मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - खाद्ययात्रा "

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:41

गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!

हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...

हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -

modak2.JPG
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज + जेवण. चालेल का? >>>> खाद्यपदार्थ हवा आहे.. गुजराथी थाळी नको.. फोटो आपण अथवा घरच्यांनी काढलेला हवा.. नेटवरुन ढापलेला नको.. नियम वाच की नीट जरा.

फोटो आपण अथवा घरच्यांनी काढलेला हवा.. नेटवरुन ढापलेला नको.. नियम वाच की नीट जरा.>>>>>>>>>>>.मुग्धे, हा मीच काढेलेला फ़ोटो आहे. Happy

मुग्धा, ते ताट आपण दोघींनी संपवूया >>> चालेल.. तसही भुक लागलीच आहे.. तोपर्यंत ज वरुन पदार्थ टाका रे लोक्सांनो

जेवण हा एक पदार्थ नाही. चालणार नाही.
ज वरून जवसाची चटणी, जॆम, जलजीरा, जेली कितीतरी आहे.

शोभा, हे घरी बनवलेल ताट आहे??? >>> असा नियम नाहीये. फोटो आपण / आपल्या कुटुंबियांनी काढलेला असावा असा नियम आहे. बरोबर का संयोजक ?

ए रुमाल रुमाल काय अरे Rofl
अगो बरोबर Happy
जेवण कोणीही बनवू देत फोटो तुम्ही, तुमच्या जवळच्यांनी काढा म्हणजे झालं Wink

सुशि

sushi.jpg

Pages