Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36
स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.
याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
घरात पाच नारळ आहेत. काय करु?
घरात पाच नारळ आहेत. काय करु?
नारळ बराच काळ राहू शकतो.काही
नारळ बराच काळ राहू शकतो.काही दिवसाने आतले पाणी आटते.व सुका नारळ मिळतो,तो फोडून २ भाग करून फ्रीजमधे ठेवा. रोजच्या स्वयंपाकात वापरत नसल्यास,नारळाच्या वड्या,चटणी ए.मधे वापरा.
खोबर्याच्या वड्या, सारण( डीप
खोबर्याच्या वड्या, सारण( डीप फ्रीज करता येइल नवरात्रात वापरता येइल) कोकोनट मिल्क ह्याचे चेट्टीनड चिकन/ व्हेजीज थाय करी करून संपविता येइल. खोबरे/ कोको. मिल्क घालून पोहे इत्यादि बनवता येइल
सोलकढी व वेज स्ट्यू ह्यात
सोलकढी व वेज स्ट्यू ह्यात बराच खपेल!
नारळाच्या रसातल्या गोड
नारळाच्या रसातल्या गोड पोळ्या. गोड आवडत असल्यास. रेसिपी माबोवर आहे
काल रात्री गडबडीत जादाचे पीठ
काल रात्री गडबडीत जादाचे पीठ ( कणिक ) जे दुसर्या पिशवीत ठेवले होते, ती उचकायच्या ऐवजी, तशीच दुसरी उचकुन ज्वारीचे पीठ परातीत ओतुन घेतले, रन्ग बराच समान असल्याने ( वरतुन मुलीचा हो हल्ला चालू असताना) चूकुन त्यात मीठ व तेल घालुन भिजवायला गेले तर लक्षात आले की ती कणिक नाहीये. मग भाकर्या थापल्या.
चना मसाला बरोबर भाकरी कशी खाणार, म्हणून सकाळी ब्रेफा साठी कुस्करुन फोडणी घातली, पण भाकरीसाठी भिजवलेले पीठ रात्री ड्ब्यात भरुन फ्रिझमध्ये टाकले. ( आता करायला गेले तर किमान १० भाकर्या होतील.:अरेरे::फिदी:)
प्रश्न असा आहे की त्या उरलेल्या पीठाच्या भाकर्या होतील का? कुणाला तसा अनूभव आहे का? किन्वा तसे भिजवलेले पीठ फ्रिझमध्ये कणकेसारखे टिकते का? प्लीज मदत करा.
नारळ अहेत ते सवाष्ण बोलवुन
नारळ अहेत ते सवाष्ण बोलवुन ओटी भरुन संपवावेत
प्रश्न असा आहे की त्या
प्रश्न असा आहे की त्या उरलेल्या पीठाच्या भाकर्या होतील का? कुणाला तसा अनूभव आहे का? किन्वा तसे भिजवलेले पीठ फ्रिझमध्ये कणकेसारखे टिकते का? प्लीज मदत करा.>> भाकर्या होतील. पण भिजवलेले पीठ एका दिवसाच्या वर फ्रिजमधेही टीकणार नाही.
इतक्या भाकर्या खपणार नसतील आणि घरी उक्कड आवडत असेल तर तो गोळा + आंबट ताक असं फु.प्रो. मधे फिरवून सरसरीत करून फोडणीला घालून उक्कड करणे. चविष्ट लागते.
मन्जूडी धन्यवाद. मग निदान
मन्जूडी धन्यवाद.:स्मित: मग निदान पाच-सहा भाकर्या तरी करुन ठेवते. आणी पीठ उरत असेल तर त्याची उकड करते. भाकरी निदान आता दुपारी आणी रात्री खाता येईल, आणी उरलेली उद्याला खाईन चटणी बरोबर वगैरे. कारण घरात उकड खाणारी मी एकटीच आहे. बाकी कुणी उकड/ उपमा/ सान्जा असे अजीबात खात नाहीत.
कारण घरात उकड खाणारी मी एकटीच
कारण घरात उकड खाणारी मी एकटीच आहे. >>>>> त्या पिठात कांदा+मिरची+कोथिंबीर टाकून थालिपीठ होऊ शकेल.
पिठात कांदा+मिरची+कोथिंबीर
पिठात कांदा+मिरची+कोथिंबीर टाकून थालिपीठ होऊ शकेल.>>>>>>> हा बेस्ट ऑप्शन आहे.. त्यातच उरलेलं वरण, भाजी वगैरे पण टाकता येइल.. थोडं बेसन पीठ अन भरपुर ओवा टाकायचा...
मी किराणा सामान एकदम
मी किराणा सामान एकदम भरते...होलसेल मधुन...शेंगदाणे नेहमी फ्रिज मध्ये ठेवते खराब होउ नयेत म्हनुन .... अजुन कसे ठेवता येतील... ??....... ( १ की. आहेत )
शेंगदाणे नेहमी फ्रिज मध्ये
शेंगदाणे नेहमी फ्रिज मध्ये ठेवते खराब होउ नयेत म्हनुन .... >>>> भाजून बाहेर ठेवा.लागत असल्यास अर्ध्याचे कूट करून ते फ्रीजमधे ठेवा.
एक सट भरुन सायीचं दही आहे.
एक सट भरुन सायीचं दही आहे. त्याचे तूपाव्यतिरिक्त अजून काय करता येईल? दहीवडे किंवा कढी चांगली होईल का?
पीनी लस्सी चांगली होईल. थोडं
पीनी लस्सी चांगली होईल. थोडं दही घुसळून त्यात साखर मिक्स केली तर पराठ्यांबरोबर खाता येईल.
ताक करून त्यात जलजीरा पावडर, काळं मिठ आणि साखर घालून मस्त मसाला ताक होईल., रोज ताक करून संपेल.
मी पण आठवड्यातून एकदाच एक लिटर दुधाचे सट भरून दही लावते ४-५ दिवस पुरतं.
धन्यवाद दक्षिणा. हे फक्त
धन्यवाद दक्षिणा. हे फक्त सायीचा दही आहे, म्हणून शंका आली की दूधाच्या दह्याचे जे पदार्थ करतात ते याचेही जमतील का? तूपकट/तेलकट नाही होणार का?
रवा केक वगैरे करायला वापरा.
रवा केक वगैरे करायला वापरा.
नारळ टिकण्यासाठी शेंडी वर
नारळ टिकण्यासाठी शेंडी वर राहिल असा ऊभा ठेवावा. आणि लागेल तसा १ -१ वापरावा.
पीनी मग लस्सीच करा गोड.
पीनी मग लस्सीच करा गोड. चांगली लागेल.
उद्या ५ ली.बासुंदी बनविणार
उद्या ५ ली.बासुंदी बनविणार आहे. एरवी जेव्हा मी बासुंदी बनविते तेव्हा दुध आटवून निम्मे करते पण उद्या एव्हढे दुध आटायला खुप वेळ जाईल. तर काही युक्ती आहे का ज्यामुळे दुध लवकर घटृ होईल व बासुंदीची चवही बदलणार नाही. तसेच जर दुध तळाशी लागु नये म्हणून मी दुधात वाटी टाकते. अजून काही उपाय आहे आणि तरीही दुध लागले तर तो वास जाण्यासाठी काय करू ?
निल्सन निम्मे कंडेन्स मिल्क
निल्सन निम्मे कंडेन्स मिल्क वापरलत तर जास्त आटवावे लागणार नाहे. तरला दलाल च्या साईट वर क्वीक बासुंदीची रेसीपी आहे.
दुध चुकूनही लागु देवू नका. वास जास्त नाही.
रश्मी, तळून थालीपीठ(धपाटे)
रश्मी, तळून थालीपीठ(धपाटे) करता येतील त्या भाकरीच्या पीठाचे. माल मसाला अॅड करायला लागेल.
नाहीतर भरीताचे वांगे भाजून त्यात मिक्स करून वांग्याचे थालीपीठ लावता येतील.
काल इंग्रोतुन लाल पोहे आणले
काल इंग्रोतुन लाल पोहे आणले आहेत ... नॉर्मल पोह्यांसारखेच करता येतिल का? की चव वेगळी असते?
एग व्हाइट चे दोन कार्टन
एग व्हाइट चे दोन कार्टन शिल्लक राहिले आहेत. दररोज ओमलेट नको. लवकर संपवायच आहे..काय काय करु शकू ? संपवण्यासाठी युक्ती सांगा प्लीज.
एगव्हाइट चे फ्रिटाटा पण करता
एगव्हाइट चे फ्रिटाटा पण करता येइल. इथे आहे कोणीतरी लिहिलेली रेसिपी.
दुधाला जर जळका वास लागला तर तो काय वाट्टेल ते करूनही जात नाही यबद्दल सीमा +१
इव्हॅपोरेटेड मिल्क, हाफ & हाफ वगैरे वापरलं तर?
बासुंदी....स्लर्प!
deeps, scrambled eggs,
deeps, scrambled eggs, बुर्जी, french toast करता येईल.
बासुंदीसाठी आई एक वेगळं खास
बासुंदीसाठी आई एक वेगळं खास जाड बुडाचं पातेलं वापरते त्यात खाली लागत नाही.
बाकी मी एकदा लईच झटपट बासुंदी केली होती गिट्सचं पॅक वापरुन.
बासुंदीकरता - सगळं दूध एकदा
बासुंदीकरता - सगळं दूध एकदा उकळवून घ्या. मग एका लहान जाड बुडाच्या पसरट पातेल्यात त्यातलं थोडं दूध घालून आटवा. आटवलेलं दूध पुन्हा पूर्ण उकळवत ठेवलेल्या दुधात घाला. असं पुन्हा पुन्हा करा. एकदा हवं तेव्हढं दाट झालं की साखर अन बाकी माल घाला. मोठ्या पातेल्यातलं दूध आटवतांना त्यात वाटी ऐवजी चिनीमातीची बशी घालतात असं पाहिलं आहे.
वरची युक्ती अन्नपूर्णा पुस्तकात वाचलेली अन आजीनी केलेली पाहीलेली आहे...
बदाम/ काजू भिजवून थोड्या
बदाम/ काजू भिजवून थोड्या दुधात बारीक पेस्ट करून दुधाला लावली तरी बासुंदी घट्ट होते.
निल्सन, बासुन्दी मिक्स या
निल्सन, बासुन्दी मिक्स या नावाने कोरडी पावडर मिळते ( पॅकबन्द) त्यात वेलची पूड वगैरे आहे. ती वापरा बासुन्दी लवकर दाट होते. आम्ही तीन वेळा केलीय, मात्र साखर जपुन घाला.
Pages