Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आणि तो परिच्छेद मी कालच्या
आणि तो परिच्छेद मी कालच्या रॅलीतील गर्दीबद्दल टाकला होता. मी लिहिलेलं नाही. तिथे लिंक दिलीये.
मिर्ची ताइ रागावु नका. मला
मिर्ची ताइ रागावु नका.
मला नेहेमी आआप आडियालिस्टीक विचारसरणीचा पक्ष वाटत आला आहे. तस नसेल तर उत्तमच.
आआप लॉजिकल उत्तर शोधण्या पेक्षा सत्तेत येवुन सामान्य माणसाच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्ययची हे दाखवुन देणार असेल तरच काही तरी फ़रक पडेल. आआप जर उत्तरे मागणार असेल तर ती इंडीया अगेन्स्ट करप्शन या चळवळी पेक्षा काही वेगळे करु शकणार नाही. आणि ती चळवळ म्हणुनच जास्त चांगले काम करु शकेल राजकिय पक्ष म्हणुन नाही.
२५०० किलो चंदन म्हणजे एक छोटा ३ टनी ट्र्क एवढे सुद्धा होत नाही. त्या बदल्यात कोसी नदीवर बांध घालुन पूर नियंत्रण होणार असेल व विज निर्मिती होणार असेल तर ते उत्तमच नव्हे का?
तुम्ही म्हणता तसे जर हे साध्य झालेले नाही तेंव्हा तुमचा राग समजण्या सारखा आहे.
>>वरून होणारा भ्रष्टाचार
>>वरून होणारा भ्रष्टाचार आटोक्यात आल्याशिवाय छोट्या पातळीवरचा म्हणजे सामान्य जनतेकडून होणारा भ्रष्टाचार आटोक्यात येणार नाही !
अगदी बेसिकमधे गडबड आहे येथे. माझे मत असे आहे की हा विचार उलटा आणि चुकीचा आहे.
आधी सामान्य जनतेमधे खुप मोठ्या प्रमाणावर नैतिक आचरण वाढले पाहिजे तर आणि तरच ते वरपर्यंत पोहोचून पुर्ण प्रवाह स्वच्छ होऊ शकेल.
नेते, राजकारणी, नोकरशहा, हे सारे येतात कोठून ? सर्वसामान्य जनतेमधुनच ना ?
मी म्हणतो ते पटायला जड जाईलही, पण पहा विचार करून जमल्यास.
महेश शी सहमत. जनता जर नैतिक
महेश शी सहमत.
जनता जर नैतिक असेल तर चांगल्या लोकांनाच निवडुन देईल.
++++++आपचं सोडा हो. भाजपा
++++++आपचं सोडा हो. भाजपा निवडणूका का घेत नाहीये ह्याचं उत्तर द्या की. +++++++
दिल्लीतील आता निवडणुक घ्यायच काम बिजेपीच आहे का ?
तुम्हीपण अगदी आआप सारखच बोलताहात !!
मिर्ची ताई १. दिल्लीतील
मिर्ची ताई
१. दिल्लीतील झोपडपट्टीला अधिकृत करण्याबाबत केजरीवाल यांचे काय मत आहे ?
गेल्या वेळेला त्यांनी दिल्लीच्या झोपडपट्टीला आम्ही अधिकृत करु अस जाहीर केल होत,
काँग्रेस प्रमाणेच जर झोपडपट्टी अधिकृत करुन काम होत असेल तर मग विकासच विकास होईल !! ह्या
मुद्द्यावर, आ आप काँग्रेसपेक्षा वेगळी कशी हे सांगाल ?
२. कुठच्याही मोठ्या शहरातील तयार होणार्या झोपडपट्टीची मुळ कारण हे त्या शहरात देशाच्या दुसर्या
भागातून येणारा लोकांचा लोंढा !
मग काल विजय गोयल यांच्या वर काँग्रेसने बरीच राळ उडवलेली होती त्यातच गोयल यांना सुनवताना
केजरीवाल ही भान विसरले, म्हणाले की दिल्ली तील झोपडपट्टीतील लोक हे ही भारतातीलच लोक आहेत आणी
त्यांना दिल्लीत रहायचा पुर्ण हक्क आहे.
जर अस असेल तर अश्या झोपडपट्ट्या सैनीकी विभागाच्या जवळ / पार्लमेंट च्या जवळ ही उभारायला पुर्ण
मुभा द्याल का ?
मिर्ची ताई, ३. कँपा कोला
मिर्ची ताई,
३. कँपा कोला विवादीत बिल्डींग बाबत आआपच काय पवित्रा आहे ? आ आप ची मत जाणून घ्यायला आवडेल !!
मिर्ची, तुमच्या मताप्रमाणे आप
मिर्ची,
तुमच्या मताप्रमाणे आप पक्षाचे काम व्यवस्थित सुरु आहे. भरपूर कार्यकर्ते आहेत. पक्ष विस्तारत चालला आहे. तसे असल्यास :-
१. चार राज्यातून निवडणूक लढवण्यास माघार का घेतली ? तिथे पक्षविस्तार झाला नाही का ?
२. कार्यकर्त्यांची कमी असल्याचा साक्षात्कार आत्ताच कसा झाला ? लोकसभेच्या निवडणूकीत कसा नाही झाला ?
३. मेधा पाटकर, अंजली दमानिया, मीरा सन्याल, वामनराव चटप असे नेते असून महाराष्ट्रात आप निवडणूक लढवत नाही कारण कार्यकर्ते कमी आहेत किंवा पक्षाची तयारी नाही. पक्ष विस्तारात हे नेते कुचकामी ठरले असा अर्थ घ्यावा का ?
४. दिल्लीत निवडणूक घेण्याची शिफारस करण्याचं काम भाजप, आपचं का दिल्लीच्या नायब राज्यपालांचं ?
५. विजय गोयल यांच्या झोपडपट्टीवरील वक्तव्यावरुन टिका करणार्या केजरीवाल यांचं शीला दिक्षीतांच्या अशाच वक्तव्याबद्दल काय मत आहे ?
६. दिल्लीतील जनतेचं वीज बिल कमी करण्याची गाजावाजात घोषणा केली, परंतु राज्य सरकारच्या बजेटमध्ये काहीच तरतूद केली नाही. ही जनतेच्या विश्वासाची प्रतारणा नाही का ?
७. याविषयी केजरीवाल यांचं मत काय ?
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-07-30/news/52237831_1_...
केजरीवाल समर्थकांची 'जितं मया' अशी अवस्था झाली असल्यास लिंक नीट वाचावी ही विनंती. बजेट मध्ये ७०० कोटीची तरतूद केली आहे.
८. सहारनपूर दंगलीतील आरोपी आणि अखिलेश यादव यांच्या भेटीविषयी केजरीवाल यांचं मत काय आहे ?
९. स्वतः इन्कम टॅक्स कमिशनर असणार्या केजरीवालकडून ९ लाख रुपये वसूल करण्यासाठी त्यांना नोटीस का पाठवावी लागली. नोटीस पाठवली नसती तर ते ९ लाख केजरीवालनी भरले असते का ?
November 1, 2000: Proceeds on two-year study leave; signs a bond saying he will work for three continuous years on return or pay up salary for non- working period
November 1, 2002: Rejoins work at Delhi income-tax office
2004: Proceeds on "leave without pay" on the ground that he was working on the RTI campaign
February 2006: Resigns from IRS; claims he worked for threeand-a-half years as against the mandatory three years
Claims he requested government in 2006 and 2007 to waive the bond condition because he was working on RTI, "a stated policy of government"
Claims did not hear from the government since 2007, a presumption of his resignation being accepted
Claims suddenly received a notice dated August 5 2011, 10 days before Anna Hazare was to launch his agitation, for paying Rs.9.28 crore to the government
And the loopholes...
- Leave-without-pay is availed when "permissible leaves" (casual leave, medical leave and earned leave) have been exhausted. It is usually granted in extraordinary circumstances when officer cannot attend work because of reasons such as a serious medical condition
- The three-year bond period cannot include leave without pay, that too for personal work like RTI campaign.
It would amount to a break in service
Read more at: http://indiatoday.intoday.in/story/i-t-slaps-notice-on-arvind-kejriwal-a...
१०. नॅशनल हेराल्ड प्रकरणात केजरीवाल गप्प का ?
यूरो, राग कशाला? आप मध्ये
यूरो, राग कशाला?
आप मध्ये सगळ्या प्रकारचे लोक दिसतायेत. खांद्याला शबनम टाइप सुद्धा, आणि करोडपतीसुद्धा. सोनी सुरीसुद्धा आणि गुल पनागसुद्धा.
सगळ्यांमध्ये एक समान धागा आहे - भ्रष्टाचाराविरुद्ध, नेत्यांच्या गुंडागर्दीविरुद्ध लढण्याची आणि सध्याची सिस्टीम खराब आहे ना तर मग रडत बसण्यापेक्षा ती बदलायसाठी प्रयत्न करण्याची हिंमत.
परवा बीबीसीवर झालेल्या हँगआऊटवर भगवंत मानला प्रश्न विचारला - तुम्ही तर फॉर्च्युनर गाडीत फिरता, मग तुम्ही 'आम आदमी' कसे?
हा प्रश्न अनेकदा विचारला गेला आहे. आम आदमी म्हणजे फक्त रस्त्यावर राहणारा, अर्धपोटी झोपणारा भणंग नव्हे. बेईमानी करून, दुसर्यांच्या वाटचा पैसा लुबाडून गब्बर होणारी मूठभर जमात सोडली तर आपण सगळेच आम आदमी.
सांगायचा मुद्दा हा की, आपची अशी विचारसरणी नाही की जास्त पैसा असणं पाप आहे, सगळ्यांना सगळं फुकट पुरवलं गेलं पाहिजे वगैरे. पण लुबाडू तरी नका ना.
दिल्लीत वीजबिल कमी होणं हा लोकांचा हक्क आहे, ती फुकट दिलेली वस्तू नाही किंवा भीक नाही.
<<आआप लॉजिकल उत्तर शोधण्या पेक्षा सत्तेत येवुन सामान्य माणसाच्या प्रश्नांची उत्तरे कशी द्ययची हे दाखवुन देणार असेल तरच काही तरी फ़रक पडेल. >>
नक्कीच दाखवून देतील. पूर्ण बहुमताचं एक सरकार मिळायला हवं त्यांना. त्या माणसाकडे लॉजिकल उत्तरं आहेत. खूप सरलीकरण झाल्यासारखं वाटतंय काहींना. पण बर्याचदा सरळ, साध्या गोष्टींतच उत्तर सापडतं.
४९ दिवसांतच बरेच बदल दिसायला लागले होते. पण एवढा कालावधी प्लस किंवा मायनस काहीच गुण देण्यासाठी पुरेसा नाही.
<<२५०० किलो चंदन म्हणजे एक छोटा ३ टनी ट्र्क एवढे सुद्धा होत नाही. त्या बदल्यात कोसी नदीवर बांध घालुन पूर नियंत्रण होणार असेल व विज निर्मिती होणार असेल तर ते उत्तमच नव्हे का?>>
नेपाळ सरकार काय वेडं आहे का?
<<अगदी बेसिकमधे गडबड आहे
<<अगदी बेसिकमधे गडबड आहे येथे. माझे मत असे आहे की हा विचार उलटा आणि चुकीचा आहे.
आधी सामान्य जनतेमधे खुप मोठ्या प्रमाणावर नैतिक आचरण वाढले पाहिजे तर आणि तरच ते वरपर्यंत पोहोचून पुर्ण प्रवाह स्वच्छ होऊ शकेल.
नेते, राजकारणी, नोकरशहा, हे सारे येतात कोठून ? सर्वसामान्य जनतेमधुनच ना ?>>
महेश,
असहमत असहमत असहमत.
डोनेशन भरल्याशिवाय मुलाला शाळेत प्रवेशच मिळत नाही असं असल्यावर कुठला पालक नैतिकता सांभाळत बसेल? तुम्ही बसाल?
सरकारी दवाखान्यात डॉक्टर्स बाहेरच्या लॅबमधून चाचण्या करायला लावतात, बाहेरची औषधे लिहून देतात. काय करणार ? नैतिकता सांभाळून कुटुंबीयांना मरू देणार ?
५००० रूपये दिल्याशिवाय पोस्टमॉर्टेमचा रिपोर्टच देत नसतील तर नैतिकता सांभाळणार आणि पोलिसतक्रार करणार? तक्रार नोंदवून घ्यायला पोलिस पैसे मागत असतील तर काय करणार? प्रेत तिथेच राहू देणार?
दिल्लीत टँकरमाफिया मोठ्या प्रमाणावर आहे. मध्यमवर्गीयांना थेट झळ लागत नसेल कदाचित. पण ज्यांना ह्या माफियांकडून जास्त दराने पाणी घेण्याशिवाय पर्यायच नाही त्यांना कसली नैतिकता शिकवणार तुम्ही?
भ्रष्टाचार कमी करायचा एकच मार्ग - जरब बसेल अशी शिक्षा करणे. चार-दोन केसेस झाल्या की पुढच्यांना धाक बसेल. भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल हे म्हणणं अतिशयोक्ती होईल, पण कमी नक्कीच होईल.
<<जनता जर नैतिक असेल तर चांगल्या लोकांनाच निवडुन देईल>>
ते दिसलंच आत्ताच्या निवडणूकीत.
आणि आख्ख्या जनतेला नैतिक बनवण्याचं शिवधनुष्य कोण पेलणार म्हणे? दीनानाथ बात्रा?
<<दिल्लीतील आता निवडणुक घ्यायच काम बिजेपीच आहे का ?>>
नाही? मग कोणाचं आहे? उत्तर नक्की द्या. वाट पाहते.
<<१. दिल्लीतील झोपडपट्टीला अधिकृत करण्याबाबत केजरीवाल यांचे काय मत आहे ?
गेल्या वेळेला त्यांनी दिल्लीच्या झोपडपट्टीला आम्ही अधिकृत करु अस जाहीर केल होत,
काँग्रेस प्रमाणेच जर झोपडपट्टी अधिकृत करुन काम होत असेल तर मग विकासच विकास होईल !! ह्या
मुद्द्यावर, आ आप काँग्रेसपेक्षा वेगळी कशी हे सांगाल ?>>
बरं मग भाजपा काय करणार आहे ह्या झोपडपट्ट्यांचं? नक्की सांगा.
<<जर अस असेल तर अश्या झोपडपट्ट्या सैनीकी विभागाच्या जवळ / पार्लमेंट च्या जवळ ही उभारायला पुर्ण
मुभा द्याल का ?>>
काय संबंध ?
एका शहरातील लोक दुसर्या शहरात का जातात? खरंतर खेड्यातील लोक शहरात का जातात?
हा मूळ प्रश्न सोडवला की पुढचा प्रश्न आपोआप सुटेल.
आपल्या देशाची अवस्था क्षयरोग्यासारखी झालेली आहे. भ्रष्टाचाराने प्रत्येक क्षेत्र पोखरून काढलंय. ह्या रोग्याला बुलेट ट्रेन्स, फ्लायओव्हर्स, स्मार्ट शहरे असली टॉनिकं देऊन का ही ही होणार नाही.
६ किंवा ९ महिने क्षयरोगावरची औषधे दिली की रोगी बरा होतो. पण "येवढा सोप्पा उपाय सांगणार्या डागदरला कायबी कळत न्हाय" अशी आपली मानसिकता बदलेल तेव्हा सोन्याचा दिवस उगवला म्हणायचं.
बाकी उद्या.
बाकी उद्या.
बरं मग भाजपा काय करणार आहे
बरं मग भाजपा काय करणार आहे ह्या झोपडपट्ट्यांचं? नक्की सांगा. >>> प्रश्न केजरीवाल यांचं काय धोरण आहे असा आहे ना ? यात भाजपाचा संबंध कुठे आला ?
मिर्ची तै, तुम्हाला
मिर्ची तै,
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाच उत्त र द्या किंवा येत नाही म्हणा !! काही फरक पडत नाही.
पण विचारलेले प्रश्न आम्हावर का उलटवताय ? वर वाट बघताय आमच्या उत्तराच ? तुमच्या उत्तराच काय ?
देणार नाहीच काय ? का त्या वर आआप पक्षात विचारच झालेला नाही ?
आआप कधी पासुन दिल्लीत निवडणुका घ्या, निवडणुका घ्या, म्हणुन मागे लागली आहे,
BJP ह्या निवडणुकीपासुन घाबरुन पळत आहे अस चित्र केजरीवाल रंगवत होते ना म्हणून हा प्रश्न !!
तरीही त्याच प्रश्नाला बगल आणि उलट प्रश्न विचारलाय ??
झोपडपट्टी च्या संबधीच्या प्रश्नाला ही बगलच ?
केजरीवाल ने दिल्लीच्या २०१३ च्या निवडणूकीच्या पुर्वीच त्या झो. अधिकृत होतील अस आश्वासन दिल होत !!
सरकारी जमिनीवर लोकांनी केलेल्या अनधीकृत कब्जाला कायदेशीर मान्यता हा भ्रष्टाचार नाही काय ?
केजरीवालच्या शब्दात,
जर भारतीय नागरीक कुठेही जाऊ शकतो आणी आपल झोपड ऊभारु शकतो, ... मग संरक्षण दलाच्या
संवेदनशील जमिनीवर झालेल अनधीकृत कब्जाही तुम्ही चालवुन घ्याल ?
+++++++ आपल्या देशाची अवस्था
+++++++ आपल्या देशाची अवस्था क्षयरोग्यासारखी झालेली आहे. भ्रष्टाचाराने प्रत्येक क्षेत्र पोखरून काढलंय. ह्या रोग्याला बुलेट ट्रेन्स, फ्लायओव्हर्स, स्मार्ट शहरे असली टॉनिकं देऊन का ही ही होणार नाही.
६ किंवा ९ महिने क्षयरोगावरची औषधे दिली की रोगी बरा होतो. पण "येवढा सोप्पा उपाय सांगणार्या डागदरला कायबी कळत न्हाय" अशी आपली मानसिकता बदलेल तेव्हा सोन्याचा दिवस उगवला म्हणायचं. +++++++
देशाची अवस्था क्षयरोगा सारखी झालेली आहे मग सर्व रोगांवर आआप एकच उपाय करणार तर !!
+++++एका शहरातील लोक दुसर्या
+++++एका शहरातील लोक दुसर्या शहरात का जातात? खरंतर खेड्यातील लोक शहरात का जातात?
हा मूळ प्रश्न सोडवला की पुढचा प्रश्न आपोआप सुटेल. ++++
ह्या प्रश्नाच उत्तर ही भ्रष्टाचारतच लपलय का ?
का भ्रष्टाचार दुर केला की खेड्यातील लोक तिथेच राहतील ?
विचार करा जरा मिर्ची ताई ,....................
<<प्रश्न केजरीवाल यांचं काय
<<प्रश्न केजरीवाल यांचं काय धोरण आहे असा आहे ना ? यात भाजपाचा संबंध कुठे आला ?>>
केजरीवालांचं धोरण तुम्ही लिहिलंत की. बरोबर आहे ते. आता भाजपाचं धोरण सांगा.
<<तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाच उत्त र द्या किंवा येत नाही म्हणा !! काही फरक पडत नाही.
पण विचारलेले प्रश्न आम्हावर का उलटवताय ? वर वाट बघताय आमच्या उत्तराच ? तुमच्या उत्तराच काय ?
देणार नाहीच काय ? का त्या वर आआप पक्षात विचारच झालेला नाही ?>>
हा काही "विचारा तुम्ही, सांगतो आम्ही" चा धागा नाहीये. चर्चेसाठी काढलाय. मी प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त उत्तरं द्यायची असं काही नाही बर्का. गैसन.
भाजपाबद्दल प्रश्न विचारायला सातीने धागा काढलेला. तिथे भाजपाचे प्रश्न विचारले की केजरीवालांना ओढून आणायचं. त्यावर उत्तर दिलं नाही की बगल दिली म्हणायचं. मूळ भाजपासंबंधी प्रश्नांना तिथेही उत्तर नाही आणि इथेही नाही. मज्जाय की.
दिल्लीत निवडणूका घ्यायच्या की नाही हे भाजपा सांगत नाहीये. काँग्रेसला ८ जागा आहेत, त्यामुळे त्यांच्या मताला काही अर्थ नाही. राजीनामा दिलेल्या दिवसापासून फेरनिवडणूका घ्या म्हणून आप मागे लागलंय. राहिलं कोण?
भाजपा निवडणूकांसाठी तयार नाही म्हणून दिल्लीची जनता अडकली आहे. हे माझं मत.
आता तुमचं मत सांगा. आणि तुम्हाला मतं नसतील किंवा नुसते असंबद्ध आणि खोचक प्रश्न विचारण्यात रस असेल तर सॉरी. मला ह्या खेळात रस नाही.
<<देशाची अवस्था क्षयरोगा सारखी झालेली आहे मग सर्व रोगांवर आआप एकच उपाय करणार तर !!>>
मुख्य उपाय तो. बाकीचे प्रश्न सुटत जातील, सोडवता येतील. जोपर्यंत तो उपाय होत नाही तोपर्यंत कुठलीही नवी योजना, नवा प्रकल्प म्हणजे खाबुगिरीला नवीन संधी.
<<का भ्रष्टाचार दुर केला की खेड्यातील लोक तिथेच राहतील ?>>
माझ्यामते राहतील. खेड्यातील लोक शहरात येतात कारण तिथे रोजगार नाहीत,शिक्षणाच्या सुविधा नाहीत, दवाखाने नाहीत, पाण्यासाठी वणवण आहे. सगळं उपलब्ध झालं तर शहरात झोपड्या टाकून कीडामुंगीसारखं जगायला का येतील ते?
आता तुमची उत्तरे द्या. नसतील तर वरचा ठळक केलेला संदेश पुन्हा वाचा.
<<विचार करा जरा मिर्ची ताई
<<विचार करा जरा मिर्ची ताई ,....................>> तो कसा करतात?
मिर्ची, दिल्लीत निवड्णूक
मिर्ची,
दिल्लीत निवड्णूक घेण्याची जबाबदारी दिल्लीच्या नायब राज्यपालांची नाही काय? नसल्यास कोणाची? आणि असल्यास ते निवडणूक जाहीर का करत नाहीत?
<<दिल्लीत निवड्णूक घेण्याची
<<दिल्लीत निवड्णूक घेण्याची जबाबदारी दिल्लीच्या नायब राज्यपालांची नाही काय? नसल्यास कोणाची? आणि असल्यास ते निवडणूक जाहीर का करत नाहीत?>>
तोच तर प्रश्न आहे. नायब राज्यपाल, रिलायन्स, दिल्ली बीजेपी अध्यक्ष ह्यांचा त्रिकोण आठवतोय का मागच्या पानांवरचा?
"एलजी का मोदीकरण हुआ है" - मनिष सिसोदिया
“If the Lieutenant Governor writes (to the Centre) that the assembly should be dissolved and recommends elections, polls will be held in Delhi. But he wants to save his job. The BJP (-led Central government) will throw him out in five minutes if he does not listen to them. He dances to their tunes,” Kejriwal said."
उगीच काहीही आरोप करत सुटतात हे लोक ! हो ना?
"एलजी का मोदीकरण हुआ है" -
"एलजी का मोदीकरण हुआ है" - मनिष सिसोदिया
“If the Lieutenant Governor writes (to the Centre) that the assembly should be dissolved and recommends elections, polls will be held in Delhi. But he wants to save his job. The BJP (-led Central government) will throw him out in five minutes if he does not listen to them. He dances to their tunes,” Kejriwal said."
उगीच काहीही आरोप करत सुटतात हे लोक ! हो ना? >>>
दिल्लीचे नायब राज्यपाल हे मनमोहन सरकारने नियुक्त केले होते ना? केजरीवालनी राजीनामा दिला त्या वेळी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग होते आणि काँग्रेस सरकार देशात होतं. त्यावेळी नायब राज्यपालांना कोणी अडवलं होतं? हा प्रश्न केजरीवालनी त्यावेळी का विचारला नव्हता?
<<दिल्लीचे नायब राज्यपाल हे
<<दिल्लीचे नायब राज्यपाल हे मनमोहन सरकारने नियुक्त केले होते ना? केजरीवालनी राजीनामा दिला त्या वेळी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग होते आणि काँग्रेस सरकार देशात होतं. त्यावेळी नायब राज्यपालांना कोणी अडवलं होतं? हा प्रश्न केजरीवालनी त्यावेळी का विचारला नव्हता?>>
३१ मार्च २०१४ - NEW DELHI: Aam Aadmi Party's national Convenor and former Chief Minister, Arvind Kejriwal today met Lt Governor Najeeb Jung and urged him to dissolve the Delhi Assembly and consider holding fresh elections.
"I met the Lt Governor and requested him to consider conducting elections in Delhi immediately. LG said he would consider," Kejriwal said.
Both BJP and Congress parties are not at all interested in having fresh elections in Delhi and it raises doubt on their intentions, Kejriwal said, referring to Supreme Court's observation. The Supreme Court today granted two weeks to both BJP and Congress to make its stand clear whether either of them is in any position to stake claim for government formation in Delhi in the wake of the Assembly being kept under suspended animation following the resignation of AAP Government."
http://articles.economictimes.indiatimes.com/2014-03-31/news/48735575_1_...
अजब लोकशाही आहे. निवडणूका घ्या हो, म्हणून मिनतवार्या कराव्या लागत आहेत.
"I met the Lt Governor and
"I met the Lt Governor and requested him to consider conducting elections in Delhi immediately. LG said he would consider," Kejriwal said.
Both BJP and Congress parties are not at all interested in having fresh elections in Delhi and it raises doubt on their intentions, Kejriwal said, referring to Supreme Court's observation. The Supreme Court today granted two weeks to both BJP and Congress to make its stand clear whether either of them is in any position to stake claim for government formation in Delhi in the wake of the Assembly being kept under suspended animation following the resignation of AAP Government."
>>> भाजपा आणि काँग्रेसला निवडणूक नको असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे पण म्हणून ते बरोबर आहे असं धरून चालावं का?
काँग्रेस नियुक्त राज्यपालांनी दिल्लीत मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भाजपच्या सांगण्यावरुन निवड्णूक घेतली नाही असं अजब तर्कट तुम्ही मांडत आहात. दिल्लीत भविष्यात भाजपा सरकार येणार आहे हे नायब राज्यपालांना आधीच कळलं होतं का?
राज्यपालांनी तत्कालीन पंतप्रधानांकडे पुन्हा निवडणूक घेण्याची शिफारस केली नव्हती का आणि नसल्यास का केली नव्हती याचं उत्तर आहे का ते द्या. केजरीवाल काय म्हणाले हे सांगू नका.
<<भाजपा आणि काँग्रेसला
<<भाजपा आणि काँग्रेसला निवडणूक नको असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे पण म्हणून ते बरोबर आहे असं धरून चालावं का?
राज्यपालांनी तत्कालीन पंतप्रधानांकडे पुन्हा निवडणूक घेण्याची शिफारस केली नव्हती का आणि नसल्यास का केली नव्हती याचं उत्तर आहे का? राज्यपालांनी दिल्लीत मनमोहन पंतप्रधान असताना भाजपच्या सांगण्यावरुन निवड्णूक घेतली नाही असं अजब तर्कट तुम्ही मांडत आहात>>
बरं, मग आता तुमचं तर्कसंगत मत मांडा. की तुम्हीसुद्धा शेनंभौंसारखे नुसते प्रश्नवालेच?
दिल्ली निवडणूकीत पार बोर्या
दिल्ली निवडणूकीत पार बोर्या वाजल्यामुळे काँग्रेसला निवडणूक नको होती आणि काँग्रेसनियुक्त राज्यपालांनी काँग्रेस सरकारच्या पंतप्रधानांना तशी शिफारस करणं टाळलं हे जास्तं संयुक्तीक वाटत नाही का?
<<दिल्ली निवडणूकीत पार
<<दिल्ली निवडणूकीत पार बोर्या वाजल्यामुळे काँग्रेसला निवडणूक नको होती आणि काँग्रेसनियुक्त राज्यपालांनी काँग्रेस सरकारच्या पंतप्रधानांना तशी शिफारस करणं टाळलं हे जास्तं संयुक्तीक वाटत नाही का?>>
आणि भाजपाचं केंद्रसरकार कुठलेही राज्यपाल धडाधड हलवतंय (अर्थात शीलातै सोडून!), पण तरीही आता काँग्रेसनियुक्त राज्यपाल काँग्रेसलाच घाबरून निवडणूका घेत नाहीयेत असंच का?
आणि भाजपाचं केंद्रसरकार
आणि भाजपाचं केंद्रसरकार कुठलेही राज्यपाल धडाधड हलवतंय (अर्थात शीलातै सोडून!), पण तरीही आता काँग्रेसनियुक्त राज्यपाल काँग्रेसलाच घाबरून निवडणूका घेत नाहीयेत असंच का? >>
राज्यपालांनी शिफारस का केलेली नाही याचं उत्तर आहे का? असल्यास द्या. नसल्यास उत्तर नाही म्हणून स्पष्ट सांगा.
++++++++++आता तुमचं मत सांगा.
++++++++++आता तुमचं मत सांगा. आणि तुम्हाला मतं नसतील किंवा नुसते असंबद्ध आणि खोचक प्रश्न विचारण्यात रस असेल तर सॉरी. मला ह्या खेळात रस नाही.+++++++++
मी विचारलेला एकही प्रश्न खोचक नव्हता, जर आआपला वैचारीक बैठक असती, आणी त्या प्रश्नांची जाण असती तरच तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे देता आली असती,
तुम्हाला मी विचारलेल्या एकाही प्रश्नाच उत्तर देता आलेल नाही ह्यातच सगळ आलेल आहे.
उत्तर दिलंय की. तुम्हाला ते
उत्तर दिलंय की. तुम्हाला ते तर्कट वाटतंय, त्याला काय करणार?
असो. आता नंतर.
तुम्हाला मी विचारलेल्या एकाही
तुम्हाला मी विचारलेल्या एकाही प्रश्नाच उत्तर देता आलेल नाही ह्यातच सगळ आलेल आहे. >> माझेही याच पानावरचे १० प्रश्न अद्यापही अनुत्तारीतच आहेत.
उत्तर दिलंय की. तुम्हाला ते
उत्तर दिलंय की. तुम्हाला ते तर्कट वाटतंय, त्याला काय करणार?
असो. आता नंतर. >> तुम्ही दिलेलं उत्तर हे केजरीवाल यांचं स्टेटमेंट आहे. केजरीवाल यांचं प्रत्येक वाक्यं हे सत्यवादी राजा हरिश्चंद्राचं वाक्यं आहे असं जनतेने मानावं अशी तुमची अपेक्षा आहे का? जो तर्क केजरीवालनी लढवला तो बरोबरच आहे हे तुम्ही कशाच्या आधारावर ठामपणे म्हणत आहात?
Pages