मातोश्री वारंवार हिंट द्यायला लागल्या तेव्हा म्हटलं, आता ते जुनं कपाट आवरुनच टाकावं. ( हिमालयाच्या थंड कुशीतला निद्रिस्त ज्वालामुखी जागा होवून ऊसळण्याआधी आवश्यक कारवाई केलेली बरी असा सुज्ञ विचार त्यापाठी होताच.)
तशी 'मी फार हुशार आणि गुणी मुलगी आहे' हे माझं स्वतचं असं मत आहे.आणि ही पोस्ट वाचणारे वाचक माझ्या मित्रयादीच्या कक्षेत येत असल्याने त्यांनाही हे मत पटलेलं असल्याची शक्यता अगदी दोनशे टक्के आहेच.
(
)
तर ते असो !
हातात एक ओला रुमाल , टाइम्स ऑफ़ इंडियाचे गुळगुळीत, ग्लॉसी असे दोनचार कागद सोबत घेऊन मी मिशन रद्दी या मोहिमेवर सज्ज झाले. कपाट ऊघडलं तस ते भस्सकन अंगावरच आलं. thanks to my maintaining activity...
सर्वात आधी त्या कपाटातील पुस्तके , स्टिकर्स , कागदपत्रे जे जे काय हाताला लागलं ते पहिलं काढून जमिनीवर ठेवलं. तसं करताच गाठ सोडवलेल्या दोराप्रमाणे कपाट सुट्लंच. जमिनीवर नजर टाकली तर, पसार्याने एकूण क्षेत्रफ़ळाच्या पाव टक्के भागावर आपला हक्क सांगितला आहे हे ही लक्षात आलं. ते पाहून 'पाहीलंस ना मी काय सांगत होते ते ! ' असा घरचा आहेर मिळाला. पण त्यासाठी मी (उस्फुर्त आणि सोशिकपणे) ' नळी फूंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे' चा यशस्वी प्रयोग केला.
तर... असोच्च !
आता पाळी होती ती पसार्याच्या वर्गीकरणाची. वर्गीकरण करत असतानाच आपण काय कार्टूनगीरी करून ठेवली आहे याचा अंदाज येत होताच. काय नव्हतं त्या पसार्यात ! मैत्रीणीनी दिलेल्या ग्रीटिंग्ज कार्डापासून ते वर्गातल्या कंटाळवाण्या तासाला काढलेल्या शिक्षकांच्या व्यंग्यचित्रांपर्यत सर्व काही त्या कपाटाने सामावून घेतल होतं. कंटाळवाण्या तासाला आमची चित्रकला विशेष बहरत असे .पण आमच्या शिक्षकांना त्याच काहीsssएक कौतुक नव्हतं. नाहीतर आपल्या भारतातही पिकासोचा एक अवतार तयार झाला असता. दुर्देव भारताचं ! दुसरं काय.....
पसार्याच्या वर्गीकरणाला इयत्तेचं बंधन नव्हत बर का ! त्या बाबतीत आमची दृष्टी पहिल्यापासूनच उदार..
इयत्ता पाचवी ते शैक्षणिक पदवीच्या आवाक्यातलं सारं काही त्यात सुखनैव नांदलेलं . त्यात " कुछ कुछ होता है" चा फ्रेंडशिप बँड सापडला. त्याचा रंग विशेष आवडला होता म्हणून तो दुसर्या मैत्रिणीकडून बदलून घेतलेला. दहावीच्या वर्गात असतानाचा पूर्ण वर्गासोबतचा ग्रुप फोटो , कॉलेजमध्ये असताना केलेल्या भटकंतीचे फोटो , कॉलेजच्या बोरिंग लेक्चरला केलेल्या कविता ( शाळेतल्या पिकासोची जागा आता वर्डस्वर्थने घेतली होती ) , वेगवेगळ्या फॅशन मॅगझीन मधले सौदर्यविषयक लेख , ट्रेक विषयक लेख , स्टीकर्स , गॅदरिंग मध्ये संयोजक मोडात असताना काढलेल्या नोट्स ,त्या फीती ,कॉलेजचं मासिक , आयकार्डस असं आणि बरंच काही सापडलं.
चित्रपटांची, दुपारच्या शोजची जीर्ण झालेली तिकिटेही सापडली. पण तो त्या काळातल्या निरनिराळ्या कलांचा आस्वाद घेण्याचा अभ्यासाचा एक भाग होता हे वाचकांनी लक्षात घ्यावे . व्यक्तीमत्व अष्टपैलू असलं पाहिजे यावर आमचा पहिल्यापासूनच भर.....तर ते ही .......
वरील परिच्छेद वाचून शाळा कॉलेज मध्ये आम्ही फक्त उनाड्क्या केल्या असा वाचक वर्गाचा समज झाला असेल तर तो साफ़ चुकीचा आहे हे ' अर्णब गोस्वामी ' शैलीत निदर्शनास आणून देऊ इच्छिते . पसार्याचा काही भाग विज्ञान विषयाचा प्रयोगवह्या , इंग्लिशची अवांतर पुस्तके , काही पेपर्स वगैरेनी व्यापलेला होता. आवडता विषय असलेल्या गणित विषयाच्या पुस्तकांचा त्यात अधिक भरणा होता ( ही आपली उगाच माहिती ) . पुढे त्यात मॅनेजमेंट , अकाउंटिंग , लॉ वगैरे पुस्तकांची भर पड़त गेली.
ओह येस ! करियर विषयक पुस्तकांची यादी ध्यानात घ्यावी लागेलच. तिरिमिरित येऊन ग्रंथालयात काढलेल्या नोट्स, क्लासेसच्या नोट्स , परीक्षेसाठीच्या ख़ास झेरॉक्स, केलेल्या नोट्स , बंक केलेल्या पिरियड्सच्या नोट्स असं वैविध्य त्यात होतचं. काही ख़ास कापून ठेवलेली कात्रणही सापडली. ( हां गुण पिताश्रीकडून उधार ) Kindly look to versatility point..
आता वर्गीकरण झाल तर पाळी आली रद्दीत वस्तू द्यायची . मग आमची घालमेल सुरु झाली . हे देऊ की ते देऊ ? ते राहु देत ना .पुस्तक ! पुस्तक अजूनही उपयोगी पडू शकतेच ना वगैरे वगैरे .. मग पसारा संग्रामात फसलेल्या या अभिमन्युला बाहेर काढण्यासाठी मातृदेवता पदर खोचून मदतीला आली . त्या आधी ' हिचा सोस काही संपणार नाही , नेहमीच आहे ते ' असे उदगार कानी आले.
त्यात एक दोन वेळा आमच्या लुडबूडीमुळे एक टिपिकल मातोश्री लुक मिळाला. पण आम्ही ही काही कमी नव्हतो .वर्षाआरंभी एचआरला पटवून सुट्टी पदरात पाडून घ्यायची कला अवगत झाली असल्याने रद्दी एक चतुर्थांशने कमी झाली. शेवटी अखेर भैया नामक प्राण्याला बोलावून उरलेला पसारा त्याच्या स्वाधीन करण्यात आला .. त्यातून आलेल्या पैशाच नेहमीप्रमाणेच भेळ, वडापाव केलं ( पैशाच चीज करतात तसं )
ह्म्म्म !
आता ते कपाट व्यवस्थित दिसतं. नीट लावलं गेलयं ना ! सुट्सुटीत वगैरे वगैरे . पसारा काढतानाच एकेक वस्तूचा जीवंतपणा जाणवलेला. त्या आठवणी ती मजा जणू एकमेकांना घट्ट बिलगलेली . अरे ते पेन माटुंग्यावरुन घेतलेल . ते मॅस्कॉट असंच काढलेल . फुटकळ कविता, जुने पुराणे तेव्हा महत्वाचे वाटलेले पेपर्स . बरंच काही .. त्या दोनेक तासात अश्या बर्यावच आठवणी जाग्या झालेल्या. परत एकदा त्या जगात जगून घेतल. शेवटी हर पसारा कुछ कहता है ....
आता ते कपाट थोड शिष्ट वाटतं मला . नाही.., नाही... स्वच्छ झालंय म्हणून नाही. तसे ते स्वच्छ तेव्हाही होतेच . पण तेव्हा ते खच्चून भरलेल. उघडता क्षणीच अंगावर आलेलं .
..
..
आता त्याचा रिकामेपणा जाणवेल इतपत अंगावर येतोय...
...
बट डोंट वरी, ते कपाट कसं भरायच हे ही माहीत आहेच. सुरुवातही केलीये . त्याची गोष्ट नंतर कधीतरी !
... कपाट पुन्हा भरल्यावर !
जाई, माझ्याच कपाटाबद्दल लिहिल
जाई, माझ्याच कपाटाबद्दल लिहिल आहेस अस वाटत. आई फक्त चेक करते, ओरडते पण फेकून देत नाही. माझ्याकडे तू लिहिल आहेस त्या प्रत्येक गोष्टी आहेत. फ्रेन्डशिप डेच्या कॉलेजमधील प्रत्येक वर्षाच्या बॅन्डस एका पिशवीत भरून ठेवल्या आहेत.
खूप छान वाटत हे कपाट आवरताना.
कपाट 'आवरायला' घेतलं आणि अखेरिस फेकून द्यावं असं काहीही न सापडल्याने ( ) फक्त धुळ झटकुन आहे तसं लावून टाकलं <<<< रिया,सेम पिंच.
पण कपडे आईची मक्तेदारी असते एक दोन वर्ष वापरले की ती गरजूंना देऊन टाकते. त्यातले अती आवडीचे असतील तर मी तिला सांगते गावी ठेव मला वापरायला मिळतील अस बोलून ते राहतात. पण नंतर एक वर्षात तेसुद्धा जातात. ह्या बाबतीत तिच एकल नाही तर नविन कपडे मिळत नाहीत. ![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
छान लिहीलंय. कपाट, ड्रॉवर्स,
छान लिहीलंय. कपाट, ड्रॉवर्स, घरच आवरणे हा माझा आवडता उद्योग.
मस्त आहे मी आणि लेक (१३
मस्त आहे
मी आणि लेक (१३ वर्षे) दोघी कायम ह्याच फेजमधे असतो. सगळंच अतिशय महत्वाचं वाटतं आणि काहीच टाकवत नाही ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच लिहिलंय.. माझाही आवडता
मस्तच लिहिलंय.. माझाही आवडता कार्यक्रम असतो हा दर भारतभेटीतला. पण कागदाचा एकही कपटा बाहेर टाकला जात नाही.... त्यात पेनफ्रेंडस कडून आलेल्या पत्रांपासून, बेस्ट बसेसच्या तिकिटापर्यंत सर्व काही असते. दर भेटीत त्यात भरच पडत जाते.
एक चांगलं आहे, मी नसताना कुणी ते कपाट उघडायच्या भानगडीत पडत नाही... अंगावर कोसळंलच समजा !
थँक्स दोस्तहो ! या वस्तू,
थँक्स दोस्तहो !
या वस्तू, नंतरही उपयोग संपला तरी काही बंध उरतोच, सहज टाकवत नाही. एका अर्थाने आपण कसे उलगडत गेलो याच्या खुणाच असतो पसारा.>>>> अगदी अमेयदा .
जाई....वाचताना असं वाटत होतं
जाई....वाचताना असं वाटत होतं की, अरेच्या ही घटना प्रत्येकाशी संबंधित आहेच आहे. त्यामुळे हे लिखाण केवळ तुझेच नसून ते माझेही झाले. मला तर वर्षा दोन वर्षातून महिन्यातून एकदा तरी अशी कपाट स्वच्छतेची खुमखुमी येतेच आणि मग तेथील वस्तूंसोबत चिकटलेला आठवणींचा इतिहास सभोवती पिंगा घालू लागतो. पुस्तकांचे कपाट वेगळे असल्याने मुख्य कपाटात त्यांची उपस्थिती नसते पण "फोटो" आणि लिखित पत्रे नामक प्रकार अगदी हळवे करून सोडत असतात.....
खूप सुंदर चित्र साकारले आहे तुझ्या आठवणीच्या कपाटामुळे.....(त्यातही एक गोष्ट मला जास्तच खटकली....ती म्हणजे गणित हा तुझ्या आवडीचा विषय होता....यामुळे तरी मी तुझ्या मित्रयादीत जागा घेऊ शकत नाही.)
वेल...रद्दीतून मिळालेल्या कमाईचे भेळेत रुपांतर झाले लागलीच, ते छान झाले.
मी या फेजनंतर शहाणी झाले आहे.
मी या फेजनंतर शहाणी झाले आहे. जुनं काहीच ठेवत नाही. निर्लेप मनाने सगळाच 'कचरा' टाकू शकते. त्यानेही काही अडचणी निर्माण होतात, पण तो भाग वेगळा >>+१११
मला काहीही फेकायची वाइट सवय आहे. अर्थात फेकलेल्या गोष्टीची गरज पडली तर सवय वाइट वाटते.
माझे परम मित्र भाग्येश अवधानी
माझे परम मित्र भाग्येश अवधानी नेहमी म्हणतातः-
"मोर म्हंटलं की पिसारा हवाच. घर म्हंटलं की पसारा हवाच."
जाई मस्त लिहिलंय.मलाही
जाई मस्त लिहिलंय.मलाही निपासारख सेम पिंच म्हणावस वाटत.
कसलं मस्त
कसलं मस्त लिहलय..........आमच्याकडे पण मुलगा आणी मि असेन तर काहिच फेकल जात नाही.. ( हे लागेल ते लागेल ) म्हनुन नवरा मी नसताना कधी कधी कपाट साफ करुन घेतो..:) :
पुन्हा एकदा आभार्स लोकहो !
पुन्हा एकदा आभार्स लोकहो !
मामा, गणिताप्रमाणेच भाषाही माझ्या आवडीचा विषय आहे . सो मित्रयादीत स्वागत आहे.
शोभनाताई , थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाई, भाषा विषय ही तुझ्या
जाई, भाषा विषय ही तुझ्या आवडीचा आहे हे तुझ्या लिखाणावरुन दिसतच आहे ग. त्या शिवाय का इतक सुंदर तु लिहु शकतेस? ( स्मित )
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
जाई खुपच सुंदर आणि ओघवतं
जाई खुपच सुंदर आणि ओघवतं लिहीलंस. खूपच गोड.
मनीमोहोर , थँक्स सावली
मनीमोहोर , थँक्स
सावली ,विशालदा , अन्जू तै आभार्स !
जाई, आधी वाचलं होतं का हे
जाई, आधी वाचलं होतं का हे फेबुवर ?तेव्हाही आवडलं होतं खूप.
>> सगळ्यांच्या मनातलं अगदी चपखलपणे उतरलंय शब्दांत!>>+१०० !
जाई, भारी जमलाय लेख.
जाई, भारी जमलाय लेख.
मस्त लिहिलंयेस जाई. आमच्याकडे
मस्त लिहिलंयेस जाई.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्याकडे पण दर वर्षी माझं कपाट आवरण्याचा कार्यक्रम मी करत असते. अगदी माझ्या पहिल्या वाढदिवसाला मामानी पाठवलेल्या भेटकार्डापासून ते पत्रिकेवरचं डिझाइन आवडलंय, ह्या कागदाचा पोत सुरेख आहे करत ठेवलेल्या पत्रिका, कागदांचे चिटोरे, लेसचे तुकडे, मणी अन अजून काय काय असतं एका कप्प्यात.
जुन्या नोटस, पुस्तकं पण होती इतके दिवस. हल्ली मात्र जागा जरा कमी पडायला लागल्याने बरीच अभ्यासाची पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीला दिली. ज्या नोट्स वाचून आता अर्थबोध होत नाहीये अश्या काही वह्या पण काढून टाकल्या.
यावर्षी घर बदलल्याने माळ्यावरच्या नोट्स, फाइल्स, पुस्तकं पण आवरावी लागली. नवरा, त्याचे चार भाऊ आणि वहिनी यांच्या सगळ्यांच्या इंजिनिअरींगच्या आणि पिजीच्या नोट्स, पुस्तकं आणि १०-१२ वर्षांपूर्वीच्या कॉलेजच्या फायली असा सगळा ऐवज सॉर्ट करून, पुस्तक लायब्ररीला देवून आणि बाकी सामग्रीची परत एका कपाटात रवानगी केलीये. या सॉर्टींगमध्ये मला घरात चक्क २५-३० गीतेचे हिंदी अनूवाद सापडले.
मस्त लेख पण निपांना अनुमोदन
मस्त लेख
पण निपांना अनुमोदन आवरणे ठिक आहे पण फेकणे महापाप![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझा काही खजिना आता माझ्या मुलांकडे हस्तांतरण करेन म्हणतोय.
मस्त छान लेख
मस्त छान लेख![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जाई मस्त लिहीलयस. खरच पसारा
जाई मस्त लिहीलयस. खरच पसारा आवरायला काढला की आठवणी जाग्या होतात.
जाई, मस्तच लिहिलंयस आज वाचलं
जाई, मस्तच लिहिलंयस![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आज वाचलं हे! एकदम खुसखुशीत वर्णन केलंयस!
मस्त!!
दाद , तुमचा प्रतिसाद पाहून
दाद , तुमचा प्रतिसाद पाहून छान वाटल .
अल्पना, अगदी ग . पसार्यात एकेक वस्तू अश्या मिळत जातात की मोह सोडवत नाही. काही काही गोष्टीना पाहिल्यावर अरेच्च्या हे आपल्याकडे होत का ? कधी आणल हे ? अस वाटत राहत .
भारतीताई, हर्पेन , प्रीति, जागुतै , सईतै , मो थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय!
मस्त लिहिलंय (आणि आटोपशीर
मस्त लिहिलंय (आणि आटोपशीर पसारा नाही
)
मस्त लेख!!!!!!!!
मस्त लेख!!!!!!!!
(No subject)
मस्त लेख!!!!!!!!
मस्त लेख!!!!!!!!
Pages