Submitted by admin on 3 June, 2008 - 19:11
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एखाद्या शब्दाचा अर्थ हवाय? मग तो इथे विचारा.
बरोबर Ropalidia marginata आणी
बरोबर
Ropalidia marginata आणी Ropalidia cyathiformis >> + १
तुम्हाला लॅटिन नाव हवं होतं
तुम्हाला लॅटिन नाव हवं होतं हे माहित नव्हतं
प्रत्येक प्राण्याला, कीटकाला, पक्ष्याला इंग्लिशमधे कॉमन नाव आणि शास्त्रीय नाव अशी दोन प्रकारची नावं असतात.
हो. पण वास्प हे त्या समुहाचे
हो. पण वास्प हे त्या समुहाचे कॉमन नाव आहे. गांधिल माशी या सब स्पेशि चे नव्हे.
लॅटीन नाव नको होत. विशीष्ट
लॅटीन नाव नको होत.
विशीष्ट त्या जातीचे नाव हव होत. ई॓ग्रजी पन चालले असते.
तद्दन ह्या शब्दाची उत्पत्ती /
तद्दन ह्या शब्दाची उत्पत्ती / व्युत्पत्ती / मूळ काय आहे ?
'सोळा मुळे सुळसुळीत' या वाक
'सोळा मुळे सुळसुळीत' या वाक प्रचाराचा अर्थ 'कितीही कान उघाडणी केली तरी एखादा माणूस त्याचे वर्तन सुधारत नाही' असा आहे.
यातील 'सोळा मुळे' ची व्युत्पत्ती काय? 'मुळे' म्हणजे खायचे मुळे की अन्य काही?
मुळे झाडाची (रुट्स ह्या
मुळे झाडाची (रुट्स ह्या अर्थाने). काहीच पाणी (इथे उपदेश) शोषल जात नाही, बदल दिसत नाही. पालथ्या घड्यावर पाणी ह्या अर्थाने.
अरेवा! नवी म्हण अन काँटेक्स्ट
अरेवा!
नवी म्हण अन काँटेक्स्ट समजली.
सीमन्तीनी , धन्स.
सीमन्तीनी , धन्स.
इंग्लिश मध्ये 'portmanteau
इंग्लिश मध्ये 'portmanteau word' असा एक जोडशब्दाचा प्रकार आहे. म्हणजे एका शब्दाचा सुरवातीचा काही भाग दुसर्या शब्दाच्या शेवटच्या भागास जोडून एक नवा शब्द होतो. उदा.
breakfast + lunch = brunch.
मराठीत अशी संकल्पना असल्यास तिला काय म्हणतात? त्याची काही उदाहरणे जाणून घ्ययला आवडतील. मला आता एक सुचले ते असे : आमरस + श्रीखंड = आम्रखंड <
( 'समास' हा २ पूर्ण शब्दांचा संयोग असतो. तेव्हा वरील प्रकार वेगळा आहे.)
कुमार१, त्याला मराठीत काय
कुमार१, त्याला मराठीत काय म्हणतात ते माहीत नाही. पण असा एक शब्द शाळेत शिकलेला आठवला: धुरके (धुळ + धुके)
मध्यमपदलोपी समास नव्हे का हा?
मध्यमपदलोपी समास नव्हे का हा?
मला पण मध्यमपदलोपी समास असेच
मला पण मध्यमपदलोपी समास असेच वाटतेय . मियांकी (टांग ) तोडी नावाचा राग त्या समासाचे उदाहरण म्हणून देत असू आम्ही
ईबा, मध्यमपदलोपी समासात नवीन
ईबा,
मध्यमपदलोपी समासात नवीन अर्थाचा शब्द तयार होणार नाही ना?
परिमार्जन ह्या शब्दाचा नक्की
परिमार्जन ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? उदा: पापाचे परिमार्जन
पाप तर आपल्याला भरुन द्यावे लागत असते ना? एक तर कुणीतरी आपल्याला दंड देतो नाहीतर आपण स्वत:हून पापाची शिक्षा भोगायला तयार होतो. मला नक्की शब्दबद्ध करता येत नाही. थोडी मदत कराला का इथे कुणी? धन्यवाद.
बी 'मार्जन म्हणजे धुवून
बी 'मार्जन म्हणजे धुवून काढणे'
'प्रातःकाळी करी बाळा शौचादि मुखमार्जन' आठवतंय ना.
परि म्हणजे एकंदरित, संपूर्ण ई अर्थाचा उपसर्ग.(उपसर्ग म्हणजे एखाद्या शब्दाच्या अगोदर जोडून लावायचा शब्दं)
पापाचे परिमार्जन म्हणजे संपूर्ण पाप धुवून काढणे.
म्हणजे समजा तू कुणाचे पैसे चोरलेस आणि नंतर लगेच परत करून क्षमा मागितलीस आणि त्याने क्षमा केलीही तर तुला दंडही मिळाला नाही, शिक्षाही भोगायला लागली नाही. परिमार्जन झाले.
साती, किती छान समजवून
साती, किती छान समजवून सांगितलेस. धन्यवाद!!!! खूप खूप धन्यवाद.
>> 'समास' हा २ पूर्ण शब्दांचा
>> 'समास' हा २ पूर्ण शब्दांचा संयोग असतो. तेव्हा वरील प्रकार वेगळा आहे
हो - हे बरोबर आहे. हा समास नाहीये. आय स्टॅन्ड करेक्टेड.
इब्लिस, व्हय.
खोबरेल/एरंडेल ही उदाहरणं सुचतायत. (खोबर्याचं/एरंडाचं तेल - 'ते' गायब झाला.)
अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप,
अंतःकरणपूर्वक पश्चात्ताप, (ज्याच्या बाबतीत पाप/चूक/गुन्हा घडला असेल त्याच्याकडे) कबुली आणि क्षमायाचना, शक्य असेल तर त्याच्या झालेल्या हानीची भरपाई असे पापक्षालनाचे मार्ग आहेत.>>
अरे वा!
माझ्या वरच्या उदाहरणात नेमकं हेच आलंय.
मला हड़कवणे या शब्दाचा अर्थ
मला हड़कवणे या शब्दाचा अर्थ सांगा प्लीज . माझ्या सीनियरने हा शब्द बोलता बोलता वापरला आणि माझी जी अमराठी कलिग आहे तिला या शब्दाचा अर्थ हवा आहे . जमल्यास इंग्लिश प्रतिशब्दही सांगा. म्हणजे मला भाषांतर करताना सोपे जाईल
जाई....हडकवणे हे
जाई....हडकवणे हे क्रियापद....सुकविणे या अर्थाने वापरले जाते असे मला स्मरते.....ह्याला Dry असा इंग्लिश प्रतिशब्द मिळतो. तुझ्या सीनिअरने वापरलेले पूर्ण वाक्य तुला आठवत असेल तर ते इथे दे म्हणजे कोणत्या संदर्भात क्रियापद आले त्याचा अंदाज येईल.
मामा , ते वाक्य अस होत "
मामा , ते वाक्य अस होत " त्याने मला चांगलच हडकवल " पार्श्वभूमी वादावादीची होती
मामा , ते वाक्य अस होत "
मामा , ते वाक्य अस होत " त्याने मला चांगलच हडकवल " पार्श्वभूमी वादावादीची होती
झापलं या अर्थाने वापरलं
झापलं या अर्थाने वापरलं असेल.
पण हडकणे या शब्दाचा अर्थ वाळणे, (चिखलाचा वरचा पापुद्रा वाळून अश्या वड्या पडल्यासारखा दिसतो, तेव्हा चिखल हडकलाय, असं म्हटलं जातं.)
काहीवेळा लोक फोनेटीकली सिमिलर शब्द वापरून काम टाकतात. लहान मुलांनी म्हटलेली गाणी कविता आठवा
इथे 'त्याने मला चांगलंच खडसावलं' ऐवजी 'हडकवलं' असा शब्द घुसवला गेलेला असण्याची शक्यता आहे.
'संस्थळ' हे 'संकेत स्थळ' चे
'संस्थळ' हे 'संकेत स्थळ' चे लघुरूप आहे की दोन्हीत फरक आहे?
लघुरूप आहे. मसं हे मराठी
लघुरूप आहे.
मसं हे मराठी संस्थळ याचे लघुरूप आहे.
फुंद या शब्दाचा अर्थ काय? मी
फुंद या शब्दाचा अर्थ काय? मी नेहमी धुंद-फुंद असा जोड शब्दच ऐकलाय ; नुसता फुंद कधी ऐकला नाहीये.
म.वा.धोंडांच्या 'ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी'त हा शब्द आलाय (प्रस्तावनेत). माझे लेख छापून आले, मल लोक ओळखू लागले तसा माझा फुंद वाढू लागला अशा अर्थाचे वाक्य आहे. वाक्यावरून मी 'गर्व' असा अर्थ घेतलाय. तो बरोबर आहे का?
"...मल लोक ओळखू लागले तसा
"...मल लोक ओळखू लागले तसा माझा फुंद वाढू लागला...."
~ या ठिकाणी "गर्व" ऐवजी "आत्मविश्वास" चे प्रयोजन असावे, लेखकाचे. गर्व कित्येक वेळा पोकळ कारणामुळेही येत असतो, पण आत्मविश्वासामागे काहीतरी निश्चित कारण असू शकते....चांगले.
फुंद म्हणजे पोकळ गर्व,
फुंद म्हणजे पोकळ गर्व, आढ्यता, इ.
अशोकमामा आणि वरदा, धन्यवाद.
अशोकमामा आणि वरदा, धन्यवाद.
Pages