Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा प्रतिसाद पहिला !!
माझा प्रतिसाद पहिला !!
भारीच.. वेल्,नाव वेगळं द्या
भारीच..
वेल्,नाव वेगळं द्या की... अमानविय अनु. पुढे सुरू किंवा अमानविय अनु. द्विशतकी वाट्चाल ...आता पुढे... वगैरे
बाकी तिथे तांत्रिक काय अडचण होती.हे फक्त माहीतीसाठी विचारतोय...
जुन्याची एक लिंक पण हवीच वर..तीही टाका...
>>>धागा अमानविय असला तरिही
>>>धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तिथे दुसरा धागा काढा, दुसरा
तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
>>>>>>>>>>>
सगळेच मेले अंधश्रद्धाळू आणि भित्रट .. आपण हे धाडस दाखवल्याबद्दल आपले खरेच मनापासून कौतुक
वा, हे छान झालं,
वा, हे छान झालं, धागाकर्त्याचं अभिनंदन पहिल्या धाग्याने २००० ची संख्या गाठल्याबद्दल.
जुन्या धाग्याची लिंक पण टाका
जुन्या धाग्याची लिंक पण टाका ना.
या रविवारी रात्री जुना
या रविवारी रात्री जुना अमानवीय धागा वाचून काढला.
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तेवढ्यात बाहेर पावसाची चाहूल लागली.
टेरेसवर सुकायला घातलेले कपडे घ्यायला वर चालले होते तर माझा साडेचार वर्षाचा लेक म्हणाला मी ही येतो.
टेरेसवर जाताना जिन्यावर वानराने घाण करून ठेवलेली दिसली म्हणून बाळाला म्हटलं तू खालीच थांब मी वर जाऊन येते पटकन , नाहीतर चुकून तुझा पाय मळेल.
मी वर पोचून कपडे गोळाआ करत असताना मनात विचार आला 'आत्ता एक्झॅक्टली बारा वाजतायत, आपण टेरेसवर एकट्याच आहोत, असे कित्येकदा इथे एकटे आलोय इतकेच नव्हे तर रात्रीअपरात्री स्कूटीवरूनही हॉस्पिटलला चकरा मारतो आपल्याला कधी भूत दिसत नाही'
हा विचार करत नाही तोच जोराने पंखांची फडफड आणि बाळाच्या 'आई बचाओ' असा ओरडण्याचा आवाज आला.
झटकन कपडे घेऊन मी खाली आले तर वळचणीला घरटं बांधून राहिलेलं कबूतर उडून जाताना दिसलं.
बाळ पळत बेडरूममध्ये त्याच्या बाबांकडे गेला होता.
इतका घामाने भिजलेला आणि भितीने पांढरा फट्टक पडलेला बाळपहिल्यांदाच पाहिला मी.
'वो कबूतरने मुझे डराया' असं म्हणत होता. त्याला जवळ घेऊन पाच मिनीटे पकडून बसल्यावर त्याच्या ओठांचा रंग पांढर्यावरून परत लाल गुलाबी झाला.
खरं तर आमच्या हालचालीने घाबरून हे कबूतर स्वतः चा जीव वाचवायला पळालं होतं.
दिवसा आम्ही गच्चीवर जातो तेव्हाही ते असंच फडफडतं पण भिती वाटत नाही.
रात्री मात्र माझ्या बाळाला पुरतं घाबरवलं त्याने.
नंतर नवर्याला सांगितलं आत्ताच 'अमानवीय' धागा वाचत होते, काय योगायोग आहे.
दक्षिणा अशी पुण्यकर्म करत
दक्षिणा अशी पुण्यकर्म करत राहा गो बाये..![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
साती यांच्या मुलाने या धाग्यावर शुभारंभाची पोस्ट टाकायची संधी पटकावल्यामुळे त्याचं अभिनंदन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आता आमच्या रात्रीच वाचायला येईन इकडे..तोवर आधीच्या धाग्यावरच्या समस्त आय्ड्यांनी इकडे हजेरी लावून ठेवा.
ब्रो - मला माहित आहे ती रूम.
ब्रो - मला माहित आहे ती रूम. ओळखीचे काही तिथे शिकत होते. एक जण शिकवत होते, पण आज्वर मी कधी कोणाकडूनही काही एइकले नाहेए. कदाचित आम्ही कोणीच अशा काही गोष्टींवर विश्वास ठेवत नाही म्हणून कोणी सांगितले नसेल.
all spelling mistakes due to amaanaviy sorry असंगणकिय behavior or my laptop
(No subject)
७८६ वा प्रतिसाद माझा होता..
७८६ वा प्रतिसाद माझा होता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ह्यात अमानवीय काय आहे मला
ह्यात अमानवीय काय आहे मला कळले नाही.
पूर्वी आजीच्या बोलण्यात 'मुठ
पूर्वी आजीच्या बोलण्यात 'मुठ मारली' हा शब्द ऐकला होता. म्हणजे काय कोणाला माहितीये का?
मुठ मारणे हा कोकणातील करणी,
मुठ मारणे हा कोकणातील करणी, देवदेवस्कीतला एक प्रकार आहे. त्यात एखाद्यावर मुठ मारली की तो माणूस काही मुदतीत मरतो असे म्हणतात.
ओह असे का? आम्ही लहान असताना
ओह असे का? आम्ही लहान असताना म्हणूनच कधी तिने याचा अर्थ सांगितला नसावा.
वेल>>>>>> आमच्या बिल्डिंग
वेल>>>>>>
आमच्या बिल्डिंग मधल्या एका पोलिस वाल्या दादा ने हा किस्सा मी साठे कॉलेज ला असताना सांगितला होता .
साठे कॉलेज च्या बेसमेंट मधे ँMCVC डिपार्टमेंट आहे तिथे रात्रि दोन हवालदार पोलिस सिक्यूरिटी साठी बसवतात , एक जन गेट जवळ थांबतो आणि दुसरा बेसमेंट मधे थांबतो , या आमच्या बिल्डिंग मधील पोलिस दादाची ड्यूटी बेसमेंट मधे होती,
रात्रि त्याने मस्त पंखा लाउन झोपी गेला आणि रात्रि 1 च्या आसपास त्याचा गळा कोणीतरी दाबू लागल , तो खुप घाबरला कारण मैन डोर बंद असताना हे केल कोणी?
त्या नंतर तो मैन गेट उघडून ऑडिटोरियम च्या गेट जवळ आला त्याने ही गोष्ट त्याच्या इतर स्टाफ ला सांगितली तर ते देखिल हेच म्हणाले की त्यांना सुध्हा सेम अनुभव आला होता ,जेंव्हा त्यांची ड्यूटी बेसमेंट मधे होती ,!
ब्रो- महाविद्यालया मध्ये
ब्रो-
महाविद्यालया मध्ये पोलिस हवालदार ते पण दोन दोन?, इथे धमकी मिळुन पण पोलिस संरक्षण मिळत नाही, तर तिकडे महाविद्यालयात आणि तेही MCVC सारख्या विभागात हवालदार. काही पटलं नाही बुआ?
असं काय घडलं होत की पोलिस बंदोबस्त ठेवला होता?
एक खरी हकीकत. अजोबांना सात
एक खरी हकीकत.
अजोबांना सात बहिणी व एक भाऊ होता. सर्वात मोठी बहीण सावत्र. तिला सगळे अक्का म्ह्णत. तर अक्काची आई ती झाल्यावर बांळंतपणात वारली. तिचा सगळा जीव लेकीत अडकलेला असावा.
पणजोबांनी नंतर दुसरे लग्न केले. ती बाई पण वयाने तशी लहानच, खाष्ट वगैरे नव्हती. पण तरी सावत्र. अक्काच्या आईला तिचा विश्वास नसावा. तिच्या बाळंतपणात डिंकवडा केला की तिला एकही लाडू खाल्ला जात नसे.आक्काला बोलावुन मनसोक्त खायला दिल्यावरच तिला खाल्ले जाई.
पणजोबाना कधी बाहेरगावी जायचे झाले तर घराची काळजी असायची. तो रझाकारचा जमाना होता. मग ते मोठ्याने म्हणायचे मला गावी जायचे आहे काय करावे आणि आवाज यायचा "माझे लक्ष आहे, चिंता नसावी".
एकदा अक्का ५-६ वर्षांची असताना खेळून आल्यावर हातातल्या सोन्याच्या बांगड्या गायब. विचारले असता एका अनोळखी माणसाने काढुन घेतल्याचे समजले. तिला ओरडा बसला व ती न जेवता रडून झोपली. रात्री पणजोबांच्या स्वप्नात अक्काची आई आली व म्हणाली "घ्या तुमच्या बांगड्या पण माझी लेक न जेवता झोपली त्याची भरपाई कशी होणार?". जागे होऊन पहातात तो खरेच उशाशी बांगड्या होत्या.
त्यानंतर अक्काचे लग्न होऊन तिला एक मूल होईस्तोवर तिची आई भासत असे. त्यानंतर मात्र कधी कोणाला काही जाणावले नाही.
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव ना. ते नाव एकदम डोक्यात बसलय आणि हीट आहे. हवे तर अमानवीय - २.
mala pan ek anubhav sagaych
mala pan ek anubhav sagaych aahe
vaishali Agre.... मग कुणी
vaishali Agre....
मग कुणी थांबवले आहे ?
सामी<< बरोबर.मलाही वाटलेलं
सामी<< बरोबर.मलाही वाटलेलं बदलावं पण तेच चांगलं आहे जुनं.
>>ब्रो,त्या बेसमेंटला व्हेंटीलेशन आहे का?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पनू, हकीअकत मस्त.पण आक्काची काळजी पणजोबांना वाटत असे,यातच गुपित कळतं...
बाकी रझाकार चा जमान म्हणजे नाही कळलं?
बाकी रझाकार चा जमान
बाकी रझाकार चा जमान म्हणजे
नाही कळलं?>>>>>
en.m.wikipedia.org/wiki/Razakars_(Hyderabad)
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव ना. ते नाव एकदम डोक्यात बसलय आणि हीट आहे. हवे तर अमानवीय - २.>>> हो प्लिझ
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव ना. ते नाव एकदम डोक्यात बसलय आणि हीट आहे. हवे तर अमानवीय - २.
>>>
+11111111111
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव
दक्षिणा नाव 'अमानवीय' च ठेव ना. ते नाव एकदम डोक्यात बसलय आणि हीट आहे. हवे तर अमानवीय - २.
>>>
+11111111111
>>>>>>> +१११११११११११११११११
जाई धन्स,लिंकसाठी... माहीती
जाई धन्स,लिंकसाठी... माहीती मिळाली...मला वाटले 'रझाकार' हे मायबोलीवरचे अॅक्रॉनीम आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अरे एवढे,प्रतिसाद वाटलं,किस्से पोस्ट झाले....![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
ब्रों-च विमान अजुन लँड झालेल
ब्रों-च विमान अजुन लँड झालेल दिसत नाही वाटतं, उत्तर आलेलं नाही अजुन
पनु मस्त अनुभव
पनु मस्त अनुभव
घ्या नाव बदललंय आता.
घ्या नाव बदललंय आता.
Pages