गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
आर्या फोटो मस्तच होता, राखून
आर्या फोटो मस्तच होता, राखून ठेव पुढच्या ड साठी
अमेय + १ आता लवकर ज आणा.
अमेय + १
आता लवकर ज आणा.
हो हो ..अमेयदा! नक्कीच!
हो हो ..अमेयदा! नक्कीच!
ज = जेवण. चालेल का?
ज = जेवण. चालेल का?
ज + जेवण. चालेल का? >>>>
ज + जेवण. चालेल का? >>>> खाद्यपदार्थ हवा आहे.. गुजराथी थाळी नको.. फोटो आपण अथवा घरच्यांनी काढलेला हवा.. नेटवरुन ढापलेला नको.. नियम वाच की नीट जरा.
शोभा लंचटाईमला जेवण दिलेत!
शोभा लंचटाईमला जेवण दिलेत!
फोटो आपण अथवा घरच्यांनी
फोटो आपण अथवा घरच्यांनी काढलेला हवा.. नेटवरुन ढापलेला नको.. नियम वाच की नीट जरा.>>>>>>>>>>>.मुग्धे, हा मीच काढेलेला फ़ोटो आहे.
शोभा, हे जेवण चालेल मला. पण
शोभा, हे जेवण चालेल मला. पण इथे नाही चालणार.
मुग्धा, ते ताट आपण दोघींनी संपवूया.
शोभा, हे घरी बनवलेल ताट
शोभा, हे घरी बनवलेल ताट आहे???
मुग्धा, ते ताट आपण दोघींनी
मुग्धा, ते ताट आपण दोघींनी संपवूया >>> चालेल.. तसही भुक लागलीच आहे.. तोपर्यंत ज वरुन पदार्थ टाका रे लोक्सांनो
जेवण हा एक पदार्थ नाही.
जेवण हा एक पदार्थ नाही. चालणार नाही.
ज वरून जवसाची चटणी, जॆम, जलजीरा, जेली कितीतरी आहे.
शोभा, हे घरी बनवलेल ताट
शोभा, हे घरी बनवलेल ताट आहे??? >>>>>>>>>.नाही हॊटेल मधलं आहे.
शोभा, हे घरी बनवलेल ताट
शोभा, हे घरी बनवलेल ताट आहे??? >>> असा नियम नाहीये. फोटो आपण / आपल्या कुटुंबियांनी काढलेला असावा असा नियम आहे. बरोबर का संयोजक ?
अरे. आशूडी, ग्लासभर जलजीरा
अरे. आशूडी, ग्लासभर जलजीरा बनवावा आणि फोटॉ काढावा म्हटलं तर घरातला जलजीरा मसाला सापडेना.
अगो, नंदिनी, जॅमच्या बाटलीचा
अगो, नंदिनी, जॅमच्या बाटलीचा फोटो काढून इथे डकव पटकन. माझ्याकडे जॅम नाही आहे.
जॅम चालत असेल तर माझा रूमाल
जॅम चालत असेल तर माझा रूमाल घ्या आणि म वरून पदार्थ शोधा.
म वरून पदार्थ रेडी आहे. तू
म वरून पदार्थ रेडी आहे. तू जॅमचा टाक. म साठी माझा रूमाल.
ए रुमाल रुमाल काय अरे अगो
ए रुमाल रुमाल काय अरे
अगो बरोबर
जेवण कोणीही बनवू देत फोटो तुम्ही, तुमच्या जवळच्यांनी काढा म्हणजे झालं
जवस चतणी
जवस चतणी
जेली. - मी परत घेतली.
जेली. - मी परत घेतली.
अरे प्राची रूमाल टाकला होता
अरे प्राची रूमाल टाकला होता ना
आता "न" वरून पदाध शोधा.
आता "न" वरून पदाध शोधा.
शोभा तो फोटो नंतरच्यासाठी
शोभा तो फोटो नंतरच्यासाठी राखून ठेवा. न आला आहे.
नाचो चिप्स.
नाचो चिप्स.
Natural आईसक्रीम मुग्धा
Natural आईसक्रीम मुग्धा स्पेशल
नंदिनी, रुमाल नाही चालत.
नंदिनी, रुमाल नाही चालत.
सिताफळ आइस्क्रिम
सिताफळ आइस्क्रिम
म घ्या म
म घ्या म
मग संपादन करा आणि पुढच्यावेळी
मग संपादन करा आणि पुढच्यावेळी ते अक्षर आलं की टाका. काय करणार?
आता "स" वरून फोटो टाका.
सुशि
सुशि
Pages