अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेल किराए में 14 फीसदी बढ़ोतरी के बाद आपकी जेब में एक और सेंध लगाने की तैयारी कर ली गई है. रेल मंत्रालय ने चुपचाप छोटी दूरी की तत्काल टिकट बुकिंग दोगुनी से ज्यादा महंगी कर दी है.
रेलवे ने ऐसा नियम बना दिया है जिसके तहत यात्रियों को तत्काल टिकट के लिए अब ज्यादा पैसे चुकाने होंगे. रेलवे ने तत्काल टिकट बुकिंग की न्यूनतम दूरी सीमा 500 किलोमीटर कर दी है, जिससे छोटे सफर के लिए तत्काल टिकट लेने वालों को दोगुने से ज्यादा खर्च करना पड़ रहा है.

और भी... http://aajtak.intoday.in/story/tatkal-tickets-on-shorter-train-routes-ha...
--------------------------

यावर आप काही करेल का ?

विकु म्हणतात - मिर्ची थोडी कमी चालेल, गुलाबजाम खा. इब्लिस म्हणतात - मिळमिळीत प्रतिसाद देताय, शिमला मिर्ची व्हा ...हे भगवान, करें तो क्या करें ? Lol

एवढ्या चर्चेतून एवढं हाती लागलंय की वीजकंपन्यांनी ऑडिटला तयार असलंच पाहिजे, कॅगचं किंवा कुठलंही. (सध्यातरी) भारतात कॅगचं ऑडिट सर्वोच्च मानत असावेत. म्हणून कॅग.

कॅगचं ऑडिट मुख्यमंत्र्याच्या परवानगीनेच होऊ शकतं, जी परवानगी शीलातैंनी १५ वर्षे नाकारली आणि केजरीवालांनी ४९ दिवसांच्या राजवटीत दिली.
आता केजरीवालांनी अशी परवानगी देणं हेच कसं बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी कंपन्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
कालची बातमी - 'AAP govt violated laws to conduct CAG audit of discoms'

हे आधीच्या कॅगचं मत - देशात मोठमोठे घोटाळे घडत आहेत हे ह्यांच्या तपासण्यांमुळेच आपल्याला निदान कळलं तरी. - Not only discoms all Public Private Partnership projects should also be audited: Ex-CAG

आता इथून पुढे तर दिल्लीचं सगळंच रामभरोसे...
BJP-RIL nexus.jpg

इराकवर हल्ला करणे कसे योग्य आहे ते कॉलिन पॉवेल यांनी युनोत स्केच दाखवून सांगितलं होतं त्याची आठवण झाली. Happy

<<यावर आप काही करेल का ?>>

लगेच काही करू नये, असं माझं वैयक्तिक मत.
आजूबाजूला इतक्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत, त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर बोललं तर आप फक्त दुसर्‍यांच्या तोंडाला काळं फासतं असं सूज्ञ लोकांचंही मत बनतंय.
त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आपने आधी संघटन मजबूत बनवावं, सत्तेत यावं, 'खुर्चीचा मोह झालाय' असं म्हणणार्‍यांकडे (ते म्हणणारच) दुर्लक्ष करून ५ वर्षे स्थिर सरकार चालवावं आणि मग ते उदाहरण पाहून कदाचित जनता जागृत होईल.

त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आपने आधी संघटन मजबूत बनवावं, सत्तेत यावं, 'खुर्चीचा मोह झालाय' असं म्हणणार्‍यांकडे (ते म्हणणारच) दुर्लक्ष करून ५ वर्षे स्थिर सरकार चालवावं आणि मग ते उदाहरण पाहून कदाचित जनता जागृत होईल.>>>> मिर्चीताई आता कसं एकदम मनासारखं बोललात हे पटले.

ह्या धाग्यावरील बहुतेक प्रतिसादकर्ते हेच म्हणत आहेत, आणि दिल्लीत संधी असताना त्यांनी ती गमावली म्हणुन अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.

बीबीसी - आम आदमी पार्टी के सांसद भगवंत मान ने संसद में बजट पर बहस के दौरान एक कविता पढ़ी, जो सोशल मीडिया पर धूम मचा रही है.

व्हिडिओ लिंक - Bhagwant Mann grills modi on ' achhe din' in parliament
जेटलीकाकांच्या चेहर्‍यावरचं हसू भारीये Lol

पूर्ण कविता -
"पहले किराया बढ़ाया रेल का
फिर नंबर आया तेल का
खुद 10 साल करते रहे नुक्ताचीनी
आते ही दो रुपए किलो महंगी कर दी चीनी
हर कोई सपने दिखाकर आम आदमी को ठग रहा है
आम आदमी को अब डर चीन से नहीं, चीनी से लग रहा है !

दुनिया मून पर, सरकार हनीमून पर
पूछ रहे सारे देश के चायवाले हैं
महंगाई की वजह से खाली चाय के प्याले हैं
लोगों को दो वक़्त की रोटी के लाले हैं
सरकार जी बता दीजिए, अच्छे दिन कब आने वाले हैं !

शायद पता नहीं कि इराक़ है किस इलाक़े में
भारतीय इराक में फंसे हैं, सुषमा जी गई थीं ढाके में
हमारे देश के लोग बहुत हिम्मतवाले हैं
जिन्होंने महंगाई के दौर में बच्चे पाले हैं
लूटने वाले ज़्यादा, बस गिनती के रखवाले हैं
सरकार जी प्लीज, बता दीजिए अच्छे दिन कब आने वाले हैं !

मेरे सपने में कल रात बुलेट ट्रेन आई
मैंने कहा, बधाई हो जी बधाई
सुना है तुम मेरे देश आ रही हो, तरक्की की स्पीड बढ़ा रही हो
बुलेट ट्रेन बोली, मेरा शिकवा किसी गाय या भैंस से नहीं
अरे, मैं बिजली से चलती हूं, गोबर गैस से नहीं

प्रधानमंत्री मोदी जी के भाषण लोगों को खूब जंचे हैं
विदेश से काला धन आने में 50 दिन बचे हैं
हम तो आम आदमी पार्टी वाले हैं
हमने तो हर सरकार से डंडे खा ले हैं
हमने तो सड़कों पर और संसद में
ये पूछने के लिए मोर्चे संभाले हैं
अच्छे दिन कब आने वाले हैं?"

काल IBN ने ही बातमी ट्वीट केली आणि (वरून कानपिचक्या आल्यावर) काढून टाकली Lol
बिचारे !

<<आणि दिल्लीत संधी असताना त्यांनी ती गमावली म्हणुन अनेकांचा भ्रमनिरास झाला आहे.>>

६५ वर्षे जे सत्ता गाजवत आहेत त्यांच्यासाठी का नाही झाला अजून भ्रमनिरास ? एक चूक झाली म्हणून आपण पुन्हा चोरांना मतं दिली...:(

>>६५ वर्षे जे सत्ता गाजवत आहेत त्यांच्यासाठी का नाही झाला अजून भ्रमनिरास ? एक चूक झाली म्हणून आपण पुन्हा चोरांना मतं दिली..>>

यावरुन मानहानीचा खटला दाखल होऊ शकतो बरं का Wink

५ वर्षे स्थिर सरकार चालवावं >>> आम्ही हेच तर म्हणत होतो. पण अरविंदरावांना राजिनामा द्यायची घाई झाली होती. आणि त्रिकोणात मुकेश पेक्षा अनील पाहिजे दिल्लीची वाट लावण्यात त्याचा हातभार जास्त आहे. (rel power, rel infra Delhi Airport express line etc.) आणि जंग यांची नेमणुक काग्रेसनी केली होती. त्यांना पण घाला त्रिकोणात. आता त्याचा पार पंचकोन झाला की.:-)

आजूबाजूला इतक्या गोष्टी चुकीच्या घडत आहेत, त्यातल्या प्रत्येक गोष्टीवर बोललं तर आप फक्त दुसर्‍यांच्या तोंडाला काळं फासतं असं सूज्ञ लोकांचंही मत बनतंय.
त्यामुळे दूरदृष्टी ठेवून आपने आधी संघटन मजबूत बनवावं, सत्तेत यावं, 'खुर्चीचा मोह झालाय' असं म्हणणार्‍यांकडे (ते म्हणणारच) दुर्लक्ष करून ५ वर्षे स्थिर सरकार चालवावं आणि मग ते उदाहरण पाहून कदाचित जनता जागृत होईल. >>>>> हेच सुरुवातीपासून सांगायचा प्रयास करत होते. अजून एक अ‍ॅड करावंसं वाटतंय की फक्त हा आणि हा पक्षच धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीही त्याच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे हा गैरसमज आणि तसा प्रचार टाळावा. जगात कुणीही पुर्ण काळं किंवा पुर्ण पांढरं नाही हे अ‍ॅक्सेप्ट करावं. धन्यवाद.

>> अजून एक अ‍ॅड करावंसं वाटतंय की फक्त हा आणि हा पक्षच धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीही त्याच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे हा गैरसमज आणि तसा प्रचार टाळावा. >>

अश्विनी, कुठल्याही प्रकारे हे इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे नसताना, किंबहुना अधिकच "गुणवान" असताना - आम्हीच स्वच्छ, आम्ही अज्जिबॉत भ्रष्टाचार करत नाही, आम्हीच प्रामाणिक, ब्लाह ब्लाह ब्लाह - हाच त्यांचा पक्ष स्थापनेपासूनचा दावा आहे. त्यांनी तसा प्रचार केला नाही तर तो पक्ष स्थापन करण्यामागचं कारणच नाहीसं होईल ना. Happy

६५ वर्षे जे सत्ता गाजवत आहेत त्यांच्यासाठी का नाही झाला अजून भ्रमनिरास ? एक चूक झाली म्हणून आपण पुन्हा चोरांना मतं दिली ?>>>>> आपचा राग याचबद्दल आहे. दुसरे सर्वच पक्ष चोर आहेत हे बोलणं सोपं आहे. पण ६५ वर्षे ते निवडून येतात कारण त्यांनी काहीतरी काम केलेलं आहे हे कबूल करतच नाहीत. दुसरा नालायक आहे हे जोरजोरात ओरडताना स्वतः काम करावं लागतं हे बेसिक ते विसरले आहेत. असो, पहिल्या दोन तीन पानांमध्ये यावर भरपूर लिहिले आहे. शेवटी मिर्चीताई पण त्याच पॉइन्टवर आल्या. (भले २५ पानानंतर्का होइना!!)

<<यावरुन मानहानीचा खटला दाखल होऊ शकतो बरं का>>

भूषण पितापुत्रांकडे धाव घेईल मग मी माझी केस चालवा म्हणून Wink

<<आम्ही हेच तर म्हणत होतो. पण अरविंदरावांना राजिनामा द्यायची घाई झाली होती. आणि त्रिकोणात मुकेश पेक्षा अनील पाहिजे दिल्लीची वाट लावण्यात त्याचा हातभार जास्त आहे. (rel power, rel infra Delhi Airport express line etc.) आणि जंग यांची नेमणुक काग्रेसनी केली होती. त्यांना पण घाला त्रिकोणात. आता त्याचा पार पंचकोन झाला की.>>

मुकेश केजीबेसिनचा गॅस देत नाहीयेत ना. वीज कशी बनवायची?
काँग्रेस आणि बीजेपी वेगळी आहे असं (अजूनही) तुम्हाला वाटतंय? सिरीयसली?

<<हेच सुरुवातीपासून सांगायचा प्रयास करत होते. अजून एक अ‍ॅड करावंसं वाटतंय की फक्त हा आणि हा पक्षच धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे आणि त्यातील प्रत्येक व्यक्तीही त्याच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात धुतल्या तांदळासारखी स्वच्छ आहे हा गैरसमज आणि तसा प्रचार टाळावा. जगात कुणीही पुर्ण काळं किंवा पुर्ण पांढरं नाही हे अ‍ॅक्सेप्ट करावं. धन्यवाद.>>

अश्विनी,
ठळक केलेला भाग ही आपण जोडलेली पुरवणी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पक्षांमधले सगळे लोक वाईट आहेत असं मी तरी कधीच म्हटलेलं नाही, केजरीवालांच्या तोंडूनही कधी ऐकलेलं नाही. तुम्ही कुणी ऐकलं असल्यास लिंक द्या.
पण इतर पक्षातील काही लोक चांगले असतील तरी त्यातल्या श्रेष्ठींपुढे त्यांचं काहीही चालत नाही हे खोटं आहे का?
आपच्या पक्षश्रेष्ठींवर माझा विश्वास आहे. त्यांनी कलंकित लोकांची तिकीटं रद्द केली आहेत. असं दुसर्‍या पक्षाने केलेलं उदाहरण तुम्ही द्या की.

नंदिनी, विचारवंत,
सध्याचे पक्ष ही एक सिस्टीम आहे. भले नावं वेगवेगळी असतील. आणि आप त्या सिस्टीमच्या विरूद्ध आहे. हे सत्य आहे. कुणी नाकारल्याने ते बदलणार नाही. काहींना लगेच कळेल, काहींना उशीरा कळेल. भले ते चूका करत असतील पण गुन्हे केलेले दाखवून द्या.

मुकेश केजीबेसिनचा गॅस देत नाहीयेत ना. वीज कशी बनवायची?>> भारतात सध्या तरी सगळ्यात जास्त वीज कोळश्यापासुन बनती.

mandard,

केजरीवाल सरकारी सेवेत असताना त्यांनी एक एनजीओ सुरू केली होती.
याला काय म्हणतात ते तुम्हाला सांगायला नकोच.

In December 1999, while still in service with the Income Tax Department, he helped found a movement named Parivartan (which means "change"), focused on assisting citizens in navigating income tax, electricity and food ration matters in parts of Delhi.

सरकारी सेवेत असताना एनजीओ सुरू करता/चालवता येत नाही.

सरकारी सेवेत असताना एनजीओ सुरू करता/चालवता येत नाही.>> हि टेक्निकल चुक असेल. मग बाकिच्यांनी का नाही केजरीवाल यांच्यावर केस केली. मला इतकेच म्हणायचे आहे की आपचा / केजरींचा विरोध करा पण योग्य मुद्यांवर.

केस केली नाही म्हणजे केजरीवाल यांनी चूक केलीच नाही असे नाही ना. जाउद्यात. विरोध करताना प्रश्न विचारले की त्याला धागाकर्ते पास देतात आणि फेसबुकी प्रश्न अशी संभावना अमेरिकेत ग्रीनकार्ड मिळवलेले लोक करतात. असो. चालुद्या.

विचारवंत,
स्वतः केजरीवाल इन्कमटॅक्स कमिशनर असूनसुद्धा ह्या एनजीओवाले लोक
"इन्कमटॅक्सचा परतावा मिळणं हा तुमचा हक्क आहे, त्यासाठी लाच देणं बंद करा" असं आवाहन लोकांना करणारी पोस्टर्स घेऊन ऑफिसच्या दारात उभे राहत होते.
काय गंमत आहे नै?
हा गुन्हा आहे का? खरं सांगा.

तुम्ही एक दोन ठिकाणी म्हटलं आहे "आप शिवाय पर्याय नाही" आणि तुमच्या सगळ्या पोस्टींवरुन तुम्ही इतरांना सरसकट वाईट म्हणता हेच दिसतं.

कलंकित म्हणजे नक्की काय? सगळेच ग्रे स्केल मध्ये कुठे ना कुठे असतात. पुन्हा, आपच्या पक्षश्रेष्ठींविरुद्धचे अनेक व्हिडिओ आहेत पण तुम्ही ते नाकारता आणि इतर पक्षांच्या विरुद्धचे विडिओ मात्र हिरिरीने इथे मांडून तेच खरे म्हणता. नुसते म्हणून थांबत नाही तर इतरांच्या नादाला लागल्यासारख्या सतत खवचट टिपण्ण्याही करत होतात मध्यंतरी. इतर आयडींना कुणी जसे प्रत्युत्तर करायला जात नाही कारण तश्याच भाषेत रिस्पॉन्स करणं सगळ्यांना जमत नाही तसंच तुमच्या बाबतीतही करावं लागत होतं. पण तुम्ही रिअ‍ॅलिटीच्या दिशेने पोस्ट टाकल्यावर व्यवस्थित उत्तरं आलीच Happy कुठल्याही पक्षाच्या बाजूचे आणि विरुद्धचे अनेक व्हिडिओ, कार्टून्स आणि इतर मटेरिअल नेटवर ढिगावारी उपलब्ध होऊ शकतं पण प्रत्युत्तरासाठीही मला ह्या सगळ्याची मदत घ्यायची गरज वाटत नाही कारण मी जाणून आहे की हे पॉलिटिक्स आहे आणि हे सामान्य जनतेला फसवायला असतं, धूळ फेकायला असतं. एकाच घटनेला, गोष्टीला विविध बाजूने जसे रंग द्यावेत तसे आपण देऊ शकतो आणि मिडिया हे काम सतत बजावत असतं आणि जनतेला कन्फ्युज करत असतं. त्यामुळे ह्या किंवा मोदी बॅशिंगच्या धाग्यावर कितीही लिंका (कुणाच्याही बाजूने अथवा विरुद्ध) टाकल्या गेल्या तरी मी त्याच्या आहारी गेले नाही.
----

माझे आतापर्यंतचे इनकमटॅक्स परतावे मी कुणालाही काँटॅक्ट न करता, विचारणा न करता आपोआप मला मिळाले आहेत. लाच बिच तर दूरच..... मी दोन शाब्दिक लाफा देऊन आलेली आहे दुसर्‍या एका सरकारी ऑफिसात, माझ्याच ऑफिसच्या सरकारी कामासाठी गेले असताना (मी 'आप' मध्ये नसतानाही).

६५ वर्षे जे सत्ता गाजवत आहेत त्यांच्यासाठी का नाही झाला अजून भ्रमनिरास ? एक चूक झाली म्हणून आपण पुन्हा चोरांना मतं दिली..>>>>>

मिर्चीताई, ६५ वर्षे सत्ता चालवुन दाखवत आहेत, त्याच बरोबर जनतेची कामे करत आहेत, सरकारच्या ध्येयधोरणांद्वारे भारत प्रगतीपथावर राहिल हे पाहत आहेत. नाहीतर ६५ वर्षापुर्वी जी भारताची परिस्थिती होती ती तशीच राहिली असती.

फक्त दुसर्‍यांना चोर, भ्रष्टाचारी अशी दुषणे देऊन उपयोग काय? आधी एक राज्य चालवायला दिले ते चालवु शकत नाहीत आणि देश चालवण्याच्या गमजा काय म्हणुन मारता? सामान्य जनता काय मुर्ख आहे काय पळपुट्यांना निवडुन द्यायला. आज भाजपाला बहुमताने निवडुन दिले आहे, पाच वर्षात अपेक्षित परिणाम नाही दिसला तर दुसर्‍या पक्षांना संधी देतील. आणि ते पक्ष जनसामान्यापर्यंत पोहचणारे असतील, त्यांच्या कार्यकत्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणिव असेल आणि ते सोडवण्याकरिता प्रशासकीय मार्गाने प्रयत्न करणारे ज्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील त्यांनाच ती संधी मिळेल. फक्त टोप्या घालुन आणि हातात झाडू घेऊन बाकी सारे भ्रष्ट असे म्हणणार्‍यांना ती संधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही.

<<तुम्ही एक दोन ठिकाणी म्हटलं आहे "आप शिवाय पर्याय नाही" आणि तुमच्या सगळ्या पोस्टींवरुन तुम्ही इतरांना सरसकट वाईट म्हणता हेच दिसतं.>>

ठळक केलेला भाग मी अजूनही म्हणतेय. दुसरा आपच्या विचारसरणीसारखाच पक्ष आला तर वेगळी गोष्ट. Happy

<<कलंकित म्हणजे नक्की काय? सगळेच ग्रे स्केल मध्ये कुठे ना कुठे असतात. पुन्हा, आपच्या पक्षश्रेष्ठींविरुद्धचे अनेक व्हिडिओ आहेत पण तुम्ही ते नाकारता आणि इतर पक्षांच्या विरुद्धचे विडिओ मात्र हिरिरीने इथे मांडून तेच खरे म्हणता.>>

कलंकित म्हणजे भ्रष्टाचार, बलात्कार, खून, किडनॅपिंग ह्यासारखे आरोप असलेले, त्यासाठी गुन्हे दाखल असलेले.
उद्या केजरीवाल भ्रष्ट आहेत असं कोणीतरी म्हणेल, पण त्यासाठी काहीनाकाही तरी पुरावा, दाखल असलेला गुन्हा काहीतरी असलं पाहिजे की. दमानिया, गांधी ह्यांच्याबाबतही तेच. अरे, केलाय ना त्यांनी भ्रष्टाचार, मग गुन्हा दाखल करा. सरकार तुमचंच आहे ना.

निहालचंदांसारखा नेता आपमध्ये आहे का? येडियुरप्पासारखा? बाबुलाल बोखारियासारखा? लालुप्रसादसारखा?
असेल तर दाखवा.

<<नुसते म्हणून थांबत नाही तर इतरांच्या नादाला लागल्यासारख्या सतत खवचट टिपण्ण्याही करत होतात मध्यंतरी. >>
हे मान्य. मी मागे लिहिलं पण होतं की तिरकस मोडातून बाहेर यायचं अवघड जातंय. पण मी तरी कुठे पांढरीशुभ्र आहे, ग्रे येणार ना अधूनमधून.
तुम्ही लक्ष ठेवा, सांगा. मुद्दे भरकटले तर जागेवर आणा.

<<एकाच घटनेला, गोष्टीला विविध बाजूने जसे रंग द्यावेत तसे आपण देऊ शकतो आणि मिडिया हे काम सतत बजावत असतं आणि जनतेला कन्फ्युज करत असतं. त्यामुळे ह्या किंवा मोदी बॅशिंगच्या धाग्यावर कितीही लिंका (कुणाच्याही बाजूने अथवा विरुद्ध) टाकल्या गेल्या तरी मी त्याच्या आहारी गेले नाही.>>

मिडिया विश्वासार्ह नाही हे मान्य आहे. मग कशावर विश्वास ठेवायचा? जे घडतंय ते फक्त पाहत रहायचं? पाच वर्षे आपले हाल होतील ते सोडा, पुढच्या पिढीसाठी काय?
मिळून सार्‍याजणीमध्ये सुद्धा 'वॉचडॉग', 'जागते रहो' असे शब्द आले आहेत. अनेक ठिकाणी अनेक लोक हे सांगत आहेत. जागरूक रहायचं का नाकारतोय आपण?
अगदी बॅशिंग करणं चूक आहे. पण जे निर्णय चूक आहेत त्यावर निषेध का नाही व्यक्त करू शकत?
India’s Modi was an over-sharing politician. Now he’s a silent prime minister.
जगाला दिसतंय ते आपल्याला दिसत नाहीये. आता ह्या बातमीतही छुपा अजेंडा असेल, रंग द्यायचा प्रयत्न असेल का?

<<माझे आतापर्यंतचे इनकमटॅक्स परतावे मी कुणालाही काँटॅक्ट न करता, विचारणा न करता आपोआप मला मिळाले आहेत. लाच बिच तर दूरच..... मी दोन शाब्दिक लाफा देऊन आलेली आहे दुसर्‍या एका सरकारी ऑफिसात, माझ्याच ऑफिसच्या सरकारी कामासाठी गेले असताना (मी 'आप' मध्ये नसतानाही).>>

काही त्रास न होता तुम्हाला परतावा मिळाला. चांगली गोष्ट. सगळ्यांना मिळत नाही (किंवा २००१ मध्ये मिळत नव्हता) हेही सत्य. २००१ मध्ये आप नव्हती.

अश्विनी, कुठल्याही प्रकारे हे इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे नसताना, किंबहुना अधिकच "गुणवान" असताना - आम्हीच स्वच्छ, आम्ही अज्जिबॉत भ्रष्टाचार करत नाही, आम्हीच प्रामाणिक, ब्लाह ब्लाह ब्लाह - हाच त्यांचा पक्ष स्थापनेपासूनचा दावा आहे. त्यांनी तसा प्रचार केला नाही तर तो पक्ष स्थापन करण्यामागचं कारणच नाहीसं होईल ना.
<<
हे भाजपाबद्दल लिहिलंय नां?

काही त्रास न होता तुम्हाला परतावा मिळाला. चांगली गोष्ट. सगळ्यांना मिळत नाही (किंवा २००१ मध्ये मिळत नव्हता) हेही सत्य. २००१ मध्ये आप नव्हती.

माय गॉड Rofl उत्तम विनोद.

मला आणि फ्यामिलीतल्या सगळ्यांना २००१ मधे, नंतर, आणि त्या आधीसुद्धा लाच न देता परतावा मिळत असे. पण जौद्यात. "आप" आये बहार आयी Lol

<<मिर्चीताई, ६५ वर्षे सत्ता चालवुन दाखवत आहेत, त्याच बरोबर जनतेची कामे करत आहेत, सरकारच्या ध्येयधोरणांद्वारे भारत प्रगतीपथावर राहिल हे पाहत आहेत. नाहीतर ६५ वर्षापुर्वी जी भारताची परिस्थिती होती ती तशीच राहिली असती.>>

काय प्रगती झाली आहे ते पटवून द्या. मी आधीसुद्धा विचारलं होतं. पण प्रश्नच बहुतेक वेडपटासारखा असेल त्यामुळे कुणी सांगतच नाहीये की भारताची प्रगती झाली म्हणजे नेमकं काय झालं.

<<आधी एक राज्य चालवायला दिले ते चालवु शकत नाहीत आणि देश चालवण्याच्या गमजा काय म्हणुन मारता? सामान्य जनता काय मुर्ख आहे काय पळपुट्यांना निवडुन द्यायला. >>

हे वाक्य विकासराज्य चालवणार्‍यांना लागू पडेल. देशाची राहू द्या, गुजरातची काय प्रगती झाली तेतरी समजावून सांगा म्हटलं तर तेपण कुणी सांगेना.
हे बघा साबरमतीमैय्याची ताजी बातमी -
GROSS NEGLIGENCE
Sight of slimy algae and rotting waste floating on the Sabarmati greeted delegates from Pakistan who had come to study the Sabarmati riverfront and replicate it on the Ravi in Lahore

गुजरातमधल्या ८वीतल्या मुलांना साधे शब्दसुद्धा वाचता येत नाहीत अशी बातमी आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात होती. खोटीच असेल का?

<<आणि ते पक्ष जनसामान्यापर्यंत पोहचणारे असतील, त्यांच्या कार्यकत्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणिव असेल आणि ते सोडवण्याकरिता प्रशासकीय मार्गाने प्रयत्न करणारे ज्या पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असतील त्यांनाच ती संधी मिळेल. फक्त टोप्या घालुन आणि हातात झाडू घेऊन बाकी सारे भ्रष्ट असे म्हणणार्‍यांना ती संधी मिळण्याची सुतराम शक्यता नाही.>>

कुठला पक्ष आहे असा?

धागा वाहता करण्यासाठी विचारवंतांचे प्रयत्न चालू झाले असं दिसतंय. बाहुल्या नाचायला लागल्या.

मयेकरांनी सांगितलं तसं धागा भरकटायला लागलाय. आज इथेच थांबते. मिलेंगे ब्रेक के बाद. Happy

Pages