Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46
घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपण आपले
आपण आपले comforts विकत ध्यायचे. उदा सोललेला लसुन, आल लसुण पेस्ट, निवडलेली ,मेथी.. आणी रविवारी तयारी करण्यात इतका वेळ घालवला तर आराम कधी करणार? परत उरल अन्न तर काय करायच ?
खालील गोष्टींमुळे बराच वेळ
खालील गोष्टींमुळे बराच वेळ वाचु शकतो:
१. दुसर्या दिवशी सकाळी करायची भाजी आद्ल्या दिवशी रात्रीच फ्रीज मधुन काढुन चाळणीत धुवुन, चाळणी ओट्यावर ठेवता येते. उदा. तोंडली, भेंडी, वांगी इ. सकाळी उठुन काय भाजी करावी असा प्रश्ण पडत नाही मग. रोजच सकाळी काय करायचे ते रात्रीच योजुन तरी ठेवावे.
२. कणीक २ दिवसांची भिजवुन फ्रीज मध्ये ठेवणे.
३. ओलं वा कोरड खोबरं खवुन वा किसुन, कोथिंबीर निवडुन बारीक चिरुन एअर-टाइट डब्यात ठेवुन देणे.
४. धिरड्याचे पीठ, भाजणी एखाद्या महिनाभराची करुन ठेवावीत, हि विकत जरी आणली एखादे वेळेस कधी, तरी गिल्टी नको वाटायला.
५. जिरे पुड, धणे पुड सुद्धा २-३ महिन्या पुरत्या करुन ठेवता येतात.
मी रोजच्या पोळ्या, निवडा-निवडी, भाज्या चिरणे, इ. साठी सरळ बाई ची मदत घेते, मला विकली ऑफ फक्त रविवारी असतो, रोज ऑलमोस्ट १० तास ऑफीस + कम्युट. सगळ्यात महत्वाचं 'सुपरवुमन होण्याचा प्रयत्न करु नये' हे पटलंय, रादर ते आपोआप आचरणात येतं काही वर्षांनी, प्रायोरीटीज ठरवणे खरोखर महत्वाचे.
महाउपयोगी बीबी ! एका दमात
महाउपयोगी बीबी ! एका दमात वाचुन काढला.. दोन्ही वेळेला घरचं अन्न बनवणार्या बायांना साष्टांग दंडवत..ये मेरे बस की बात नहीं!
प्रयत्न करतेय सध्या..
'सुपरवुमन होण्याचा प्रयत्न
'सुपरवुमन होण्याचा प्रयत्न करु नये'
१००%
छान,उपयुक्त बीबी आहे हा! मी
छान,उपयुक्त बीबी आहे हा!
मी ईड्ली,डोसा,ढोकळा ई. साठी गिट्स ची इन्स्ट्न्ट पीठे आणते. वेळ आणि व्याप तर वाचतोच पण व्हरायटी पण भरपूर मिळते! थोडा फेरफार करुन वेगवेगळया प्रकारची धीरडी, पॅनकेक, आप्पे ई. पण बनवता येते. पालेभाज्या निवडण्याचा जाम कंटाळा येतो. त्यामुळे ते काम आउट्सोर्स( नवरा अर्थातच)! गिट्स ची पीठे वापरलेली चांगली असतात ना पण?
नुपुरने इथे खुप चांगली माहिती
नुपुरने इथे खुप चांगली माहिती लिहिली आहे. २० मिनिटात ताजा स्वयंपाक कसा करता येतो त्याची.
http://onehotstove.blogspot.com/2011/02/dinner-in-20-minutes-and-blog-bi...
भांडी सिंक मध्ये न टाकता , त्या त्या वेळी डिश वॉशर मध्ये टाकत राहिल तर बराच वेळ वाचतो.
चांगलाय की हा बाफ माझा एकच
चांगलाय की हा बाफ
माझा एकच पण उपयोगी सल्ला -
Outsource the repetitive, monotonous, non value adding work and retain the core competencies with you
मला आणि नवर्याला दोघांनाही दोन्ही वेळेला ताजे, घरचे जेवण मिळणे, हे महत्वाचे वाटते (अनेक वर्षं बाहेर खाल्ल्याने जरा जास्तच). आम्ही स्वयंपाकाला बाई ठेवलिय. पण ती पोळ्या, कुकर, भाज्या-फळं चिरणे, किसणे/निवडणे/सोलणे वगैरे करते. आम्हाला चव (कशात काय घालायचं) आणि कुठला पदार्थ किती शिजवायचा/किती पाणी /कुठली पद्धत इ. गोष्टी स्वतःच्या आवडीप्रमाणे व्हाव्यात असे वाटत असल्याने फोडण्या घालण्याचे काम शक्यतो मीच करते. (यासाठी सकाळी २० मिनीट आणि रात्री २०-३० मिनीट नेहमीच्या साध्या जेवणासाठी). दिवसाची आवराआवरी बाई तर रात्रीची नवरा करतो.
बाईला शिकवणे हा पर्याय आहे, पण बाया टिकत नाहीत हा स्वानुभव असल्याने तो बाद. न शिकवलं तर आहेच भेंडीच्या भाजीत कढीपत्ता/ मेथीच्या भाजीत टोमॅटोचे तुकडे वगैरे त्यापेक्षा कँटीन बरे..
शिवाय स्वयंपाक (म्हणजे मी जे करते ) केल्याने ऑफिसातील कामानंतरचा ताण दूर होतो आणि त्यासाठी लागणारी तयारी बाईने केल्याने अतिरिक्त ताण येत नाही.
जेव्हा अजिबातच वेळ नसतो तेव्हा ही बाई जे करेल ते खायचे. तिला साधारण २-४ साध्या भाज्या/वरण इ. शिकवल्यात.
कधी तळण झाले की उरलेल्या
कधी तळण झाले की उरलेल्या तेलात लगेच मोहोरी हिन्ग आणि हळद घालून ती फो़ड्णी मी बाट्लीत भरून ठेवते मिसळणाच्या ड्ब्याच्या वर. चार पाच दिवस चमचा चमचा कोशिम्बिरीला वापरते. दर वेळेस फोडणी करायचा व्याप वाचतो. आणी तेल नन्तर तापवावे पण नाही लागत. दर वेळेस तळणीचे तेल टाकून द्यायचे जीवावर येते म्हणून.
sumedhav, तुमची तळणीचे तेल
sumedhav,
तुमची तळणीचे तेल वापरयाची पद्धतीने 'वेळ वाचवायची' नाही तर 'वेळ जायची' वेळ येइल. असे तेल वाचवाल तर नुकसान आहे तुमच्या तब्येतीचे. बाकी तुमची मर्जी. चांगल्या अर्थाने सांगतेय,चेष्टा नाही करत आहे.
हो ध्वनी इज म्हणिंग राईट. वेळ
हो ध्वनी इज म्हणिंग राईट. वेळ वाचवण्यासाठी तब्येत कॉम्पेनसेट नका करू. तळणीचं तेल परत वापरू नये असं वाचलंय. त्यामुळे जेवढं गरज असेल तेवढेच तेल वापरा.
ध्वनी आणि आडो, बरोबर आहे
ध्वनी आणि आडो, बरोबर आहे तुमचे.
चांगला बाफ. ओटा स्वच्छ
चांगला बाफ.
ओटा स्वच्छ ठेवण्याची एक युक्ती:
पोळ्या करताना, कणीक मळताना खाली जुने वर्तमानपत्र पसरून त्यावर परात, पोळपाट ठेवून पोळ्या करा किंवा कणीक भिजवा, भाजी निवडा - चिरा इ. इ. माझ्या बहिणीच्या सासूबाईंची ही पध्दत आहे. त्यामुळे टेबल किंवा ओटा फारसे खराब होत नाही. सांडलवंड झालीच तर ती वर्तमानपत्रावर होते. काम झाले की वर्तमानपत्र उचलून कचरापेटीत झटकायचे, पुन्हा घडी करून ठेवून द्यायचे.
अरु, मी हि असेच करते पोळ्या
अरु, मी हि असेच करते पोळ्या करताना...फक्त पेपरच्या ऐवजी कॉटनच्या साडिचे फडके टाकते. जे कि नंतर धुवायला टाकता येते.
पोळ्या करताना, कणीक मळताना
पोळ्या करताना, कणीक मळताना खाली जुने वर्तमानपत्र पसरून त्यावर परात, पोळपाट ठेवून पोळ्या करा ......सांडलवंड झालीच तर ती वर्तमानपत्रावर होते.>>>>
ओके ओके. म्हणजे आमच्या कडे पूर्वी संध्याकाळच्या स्वयंपाकाला असलेल्या बाईंनी पोळ्या करताना पोळपाटाखाली ठेवण्यासाठी वर्तमानपत्र मागितले याचे कारण हे आहे तर! आणि माझ्या साबांना वाटले की पोळपाटाचा बेस सपाट नसल्याने लाटताना ते मागे पुढे होत असल्याने एका जागी रहावे म्हणून ती बाई वर्तमानपत्र मागतेय.
(स्वयंपाकाच्या बाईनेच मागची ओट्याची सफाई करून जावी अशी बोली असते. तेव्हा तिच्या दृष्टीने तिचा नंतर मागचे आवरण्याचा वेळ व मेहेनत वाचविण्याचा हा एक पर्याय असावा.)
पोळपाटाचा बेस सपाट नसल्याने
पोळपाटाचा बेस सपाट नसल्याने लाटताना ते मागे पुढे होत असल्याने एका जागी रहावे म्हणून >> माझ्याकडचे दोन्ही पोळपाट मी लाटताना सरकतात. तेच स्वयंपाकवाली किंवा जाबा करताना नाही सरकत.. मला कपडा टाकावाच लागतो
निंबु जेव्हा कामवाली बाई
निंबु
जेव्हा कामवाली बाई बरेच दिवसांसाठी सुट्टीवर जाते / दांड्या मारते आणि खरकटी भांडी स्वच्छ करण्यासाठी डिशवॉशरसारखा पर्याय नसतो तेव्हा वेळ वाचवण्यासाठी व काम सोपे करण्यासाठी :
१. एका टबात गरम पाणी + डिटर्जंट सोप असे मिश्रण तयार करून त्यात खरकटी भांडी किमान दहा-पंधरा मिनिटे बुडवून ठेवा. भांड्यांचा ओशटपणा इत्यादी बराचसा निघून जातो. मग घासणीचा हात फिरवून साध्या पाण्यातून भांडी काढली तरी लगेच ती स्वच्छ होतात.
२. जेवणासाठी बाहेर तयार पत्रावळी, द्रोण मिळतात, ते वापरू शकता. स्वयंपाकासाठी नॉनस्टिक भांड्यांचा पर्याय वापरला तर ती भांडी तुलनेने लवकर स्वच्छ होतात, पदार्थ जळत नाही, लवकर शिजतो. लाकडी कलथे/ डावही तुलनेने लवकर स्वच्छ होतात. अशी ३-४ मोजकी भांडी वापरून स्वयंपाक करणे जास्त सोयीचे जाते.
३. दिवसभरात साठणार्या कपबशा, पेले, मग, चमचे हे डिटर्जंटच्या पाण्यात जरा वेळ बुडवून ठेवले तर लगेच स्वच्छ होतात. शक्यतो हातासरशी ते साफ करावेत, पण घाईच्या वेळी अनेकदा तसे जमत नाही. स्वच्छ कपबशा, चमचे इत्यादीची गरज भासली की ते आपोआप धुतले-घासले जातात.
आज दिवसाची सुरुवात रैनाची
आज दिवसाची सुरुवात रैनाची पोष्ट वाचून केली आणि अगदी योग्य बाफ उघडला असं वाटतंय..खूप सारे मोदक देता येत नाहीये कारण किती हि वेळा स्वतःला समजावलं तरी एक्सेप्ट करता येत नाहीये ..
आमच्या घरी पण शेम टू शेम स्टोरी घरात पोर असून सुद्धा ७५%वेळा टाप टीप असतं ..अर्थात श्रेय नवर्याला..
सुपरवूमन व्हायच्या फंदात पडू नये आणि न केलेल्या कामांचा स्ट्रेस (>> स्वाती आणि मेधा ते तर एकदम बेष्ट गर्भाशय नाही म्हणून.
खूप खूप गरज होती ह्या वाक्यांची.. काल रात्री बारा पर्यंत बसून सगळं साफसूफ करत बसले आणि अगदी हेच ठरवलं कि जेव्हाच्या तेव्हा काम उरकायची.. .. फक्त पोरांमुळे कधी कधी ते शक्य होत नाही ..मग खूप चीड चीड होते.. रैना म्हणते तसं शहाणपण लवकरच येयील बहुतेक ... परत प्रयत्न करेन आता..
संपदा मस्त पोस्ट बर्याच उपयोगी गोष्टी कळतात आहेत..
अकु १. टीप मस्त.. माहितीये पण करेल कोण आता करत जाईल.
शिस्तीला व आठवड्याच्या पूर्वतयारीला पर्याय नाही १००% .. !!!!
माझी अमेरीकेत राहणारी आतेबहीण
माझी अमेरीकेत राहणारी आतेबहीण महिन्यातल्या एखाद्या विकांताला कांदा-टोमॅटो चांगले परतून, त्यात हळद, तिखट, मीठ, गरम मसाला वगैरे घालून मिक्सरवर बारीक वाटून पातळसर मिश्रण तयार करते. तिच्याकडे जरा मोठा बर्फाचा ट्रे आहे त्यात हे घालून त्याचे बर्फासारखे तुकडे करून फ्रीजर मध्ये ठेवून देते. रोजच्या भाजीला घालायची ग्रेव्ही तय्यार!
काय एकापेक्षा एक टिप्स दिल्या
काय एकापेक्षा एक टिप्स दिल्या आहेत... मस्तच... अजुन पुर्ण धागा वाचुन काढला नाही, वाचुन काढेन वेळ मिळेल तसा.... टिप्स देणारया सर्वांना धन्स
इन्टरेस्टिंग डिस्कशन
इन्टरेस्टिंग डिस्कशन आहे..धागा वर काढल्याबद्दल धन्यवाद यशस्विनी!
परदेशात असलेल्यांचेही अनुभव वाचायला आवडतील जिथे कामाला पेड हेल्प मिळत नाही व पोळी-भाजी विक्री केंद्रे नसतात.
हा जुना बाफ वाचुन मजा
हा जुना बाफ वाचुन मजा आली.
मेधाचे "गर्भाशय नसल्यामुळे" पोस्ट वाचुन (पुन्हा एकदा ) खूप हसले.
रॉबिनहुडचे कांद्याचा वास पोस्ट वाचुन
हे मी मा बो सदस्य नसताना
हे मी मा बो सदस्य नसताना वाचले होते. खूप उपयोग झाला होता मला. त्यावेळी प्रतिसाद दिला नव्हता म्हणून आत्ता '' धन्यवाद. ''
मेधाचे "गर्भाशय नसल्यामुळे" पोस्ट वाचुन (पुन्हा एकदा ) खूप हसले. पण खरच दृष्टीकोनात बदल झाला होता त्या वेळेला.
फारच उपयुक्त चर्चा. सतत वर
फारच उपयुक्त चर्चा. सतत वर रहायला पाहिजे हा बीबी.
पूर्ण धागा वाचला नाही, पण
पूर्ण धागा वाचला नाही, पण पहिल्या पानावर लसूण सोलण्याबाबत चर्चा आहे.
लसूण पाकळ्या पाच मिनिटं पाण्यात भिजत ठेवायच्या, मग बाहेर काढून सोलल्या/ ठेचल्या की सालीचे तुकडे न पडता पूर्ण साल निघून येते, बरेच सोपे जाते.
चपाती करण्याचा वेळ वाचावा
चपाती करण्याचा वेळ वाचावा म्हणून कणिक मळण्यास फुप्रो आणि लाटणे ,शेकण्यास रोटी मेकर वापरता येईल का
आदु,
आदु,
फुप्रोत कणिक मळल्यास वेळ वाचेल. अशा मळलेल्या कणकेचे गरजेनुसार भाग करुन फ्रीजर मधे ठेवणे शक्य असेल तर आठवड्यातून एकदाच कणिक मळणे प्रकार करावा लागेल. (माझी एक वहिनी तसे करते.) रोटी मेकर मधे पोळ्या करायचे तंत्र जमणे, त्या पोळ्या आवडणे हे व्यक्तीनुसार बदलते.
अवांतर होईल पण स्वयंपाक
अवांतर होईल पण स्वयंपाक घरातील पालींना कसे पळवून लावावे? आणि एकंदरीत स्वच्छता कशी करावी कमी वेळात ?
Pest control
Pest control
पालींची फूड चेन (कोळी झुरळे
पालींची फूड चेन (कोळी झुरळे चिलटे) पहिले घालवणे
पेस्ट कंट्रोल दर 6 महिन्याला
दारे खिडक्या उघडी न ठेवणे
पालीला लपण्यासाठीच्या जागा कमीत कमी असणे
इथे बघा बरं काही मिळतंय का ?
इथे बघा बरं काही मिळतंय का ? mi_anu यांची परवानगी ना घेता बिनधास्त शेअर करत आहे
https://www.maayboli.com/node/64886
Pages