मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - खाद्ययात्रा "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:41

गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!

हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...

हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -

modak2.JPG
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया फळे, भाज्या व धान्ये यांचे फोटो खेळासाठी चालणार नाहीत याची नोंद घ्यावी. टोमॅटोचा फोटो बाद आहे.
- संयोजक मंडळाच्या वतीने.

That was posted for fun and to make sure the alphabet does not change...hope you could read the comment...thanks

कमेंटवरून 'तो फोटो गंमतीत टाकला आहे झब्बूसाठी नाही' असे काही स्पष्ट कळाले नाही म्हणून पुन्हा एकदा नियम सांगितल्यास हरकत नसावी. ते आमचे कामच आहे. खेळ सुरू ठेवा.
- संयोजक मंडळाच्या वतीने.

रुमाल नको टाकू. जेवढे फोटो आहेत ते अपलोड करून ठेव म्हणजे इकडे अक्षर आल की लगेच टाकता येतात. पदार्थाच्या नावानेच अपलोड करून ठेव म्हणजे शोधायला सोपे पडतात. माझे काही फोटो वेगळ्या नावाने होते त्यामूळे शोधायला वेळ गेला.

एका मोठ्या फोटोतुन सगळे पदार्थ वेगळे केल्याने फोटो नीट दिसत नाहियेत.. समजुन घ्या प्लीजच Happy

Pages