वेळ असा वाचवला जाऊ शकतो!

Submitted by नंदिनी on 22 July, 2009 - 02:46

घरामधे काही काही कामं खूप कंटाळवाणी असतात. कित्येक कामांना भरपूर वेळ लागतो. आधीच्या पिढीमधल्या बायका सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. आताच्या आमच्यासारख्या मुलीना ते जमणं शक्य नाही. उलट अर्ध्या तासांत पूर्ण स्वयंपाक ही काळाची गरज आहे. तशीच उपकरणं देखील उपलब्ध आहेत. या बीबीवर अशाच "वेळ वाचवण्याच्या" उपायांवर चर्चा करावी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनावधानानी झाले रे..... Sad

~~~~~~~~
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर
पश्चाताप होतो, अशा लोकांनी सरळ दुपारीच उठाव...

ट्यु,
त्या डबेवाल्या बाई मला अजून सापडल्या नाहीयेत.

पण हल्ली आमच्या ऑफिसवर एक डबा येतो. जो छान असतो. त्यामुळे लंच बाबतीत मी निर्धास्त असते. पार्ल्यात भाकरी (ज्वारीचीच..) करून देणार्‍या कोणी बाई सापडल्या नाहीयेत अजून आणि मला भाकरी अजिबात येत नाही. त्यामुळे सध्या पुरेपूर कोल्हापूर च्या भाकरीवर समाधान मानतेय. त्यांची बरी असते पण इथे पुण्यात नातुबागेतल्या महिलाश्रमात करतात ना तशी खमंग नसते. भाकरीशिवाय संध्याकाळच्या जेवणाला मजा नाही.
त्याही सापडतील कधीतरी मग मी पूर्णपणे निर्धास्त आणि निर्लज्ज होईन.

मग कधीतरी हौस म्हणून, वेळ मिळालाच आणि मूड असलाच तर म्हणून किंवा वेगळंच काही खायची हुक्की आलीच तर मी त्या वाटेला जाईन. अन्यथा जय हिंद जय महाराष्ट्र..

टण्या,
तुझी पोस्ट बाबा खरंच आवडली. Happy
आणि मीनाताईंची कॉमेंटही..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हे वाचल्यावर सगळ वाचल्यावर << वेळ असा घालवला जाऊ शकतो! >> जास्त योग्य वाटतय Lol

टण्याच्या पोष्टीला अनुमोदन.

इथे सिंगापुरात स्थानिक चिनी, मलय जनता सहसा फूडकोर्टांतच जेवते. अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि उगीच तळकट, तेलकट, अनारोग्यकारक नसतात. सुपं, उकडलेल्या गोष्टी, वगैरे भरपूर आणि फूडकोर्टंही व्यवस्थित स्वच्छ असतात. भारतीय जनता लिटल इंडिया भागात ताज्या भाज्या वगैरे घेत असते (आणि मग घरी जाऊन शिजवणार असते) तेव्हा सिंगापूरकर मुलाबाळांसकट फूडकोर्टात संध्याकाळी ७, ७.३०ला जेवून घेतात. कुटुंबासोबत वेळच वेळ मिळतो. स्वयंपाक घरीही करतात पण सठीसामाशी. बरं, हे बाहेरचे जेवण महागही पडत नाही.

आजकाल हा पर्याय बरा वाटायला लागला आहे (अजून संपूर्णपणे अंगी बाणवला नसला तरी). Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

तेव्हा सिंगापूरकर मुलाबाळांसकट फूडकोर्टात संध्याकाळी ७, ७.३०ला जेवून घेतात.
>>>

हे सिंगापुरचं प्रातिनिधिक चित्र आहे? नसावं. गोरगरीब, मजूर, मध्यमवर्गीय देखील फूडकोर्टात जेवतात? की याना सिन्गापुरात स्थानच नाही? नाहीतर रविवारी संध्याकाळी जे एम रोड अथवा एफ सी रोड एखाद्या ह्युएन्त्सान्गने पाहिला तर भारतातले विशेषतः पुण्यातले लोक जेवण हॉटेल्,रेस्टौरन्ट्मध्येच घेतात असे लिहून ठेवायचा.

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

याला दोन बाजू आहेत.
घरच्या अन्नाची महती आमच्यासारखे भारतात सदासर्वदा बाहेरच जेवावे लागणारे लोकच सांगू शकतील.
एकतर बाहेरचं जेवण महाग असो वा स्वस्त त्याची क्वालिटी रोज खाण्यासाठी पोटाला अजिबात न पेलणारी असते. अपवाद काही घरगुती डबेवाल्यांचा. पण काहीच. बाकी बर्‍याचदा सोडा घालून शिजवलेला फडफडीत भात, तेलात पोहणार्‍या भाज्या असा प्रकार असतो.डबा चांगला असलाच तरी डबेवाल्यांच्या बाबतीत सगळ्यात मोठ्ठा प्रॉब्लेम आमच्यासारख्यांचा होतो तो म्हणजे खूप आधीपासून सांगावा लागतो किती जणांचा डबा हवा ते. गेलं, केली ऑर्डर आणि घेतलं बांधून पार्सल असं मुळीच होत नाही. डबा घरी लावला तर डबेवाला घरी येईल तेव्हा आपण घरात असू याचीही गॅरंटी नसतेच.
या सगळ्यावर उपाय म्हणून मग घरात स्वैपाकाला बाई लावणं किंवा स्वतः करणं अपरीहार्य ठरतं.

श्रद्दा, मी वाट बघतेय की अशी फूड कोर्टस जिथे खरंच रोज खाल्लं तरी पोटाला त्रास होणार नाही अशी... कधी सुरू होतील भारतात..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हे सिंगापुरचं प्रातिनिधिक चित्र आहे? नसावं. गोरगरीब, मजूर, मध्यमवर्गीय देखील फूडकोर्टात जेवतात?<<<<<<
रॉबिनहूड, होय. सर्वसाधारण लोकही जेवतात फूडकोर्टांमध्ये. इथे सर्वांना परवडू शकेल अशा दरातली फूडकोर्टे आहेत. अगदी एखाद डॉलरात भाताचा पुरेसा वाटा, करी आणि मासा/चिकन/भाजीचा एखादा वाटा देणारीही बजेट फूडकोर्टे आहेत. वरच्या दर्जाच्या फूडकोर्टांतूनही एखादे 'इकॉन राईस'सारखे स्वस्तात जेवण देणारे दुकान असते. लोकांना आपापले दिवसाच्या जेवणाचे बजेट आखून त्यातून योग्य पोषण देऊ शकेल असे जेवण घेता येते.
इथल्या सर्वसाधारण जनतेची शरीरप्रकृती बघितली तरी फूडकोर्टांत जेवण्याची ही पद्धत चुकीची वाटणार नाही. Happy

नीधप, खरोखर. भारतातली प्रचंड वेगाने बदलणारी जीवनशैली बघता अशा गोष्टी याव्यात असे वाटते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संतों की बातें मान भी ले, इस मे ही भलाई तेरी है...
तकदीर का सारा खेल है ये, और वक्त की हेराफेरी है...

भारतात राहण्यार्‍या लोकांसाठी एक चांगला पर्याय म्हणजे उत्तम मेस/थाळी देणारे हॉटेल शोधणे. घरात खाल्लं काय आणि बाहेर खाल्लं काय, एकच >>>> अगदी योग्य बोललास टण्या. पु ल वाचले काय किंवा नेमाडे वाचले काय एकच. तेव्हा आता तू एक काम कर. घरी जेवणे बंद करुन एक मेस लाव. रोज व्यक्ती आणि वल्ली अथवा स्वामी अथवा महोत्सव किंवा तत्सम पुस्तक घेऊन त्या मेशीत जाऊन वाचता वाचता जेवत जा किंवा जेवता जेवता वाचत जा. म्हणजे घरी भाषण देण्यात तुझा वेळ जाणार नाही आणि तू मानसिक-सांस्कृतिक-साहित्यिक गुलामगिरीतुन मुक्त होशील Wink

दिवे घेशीलच Happy

तेव्हा आता तू एक काम कर. घरी जेवणे बंद करुन एक मेस लाव. >>> Happy गेली १० वर्षे हेच करतोय अगं..

>>>
रोज व्यक्ती आणि वल्ली अथवा स्वामी अथवा महोत्सव किंवा तत्सम पुस्तक घेऊन त्या मेशीत जाऊन वाचता वाचता जेवत जा किंवा जेवता जेवता वाचत जा.
>>>
नाही, जसे चवींचे गुलाम असतात तसे साहित्याचे पण असतात ना Happy

म्हणुन तर तू मानसिक-सांस्कृतिक-साहित्यिक गुलामगिरीतुन मुक्त होशील असे म्हणाले मी Wink

श्रद्धा , तुझी पोस्ट वाचुन धक्का बसला... प्रचंड धक्का बसला.

एक प्रातिनिधीक उदाहरण सांगते, नवर्‍याच्या ऑफिसातला एक लोकल सिंगापूरीअन मित्र तब्ब्येतीने धडधाकट, (सडपातळ आणि उंच अन उत्साही) मध्यंतरी त्याने हेल्थ चेकप केले ज्यात त्याचे हाय कोलेस्तेरॉल निघाले आणि त्याला डॉक्टरांनी त्याला सक्तीचे घरचे जेवण करायला सांगितले. आता तो आणि त्याची बायको दोघेही नोकरदार असूनही घरी गेल्यावर भारतीय जनते प्रमाणे घरचेच जेवण बनवतात आणि खातात.

नवरा फार्मा कंपनीत असल्यामुळे काही माहिती :

सिंगापूरमध्ये खुप मोठ्या प्रमाणात त्वचारोग आहेत. त्याचे कारण बाहेरचे जेवण हेच एकमेव दिले जाते. हृदयविकाराचे प्रमाणही खुप वाढत आहे. अगदी सडपातळ दिसणारे लोकही धाडकन हृदयविकाराने मरतात. इथले लोकल मासिक वाचलेस तर कळेल की प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरात इथले डॉ घरचे जेवण हाच उपाय देतात.

इथे लक्षपूर्वक पाहिलेस तर इथल्या लोकांची प्रतिकारशक्ती खुप कमी असते. सतत घरातला एक सदस्य सर्दी ताप खोकल्याने आजारी असतो.

तुझ्या पोस्टमध्ये मला तुझे बर्‍यापैकी गैरसमज दिसतात. ते एक हितचिंतक म्हणुन मी दूर करण्याचा प्रयत्न करतेय.

इथे सिंगापुरात स्थानिक चिनी, मलय जनता सहसा फूडकोर्टांतच जेवते. अनेक पर्याय उपलब्ध असतात आणि उगीच तळकट, तेलकट, अनारोग्यकारक नसतात.
>>>>>>>> चुक. इथल्या जेवणात खुप तेल वापरतात. तेही वाईट तेल. ज्याच्याने बर्‍याच लोकांना खोकल्याचा त्रास होतो (सगळ्यांनाच नाही.)

सुपं, उकडलेल्या गोष्टी, वगैरे भरपूर आणि फूडकोर्टंही व्यवस्थित स्वच्छ असतात. >>>> सहमत आहे. स्वच्छता असते. पण अगदी अलिकडे फूड पॉयझनिंगने लोक मेल्याचे माहिती असेलच तुला. शिवाय इथे फुड्कोर्टात वापरले जाणारे भांडे बघशील तर तुला जेववल जाणार नाही Sad अलुमिनियमची आझक के जमाने की भांडी असतात. ते बदलणे त्यांना परवडत नसते (असे म्हण्तात.)

भारतीय जनता लिटल इंडिया भागात ताज्या भाज्या वगैरे घेत असते (आणि मग घरी जाऊन शिजवणार असते) >>>>>>> हे तुला चुकीचे वाटते???? Uhoh कमाल आहे. मी हेच करते. ताज्या भाज्यांना , वरण भाताला आणि चपात्यांना कधीही कंटाळा नाही . मला हीच पद्धत बरोबर वाटते. मस्त नासिकची पालक, शेपु आणायचे आणि ताजी ताजी बनवायची मौजा ही मौजा Happy

तेव्हा सिंगापूरकर मुलाबाळांसकट फूडकोर्टात संध्याकाळी ७, ७.३०ला जेवून घेतात. कुटुंबासोबत वेळच वेळ मिळतो. >>>>> रोज मुलांना हॉटेलातले जेवण खाऊ घालुन मुलांच्या तब्ब्येती बिघडवण्यापेक्षा थोडा कमी वेळ दिला तरी चालायला हवे असे माझे मत.

स्वयंपाक घरीही करतात पण सठीसामाशी. बरं, हे बाहेरचे जेवण महागही पडत नाही. >>>> असे म्हणु नकोस, तब्ब्येतीच्या दृष्टीने कधीकधी खुप महाग पडते.

आजकाल हा पर्याय बरा वाटायला लागला आहे (अजून संपूर्णपणे अंगी बाणवला नसला तरी). >>>> नको बाणवुस असे मला वाटते.

इथल्या सर्वसाधारण जनतेची शरीरप्रकृती बघितली तरी फूडकोर्टांत जेवण्याची ही पद्धत चुकीची वाटणार नाही. >>>>> त्याचे कारण फूडकोर्टातले जेवण नसुन त्यांचा न चुकता केला जाणारा व्यायाम आहे. चालण्याला पर्याय नसल्यामुळे बराचसा व्यायाम इथे आपोआपच घडतो .

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

नीधप

या सगळ्यावर उपाय म्हणून मग घरात स्वैपाकाला बाई लावणं किंवा स्वतः करणं अपरीहार्य ठरतं. >>>>>>>>>> हे सगळ्यात बेस्ट. पोटात काय जातय ते आपल्याला माहिती असते. कॅलरीज, न्युट्रिशन सगळ्याची काळजी घेता येते.

मी बंगलोरला असतांना नोकरी ज्या क्षणी अनियमित झाली त्या क्षणापासुन पूर्ण दिवसाची बाई ठेवली. जेवणाच्या बाबतीत हेळ्सांड करणे आपल्या पिढीला परवडणार नाही.

...तु सब्र तो कर मेरे यार....
-प्रिन्सेस...

प्रिन्सेस , अखेर मला ज्याची भीती वाटत होती तेच निघाले. बहुधा ही तेले रिसायकल केलेली वापरत असणार. म्हनजे त्यात फ्री रॅडिकल्स प्रचन्ड असणार . मग हाय कोलेस्टेरॉल आणि हृदयविकार ओघाने आलेच. आपल्याकडे नाही का वडापाव, भजी इत्यादीसाठी तेच तेल पुन्हा पुन्हा वापरले जात...
***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

प्रिंसेस , अप्रतिम पोस्ट आहे .
खरं तर आपण काय खातोय , ते कधी बनवलेय , त्यामुळे शरीराला फायदा होईल की नुकसान , त्यातून काय पोषकांश मिळत आहेत , मुख्य म्हणजे आपल्या प्रकृतीला ( Long run मध्ये ) ते सोसवेल की नाही ह्याचा विचार कोणीच करताना दिसत नाही .
असो, ह्या बीबी चा रोख दुसरीकडे वळतोय असे वाटतेय . नवीन बीबी उघडून ह्या विषयावर चर्चा केल्यास उत्तम .

पोटात काय जातय ते आपल्याला माहिती असते.<<
खरंतर घरी केल्याने हे आपल्याला कळत असतं हे ५०% च खरंय असं म्हणायला हरकत नाही.
किंवा भाजी करताना कच्ची भाजी शिळी/ताजी हे आपण बघितलेलं असतं, तेलाचं प्रमाण आपण बघतो, तेल कुठलं ते आपण बघतो इत्यादी..

माझ्या माहेरी गहू, तांदूळ, डाळी, ज्वारी वर्षाच्या भरून घ्यायच्या आणि लागेल तसंतसं धान्य दळून आणायचं अशी पद्धत होती. अजूनही बाबा हेच करतात. सासरी मुंबईतली जागा लहान त्यामुळे सगळं थोडक्या प्रमाणात आणायचं आणि निवडून धान्य दळून आणायची पद्धत होती. आपल्या सर्वांच्याच घरी ती होती/ आहे.

आता मी धान्य दळून आणण्यापेक्षा देशपांड्याची तयार पिठं आणते. मी खात्रीशीररीत्या सांगू शकते का की वापरला गेलेला गहू उत्तम दर्जाचा होता? नाही पण देशपांड्यांचं नाव आहे आणि अजून तरी शंका आलेली नाही मला म्हणून तो चांगला गहू असणार हा माझा अदमास आहे. तेव्हा आपल्या पोटात काय जातं हे समजण्याच्या खात्रीतले काही टक्के तिथे संपले.

तीच गोष्ट तयार मसाले, तयार लोणची, तयार पापड आणि इतर सर्व विकतच्या वस्तूंची. ५०% काट लागली खात्रीला.

याला पर्याय काय? काहीच नाही.
तेव्हा आटापिटा केवळ उरलेल्या ५०% साठीच...

असो एक इंटरेस्टींग गोष्ट ऐकली होती एका नात्यातल्या कुटुंबाबाबत ती सांगाविशी वाटतेय...
सधन आणि मोठं कुटुंब. मुंबईत राहाणारे. तीन भाऊ. एकाच बिल्डींगमधे एकेका मजल्यावर एकेका भावाचं घर. आता ह्या भावांनाही सुना आलेल्या आहेत. काही तिथेच रहातात काही दुसरीकडे. तीनही काकूंपैकी १ नोकरी करायची दोन हाउसवाईफ. त्या दोघी सुट्टीत सगळ्या लहान मुलांना घेऊन गावच्या घरी जात आणि संपूर्ण कुटुंबासाठी लागणारे मसाले, लोणची, पापड, बाकी वाळवणं आणि वर्षाचं साठवणीचं सामान त्या एकदोन महिन्यात करून घेत. आता मुलं मोठी झालीत, नातवंडं आलीत, दोन हाउसवाइफ काकूंपैकी एक फोटोत गेल्यात, नोकरी करणार्‍या काकू रिटायर झाल्यात आता नातवंडांना घेऊन या दोघी काकू गावी जातात सुट्टीला आणि सगळ्या लेकीसुनांसाठीचं वर्षाचं सामान तयार करून आणतात. हल्ल्ली जसं जमेल तसं नोकर्‍या सांभाळून सुना किंवा मुली मदत करायचा प्रयत्न करतात. त्यांनी नाही केली तरी या सासवांची हरकत नसते. आम्हाला झेपतंय तोवर आम्ही करणार. पुढचं पुढे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करा. असा साधा सरळ हिशोब असतो त्यांचा.
त्या कुटुंबात लग्न होऊन गेलेल्या आमच्या नात्यातल्या मुलीचा मला जाम हेवा वाटला होता हे ऐकलं तेव्हा.. Happy

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

गव्हाच्या दर्जात फार कमी जास्त होत नाही असं मला वाटतं. कारण गव्हाची आपण निवड करतो ती कॉस्मेटिक कसोट्या लावून. पण अंधारात सगळी मांजरं काळी या न्यायाने दळल्यावर सगळाच गहू सारखाच होतो.
मात्र हे गव्हाचे पीठ whole असणे महत्वाचे आहे. म्हनजे कोंड्यासकट . पूर्वी आमच्या घरात कोन्डा चाळणीने चाळून काढून टाकत तो भरड कोन्डा. सूक्ष्म कोंडा म्हनजे फायबर युक्त असे. आजही लोकप्रिय नसलेला 'होल' किंवा ब्राऊन ब्रेड उत्तम. गव्हाच्या पीठाच्या बाबतीत आटा हा पदार्थ फारच वाईट आणि घातक्.आणि बाहेरच्या पोळ्या, नान, पराठे, रोट्या नेमक्या या आट्याच्याच असतात. घरच्या पोळ्यानी पोट बिघडल्याचे कधी ऐकलेय का? पण बेकरी प्रॉडक्ट्स , रोट्या, नान, पराठे, आणि मेस हॉटेलमधल्या चपात्या यानी नक्कीच कमी अधिक पचनाचे प्रॉब्लेम होतात ते या 'फायबर' घटकाच्या नसण्याने.
त्यामुळे देशपांड्याच्या पिठात फायबर युक्त कोंडा ठेवलाय की नाही हे पहाणेच दर्जाच्या दृष्टीने महत्वाचे आहे असे मला वाटते.
आटा बनवताना घाऊक प्रमाणावर गहू भिजवून मशिनने दाबून गव्हाची पेस्ट काढून सुकवून पावडर करतात अशी प्रोसेस दिनेशनेच मागे मायबोलीवर वर्णन केली होती. त्यात निव्वळ पिठूळपना असल्याने फायबर नसतात. बल्क प्रॉडक्शनच्या दृष्टीने स्वस्त पडते म्हणून पीठा ऐवजी आटाच व्यापारी बनवतात. नुसत्या पोळ्या चांगल्या असल्या तरी ७५ टक्के जेवणाची काळजी मिटते. त्याबरोबर काहीही म्हनजे अगदी कोरडे केळे, चटणी, दूध ही खाता येते...

मूळ बीबी चा विषय वेळ वाचवण्याचा आहे आणि विषय आता आरोग्याच्या वाटेने निघाला आहे Happy

***

ये कहांकी दोस्ती है, के बने है दोस्त नासेह,
कोइ चारासाज होता, कोइ गम गुसार होता...

(नासेह्=सल्ले देणारा, चारासाज= दु:खावर फुंकर घालणारा, गम गुसार= दु:खात भागीदार)

>>> मूळ बीबी चा विषय वेळ वाचवण्याचा आहे आणि विषय आता आरोग्याच्या वाटेने निघाला आहे
काय हरकत आहे? बाफचं, 'वेळेची बचत आणि आरोग्यवर्धक स्वयंपाक' असं बारसं करावं.

वाट थोडी बदललीये ते खरंय पण वेळ वाचवताना आपण चुकून नको ती तडजोड नाही ना करत हे माहीत असायला काय हरकत आहे!

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

चांगली चर्चा चालू आहे... नीधप आणि मृ ला अनुमोदन... Happy

हो. खरंच चांगली चर्चा चालू आहे. रोजचा पाच मिनिटाचा वेळ वाचवायच्या नादात आपण आरोग्याचा खेळखंडोबा करत नाही ना, ते बघायलाच हवं. खास करून जे लोक दिवसच्या दिवस बाहेरच असतात. Happy
--------------
नंदिनी
--------------

खरय नंदिनी...
~~~~~~~~
ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा सकाळी उठल्यावर
पश्चाताप होतो, अशा लोकांनी सरळ दुपारीच उठाव...

अडम चं हे पार्ले बीबी वरचं पोस्ट

adm | 24 जुलै, 2009 - 09:30
इडली/डोशाची पीठं >>>> हे तयारच खायचं... स्वाद किंवा देसी हाटेल..

कडधान्याला मोड आणणे >>>>> हे विकांताला केलच पाहिजे असं नाही.. विकडे ला ड्यूरींग बाकीची कामं पण होतं...

कडिपत्ता/कोथिंबीर/मिरच्या धुवुन कोरड्या करुन ठेवणे >>>> हे जनरली आणलेली ग्रोसरी आवरतानाच/ फ्रिज मधे टाकतानाच केलं जातं.. आणि त्याची चिराचिरी फोडणीचं तेल गरम होताना करायची..

दाणे जर भाजलेलेच आणले तर \चहा होइपर्यंत दाण्याचा कूट होतो. >>>>> चहात दाण्याचं कुटं ???? दाण्याचं कूटं.. हं.. आत्तापर्यंत कधी वेळ नाही आली कारण मी देशातून घेऊन आलो होतो तीन्ही वेळा आणि २ दा आई आली असताना करून ठेवून गेली होती २ दा.. आणि मी साधारण नारळ च वापरलो कूटापेक्षा...

एकूण जर वेळकाढू पदार्थ विकएंड ला केले आणि बाकी कामं नीट organized पध्दतीने केली तर वेळ वाचवणे एव्हडं अवघड नाहिये.... e.g. किचन मधे असताना कुठलाही वेळ idle न घालवणे (जसे भाजी शिजताना त्याकडे बघत बसणे, चहा ला उकळी येईपर्यंत नुसतेच उभे रहाणे त्यावेळी टोस्ट बनवणे, ब्रेड ला बटर लावणे ई. कामे करता येतात)
सिंक मधे भांडी भरून ठेवायच्या ऐवजी स्वैपाक चालू असतानाच जितकी शक्य असतील तितकी धून वा विसळून टाकणे ज्यामूळे मागच्या आवरा आवरीचा वेळ प्रचंड वाचतो...
मसाले, मिरच्या/ आलं/ लसूण, साखर, मिठ, तेल हे घेऊन झालं की त्या गोष्टी लगेच जागेवर ठेवणे,
बर्‍याचदा तेल तापेपर्यंत भाजी चिरून सुध्दा होते..

ई. ई. ई.

.......................
इथे डिश वॉशर असतं त्यात भांडी एका वेळी ढीग टाकण्यापेक्षा हातासरशी त्यात भांडी टाकत जावी...सिंक क्लीन रहाते आणि एकावेळी लोड येत नाही.

मात्र अडम ने म्हणलय की तयार इडाली दोश्याची पीठं जे मी प्रिफर करत नाही, घरी करायला फार वेळ लागत नाही आणि फ्रेश, भरपुर होतात घरी.

हे तयार पीठ बॅचलर लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे Happy

हे तयार पीठ बॅचलर लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे >> घरी २+ माणसे असतील तर घरी करायला माझी हरकत नसते पण २ लोकांसाठी तो येवढा पसारा + ते पीठ फुगुन यायला जो वेळ लागतो त्यात कधी कधी दुनिया उलटी व्हायचा संभव असतो Happy

एकुणात काय, आपल्याला जे झेपेल ते करावे. उगीच दुसरा करतो म्हणुन मी करतो/करते म्हणण्यात अर्थ नाही. स्वयंपाक/घर आवरणे यामधे 'one size fits all' असे नसते हेही खरेच.
मला नाही आवडत रोज एखादी गोष्ट करायला तर त्यात वाईट वाटण्यासारखे काहीही नसावे. आणि शोनू म्हणाली तसे आपण समोरच्या व्यक्तीची आपल्याशी किंवा आपली त्याच्याशी तुलना करु नये हे महत्वाचे.

~~~~~~~~~~~~~
मराठी रेसिपीज साठी आजच अवश्य भेट द्या: http://vadanikavalgheta.blogspot.com/
~~~~~~~~~~~~~

हे तयार पीठ बॅचलर लोकांसाठी चांगला ऑप्शन आहे >>लिहायचं राहिलं की हे माझं मत आहे Happy

घरी २+ माणसे असतील तर घरी करायला माझी हरकत नसते पण २ लोकांसाठी तो येवढा पसारा + ते पीठ फुगुन यायला जो वेळ लागतो त्यात कधी कधी दुनिया उलटी व्हायचा संभव असतो >>ज्याचा त्याचा प्रश्न आहे तो...मला सोपे वाटते म्हणुन मी करते.

विकतचे पिठ मी चाळून पाहिले पण मल त्यात कोंडा आढळला नाही. ही लोक काय गिरणीतून पिठ आले की चाळून पॅक करतात का?

हा बा. फ. चांगला आहे.

एक मिनिट.. प्रिती तू तयार पिठ डोश्याइडलीच्या पिठाबद्दल म्हणतेयस
आणि बी जे तयार पीठ म्हणतोय ते कणकेबद्दल आहे...
बरोबर ना? की माझं काहीतरी चुकतंय?

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

Lol बरोबर आहे ग नी.. काय गोंधळ घालतेयस..

समजून घे डॅफो.. आधीच एवढ्या सगळ्या सुपरवुमनांना बघून गांगरलेय मी... त्यात कोणाची एंट्री झाली पाह्यलंस ना.. गोंधळ नाही वाढणार..

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मी प्रकाशचे पोष्ट वाचून माझे पोष्ट लिहिले आहे. जेवणाचाच विषय आहे ना.. तरी इतका गोंधळ!!!! ती शोनू कसे करत असेल Happy

"I have measured my life with coffee spoons"
- T.S.Eliot

Pages