येणार येणार म्हणत वर्षभर गाजत असलेले मोदी यांच्या अधिपत्याखालील एन डी ए सरकार आता लवकरच मूहुर्तमेढ रोवणार आहे. इतक्या वर्षांनी असे निर्विवाद बहुमत असलेले सरकार भारताला लाभले आहे.
याचा फायदा खरच भारतीयांना होईल का?
काय असेल या सरकारचा कार्यक्रम?
कसे राबवतील ते त्यांच्या योजना?
खरंच आपल्या देशाच्या आर्थिक/ सामाजिक विकासास चालना मिळेल का?
पाच वर्षांनी हा धागा मोदीसरकारच्या कार्यकाळाचा लेखाजोखा घेण्यास उपयुक्त ठरावा.
या धाग्यात-
१. मोदी प्रशासनाने राबविलेल्या विकास कामांची उपयुक्तता/ कमतरता
२. नविन निर्णय घेतल्यास किंवा विधेयक मांडल्यास त्या बाबत सर्वांगाने चर्चा
३. सरकारचे परराष्ट्र धोरण
४. भारताचा आर्थिक विकास
५. एकंदर प्रशासकीय बदल
याविषयी चर्चा व्हावी असा मानस आहे.
-कृपया वैयक्तिक दोषारोप, जुने मुद्दे काढून हमरीतुमरीवर येणे, ड्यु आयड्यांनी महायुद्ध करणे हे प्रकार या धाग्यावर करू नये.
- जनतेने बहुमताने मोदीसरकारला कौल दिलेला आहेच त्यामुळे हा धागा यापुढे सरकार काय करते याकरिता वॉचडॉग म्हणून आहे. पूर्वी काय झाले, मोदी निवडून यायला नको होते वैगेरे चर्चा या धाग्यावर करू नये.
१.दि. २१-०५ -१४-शपथविधीकरिता सार्क राष्ट्रप्रमुखांना आमंत्रण, सगळ्यांकडून स्विकार.
२.दि. २६-०५-१४- मंत्रीमंडळ निवड
अरुण जेटली : अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण
सुषमा स्वराज : परराष्ट्र मंत्रालय
राजनाथसिंह : गृह
अनंतकुमार : संसदीय कामकाज, रसायन आणि खत
नितीन गडकरी : भू-पृष्ठ वाहतूक आणि नौकानयन
सदानंद गौडा : रेल्वे
वेंकय्या नायडू : नगर विकास, गृह निर्माण
रवी शंकर प्रसाद : दूरसंचार, कायदा आणि न्याय
मनेका गांधी : महिला आणि बालकल्याण
नजमा हेपतुल्ला : अल्पसंख्यांक
स्मृती इराणी : मनुष्यबळ विकास
राधा मोहन सिंह : कृषी
निर्मला सीतारामन : वाणिज्य राज्य मंत्री
पीयुष गोयल : उर्जा राज्य मंत्री
प्रकाश जावडेकर : माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री
रामविलास पासवान : अन्न, ग्राहक संरक्षण
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री
अनंत गीते - अवजड उद्योग
गोपीनाथ मुंडे - ग्रामविकास
उमा भारती - जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान
रावसाहेब दानवे - ग्राहक संरक्षण मंत्री
कलाराज मिश्र - लघु उद्योग मंत्री
हरसिमरत कौर बादल - अन्न प्रक्रिया मंत्रालय
अशोक गजापती राजू - नागरी उड्डान मंत्री
थवर चंद गेहलोत - सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
आल ओराम - आदिवासी विकास मंत्रालय
किरेन रिजुजू - गृह राज्यमंत्री
३.दि. २९-०५-१४
मोदींनी सरकारचा 10 कलमी कार्यक्रम सादर केला आहे. तो खालीलप्रकारे -
1. परिणामांना घाबरू नये यासाठी प्रशासनामध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोधैर्य वाढवले जाईल.
2. नवे विचार आणि सल्ल्यांचे स्वागत केले जाणार.
3. शिक्षण, आरोग्य, पाणी, ऊर्जा आणि रस्ते यांना प्राधान्य देणार.
4. सरकारमध्ये पारदर्शकता आणणार, टेंडर आणि इतर सरकारी कामांसाठी ई-ऑक्शन (ऑनलाईन लिलाव) प्रणाली
5. जीओएम स्थापन करण्याऐवजी मंत्र्यांमधील ताळमेळ वाढवण्याचा प्रयत्न करणार.
6. जनतेला दिलेली वचने पूर्ण करण्यासाठी खास व्यवस्था तयार केली जाणार.
7. अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्यांवर चर्चा करणार.
8. पायाभूत सुविधा आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींमध्ये सुधारणा.
9. वेळेवर ओजना पूर्ण करण्यावर जोर.
10. सरकारी धोरणांमध्ये सातत्य आणि स्थैर्य आणणार
४. श्री. अजित डोवाल यांची मोदींच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी नियुक्ती. नृपेंद्र मिश्रा यांची प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती.
५. ग्रूप ऑफ मिनीस्टर्स आणि एम्पॉवर्ड ग्रूप ऑफ मिनिस्टर्स ही पदे रद्द.
६. संरक्षण खर्चात १००% एफ डी आय
७. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत होणारी नियमित दरवाढ तशीच चालू रहाणार.
८. वैयक्तिक कर्मचारी वर्ग म्हणून नातेवाईकांची वर्णी लावू नये असा सर्व मंत्रीमंडळाला आदेश.
९. जस्टिस एम बी शहा यांच्या अधिपत्याखाली एस. आय. टी ची स्थापना- काळ्या पैशाची चौकशी करण्याकरिता.
१०. सगळ्या खात्याच्या मंत्र्यांना १०० दिवसांच्या कार्यक्रमाची आखणी करण्याची सूचना.
११. सगळ्या खात्यांच्या मुख्य सचिवांची बैठक घेऊन पुढिल कार्यासाठी सूचना आणि प्रोत्साहन.
१२.पंतप्रधान म्हणून पहिलाच परदेश दौरा- भूतान या छोट्याश्या शेजारी देशात. तिथून वीज आयातीबद्दल करार
१३. बजेटपूर्वीच रेल्वे प्रवासी भाड्यात अतिप्रचंड वाढ. सीझन पासचा रेट दामदुप्पट.
बेफिकीर, तुमच्या विनंतीला मान
बेफिकीर, तुमच्या विनंतीला मान द्यायला हरकत नाही. पण रॉबिनहुड यांनाही अशी विनंती करावी ही आपल्याला विनंती. त्यांनी दोन्ही पोस्ट क्वोट केलेल्या आहेत.
वाघाने डरकाळी फोडली की वानर
वाघाने डरकाळी फोडली की वानर आपसूक झाडावरून गळून पडतात <<<
हे वाक्य फार आवडले.
त्यावर मोदींनीच स्टेटमेंट
त्यावर मोदींनीच स्टेटमेंट द्यावे किंवा कारवाई करावी ही अपेक्षा गैर आहे.>>>
मग प्रत्येक ठिकाण्वी मनमोहन यांना बोलावे का म्हणात होते
रॉबीनहूड हे जुने सदस्य असून
रॉबीनहूड हे जुने सदस्य असून त्यांनी आजवर लिहिलेल्या पोस्ट्स एकतर वैयक्तीक किंवा खोचक होत्या असे मला स्मरत आहे. तुम्ही व इब्लिस 'फक्त आणि फक्त' वैयक्तीक किंवा खोचक लिहीत नसता, इतरही गोष्टी लिहिता, म्हणून फक्त तुम्हालाच दोघांना विनंती केली.
मनमोहन काहीच बोलत नव्हते.
मनमोहन काहीच बोलत नव्हते. मोदी बरेच बोलतात. असो.
बेफिकीर, आपल्या विनंतीला मान
बेफिकीर, आपल्या विनंतीला मान देऊन माझ्या दोन पोस्ट मी संपादित केलेल्या आहेत. असे ही आश्वासन देत आहे की माझ्या पोष्टीला उद्देशून त्या व्यक्तीची खोडसाळ पोस्ट आली नाही तर मी ही त्या व्यक्तीच्या पोष्टीला उद्देशून काहीही टिप्पणी करणार नाही. ते आपल्या न्युक्लिअर पॉलिसी सारखे No first use policy.
अरारा जरा जावुन येईपर्यन्त
अरारा
जरा जावुन येईपर्यन्त एकदम तिन छक्के ?
द आमीन . सगळेच तोपिक फास्ट पलवलेत.
नक्को त्या गोष्टीवर कोणी ही
नक्को त्या गोष्टीवर कोणी ही बोलतो... हव्या त्या गोष्टीवर बोलायला डोके आणि भावना लागते जी त्यात बिल्कुल दिसत नाही
स्व-संपादित. वरची उदयन यांची
स्व-संपादित. वरची उदयन यांची पोस्ट संपादित झाली.
हो नक्कीच ... बोलायला हवे खरे
हो नक्कीच ... बोलायला हवे खरे काय ते सांगायला नको ... खोटे बोंबलुन बोलणारे दिसलेत
मग प्रत्येक ठिकाण्वी मनमोहन
मग प्रत्येक ठिकाण्वी मनमोहन यांना बोलावे का म्हणात होते<<<
तुलना चुकीची आहे.
मनमोहन सिंग आणि सोनिया ह्यांचा संबंध जितका थेट, जगजाहीर होता तितका मोदी व संघ ह्यांचा नाही. त्यामुळे आजमितीला भारतीय नागरिक मोदींकडे पाहताना नेता म्हणून पाहतात, तसे मनमोहन सिंगांना पाहणे शक्य नव्हते कारण सर्वत्र सोनियाजींचा वावर समोर येत होता व त्या अधिक प्रभावी नेत्या आहेत हे मनांवर ठसत होते. नेमक्या ह्याच कारणामुळे लोक कार्यकारी अधिकारी असलेल्या मनमोहन सिंग ह्यांचा मुखदुर्बळपणा पचवून घेत नव्हते व त्यामुळे असे म्हंटले जात होते की त्यांनी बोलावे. मोहन भागवत मोदींपेक्षा प्रभावी नेते आहेत किंवा सातत्याने जनतेसमोर येत आहेत असे चित्र नाही. मोदीच सबकुछ असल्याचे चित्र जनतेसमोर आहे. त्यामुळे मोदींच्या बोलण्याला खूपच अधिक वजन आहे.
१. बदायूं प्रकरण - मोदी जर म्हणाले की अखिलेश यादवांच्या सरकारने राजीनामा द्यावा, तर भाजप प्रशासित राज्यांमधील गुन्ह्यांची आकडेवारी जाहीर करून गोंधळ केला जाईल. त्यामुळे योग्य मार्ग हा आहे की 'केंद्र सरकार' ह्या ताकदीमार्फत हे प्रकरण हाताळले जावे. काही प्रकरणे वैयक्तीक भूमिका घेऊन तर काही संघटनेची भूमिका घेऊन हाताळावी लागतात.
२. पुणे प्रकरण - हे प्रकरण अतिशय वेगळ्या प्रकारचे आहे. सुदैवाने त्याचे लोण फार पसरले नाही. (आय होप तुम्ही सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध होण्याबाबतच म्हणताय, तसे नसल्यास क्षमस्व). अश्या प्रकारच्या प्रकरणांमध्ये कसे स्टेटमेंट द्यावे हेसुद्धा नाजूकपणे बघावे लागते. तसेही, पुणे प्रकरण काँग्रेसच्या राज्यात झाले असते तर येथील किंवा इतरत्र कोणा भाजप अनुयायांनी मनमोहन सिंग ह्यांनी स्टेटमेंट द्यावे असा आग्रह धरला असता ही कल्पनाच बिनबुडाची 'वाटत' आहे.
विनंती स्वीकारल्याबद्दल आभार
विनंती स्वीकारल्याबद्दल आभार विचारवंत
ब विचारवांती ! लै हसलो या
ब
विचारवांती !
लै हसलो या शब्दावर
वरची उदयन यांची पोस्ट संपादित
वरची उदयन यांची पोस्ट संपादित झाली. >>> नीट बघा... मी माझ्या मतांवर ठाम असतो मला कुठली पोस्ट संपादीत करण्याची आवश्यकता नसते ....... आणि मी कुठली माझी पोस्ट संपादीत केलेली नाही आहे
पित्त खवळणे काय असत हे
पित्त खवळणे काय असत हे प्रत्यक्ष पाहिलं / वाचलं
एखादी अँटासिड घ्या बा!, पित्त नाशक चुर्ण सुचवणार होतो पण ते आर्युवेदिक आहे ना चालणार नाही ते.
श्री लगो, तुम्ही आगीत तेल ओतत
श्री लगो,
तुम्ही आगीत तेल ओतत आहात असे सकृतदर्शनी वाटत आहे
बेफी मग विजय आणि मुझ्झफ्फरनगर
बेफी मग विजय आणि मुझ्झफ्फरनगर चे प्रकरण देखील अखिलेश कडेच सोपवावे ना तिथे स्वतःचा तपास आणि बवाल करुंगा सारख्या गोष्टी का ?
मी ... खर आणि स्पष्ट
मी ... खर आणि स्पष्ट लिहिल्यावर ते इतरांना बघवत नाही आणि अजिर्ण होते
अजब आहे. ठाम असाल हो. पण
अजब आहे. ठाम असाल हो. पण पोस्ट संपादित झाली.
बेफिकीर यांनी त्या पोस्टीतला काही भाग टाकलाय सुद्धा. तरी संपादित नाही??
नाइ हो बेफि , मी अजुन हसतोय
नाइ हो बेफि , मी अजुन हसतोय
अच्छा ते काय.... अहो एक
अच्छा ते काय.... अहो एक वाक्याचे व्याकरण चुकलेले...... ते सरळ केले....
बाकी लिहिलेले काहीच गाळले नाही...
मागे मुलायम बाबु बोलले होते
मागे मुलायम बाबु बोलले होते ना शक्ती मिल सन्दर्भात, की बच्चे है जी जाने दो, गलतिया हो जाती है. नेमके असलेच हेरुन आणी या पोपटनाक्या बाप बेट्यान्ची अलिखित सम्मती गृहित धरुन उ प्रदेश मध्ये असले घाणेरडे धन्दे सुरु झाले आहेत. आपण काहीही करु पण बाप बेटे आहेतच आपल्या पाठी असे समजून नुसता धिन्गाणा चालू आहे या उत्तर प्रदेशात.:राग:
खरच राष्ट्रपती शासन लावा असल्या दळभद्र्या राज्याना. ही असली विखारी पिल्लावळ जगात नसलेली बरी.
बाकी पुण्यात जे झाले ते निन्दनीय आहे. निरपरान्धाचा मात्र हकनाक बळी जातो.
काल काका बोलले की मोदी सरकार आले नी जातीय दन्गली सुरु झाल्या, तिकडे हफिज सईद बोलला की मोदी सरकार आले नी यव त्यव सुरु झाले. मज्जाय बुवा! उचलली जीभ लावली टाळ्याला.:फिदी:
तुम्ही आगीत तेल ओतत आहात असे
तुम्ही आगीत तेल ओतत आहात असे सकृतदर्शनी वाटत आहे >>>>>>. बेफी...आगीत तेल / तुप ओतने लिंबुभाउ चे काम आहे.......... त्याऐवजी पेट्रोल डिझेल या शब्दाचा प्रयोग करावा
बरं.
बरं.
च्यायला, अजुनहि लोक
च्यायला, अजुनहि लोक गुजरातमध्ये झालेली प्रगती फक्त दिखाउ आहे; याचीच टीमकी वाजवताना पाहुन गंमत वाटते आहे.
मी अजूनही पेट्रोल स्वस्त
मी अजूनही पेट्रोल स्वस्त होण्याची वाट पाहत आहे
टीमकी वाजवताना पाहुन गंमत
टीमकी वाजवताना पाहुन गंमत वाटते आहे. >> ६० वर्षा काहीच प्रगती झाली नाही ही टिमकी डफली वाजवत असताना आम्हाला देखील गंमत वाटते आणि मनोरंजन होते हो
मी अजूनही पेट्रोल स्वस्त
मी अजूनही पेट्रोल स्वस्त होण्याची वाट पाहत आहे >>> ५ वर्ष थांबा ... १२ रुपये भाव होणार आहे..
बापरे, आज दिवसभर माबोवर यायला
बापरे, आज दिवसभर माबोवर यायला मिळाले नाही तर धागा पळतोय.
जरा सभ्य शब्दात चर्चा झाली तर चालेल लोकहो.
बाकी मोदी समर्थक चांगली फालतूतील फालतू गोष्टं झाली तर मोदी फॅक्टर आणि वाईटाला मात्रं पूर्वीचे सरकार आणि आत्ताचे तेथील राज्यसरकार जाबाबदार म्हणतायत; याउलट मोदी विरोधक प्रत्येक वाईत गोष्टीला मोदी जबाबदार आणि चांगल्या गोष्टीला पूर्वीचे शासन जबाबदार म्हणतायत हे पाहून गंमत वाटतेय.
मोदी आल्यावर अचानक दिल्लीत इतके विजेचे शॉर्टेज झाले हे पाहून गंमत वाटतेय.
याला मोदी / मोदीविरोधक यांपैकी कोण जबाबदार की कुणीच नाही हे जाणून घ्यायला आवडेल.
मोदी चीनच्या जवळ जाऊ पहात आहेत यात त्यांचा 'नेहरू' तर होणार नाही ना हे पहाणे मनोरंजक ठरेल.
ता.क. - ह्या मिर्ची म्हणजे लहानपणी जत्रेत हरवलेली माझी जुळी बहिण आहेत का?
आमचे विकूउल्लाखान रोज सोनिया
आमचे विकूउल्लाखान रोज सोनिया चाळिसा म्हणतात
<<
विकु तुमचे मित्र आहेत, हे ठाऊक आहे.
पण, काँग्रेस समर्थक असलेल्या मित्रालाही कुणीतरी-उल्लाखान बनवून टाकणे ही विकृती आहे, असे वाटत नाही का? मोदी विरोधक अथवा काँग्रेस समर्थक असलेत तर मुसलमानच असायला हवे असते का?
Pages