युक्ती सुचवा युक्ती सांगा- ४

Submitted by पूनम on 27 November, 2013 - 03:36

स्वयंपाकघरातल्या युक्ती सुचवायला आणि सांगायचा हा चौथा बाफ.

याआधीचे तीन भाग बघायला विसरू नका:

युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
युक्ती सांगा- ३: http://www.maayboli.com/node/38475

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या माहितीप्रमाणे कोकमाची सालं साखरेत मुरवुन मुरवुन त्याचा जो रस निघतो ते म्हणजे कोकम सरबत ( पाणी न घातलेलं) . यालाच अमृत कोकम पण म्हणतात. याऐवजी कोकमाची सालं थोडं मीठ लावून वाळवली की त्याला म्हणतात आमसुलं . आमसुलांचं सरबत कुणी केल्याचं ऐकलं नाही. मिक्सरमधून आमसुलं फ़िरवली की ती तेलकट होतील.
ताज्या कोकमांचं सरबत करताना कोकमाची सालं नुसतीच पाण्यात भिजवतात आणि त्या पाण्यात साखर मीठ घालतात.

आमसुलाचं सरबत करायचं असेल तर मी आमसुलं थोड्या पाण्यात भिजत घालते. नंतर ते पाणी गाळून त्यात चवीनुसार साखर, मीठ, जिरेपूड घालून व गरजेप्रमाणे जास्तीचे पाणी अॅड करते. पण त्याची चव कोकमासारखी नाही लागत. आमसुलाची चव वेगळी लागते.

धारा, आमसुले मिक्सरमधून काढू नका, वाईट चव लागते. हातानेच कोळून रस काढता येईल. त्याने बरी चव लागते. सोबत थोडी मिरपूड व भाजलेल्या जिर्‍याची पूड टाकायची.

सगळ्यांचे धन्यवाद. मिक्सरच्या टीपबद्दल तर खूपच. मला लक्षातही आलं नव्हतं.
आमसुलांचं सरबत कुणी केल्याचं ऐकलं नाही. >>>> मी पण, म्हणून तर इथे विचारलं. Happy
क्रॅनबेरी ज्युस आमच्या गावातल्या एकुलत्या एका दुकानात मिळायची शक्यता नाहीये, पण तरी एकदा बघते. उम्मीद पे दुनिया कायम है| Wink
आमसुलाच्या सरबताला काट मारू का सरळ? कारण कोकम सरबताच्या अपेक्षेने प्यायला गेले तर कायच्या काय अपेक्षाभंग होईल ना? शिवाय २० माणसांना आमसुलंही एवढी लागतील, तेव्हा आहे ती पुरतील की नाही, ही पण शंका आहेच.

काट मार! आमसुले संपतील आणि आवडल नाही तर वायाही जातील! परत एखाद्या मित्राला/ तुम्हालाच आंबट गोड वरण खावसं वाटलं तर आमसुलं नसतील. (महाराष्ट्रात गेले की कोकम सरबत आणेल म्हणावं! Biggrin )

आमसुलाचं सरबत करायचं असेल तर मी आमसुलं थोड्या पाण्यात भिजत घालते. नंतर ते पाणी गाळून त्यात चवीनुसार साखर, मीठ, जिरेपूड घालून व गरजेप्रमाणे जास्तीचे पाणी अॅड करते. >>>> अगदी अगदी . शाळा-कॉलेजच्या दिवसात फार प्यायचे एकटीच बनवून

धारा, आमसुलं, कोकम सरबत या इथल्या प्रदेशासाठी मौल्यवान जिनसा आहेत. पुरवून वापर Proud

आमच्याकडेही कोकम सरबत हिट्ट आहे. माझे गेल्यावर्षी आणलेले दोन कॅन संपलेत. एक आगळाचा कॅन आहे तो कधीतरी सोलकढी, आमटी साठी वगैरे ठेवलाय.

मेडीटरेनियन डेलिकसी विकणारे दुकान असेल तर त्यांच्याकडे करकाटे / करकाडे या नावाने आंबाडीच्या बोंडाच्या
पाकळ्या मिळतील... त्या कोकमांना उत्तम पर्याय आहेत. रंग व चव तशीच ( काकणभर सरसच ) पण याचे फक्त
सरबत करतात, पदार्थात नाही वापरता येत.

http://www.monkeysee.com/play/13228-how-to-make-karkade-hibiscus-punch

इथे पहा !

ओह आत्त्ता पाहतेय सगळे छान पर्याय आहेत.
नेमकं दूधी काउंटरवर राहिल्याने आयता खिसून मिळाला आणि त्याचं सोनं आपलं ते हलवा झाला. पुढच्या वेळेला वरील पद्धतीने करेन. पराठे तर मी विसरलेच होते. घरची झुकीनी आहे तिला कामाला लावेन. आभार्स..

रच्याकने, अशा दुधीचा हलवा छान होतो Happy (की हलवा असल्यामुळे पब्लिकला तो छान लागतो ;))

(की हलवा असल्यामुळे पब्लिकला तो छान लागतो डोळा मारा)>> हेच करण असावं..
बाकी दुधी आपला प्रचंड फेवरीट.. तो फेकल्या जातो की काय ह्या भितीने काकुळतीने मदत करायला आले Wink

५०० मिली व्हिपींग क्रिम उरली आहे. आज एक्सापयरी. कमी कटकटीचे काय बनवता येइल? घरात दोनच माणसे आहेत संपवणारी म्हणुन पेढे, बर्फी बाद.

मी घाईघाईत दिनेशदांच्या पद्ध्तीने रवा खोबर्‍याचे लाडू करायला घेतले. आणि तूप न घालता रवा भाजला. Sad खोबरं घातल्यावर चूक लक्षात आली. मग थोडं थोडं तूप घातलं आणि चांगलं भाजलं. आता मुरायला ठेवलंय. दिड तास झालाय. काही बिघडेल का? आता काही करू का?

(हाच प्रश्न तिथेही विचारून आलेय.)

~साक्षी

तूप न घालता रवा भाजला.>>>> रवा नीट भाजला असेल तर काही प्रॉब्लेम नाही.लाडू वळून खाऊन टाका.

देवकी+१. लाडू वळतांना थोडा दुधाचा हबका दिल्यास छान वळले जातात, पण मग टिकत नाहीत. तसेही शिल्लक राहत नाही म्हणा Happy

अर्धा किलो काटे कोहोळं आणलं आहे (पांढरा भोपळा) किसुन ठेवला आहे..

काय करता येइल? गजरचा हलवा करतो तसा कसा लागेल ह्याचा?
काहीच नाही झालं तर पराठे अन खिचडीत खपवायचाय.. पण हलवा कसा होइल/लागेल?

क्रिम एक्स्पायर होउन गेलं Sad काही करायला वेळच नाही मिळाला.
लाजो, कुल्फीची रेसिपी छान आहे गं पण एवढ्या पावसाळी वातावरणात नसतीचे केल्या गेली. उन्हाळ्यात आवर्जुन करेन.

किसून, जिरं-मिरचीची फोडणी आणि ओलं खोबरं घालून परतून भाजी करता येईल (शिजायला दुधीपेक्षा थोडा जास्त वेळ लागेल)

मी पुस्तकात वाचून बीट, सफरचंद आणि खजूराच्या वड्या केल्या. पण मिश्रण थोडं मऊ राहिलंय. वड्या पडत नाहियेत. आता ते प्रकरण तसंच फ्रिजात टाकलय. काय करू? का त्याचे लाडू वळून टाकु? लाडूच करत होते असं सांगेन सगळ्यांना. Happy

साक्षी

साक्षी, मिल्क पावडर असेल तर त्यात वापरा. नाहीतर रवा मिक्सरमध्ये बारीक करून त्यात घालून मिश्रणाचा गोळा करा. वड्या पडतील.

Pages