नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!
१ हेच का ते अच्छे दिन ?
२ अमीर खानच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा पण बुध नीचेचा असे असल्याने तो असे narcissistic वर्तन करत असेल का?
३ Homeopathy मधल्या Lycopodium किंवा Pulsetilla औषध अशा केसेस मध्ये परिणामकारक असेल का?
४ मांसाहारी व्यक्तीमध्ये सात्विक गुणापेक्षा तामस गुणाचे संवर्धन जास्त असल्याने असे होत असेल का?
५ अरविंद केजरीवालांसारखा स्वच्छ माणून पंप्र झाल्यावर असला आचरटपणा थांबेल का?
६ व्यवसायिक भारतीय सिनेमात कॉस्ट्यूम डिझायनिंग हा विषय गभीरतेने घ्यायला कधी सुरुवात होणार? इथे तर मुदलात कॉस्ट्यूमचाच पत्ता नाही.
यात पाश्चिमात्य संस्कृती
यात पाश्चिमात्य संस्कृती कुठुन आली ?
जादुगर सैंय्या मधला उघडा प्रदीपकुमार पाहिला नव्हता का ?
आज पुन्हा मांजर सांभाळायचे
आज पुन्हा मांजर सांभाळायचे काम आले आहे का ? शुभेच्छा !!!
तुम्ही एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. ञावर २००० पोस्स्टी पडून याचा दुसरा भाग निघो याच्या तुम्हाला अत्ताच शुभेच्छा. व अभिनण्दन.
छ्या अगदीच मिळमिळीत हय ते
छ्या अगदीच मिळमिळीत हय ते पोष्टर....
बहुधा अंबीरखाण स्वतःच स्वतःविरुद्ध पोलीसात केस देईल... म्हंजी चर्चा तर होणारच::फिदी:
घटम भिंद्यात पटम छिंद्यात,
कुर्यात रासभारोहणम
येन केन प्रकारेण
प्रसिद्ध पुरुषो भवेत.....
अरेच्या! तुम्ही व्हॉ अॅ वरचे
अरेच्या! तुम्ही व्हॉ अॅ वरचे फोटोशॉप केलेले आमीरच्या 'पी के' उभ्या पोझशेजारी रेल्वेरुळावर प्रातर्विधीसाठी बसलेल्या व "खा के" असे शीर्षक मिरवणाऱ्या माणसाच्या पोस्टराला पाहिले नाही असे वाटते.
अरुन्धती खा के म्हणजे काय?
अरुन्धती खा के म्हणजे काय? खरच माहीत नाही म्हणून विचारतेय, यात उपहास नाही.
अमिरच्या पोस्टरवरुन सकाळ मध्ये बातमी पाहिली, पण हे खरच फोटोशॉप आहे की अमिरने प्रत्यक्ष असे केलेय नीट कळले नाही. उ. प्र. किन्वा म.प्र च्या एका वकिलाने अमिर विरुद्ध केस दाखल केलीय एवढेच वाचले.
म्हणजे खाऊन पिऊन ( खा-पीके )
म्हणजे खाऊन पिऊन ( खा-पीके ) दुसर्यादिवशी सकाळी 'सवेरीवाली गाडीसे चले जायेंगे' वाली रेल्वेगाडी पकडणे![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
( हा 'सवेरीवाली गाडी' जोक फार प्रचलित होता आमच्या लहानपणी. )
असे आहे होय. धन्यवाद अगो.
अमिर खानच्या पोस्टरचे दिशात
अमिर खानच्या पोस्टरचे दिशात जागोजागी दहन करावे असे सुचवतो.
त्या निमित्ताने खजुराहो, अजंठा इत्यादि ठिकाणेही बाबरी मस्जिद स्टाईल तोडून-फोडून भुईसपाट करण्यात यावीत!
अवांतर - स्वजो आणि नॅनो
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एका उत्तम कलाकृतीचा मुर्तीमंत
एका उत्तम कलाकृतीचा मुर्तीमंत आविष्कार म्हणुन या पोस्टर कडे पाहावे..
या पोस्टर मधे माननिय श्रीयुत आमिर खान यांनी आपले वस्त्र काढुन टाकलेले आहे आणि ते एका रेल्वेच्या रुळावर उभे आहे. यातुन आपल्याला असे कळवण्यात आलेले आहे की बरेच भारतीय लोक प्रातःकाली अश्याच अवस्थेत रेल्वेच्या रुळांवर असतात .. यांचे प्रतिनिधित्व आमिरखान उभा राहुन करत आहे. ( आता सिनेस्टार असल्याने तो बसु शकत नाही तो भाग वेगळा) यात त्याने ट्रांस्झिस्टर पकडलेले आहे..यातुन तो हे सांगतोय की तुम्ही काळ मधे वाहत गेल्याने जुण्यागोष्टी विसरुन गेलेत तो ट्रांझिस्टर पुर्वी घराघरांमधे होता परंतु आपण मोबाईलच्या नादाला लागल्याने आप्ण आपल्या जुन्या गोष्टी विसरुन गेलोत... आमिर या चित्रपटात घागरा आणि वर कोट देखील घातलेला दाखवलेला आहे अमिर हा अत्यंत हुशार अभिनेता असल्याने त्याने त्यातुन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्त्री पुरुष समान असतात म्हणुन त्याने वर कोट घातलेला आहे आणि खाली घागरा .. ( खाली पँट घातलेली आधी पण वर काय घालावे याचा विचार अत्यंत भयानक असल्याने ती आयडीया ड्रॉप केली) ... त्याच प्रमाणे तो अत्यंत आश्चर्यचकित होउन समोर बघत असतो .. यात देखील मोठ्ठी गोम आहे.. खर तर त्याचा चेहरा फारच बोलका असल्याने त्याचे भारतात असणारे जगप्रसिध्द वाक्य " ओ त्तेरी " याचा अभिनय त्याने त्या डोळ्यातुन दाखवलेला आहे.. नीट चेहर्या कडे बघा आणि मनात ओ त्तेरी असे वाक्य बोला.......... वाटते ना तोच बोलतोय म्हणुन .. याला म्हणतात जिवंत अभिनय ..
काम आले बाकीची माहीती नंतर देतो ...............
आपल्याकडे पोस्टर बॉईज,तिथे
आपल्याकडे पोस्टर बॉईज,तिथे पोस्टर बॉय.
मागे त्याच्या देल्ली बेली वरुन गोंधळ घातलेला.
लोकांना चघळायला नुसते विषय लागतात.
इज्ञासडास टेण्सन घेत नका जाव.
इज्ञासडास टेण्सन घेत नका जाव. आमालाच टेन्सन येतं
ज्यांना ट्रान्झ्सिटर परवडत नाय त्यांनी काय करायचं ?
मला तर वाटतय रेल्वेच्या रुळात टमरेल घेऊन जायांचं सोडुन आमिर खानदानी ट्रान्स्झिस्टर घेवुन गेला चुकुन.
इज्ञासडास टेण्सन घेत नका जाव.
इज्ञासडास टेण्सन घेत नका जाव. आमालाच टेन्सन येतं
ज्यांना ट्रान्झ्सिटर परवडत नाय त्यांनी काय करायचं ?
मला तर वाटतय रेल्वेच्या रुळात टमरेल घेऊन जायांचं सोडुन आमिर खानदानी ट्रान्स्झिस्टर घेवुन गेला चुकुन.
बावळट आहे अमीरखान. असले
बावळट आहे अमीरखान. असले काहीतरी करण्यापेक्षा जर मनापासून अश्या लोकाम्ची काळजी असेल, तर जाहिराती न करता संडास बांधून दिले तर जास्त फायदा होइल. पण बोलून चालून नटच तो - वर लिहील्याप्रमाणे
घटम भिंद्यात पटम छिंद्यात, कुर्यात रासभारोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत.....
डॉ. बंग, आमटे यांनी कधी पोस्टरे लावली नाहीत!
अरेरे, कुठे ते अंगभर कपडे
अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!>>>>>>>>>>>>> निळा स्वेटर घालणारे त्या काळातल्या हिरोंची शरीरयष्टी मुद्दाम उघडे होउन दाखवण्यासारखी नसायचीच....आणि असले पोस्टर बिस्टर लाउन संस्कृती बुडत बिडत नाही.....बाकी खुप गोष्टी चालु असतात सं बुडविण्याच्या...त्यावर पण प्रकाश घाला
कुठे हे खुदालाही डरवणारे
कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक! >>>
हे कॅच झाले नव्हते विकु पहिल्यांदा वाचले तेव्हा. लोल.
त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? >>> हे मी भलत्याच अर्थाने वाचले आधी![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे >> पण हे पाश्चात्य देशात तरी कोठे होते? (तुमच्या) इटलीत हीरो लोक असे फिरतात का?
परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन >>> मोहब्बते पाहिलात का नुकताच?
गंमतच आहे. कालच्या पेपरात
गंमतच आहे.
कालच्या पेपरात कॉंग्रेस की बिजेपीच्या एका खास की आमदाराने आमीरच्या त्या पोस्टरला कपडे चढवत असल्याचा फोटो पाहिला आणि तो आम की खासदार आमीरचा जोरदार निषेध करतोय असेही वाचले. तोही गंमतच करत असावा बहुधा.
(No subject)
हाच ट्रेंड मराठीत आला >>
हाच ट्रेंड मराठीत आला >> कशाला काळजी करता? मराठी माणूसच असे ट्रेंड सेट करतो. पोस्टरच बघायची तर मिलिंद सोमण यांची बघा.
पोस्टरच बघायची तर मिलिंद सोमण
पोस्टरच बघायची तर मिलिंद सोमण यांची बघा.>>>>>>>>>>>. हॉट...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजगर (जुर्राट नव्हे) सोमण
अजगर (जुर्राट नव्हे) सोमण
तो त्यांचा अभिव्यक्ती
तो त्यांचा अभिव्यक्ती स्वातंत्रयाचा प्रश्न आहे. एखाद पोर नंग दिसलंतर चड्डी देतील पणं अभिव्यक्ती म्हटलं कि स्वतः नंगे होतील
विजयजी, हा धागा काढल्याबद्दल
विजयजी,
हा धागा काढल्याबद्दल अभिनंदन.
शब्दखुणा आवडल्या.
शब्दखुणा आवडल्या.
पोस्टरवर झळकायचे धाडस आमिर
पोस्टरवर झळकायचे धाडस आमिर ने केले खरे पण असली दृष्य अनेक अभिनेत्यांनी दिली आहेत.
गिरीश कर्नाड ( उंबरठा ), ऋषि कपूर ( बॉबी, दुसरा आदमी ), धर्मेंद्र ( ललकार ), अक्षय कुमार ( सुहाग ), रणवीर कपूर ( सावरीयाँ, बेशरम ) बँडीट क्वीन, ट्रेन टू पाकिस्तान, अर्थ ... मधेही आहेत. नया नही है यह !
आमिर या चित्रपटात घागरा आणि
आमिर या चित्रपटात घागरा आणि वर कोट देखील घातलेला दाखवलेला आहे अमिर हा अत्यंत हुशार अभिनेता असल्याने त्याने त्यातुन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की स्त्री पुरुष समान असतात म्हणुन त्याने वर कोट घातलेला आहे आणि खाली घागरा ..>>>> पण या चित्रपटाचा नक्की विशय काय आहे , हे कळल्याशिवाय टिप्पणी का?
लोकांचा नक्की आक्षेप कशाला ?
आमिर खान ने "हे" केल म्हणून की "आमिर खान" ने हे केल म्हणून ?
न्यूड चित्रकला हा विषय इथेच
न्यूड चित्रकला हा विषय इथेच झाला होता
पण या चित्रपटाचा नक्की विशय
पण या चित्रपटाचा नक्की विशय काय आहे >>>> परग्रहावरून आलेला अस काहीस वाचलेलं आठवतयं.
परग्रहावरून आलेला अस काहीस
परग्रहावरून आलेला अस काहीस वाचलेलं आठवतयं>>>>
कोण पराग्रहावरुन आलेला.. ट्रांझिस्टर ????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमिर खान ने केले म्हणुन
आमिर खान ने केले म्हणुन कोडकौतुक
हेच सलमान या रणवीर ने केले अस्ते तर ?>
या प्रकाराला "चीप पब्लिसिटी" असे म्हणतात
ओह अमिर खान परग्रहावरून
ओह अमिर खान परग्रहावरून आलेला असतो का ? मग आल्याआल्या त्याला कपडे शॉपिंगला वेळ कसा मिळणार? आणि मग कोणते कपडे घालायचे माहित नसल्याने घागरा कोट घातला तर एवढं काय हसायचं ते! शिकेल हो हळूहळू....
खरंतर तो ट्रान्झिस्टर धरायला पाहिजे आणि नेमका कुठे धरायला पाहिजे याचं भान एलियनला असल्याचं पाहून आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे!
रच्याकने, टर्मिनेटर मध्ये टर्मिनेटर मंडळी अशीच दिगंबरावस्थेत वर्तमानकाळात येतात. त्यावरून नक्कीच ही कल्पना उचलली असणार.
Pages