म्युनिसिपल कॉर्पो रेशन ओफ ग्रेटर मुंबई
सार्वजनिक आरोग्य खाते, श्वान पाळण्याकरता अनुज्ञापत्र
( मुंबई महानगर पालिका अधिनियम १८८८ ( अद्यावत सुधारीत) च्या कलम १९१ अ अंतर्गत.
टर्म्स अँड कंडिशन्स
This license is granted pursuant to the provisions of teh section 191A and 191 b of MMC ACT 1888 and is valid and subsisting subject to the faithful compliance and observance of the conditions stipulated here under.
१) श्वान मालकाने आपल्या श्वानास प्रत्येक सहा महिन्यांनी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून रेबीज विष प्रतिबंधक लस टोचून घेतली पाहिजे. ह्यासाठी प्राणि रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा.
२) प्रत्येक श्वान मालकाने तो राहात असलेल्या परिसरात आप ल्या श्वानास त्या नियं त्रणाखाली ठेवले पाहिजे.
आणि त्यास बाहेर नेताना मुस्की अगर साखळी बांधून नेले पाहिजे.
३) प्रत्येक श्वान मालकाने जर आपले श्वान वेडाच्या झटक्याने अगर अन्य सांसर्गिक रोगाने आजारी असल्यास
त्याच्यावर प्राणी रुग्णालयातून अगर पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले पाहिजेत व तसा पुरावा
कार्यालयात सादर करावा.
४) श्वानाचा मालकी हक्क बदलल्यास अनुज्ञापत्र नवीन श्वानमालकाच्या नावे करून घ्यावे.
५) नूतनीकरणाच्यावेळी सर्व आवश्यक कागद पत्रे सादर करावीत.
६) श्वानाचा मृ त्यू झाल्यास किंवा ते हरवल्यास त्याबाबत अनुशासन कार्यालयात कळवावे व लायस न्स
रद्द करून घ्यावे.
७ ) अ. पत्राचे उरलेल्याकाळाचे कर परत केले जाणार नाहीत.
८) हे अप कोणत्याही परिस्थिती त दुसृयास देउ नये. अर्थात कुत्र्याची मालकी बदलली जाउ शकते.
९) पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे.
लायसेन्स वर म्युनिसिपल वार्ड, मालकाचे नाव पत्ता फोन नंबर कुत्र्याची माहिती, सर्व वॅ क्सिनेशन्स चा दाखला, व्हेट चे सर्टिफिकेट व नंबर, व्हेट ची जी फाइल असते त्याची कॉपी, द्यावी लाग ते, प्रति लायसेन्स
७५० रु. खर्च येतो व ते लगेच मिळते. ह्यावर असिस्टंट मेडिकल ऑफिसर, व सॅनिटरी इन्स्पेक्टर ची सही होते शिक्का होतो व मग ते हातात येते. दर वर्शी रिन्यू करावे लागते.
व्हॅक्सिनेशन शेड्यू ल व इत र माहिती पण आहे. सवडीने लिहीते.
काही उपयुक्त लिंका:
http://jaagruti.org/2013/07/09/pet-dogs-and-street-dogs-dos-and-donts/
http://www.pawnation.com/2014/05/08/10-dog-park-dos-and-donts/
http://www.cityofboston.gov/animals/regulations.asp
http://www.thedogplace.org/Family-Dog/Rules-for-dog-owners.asp
<<मिरर' आणि 'सकाळ' यांच्या
<<मिरर' आणि 'सकाळ' यांच्या आकारात फरक आहे.>>
मान्य पण शेवटी त्याचे तुकडे घ्यायचे आहेत ना?
ते सारख्या आकारात पण बनवता येतील
सुजा, अमांचा प्रतिसाद वाचणे.
सुजा,
अमांचा प्रतिसाद वाचणे.
चिनुक्स अमांचा प्रतिसाद
चिनुक्स अमांचा प्रतिसाद वाचला आहे पण तो पटला नाहीये .
करायचेच म्हटले/ठरवले तर कुठल्याही पेपर चे तुकडे पटकन होऊ शकतात.
त्याच्या करता मुंबई मिरर चीच जरुरी नाही.
हा आत्ता अमाकडे मुंबई मिरर पेपर येत असेल म्हणून त्यांनी तसे म्हटले आहे
टॅब्लॉईड साईझ पेपर (मिरर)
टॅब्लॉईड साईझ पेपर (मिरर) हाताळणीला सोपा असतो. शिवाय कागदाचा विशिष्ठ पोत- याहीमुळे तुकडे पटकन होतात. घाईगर्दीत तुकडे न करताही टॅब्लॉईड साईझचे एक पान पटकन बाजूला करता येते. मोठ्या आकाराच्या वर्तमानपत्राची पुन्हा पुन्हा घडी करण्याच्या नादात एकाच ठिकाणी अनेक अनेक फोल्ड्स पडतात त्यामुळे हाताळायला तसेच फाडायला अवघड जाते.
कुठल्या पेपरचे तुकडे हा काय
कुठल्या पेपरचे तुकडे हा काय गहन प्रश्न आहे का एवढा?
टॅब्लॉईड साईझ पेपर (मिरर)
टॅब्लॉईड साईझ पेपर (मिरर) हाताळणीला सोपा असतो. शिवाय कागदाचा विशिष्ठ पोत- याहीमुळे तुकडे पटकन होतात. घाईगर्दीत तुकडे न करताही टॅब्लॉईड साईझचे एक पान पटकन बाजूला करता येते. मोठ्या आकाराच्या वर्तमानपत्राची पुन्हा पुन्हा घडी करण्याच्या नादात एकाच ठिकाणी अनेक अनेक फोल्ड्स पडतात त्यामुळे हाताळायला तसेच फाडायला अवघड जाते.>>>>+१ खूप हँडी असतात ते.
कोणता पेपर घेता यावरून
कोणता पेपर घेता यावरून सामाजिक जाणिवा इ.पॅकेज ठरत असेल
कोणता पेपर घेता >> हा फारच
कोणता पेपर घेता >> हा फारच मोठा निकष झाला. आमचे पिताश्री तर पेप्राची घडी कोण कशी करून कसा पेपर ठेवतो यावरूनही जाणीवंचे पॅकेज काढायचे.
कुठल्या पेपरचे तुकडे हा काय
कुठल्या पेपरचे तुकडे हा काय गहन प्रश्न आहे का एवढा?
>>>
तेच तर
किती मन लावून चर्चा करतायेत त्यावर
(No subject)
(No subject)
.
.
पुलंच पाळीव प्राणी हा लेख
पुलंच पाळीव प्राणी हा लेख वाचून प्राण्यांबद्दल मत बनविणारे बरेच असतात. त्यांना माहिती नसते. हा लेख लिहील्या ने अनेक स्टिरिओटाइप बळकट व्हायला मदत झाली आहे. लेख फार जुना आहे पण मेजॉरिटी पब्लिक ह्यातून बाहेरच पडत नाही. वेगळा विचार होण्याची गरज आहे.
अमा, अहो तसे स्टीरिओटाईप पण
अमा, अहो तसे स्टीरिओटाईप पण खूप असतात हो. भेटत रहातात. पण हेही खरं की सगळेच तसे नसतात.
तुम्ही असल्या पोस्ट्सकडे खरंच लक्ष देऊ नका. तुम्ही छान माहिती देत आहात आणि तुम्ही जबाबदार कुत्रामालक आहात हे तुमच्या लिखाणावरून कळतंय.
है शाब्बास अमा!
है शाब्बास अमा!
तुम्ही असल्या पोस्ट्सकडे खरंच
तुम्ही असल्या पोस्ट्सकडे खरंच लक्ष देऊ नका. तुम्ही छान माहिती देत आहात आणि तुम्ही जबाबदार कुत्रामालक आहात हे तुमच्या लिखाणावरून कळतंय. +१००००
अमा तुम्ही प्लीज इग्नोर करा
पुलंच पाळीव प्राणी हा लेख
पुलंच पाळीव प्राणी हा लेख वाचून प्राण्यांबद्दल मत बनविणारे बरेच असतात. त्यांना माहिती नसते. हा लेख लिहील्या ने अनेक स्टिरिओटाइप बळकट व्हायला मदत झाली आहे. लेख फार जुना आहे पण मेजॉरिटी पब्लिक ह्यातून बाहेरच पडत नाही. वेगळा विचार होण्याची गरज आहे.
>>>> नाही अमा. लेख वाचून कोणी मतं बनवत असतील हे खूप विनोदी वाक्य आहे.
सगळे कुत्रेमालक तसे नसतात नक्कीच. पण ते अतिशयच विरळा (भारतात. इतर देशांत लोकं सभ्यपणे वागतात). जे अनुभव लोकं लिहितात ते पुलंचा लेख वाचून लिहीत नाहीत, तो स्वानुभव असतो.
त्यामुळे कुत्रे आणि कुत्रेमालकांबद्दल लिहिणार्यांना दोष देण्यापेक्षा इतर कुत्रेमालकांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागायचे हे शिकवलेस तर ?
पुन्हा एकवार सांगते - तक्रार पाळीव कुत्र्यांबद्दल नाही तर त्यांच्या विक्षिप्तपणे वागणार्या मालकांबद्दल आहे. कुत्रे आणि कुत्रेमालक यातील भेद लक्षात घेणे.
वेगळा विचार म्हणजे काय?
मामी राहू दे ना ग . माझ्या
मामी राहू दे ना ग . माझ्या मते समजलंय अमाला तक्रार कशाबद्दल आहे ते
पोस्टींवरून तसं वाटत नाहीये.
पोस्टींवरून तसं वाटत नाहीये.
सगळे कुत्रेमालक तसे नसतात
सगळे कुत्रेमालक तसे नसतात नक्कीच. पण ते अतिशयच विरळा (भारतात. इतर देशांत लोकं सभ्यपणे वागतात). जे अनुभव लोकं लिहितात ते पुलंचा लेख वाचून लिहीत नाहीत, तो स्वानुभव असतो. +१११११
मलाही हेच म्हणायच आहे. गैरसमजाबद्दल क्षमस्व
मामी, फक्त अमांनी का शिकवायचे
मामी, फक्त अमांनी का शिकवायचे आहे इतर कुत्रेमालकांना? सगळेच शिकवुयात की आपल्याला जेव्हा त्रास होईल तशा मालकांच्या कुत्र्यांमुळे.
अमा, नियम लिहिल्याबद्दल धन्यवाद.
मामी, फक्त अमांनी का शिकवायचे
मामी, फक्त अमांनी का शिकवायचे आहे इतर कुत्रेमालकांना? सगळेच शिकवुयात की आपल्याला जेव्हा त्रास होईल तशा मालकांच्या कुत्र्यांमुळे.
>>> कुत्रेमालक असे आमच्यासारख्यांकडून शिकत असते तर काय प्रश्न होता सुनिधी? कुत्र्यांविरुद्ध तक्रार कुत्रेमालक ऐकून घेत नाहीत. आणि असा काही एक प्रसंग घडला म्हणून लगेच कोणी प्रतिसाद दिले नाहीयेत. असे अनेक प्रसंग अनेक कुत्रेमालकांकडून आले आहेत. आधीच्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचलेस ना?
पाळलेले श्वान हे कोन त्याही परिस्थितीत इतरांना उपद्रवी ठरता कामा नये याची योग्य ती दखल घेतली पाह्जे. >>> हा नियम आहे हे ही त्यांच्या गावी नसतं. त्यांची जबाबदारी आहे हे ही त्यांना कळत नाही.
अमा इथे नियम लिहित आहेत पण आधीच्या धाग्यावर त्यांनी 'इतर कुत्रेमालक काय करतात याच्याशी त्यांचा संबंध नाही' असं लिहिलंय. ठीक आहे. पण मग आम्ही कुत्रेमालकांबद्दल तक्रारी केल्या तर त्यांना त्रास होतोय. म्हणजे काय? या परिस्थितीत तोडगा काय? ज्यांच्या कडे कुत्रे आहेत आणि जे आदर्श कुत्रेमालक आहेत त्यांनी इतरांना सांगावे ना!
अमाविरुद्ध माझा काही पर्सनल अजेंडा नाहीये. त्यांची माझी इंटरअॅक्षनही नाहीये. पण उगाच त्यांना पाठिशी घालणार्या पोस्टी लिहिण्याआधी मुद्दे समजून घ्या.
सगळेच शिकवुयात की आपल्याला जेव्हा त्रास होईल तशा मालकांच्या कुत्र्यांमुळे. >>> सांग ना कसं शिकवायचं? अॅक्शन प्लॅन असेल तर सांग. त्या आधी सकाळी वरळी सी फेस, मरीन ड्राईव्हवर जाऊन कुत्र्याने घाण करूनही न उचलणारे, सार्वजनिक जागेत लीश न वापरता त्यांचे फ्रिस्की डॉग्स वाटेल तसे पळू देणारे अशा कुत्रेमालकांशी जाऊन बोल आणि मग शिकवण्याच्या गोष्टी कर. आम्ही या सगळ्यातून गेलो आहोत म्हणून पोटतिडकीनं बोलत आहोत. ज्यांना ज्यांना आपण कुत्रेमालकांना शिकवू शकतो असं वाटतं त्यांनी आधी रस्त्यावर उतरून सर्व्हे घ्यावा. मग बोलावं अशी मी विनंती करेन.
पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही
पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही पण अमा सर्व कुमा.ना जाऊन शिकवणार, सांगणार हे पण प्रॅक्टिकल नाही ना भले मग अमांचे मत तुमच्या विरोधात असो, किंवा काहीही मत असो..... हेच म्हणायचे होते.
वादासाठी, वैतागुन 'तुच शिकव ना, तुच कर ना' हे म्हणणे ठीक आहे पण तुला पण माहीती आहे 'मला त्रास होतोय तर मलाच काहीतरी करायला हवे भले त्याच उपयोग होवो न होवो, वा कुणी त्याला विरोध करो न करो'. तेच कर करतीयेस ना तु. आपल्या हातात तेच तर आहे, त्यांना सांगत रहायचे, ते ऐकोत न ऐकोत.
आणि अमांनी कदाचित सहानुभुती दाखवली नसेल पण आमच्यासारख्या बर्याच कुत्रेप्रेमींनी हा प्रॉब्लेम मान्य केलाय ना ते का नाहीस पहात?
इथले कोणीच बहुतेक इतके ताकदवान नाही की हा प्रश्न निकालात काढु शकतील.
बरोबर आहे. मग त्या धाग्यावर
बरोबर आहे. मग त्या धाग्यावर आम्ही आमचं फ्रस्ट्रेशन काढत होतो. तेव्हा कुत्रेप्रेमींनी येऊन गोंधळ घालण्याची काहीच गरज नव्हती.
अमा सर्व कुमा.ना जाऊन
अमा सर्व कुमा.ना जाऊन शिकवणार, सांगणार हे पण प्रॅक्टिकल नाही ना >>> आणि सगळ्यांना नाही पण रोजचे भेटणारे जे स्वच्छता पाळत नाहीत , दुसर्यांची कुत्र्याची भिती (राग, तिरस्कार, द्वेष, घृणा नाही. प्लीजच नोट) समजून घेत नाहीत अशा लोकांना कुत्रेमालकांनी सांगितल्यावर जरा तरी कळेल.
सुनिधी +१ मी कुत्रेप्रेमी
सुनिधी +१
मी कुत्रेप्रेमी अजिबात नाही, तरीही - अमांच्या तिकडच्या बाफवरच्या सगळ्या पोस्ट्स वाक्यन् वाक्य पटल्या आहेत असंही नाही - पण इथे नकळत का होईना अमांवर सगळा रोख अकारण जातोय असं मलाही वाटलं.
शिवाय तिथे त्यांनी लिहिल्याप्रमाणे इथे वेगळा बाफ उघडून त्यांच्याकडे असलेले नियम वगैरे टाकले आहेत. त्यांना माहित असलेल्या लिंक्स दिल्या आहेत. शिवाय त्या कुत्रेमालक म्हणून कशा वागतात हेही तपशीलवार दिलेलं आहे.
त्यावरून इथे मुंबई मिरर का? इतर पेपर का नाही वगैरे महान प्रतिसाद आल्यावरही त्यांनी त्यांच्यापरीने स्पष्टीकरण दिले आहे....
आणखी नक्की त्यांनी काय करायला हवंय इथे माबोवर? प्रत्येकाचा पिंड हा समाजात उतरून लोकांचं प्रबोधन करण्याचा नसतो, म्हणजे ते स्वतः बेजबाबदारच असतात आणि इतरांसारखेच बेपर्वा असतात असंही नसतं!
असो, चालूद्यात. या सगळ्या मजकुराला अमांना पाठीशी घालणारी पोस्ट असं वाटलं तरी मला काही फरक पडत नाही.
शिवाय तिथे त्यांनी
शिवाय तिथे त्यांनी लिहिल्याप्रमाणे इथे वेगळा बाफ उघडून त्यांच्याकडे असलेले नियम वगैरे टाकले आहेत. त्यांना माहित असलेल्या लिंक्स दिल्या आहेत. शिवाय त्या कुत्रेमालक म्हणून कशा वागतात हेही तपशीलवार दिलेलं आहे.
>>> प्रश्नच नाही. त्याबद्दल मी त्यांना छान लिहिलंयत अशी दाद दिली आहे.
पण इथे नकळत का होईना अमांवर सगळा रोख अकारण जातोय असं मलाही वाटलं. >>> नक्की कुठे वाटलं?
रोख कोणावरच नव्हता. जनरल बेजबाबदार कुत्रेमालकांवर होता. तो आपल्यावर आहे असं वाटून पोस्टी लिहिल्या गेल्या तर आम्ही काय करणार?
अगं असु दे ना.... लिहुदेना
अगं असु दे ना.... लिहुदेना सर्वांनाच.
त्यामुळे वादात का होईना बरीच चर्चा झाली, बरीच मते कळली, बर्याच गोष्टींचे फायदे-तोटे बोलले गेले. नाहीतर तुम्ही नुसतेच दमले असता त्रासाबद्दल लिहुनलिहुन. त्यानिमित्ताने अमांनी जे नियम पेपरवर आहेत ते लिहिले. काहींनी थोडे उपाय सुचवले. मलातरी नक्कीच अजुन माहिती मिळाली.
अगं असु दे ना.... लिहुदेना
अगं असु दे ना.... लिहुदेना सर्वांनाच. >>> अर्थातच. कोणी काय लिहावं हे मी थोडीच सांगू शकते. तो अधिकार मला नाही. पण आम्हाला काय वाटतं हे आम्हालाही मोकळेपणे लिहू द्या की. लगेच लेबलं लावण्याची काय गरज?
'त्या धाग्यावर आम्ही आमचं
'त्या धाग्यावर आम्ही आमचं फ्रस्ट्रेशन काढत होतो. तेव्हा कुत्रेप्रेमींनी येऊन गोंधळ घालण्याची काहीच गरज नव्हती' हे वाक्य वाचुन 'त्यांनी तिथे का लिहिले?' असा अर्थ निघतोय म्हणुन तसे लिहिले. लेबलं लावली गेली तरी मोकळेपणी लिहिले की सर्वांनीच. सर्वांचे फ्रस्ट्रेशन जबरदस्त बाहेर पडले ना तिथे, प्रतिसादावरुन कळतय.
Pages