धून आल्यावर यापैकी थोडेसे खाऊ शकतो.
पण वीकेंडला वेगळं काहीतरी बनवून बघण्यचा माझा प्रयत्न असतो. प्ण त्यामधे अख्खा दिवस जाणार नाही याची काळजी घेते. शनिवारी हायपर्सिटी/बिग बझार ला जाऊन भाजी/ग्रोसरी आणते. शनिवारी डीव्हीडीवर पिक्चर बघत बघत भाज्या निवडून होतात. मग त्याला हवे असतील ते मसाले (भरली वांगे वगैरे बनवायचे असेल तर) लगेच बनवून ठेवते. घर पुसून घेणे/जास्तीचे कपडे धुणे/स्वच्छतेची अजून काही कामे हे सर्व नवत्रा बघतो.
रविवारचा दिवस हा सुटीचा दिवस असतो. या दिवशी काय करायचं ते अजिब्बात ठरवत नाही.
भरपूरशी कामे सतिश करत असल्यामुळे मला तसे फारसे टेन्शन नसते. पो़ळ्ञाच्या जचातून सुटका झाल्याने मला सकाळी निवांत पेपर वाचता येतो. ऑफिसच्या कामाकडे लक्ष घालता येते.
सवयीने आता काय लवकर जमेल कशाला वेळ लागेल हे समजायला लागलय. आधी इडली डोसा वीकेंडला बनवायचे पण आता कमी वेळ लागतो हे बघून वीकडेला पण बनवते. यामधे शक्यतो आरोग्याकडे बघण्याचा प्रयत्न करतो पण ते नेहमीच जमते असे नाही.
रैनाचे पहिले पोस्ट पटले. पण त्याचबरोबर आपल्या विविध भूमिकामधे असताना आपण दुसरी भूमिका सोडू शकत नाही हे तित्कंच खरे आहे. ऑफिसमधे असताना रेसिपीज वाचणे असो किंवा घरी भाजी चिरताना मंथली रीपोर्टचा विचार करणे असो.... आपण एका वेळेला एका ठिकणी नाही राहू शकत. हे जेव्हा जमायला लागेल तेव्हा स्ट्रेस लेव्हल कमी होइल. प्रत्येकाच्या क्ष्रेत्रानुसार आणि कामानुसार यात्फरक पडू शकतो पण दिवसाच्या शेवटी आजचा दिवस कसा वाईट गेला याचा विचार करणं किंवा उद्याचा दिवस किती मस्त असेल याचा विचार करणं यापैकी काय करणें हे आपल्या हातातच आहे.
--------------
नंदिनी
--------------
टण्या
टण्या
अरे!
अरे! लिहायला आले तर ७४ पोस्ट्स!
असो, रैनेच्या पोस्टमधले १-४ सगळे मुद्दे एकदम पटले, मी साधारण तसेच करते, नवरा पण बरोबरीने मदत करतो. ट्युलिपशी पण सहमत. पूर्वतयारी आणि नियोजन याचे कधीकधी दडपण येतेच, तेव्हा प्रायॉरीटी काय ते ठरवूनच करावे.
आणि नंदिनी, तू पण व्यवस्थित सगळे करतेयस की!
*पुरुषांची
*पुरुषांची मनोवृत्ती याबाबत फॉलो करावी. कामात सुटसुटीतपणा कसा आणावा यासंदर्भात त्यांच्याकडून काही महत्वाच्या टिप्स मिळू शकतात. त्या लगेच घ्याव्यात. >> मी जेव्हा हे विधान केले तेव्हा मला टण्याकडून हे 'असे' पोस्ट टाणकन येईल हे अपेक्षित नव्हते अर्थातच मानसिक-सांस्कृतिक गुलामगिरीचे तुझे विधान काही संपूर्णपणे चुकीचे नाहीच आहे अर्थात. त्यात ठरावीक प्रकारच्या 'चवींचे गुलाम' हेही अॅड करायला हवेय.
आणि खरय टण्याचं. साधं, घरगुती चवीचं, स्वच्छ हातांनी बनवलेलं तयार जेवण रोज उपलब्ध का होऊ नये निदान शहरांतील बायकांना? आमच्या पार्ल्यात पूर्वी रामानंद मधे एक जोशीकाकू असे डबे घरपोच द्यायच्या. आईची पीएचडी चालू असताना आणि एरविही तिच्या कॉलेजात परिक्षांचा सीझन असताना आमच्या घरी खूपदा ते यायचे. आम्हाला जोशीकाकूंची आमटी आणि कितीतरी भाज्या (ज्या एरवी आईच्या हातच्या जबरदस्ती संपवायचो) जास्त आवडायच्या. पोळ्याही अगदी मऊसुत असायच्या. आता तसे काही पर्याय मोठ्या प्रमाणांवर शहरांतून मिळाले तर करिअर विमेन आणि त्यांचे नवरे कितीतरी सुखी होतील.
रॉबिनहुडची ग्रामिण खाद्यसंस्कृतीची पोस्टही अगदी 'डोळे उघडवणारी' आहे. आवडली.
आता तसे
आता तसे काही पर्याय मोठ्या प्रमाणांवर शहरांतून मिळाले तर करिअर विमेन आणि त्यांचे नवरे कितीतरी सुखी होतील.
>>> असे काही पर्याय असले तरी थोड्या दिवसांनी त्यात तोच तोच पणा येतो. (मी हॉस्तेलवर असताना डबा लावलेला.) आणि मला आता मस्त कांद्याचं थालिपीठ आणि लोणी खावंसं वाटतय तर माझा डबेवाला देइल का?? नाही ना?? मग ठेवा घरामधे थोडी भाजणी.
रॉबिन, तुमची पोस्ट पण आवडली. कोकणात पण बहुतेकदा नाश्त्याला पेज असते. प्वाटभर पेज प्यायलं की दुपारपर्यंत पोटोबा शांत.
--------------
नंदिनी
--------------
रैना,
रैना, ट्युलिप, रॉबिन सगळ्यांच्याच पोस्ट उ त्त म! मार्गदर्शक!
टण्या ! टणीची मज्जाय!
नवीन लग्न झालेले असूनही अजून तरी मला या दिव्याला सामोरे जावे लागले नाही हे भाग्यच समजायचे. सा.बांचे वर्किंग अवर्स , कामाचे टेन्शन माझ्या वरताण असूनही दोन्ही वेळेस व्यवस्थित स्वयंपाक! दर चतुर्थीला मोदकांचा नैवेद्य, सुटीच्या दिवशी हमखास खास मेनू, घर अगदी घडी घातल्यासारखं नीटनेटकं..बाहेरचं जेवण ३-४ महिन्यातून एकदा.. शिवाय एक दिवस सुटी आणि एक दिवस हाफडे मध्ये नातेवाईकांचे समारंभ, भिशी, गाण्याचा क्लास आणि त्यांच्या आजारी आईला भेटायला जाणे हे सगळं न चुकता..! आणि एकदाही कंटाळा.. दमणूक असे शद्बही नाहीत..गेले सहा महिने मी फक्त निरीक्षणातून शिकतीये कसं जमवतात हे सगळं..पण या सगळ्यात बाबांचे जे सहकार्य त्यांना मिळतं त्याला तोड नाही! (कधी सा.बांना उशीर झाला यायला तर बाबा चतुर्थीला मोदकही करुन ठेवतात! )
आशु सहि
आशु सहि आहे तुझ्या घरचे............ त्या कश्या manage करतात ते शिकुन झाल कि आम्हाला सान्ग म्हणजे आम्हि जरा सुधारु .......
काल नंदिनी
काल नंदिनी आणि यो च्या सांगण्याप्र्माणे स्वयंपाक चालु असतानाच ओटा आवरणे चालु ठेवले.. मग काय पडले महागात..
संध्याकाळी शेवटची भाकरी तव्यात टाकल्यावर शिस्तीत परात धुवून ठेवले.. मग भाकरी उलटवून ओटा आणि गॅस पुसायला घेतला.... तवा खुप जोरात भाजला मला...
~~~~~~~~
पिल्लु
पिल्लु छोटा, गरम तव्याला हाताने उचलायचा सल्ला मी आणि योने दिला नव्हता. गरम तवा उचलून बाजूला ठेवणे इतके तरी स्वयंपाकघरात सुचायला हवे, नाहीतर कठीण आहे.
--------------
नंदिनी
--------------
मला पण
मला पण ट्युलिपच म्हणण पटल. विकएंड्ला आपण एवढ सगळ करत राहिलो तर स्वतःला वेळ कधि देणार.
पिल्लू,
पिल्लू, गॅस चालू असताना, तवा गरम असताना गॅस पुसायची घाई काय गं? आजू बाजूचे आवरुन घ्यायचे मग तवा गॅसखाली सरकवून द्यायचा. जेवून घ्यायचे, तोपर्यंत तवा गार होतो. मग तव्याशी खेळायचे तर खेळायचे तू तुझ्या स्वयंपाकघरात एक बर्नॉल्ची ट्युब पण ठेवत जा
***************
ॐ नमश्चण्डिकायै |
अगं गधडे
अगं गधडे पिल्ले डोळे आणि मेंदु ऑफ मोडवर ठेवुन वावरतेस का ग किचनमध्ये??
-------------------------
अंधेरा मांगने आया उजाले की भिख हमसे,
अपना घर ना जलाते तो क्या करते हम.
मग तव्याशी
मग तव्याशी खेळायचे तर खेळायचे >>
पाहिजे तर गाणेही म्हण मग.. "मि तवा... मि तवा... "
Pages