अमीर खानच्या पोस्टरच्या निमित्ताने !

Submitted by vijaykulkarni on 10 August, 2014 - 09:07

नुकताच नेटवर आमीर खानने पीके चित्रपटासाठी केलेले पोस्टर पाहिले आणी धक्काच बसला ! पाश्चिमात्य संस्कृतीचे अंधानुकरण नक्की कुठे घेऊन जाणार आहे आपल्याला? परंपरा, प्रतिष्ठा आणी अनुशासन असलेली आपली संस्कृती खाऊजा च्या लाटेपुढे हतबल होत आहे का ? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो. हाच ट्रेंड मराठीत आला आणी स्वजो ने असेच पोस्टर केले तर? त्यात बजेट नाही म्हणून हातात टू इन वन च्या ऐवजी आयपॉड नॅनो घेतता तर? अरेरे, कुठे ते अंगभर कपडे घालून वर निळा स्वेटर घालणारे आमच्या वेळचे नायक आणे कुठे हे खुदालाही डरवणारे आजकालचे नायक!

१ हेच का ते अच्छे दिन ?
२ अमीर खानच्या पत्रिकेत शुक्र उच्चीचा पण बुध नीचेचा असे असल्याने तो असे narcissistic वर्तन करत असेल का?
३ Homeopathy मधल्या Lycopodium किंवा Pulsetilla औषध अशा केसेस मध्ये परिणामकारक असेल का?
४ मांसाहारी व्यक्तीमध्ये सात्विक गुणापेक्षा तामस गुणाचे संवर्धन जास्त असल्याने असे होत असेल का?
५ अरविंद केजरीवालांसारखा स्वच्छ माणून पंप्र झाल्यावर असला आचरटपणा थांबेल का?
६ व्यवसायिक भारतीय सिनेमात कॉस्ट्यूम डिझायनिंग हा विषय गभीरतेने घ्यायला कधी सुरुवात होणार? इथे तर मुदलात कॉस्ट्यूमचाच पत्ता नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिनेमाची पी आर एजन्सी हुशार आणि एफिशियन्ट आहे एवढेच यावरून सिद्ध होते.
>>>>>>
व्हॉटसपवर दर दुसरा मेसेज सनी लिओनच्या नावाने फिरत असतो, पण म्हणून लोकं जिस्म आणि रागिणी एमेमेस बघायला गर्दी करतात असा होत नाही.

मी तिघाही खानांचे सिनेमे बघत नाही. कितीही पोस्टर लावा.
>>>>>>>
आता इथे तिसरा खान कोण आणि का आला चर्चेत ?
तसेच इंडस्ट्रीत इतरही बरेच खान असताना तुम्ही लोक नेमके तिसरा खान कोण ते ओळखतील असे गृहीत पकडले असेल तर याचाच अर्था तो तिसरा खानही रॉकस्टार आहे Happy

मी चित्रपट चांगला आहे हे चार लोकांकडून समजल्यावरच तो किती चांगला आहे यानुसार थिएटरात बघायचा कि घरी हे ठरवतो.
बाकी मग तो खानाचा असो वा खन्नाचा, काही फरक पडत नाही.
तसेच फक्त माऊथ पब्लिसिटीवर विश्वास ठेवतो, आणि यासाठी आपल्या भाईचा चित्रपट आहे तर फर्स्ट डे फर्स्ट शो च बघितला पाहिजे असा हट्ट नसला की झाले Happy

ज्यांना खान आडनावाची अ‍ॅलर्जी आहे त्यांनी खोत असं वाचून जावं..
(टीव्हीवर मोफत पाहून होत असेल तर सूचनेकडे दुर्लक्ष करावं. हल्ली पाकिस्तानातून साड्या येत असल्याने धोरणठिसूळता झिरपायला हरकत नसावी )

काड्या फक्त गगोवरच...
हे सीरीयसली लिहीलय. बिचारे चांगल्या करमणुकीला मुकतात. भूतदया

ऋन्मेऽऽष, मी मुळातच हिंदी चित्रपट कमी पाहतो. बघितले तर जुनेच. ते अर्थातच टीव्हीवर. त्यामुळे हिंदी सिनेमाला सहसा पास असतो. त्यात शाहरुख-सलमान-आमीरचे सिनेमे असले तर कंप्लीट इग्नोर.

<<अमिरने सान्गीतले की या पुढे जे पोस्टर येईल, त्यात ट्रान्झीस्टर पण नसेल झाकायला.ऑ!>> पण नसेल ?
माझ्या मते ट्रान्झीस्टर च्या जागी चड्डी असेल .जंगल जंगल पत्ता चला है ,चड्डी पहेनके फुल खिला है Happy

मी सहसा इंग्रजी चित्रपट बघतो. अर्थातच मराठीही. आनि वर म्ह्टल्याप्रमाणे हिंदी बहुतेक जुनेच. मल्याळी कधी काळी शिकलो तर ते ही बघेन.

कोक्या,
१) मी तिघाही खानांचे सिनेमे बघत नाही.
२) मी मुळातच हिंदी चित्रपट कमी पाहतो. बघितले तर जुनेच. ते अर्थातच टीव्हीवर.

>>>>>>>>

या आपल्याच दोन्ही वाक्यातील फरक बघा.
मी आपल्याला वैयक्तिक ओळखत नाही त्यामुळे आपले विचार ठाऊक नाहीत पण आपल्या पहिल्या विधानानुसार आपण खानद्वेष करतात अशी शंका घेण्यास पुर्ण वाव होताच. बस्स तेवढेच शंकासमाधान करून घेतले.

तळटीप - यातही हे असे (खानद्वेष) करणे हे चूक की बरोबर, योग्य कि अयोग्य यावर मला भाष्य करायचे नाहीये. हा वेगळ्या धाग्याचा विषय झाला. Happy

या आपल्याच दोन्ही वाक्यातील फरक बघा.>>
आँ?! फरक असणारच. Light 1

यातही हे असे (खानद्वेष) करणे हे चूक की बरोबर, योग्य कि अयोग्य यावर मला भाष्य करायचे नाहीये. >>
भरपूर खोडसाळ भाष्य करुन झाल्यावर हे वाक्य टाकले की झाले! Proud
बाकी, तुम्ही काय समजता आणि कसली खात्री करुन घेता हा तुमचा प्रश्न आहे. सो, आय डोन्ट केअर Happy

ह्या धाग्यावर हेमाशेपो.

आमिर मध्ये र्‍हस्व 'मि' हवा तेवढा सुधारा प्लीज शीर्षकात.

इथे अनेक उदा. देता येतील हॉली-बॉली अ‍ॅक्टर्स न्यूडीटीची.आधी कोणीतरी दिलेली आहेतच.आणि बाहेर कुणाला काही पडलीये का याची?उगाच मेडीया आणि तो केस करणारा आणि आमिर एवढेच चर्चेत आहेत.मस्त फिल्म बघू.चांगली असेल तर दाद देऊ...हाकानाका..

सगळ्या खानावळीत आमिर बराच बरा आणि सेन्सिबल आहे, पण कधी कधी पडतो माणुस डोक्यावर काय करणार,
बहुतेक सगळे चित्रपट सणकून आपटले की काय होऊ शकते असा काहीसा संदेशही द्यायचा असेल त्याला Wink

>>तत्त्वज्ञानअच्छे दिनआपआरक्षणनरेंद्र मोदीमांसाहारराहुल गांधीसंस्कृतीसमाजसोनिया गांधीहोमिओपॅथी
विषयाचा आणि शब्दखुणांचा काही संबंध आहे का ? Lol

महेश, अंशतः सहमत. होमिओपॅथीचा येथे अजिबात संबंध नाही. बाकी माहीत नाही. काही काही आयडींच्या बरोबर काही टॅग आपोआप येत असाव्यात - उदा: माझ्या लेखाला क्रिकेट, गापैंच्या मोदी, केदारच्या इतिहास, तसे विकुंच्या लेखाला सोनिया गांधी Happy

विकु, या प्रतिक्रियांवरची संस्कृतीप्रधान प्रतिक्रिया तुमची अजून आली नाही?

आणखी मुद्दे असल्यास सुचवावेत.<<< माझा सुचवलेला मुद्दा अजून तसाह आहे...बदल अपेक्षित...

तुम्ही जे प्रश्न विचारले आहेत त्याच्या आऊट ऑफ रेफेरंस काँटेक्स्ट वर मला "आज लंडन ला पाऊस पडेल कारण मी आज निळ्यारंगाचा शर्ट घातलाय अन पोपटाला मिर्ची आवडते कारण लता चा आवाज जन्नत आहे" असे काहीसे उत्तर तयार करावे लागेल!!!!,

शाकाहार अन वर्तनाचा संबंध जोडणे हे प्रचंड हास्यास्पद आहे (नो ऑफेंस), शाकाहारी हिटलर पण होता!!! बाकी आपण सुज्ञ आहात!!!!.

राहता राहीला तुमच्याकाळचे हिरो अन आजचे हिरो , तर तुमचा काळ काय ते मला माहिती नाही तरी आजकाल हिरो म्हणजे "तुमच्या काळातल्या" सारखे नसुन, जास्तीत जास्त वास्तविकते कडे झुकणारी कॅरेक्टर्स करताना दिसतात, आता हिरो म्हणजे एका फटक्यात सात ठार (फुल बाह्यांचे कपडे घालुनही !!!) वगैरे तुमची काँसेप्ट असलीच तर ती बनवायचा आपणास पुर्ण हक्क आहे, आता आमिर च्या अ‍ॅक्टींग पेक्षा आपण त्याचा आहार, धर्म वगैरे वर फोकस करणार असाल तर नाईलाज आहे.

(संस्कृती चे काय हो, चंदेल राजांनी नवव्या ते अकराव्या शतकात शिवमंदिरांवर मैथुनशिल्पे कोरुन तेव्हा पासुनच बुडवायला सुरुवात केली होती अन त्यातल्या एकाही शिल्पाने टू-इन-वनच काय तर चिंधी सुद्धा पांघरलेली नव्हती , कसे? )

सोन्याबापूंशी सहमत.

आजकाल काही लोकांना विषय कोणताही असला तरी त्यात 'जात, धर्म, संस्कृती, मोदि आणि गांधी' यांना मध्ये आणल्याशिवाय चर्चा(?) पुर्णच होऊ शकत नाही असे का वाटते?

रश्मी ताय, आता कुठे टिकली फोडली ती पण एकच!!!, आजकाल सहजी आम्ही आमचे "आर्सिनल" (वाचा विचार) फोडत नाय ना!!! लवंगी अन सुतळी समयोचित कार्यांस सिद्ध असे ठेवले आहेत Biggrin

संस्कृती चे काय हो, चंदेल राजांनी नवव्या ते अकराव्या शतकात शिवमंदिरांवर मैथुनशिल्पे कोरुन तेव्हा पासुनच बुडवायला सुरुवात केली होती अन त्यातल्या एकाही शिल्पाने टू-इन-वनच काय तर चिंधी सुद्धा पांघरलेली नव्हती , कसे? >> आता तेंव्हा ट्रांसीस्टर नव्हते म्हणून Lol

Pages