मोदी सरकार- एन डी ए २०१४ : जागता पहारा! - भाग १

Submitted by साती on 22 May, 2014 - 00:20

येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.

या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल

याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.

-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.

१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.

२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड

अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री

३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार

४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.

१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार

१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<<मोदी व भाजपा फक्त खोटे बोलून सत्तेवर आले आहेत.>>>

असेल बुवा! पण ते देशभरातल्या सर्वसामान्य जनतेला कसे कळाले नाही; हा मोठा गहन प्रश्न आहे. Uhoh

मी तर भाजपा चा उमेदवार निवडून यावा म्हणून माझ्या आवडत्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केले. अशाच प्रकारचे मतदान देशभरात झाले असावे असा माझा अंदाज आहे!

पण नमो जे करत आहेत त्यात वावगे काहीच नसावे असे वाटते. Happy

नमो नमः

मी तर भाजपा चा उमेदवार निवडून यावा म्हणून माझ्या आवडत्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केले. अशाच प्रकारचे मतदान देशभरात झाले असावे असा माझा अंदाज आहे!<<< बरोबर..

पण भाजपा लबाड की इतर कोणता,हा वादाचा मुद्दा करायचा म्हणजे आता बालीशपणा ठरेल.भाजपा लबाड,खोटा तर काँग्रेस दांभिक सत्यवचनी म्हणावा लागेल. शेवटी तुमच्या आमच्या भावनिक वादातले हे पक्ष ओली लाकडं आहेत.जळताना धूर होणारच.

मोदी,जे चांगलं करतील त्याला पाठींबा द्यायचा,नवे उपाय राबवताना आपण त्याचं पालन करायचं. चूक झाली तर निदर्शनास आणून द्यायची,आणि काय!

कोन्ग्रेसने पाठिम्बा काढुन घेतला तर हे सरकर अल्पामतात येईल. विशवासदर्शक ठरावाच्या वेळि जपुन रहाव लागेल. कोन्ग्रेस मोठि गेम करेल.

कोन्ग्रेसने पाठिम्बा काढुन घेतला तर हे सरकर अल्पामतात येईल. विशवासदर्शक ठरावाच्या वेळि जपुन रहाव लागेल. कोन्ग्रेस मोठि गेम करेल. >> Uhoh

>> प्रसिद्धीमाध्यमांना मेलं कौतुकचं नाही आमचं. <<
इट जस्ट सॅट ऑन पेपर; नो एक्झीक्युशन. डज पवन बंसल केस रिंग अ बेल?

कोन्ग्रेसने पाठिम्बा काढुन घेतला तर हे सरकर अल्पामतात येईल. विशवासदर्शक ठरावाच्या वेळि जपुन रहाव लागेल. कोन्ग्रेस मोठि गेम करेल.<<< आपचं म्हणताय का?

आताच्या भाजपाचा पाठिंबा कुणीही काढून घेत्ला तरी सरकारला तीळमात्र फरक पडत नाही. अम्माची गोची झालेली माहित नाही का? तिसर्या आघाडीचं सरकार आणून स्वतः पंतप्रधान व्हायचं तिचं स्वप्न बोंबललंच. आमच्या गावात अजून संसदेच्या दारात उभी असलेली आणि बुश, ओबामा, इत्यादि मंडळी तिला झूकून अभिवादन करत अस्लेली पोस्टर्स अद्याप लावलेली आहेत.

पण मी काय म्हणते, निवडणूकीचा फॉर्म भरताना हे संपत्तीचं विवरण खुल्लेआम दिलेलंच असतं की.
मग परत हा सगळा देखावा कशाला?
की निवडून येईपर्यंत बिचार्यांचे पैसे संपून जातात?

की निवडून येईपर्यंत बिचार्यांचे पैसे संपून जातात?>>उलटा प्रश्न विचारा हो, किती कोटी कोटी उड्डाणे झाली. कमी कसले होतय महागाई सारखे लोकप्रतिनिधी आणि सरकारी बाबूंची मालमत्ता फक्त वाढतच जाते.

तसं नव्हे हो गुमास्ते, दीड दोन महिन्यांपूर्वी तर फॉर्म भरलेले बिचार्यांनी .
मग आता अचानक दीड दोन महिन्यात पैसे कसे बदलतात?

Proud

दीड दोन महिन्यात पैसे कसे बदलतात? >> काय आहे ना... की त्याला बघायचे असेल की आता किती संपत्ती आहे आणि ५ वर्षानंतर किती होईल ते.. म्हणजे वाटा कळायला नको का....... Wink
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. त्याचा नाही....भ्रष्टाचार चा म्हणतोय मी Biggrin

अहो असं काय करताय. पुन्हा पुन्हा तेच कागद केल्याने झेरॉक्सवाल्याना पोट भरायला मदत नै का होणार? मोदी इतके दुरदर्शी . अन तुम्हाला बै कदरच नै

१०-१२ दिवसात स्वतः मोदींच्याच कागदपत्रावर काही लाखानी रक्कम वाढली होती मग इतक्या दिवसात कोटी शक्य आहेत.

राजकारणी स्वतःच्या नावावर मालमत्ता ठेवतात का? एखादा राजकारणी कफल्लक असला तरी विश्वासु कार्यकर्ते ,नातेवाईक यांच्या नावे हजारो एकर जमीनी घेऊन ठेवलेल्या असतात, कंपन्या त्यांच्या नावे असतात.
मोदींना हे ठाऊक आहे परंतु दिखाव्यासाठी परत हा संपत्ती जाहिर करण्याचा प्रकार ते करत आहेत. कृती केली नाही तर मोदींचा केजरीवाल व्हायला वेळ लागणार नाही.

800

मा. पंतप्रधान मोदींचे आजचे संसदेतील भाषण ऐकले.

अस्थी कृषीवलांच्या पुसतात संसदेला
करतात आत्महत्त्या का देश पोसणारे?

या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही, हे मला अपेक्षितच होते. शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून येईल एवढा भाव देण्याचे सोडून बाकी सर्वच ते बोलले. कॉग्रेस शेतकर्‍यांच्या लुटीचे धोरण आखून ते धोरण हिरिरिने राबवत होती. तेच धोरण आणखी प्रभावीपणे राबवले जाईल, असा अंदाज होता, तो खरा ठरेल असे आता स्पष्टपणे दिसायला लागले आहे.
मात्र
शेती सोडून अन्य बर्‍याच क्षेत्रांना ’अच्छे’ दिवस येतील, याची झलक त्यांच्या भाषणात जाणवली. विकासाचा मुद्दा आणि सामोपचाराने निर्णय घेऊन धोरण राबवायचे हा त्यांचा मुद्दा अत्यंत प्रामाणिक आणि देशहितासाठी प्रगल्भ राजकारण कसे असू शकते, हे अधोरेखित करणारा होता. आजचे त्यांचे भाषण अनेक क्षेत्रात क्रांतीकरक बदल घडवून आणणे शक्य आहे, याची ग्वाही देणारे आणि राष्ट्रासमोर सकारात्मक आशादायी चित्र निर्माण करणारे आहे. शिक्षण क्षेत्राविषयीचा त्यांचा मुद्दा ऐकताना माझ्या "वांगे अमर रहे" पुस्तकातील "प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती" या लेखाची आठवण झाली.

बर्‍याच काळानंतर देशाला पंतप्रधान मिळाला
आणि
या देशाला पंतप्रधान आहे, असे जाणवायला लागले आहे.

- गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------

श, ओबामा, इत्यादि मंडळी तिला झूकून अभिवादन करत अस्लेली पोस्टर्स अद्याप लावलेली आहेत. >>> नंदिनी, सिरीयसली? ओबामा ठीक आहे, बुश कोठून आला आता? Happy निदान पुतिन, मर्केल किंवा चीन जपान वाले तरी दाखवायचे.

येथे तुम्हाला बुश ओबामा आदी नेते अम्मा देवीला वन्दन करताना पहायला मिळेल.

http://www.bbc.com/news/blogs-news-from-elsewhere-26359267

East or West ammaa is the best...

शपथविधीला झाडुन सर्व सार्क नेते आले... पण त्या काळात अम्मा दुखवट्यात होती. आणि अम्माला (आणि तिच्या भक्तान्ना) नेहेमी कॅमेरा केवळ स्वतः कडे हवा असतो... ४००० अतिथी मधे एक अम्मा (राज्याची मुख्यम्त्री) कॅमेर्‍यासमोर किती वेळ दिसली असती.... मग न जाण्यासाठी प्रेमदासा ह्यान्चे कारण शोधले.

<<३-४ असे BOD कुठल्याही नदीचे असत नाहीत.(अर्थात शहरामधून जाणार्‍या) ही व्हॅल्यू एवेढी खाली आहे की बिसलरीचा |BOD सुध्दा त्यापेक्षा जास्त असू शकेल..>> खरंय.

<<2.8 million MPN म्हणजे तसे पाणी अगदी शुध्द करुन पिले तरी मेलेल्या F.Coli चा ज्युस पिल्यसारखेच आहे>> अगाईग Lol

<<असेल बुवा! पण ते देशभरातल्या सर्वसामान्य जनतेला कसे कळाले नाही; हा मोठा गहन प्रश्न आहे>>

शरद, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. बरीचशी जनता अंधारात आहे. बातम्या चाळणी लावून आपल्यासमोर येत आहेत.

MadhaPatkar EVM tag.png

कुठल्याही चॅनेलवर ह्या बातमीवर चर्चा झालेली पाहिली तुम्ही? मेधा पाटकर खासदार बनण्यासाठी खोटे किंवा बिनबुडाचे आरोप करतील हे मनाला पटत नाही.
http://timesofindia.indiatimes.com/home/news/Medha-Patkar-complains-of-p...?

वाराणसीतल्या मॅजिस्ट्रेटला इव्हीएम फ्रॉडमध्ये अटक झाल्याची चर्चा कुठल्या चॅनेलवर ऐकलीत?

http://kohram.in/evm-at-home-case-updates-f-i-r-lodged-by-aam-aadmi-part...

Varanasi EVM fraud.png

<<की निवडून येईपर्यंत बिचार्यांचे पैसे संपून जातात?>>उलटा प्रश्न विचारा हो, किती कोटी कोटी उड्डाणे झाली. >>
HRD assets.png
हे बघा अशी उड्डाणे! Happy
http://myneta.info/rajsab09aff/candidate.php?candidate_id=318

<< शेवटी तुमच्या आमच्या भावनिक वादातले हे पक्ष ओली लाकडं आहेत.जळताना धूर होणारच.
मोदी,जे चांगलं करतील त्याला पाठींबा द्यायचा,नवे उपाय राबवताना आपण त्याचं पालन करायचं. चूक झाली तर निदर्शनास आणून द्यायची,आणि काय>> +१

मुटे, शेतकरी आणि मोदी Sad ह्या मुद्द्यावर तर प्रचंड चिडचिड होते माझी. भयानक खोटं बोलली आहे ही व्यक्ती.

इथे चित्रे टाकली तर चालतात ना? मी धपाधप टाकत सुटलेय Uhoh

निदान पुतिन, मर्केल किंवा चीन जपान वाले तरी दाखवायचे.>> तेपण आहेत. Happy

उदय, तिचा फारच वाईट पोपट झालाय. जाऊद्यात!!! त्यात परत तमिळनाडूमधून एक बीजेपी उमेदवार निवडून आलाय. संघाला इकडे भाव मिळतोच आहे. थोडक्यात इतके दिवस जागवत ठेवलेली तमिळ अस्मिता आचके देतेय. २०१९ एकंदरीत प्रादेशिक पक्षांना फारच टफ जाईल.

Pages