Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
विज्ञानदास, >> वरती एका
विज्ञानदास,
>> वरती एका पैलवानाने मला उकसवलं...
तुम्हाला भुताखेतातलं काहीच कळंत नाही. तेव्हा शांत राहणे इष्ट. हा धागा अमानवीय अनुभवांसंबंधी आहे. तुम्हाला अशा घटना मान्य नसतील तर दुसरा धागा खोला.
तुम्हाला विज्ञानातलंही काही कळंत नाही. तरी मी उसकलो का तुमच्यावर?
आ.न.,
-गा.पै.
कोकणातली घरे कोण जाणे पण मला
कोकणातली घरे कोण जाणे पण मला नेहमी गूढ भासतात.सतत असं वाटत राहत <की त्या कौलारू फटींमधून काहीतरी सरपटत जातंय.किंवा ती कोंझी माजघरं...परसदार आणि अंगणामधला अंधार आणि पालव्यांची सळसळ...दिवसाही तिथं गच्च वाटतं.पाचोळ्यावर पडलेला पाय अंगावर काटा आणतो.कोणीतरी आपल्या मागावर आहे असं वाटतं.वाड्यांतून अंगावर येणारा एक विशीष्ट गंध आणि आपलेच श्वास यात काहीबाही अतर्क्य नातं आहे की काय असाही भास होतो.
बाकी असं कोकणातच वाटतं की भारताच्या सगळ्या किनारपट्टीवर कोणी सांगणार का?
तुम्हाला विज्ञानातलंही काही
तुम्हाला विज्ञानातलंही काही कळंत नाही.<<< हे तर मलाही माहीत्ये,त्यात काय नवीन... तेच तर शिकतोय मी साहेब...कशाला विषय संपला असताना काढता राव.विपूत टाका काय टाकयचंय..
तरी मी उसकलो का तुमच्यावर?<<<तुम्हाला हवं ते बोलत जा.तुम्हाला कोणी अडवलंय..इकडे अवांतर नको..उत्तरे मिळतीलच नक्की.
नंदिनी, बायंगीबद्दल अजून
नंदिनी, बायंगीबद्दल अजून माहीती सांगा ना... हे खाण्यातून करणीसारखं आहे कां?
विज्ञानदास, >> तेच तर शिकतोय
विज्ञानदास,
>> तेच तर शिकतोय मी साहेब...कशाला विषय संपला असताना काढता राव.विपूत टाका काय टाकयचंय..
जसे विज्ञान शिकतांना कोणी विरोधाभास दाखवला तर त्याच्यावर तुम्ही उसकता का? नाहीना? मग मी वेगळं मत मांडलं तर उसकायला काय झालं एव्हढं?
आ.न.,
-गा.पै.
फक्त भुताचे किस्से येउ द्या
फक्त भुताचे किस्से येउ द्या
जाऊ दया हो........... अमानवीय
जाऊ दया हो...........
अमानवीय किस्से टंका ,
या गोष्टींचे पोस्टमॉर्टेम" परानोर्मल सत्य की असत्य" या धाग्यावर करू
धागा ए क वर अभिजीत ब्रो
धागा ए क वर अभिजीत ब्रो ह्यांनी एअर्पोर्ट बद्दल्च्या लिहिले ल्या वदंतांना एका एअर्पोर्टवर का. करणार्या नातेवाईकाने पुष्टी दिली.
(मी ब्रो.चा. डुआय नाही :))
फक्त भुताचे किस्से येउ
फक्त भुताचे किस्से येउ द्या<<<मग टाका की किस्से ...या धाग्यावर किस्सेच येऊ द्या हे झालंय आधीच त्यात तुमचंही तेच... हे लोकं लिहीत नाहीत काही,अशा कंमेंट टाकायला पुढे...
वरती वातावरण तयार होतं आहे...मध्येच काय हे? :रागः किस्से येऊ द्यात नेहमीसारखे ..
[गापै,तुम्हा लोकांचं म्हणणं असतं,ऐकलंच पाहीजे... ते इतर काही धार्मिक धाग्यावर तुमच्या कमेंट्स बघून कळतंच आहे.काय बोलायचं... (इथे काही कमेंट्स टाकू नका प्लीज.)]
100
100
या करणी प्रकाराच्याच एका
या करणी प्रकाराच्याच एका मित्राच्या वाईट अनुभवाबद्दल इथे टाकायचे की नाही हा विचार करतोय असे मी मागे बोल्लो होतो. पण नंतर विचार करून नाही टाकायचे ठरवले कारण तो बिचारा अजून भोगतोय, त्यातून सुटका झाली नाहीये त्याची.
आधी माझा यावर फारसा विश्वास नव्हता पण त्याच्या केसवरून अविश्वास दाखवावासा वाटत नाहीये, सगळ्या डॉक्टरांनी हाथ टेकलेत आणि उपचार करने तर दूर निदान करायलाही हार मानली आहे.
असो, मी डिटेल देत नाही, पण असे ईतर काही कोणाचे करणीचे अनुभव असतील तर प्लीज वेलकम ..
असा अनुभव माझ्या आजोबा बद्द्ल
असा अनुभव माझ्या आजोबा बद्द्ल घडला होता. खुप डॉक्टरांचे उपाय केले पण उपयोग होत नव्हता.
लोकांनी बाहेरचे उपाय करायला सांगितले. आधी यावर फारसा विश्वास नव्हता पण त्याच्या आजाराचे डॉक्टरांना निदान करता येत नव्हते म्हणुन एकाकडे नेले तर त्याने सांगितलेकी आता मुदत संपली आहे.
काही करु शकत नाही ते वाचणार नाहीत.
१५ दिवसांनी ते गेले.
पियु +११११ विज्ञानदास कृपया
पियु +११११
विज्ञानदास कृपया या धाग्याची मजा कमी करू नका. इथले सगळे लोक काय घ्यायच आणि काय नाही इतक कळण्यातपत सुज्ञ आहेत. प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कृपया आपण आपली इमेज 'ओव्हरस्मार्ट' अशी बनवू नये.
धन्यवाद
पियू +1
पियू +1
हे काय होतं मध्येच? बराच राग
हे काय होतं मध्येच?
बराच राग आलेला दिसतोय.... मला विश्वासच बसत नाहीये नेमका कुठे इगो हर्ट झाला आहे आणि कुणाचा?? पीयू,जाई की स्वप्नील की यांच्या ड्यूजचा...
आता धाग्याची मजा कोण कमी करतंय... आणि तुम्ही लोकांनीच अस्मादिकाना उत्तर लिहीण्यासाठी आग्रह केला होता... गेला धागा पहावा कृपया... पीयू यांच्याशी माझा वैयक्तीक वाद नाहीचे.. नेमका कसला राग आलाय ते सांगितलंत तर उपकार होतील...
अवांतरासाठी क्षमस्व... परत तुम्ही लिहायला भाग पाडलत माफ करा...
तुम्ही लोकांनीच अस्मादिकाना
तुम्ही लोकांनीच
अस्मादिकाना उत्तर
लिहीण्यासाठी आग्रह केला होता...>>>>>>> मी कसलाही आग्रह तुम्हाला केलेला नाही
मी फक्त पियूची पोस्ट पटली म्हणून अनुमोदन दिले आहे
आणि तुम्हाला खरेच एवढे वाटत असेल तर या बाफवर काही दिवस लिहू नका
ही फक्त विनंती आहे
पटल तर घ्या नाही सोडून द्या
असो
येऊ द्या अमानवीय किस्से
आणखी एक तुमच्याशी कसलाही
आणखी एक
तुमच्याशी कसलाही वैयक्तिक वाद वगैरे नाही
जे वाटले ते लिहिले इतकेच
मानवीय वाद चालू झालेत यात
मानवीय वाद चालू झालेत यात अमानवीयान्चा तर काही हात/ पन्जा/ पाऊल तर नाही ना?:अओ::दिवा:
विज्ञानदास अहो इतका राग मानून
विज्ञानदास अहो इतका राग मानून घेऊ नका. या धग्यावर कुणी अंधश्रद्धा पसरवत नाहीये. हा धागा आपल्या मनोरंजनासाठी आहे.
>>>>सुट्टिच्या निमित्ताने सारी मामे/चुलत/आते भावंडे आजोळी जमली आहेत आणि रात्री जेवण झाल्यावर चांदणं पडलेल्या अंगणात सगळी भावंडं एकमेकांना आपापले भुताचे किस्से सांगत आहेत. एकेका कहाणीने सगळ्यांच्या अंगावर काटा येत आहे. आणि प्रत्येकजण हुरुप येऊन अजुन रंगवुन आपला किस्सा सांगत आहे. आता त्यात एखादाच भाऊ प्रत्येक किस्स्यामागचे विज्ञान सांगत बसला, प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करत बसला आणि रेफरन्सेस देऊ लागला तर ती मैफल/ बैठक रंगेल का? सगळ्यांना बोर होईल आणि सगळे काढता पाय घेतील.<<<< पियू च्या या मताशी मी सहमत आहे.
मनोरंजनासाठी आपण हॉरर सिनेमे बघतोच ना, तसेच हा धागा पण वाचूया. उगाच प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण कशाला, नाही का.
आणि तुम्हाला खरेच एवढे वाटत
आणि तुम्हाला खरेच एवढे वाटत असेल तर या बाफवर काही दिवस लिहू नका
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही फक्त विनंती आहे
पटल तर घ्या नाही सोडून द्या <<< परत तेच... अरे कुणाचा इगो हर्ट झाला आहे? मला राग आणि हसू दोन्ही येतय आता....
रश्मी +१
रश्मी +१![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्नील... ओव्हरस्मार्ट काय
स्वप्नील... ओव्हरस्मार्ट काय होतं ही कुठली भाषा??
माझा कुणावरही राग नाहिये आणि नसतोही... पण मागचं-पुढचं बघून बोलून मग बोलावं,इतकंच...
माझी आजची संध्याकाळ आनंदाची केल्याबद्दल आभार आपले.
त्यांनी सांगितलं ना एकदा की
त्यांनी सांगितलं ना एकदा की ते दुसर्या धाग्यावर लिहितील![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पुन्हा पुन्हा तीच चर्चा, अनूमोदन का चालूये मग?
पियूचं म्हणणं परफेक्ट आहे आणि त्यानंतर त्यांनी मी दुसरीकडे लिहितो पण सांगितलं आहेच!
भुताचे किस्से येतील का आता?
विज्ञानदास...तुमच्याशी
विज्ञानदास...तुमच्याशी कोणताही वैयक्तिक वाद अथवा वैर नाहीये आणि तुम्हाला दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. दुखावले गेले असल्यास माफ करा.
हे शेवटच. आता येउदेत किस्से
हे शेवटच. आता येउदेत किस्से![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तेच... अरे कुणाचा इगो हर्ट
तेच... अरे कुणाचा इगो हर्ट झाला आहे?
मला राग आणि हसू दोन्ही येतय आता....>>>>>> चालू द्यात तुमचे
या विषयावरचे हेमाशेपो
ok..
ok..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप आधीची गोष्ट आहे.
खुप आधीची गोष्ट आहे. गावाबाहेर एक चिंचेचे झाड होते.
तेथुन जात असताना दुपारी १२ च्या आसपास धरत असे.
भजीची पुडी त्या झाडाखाली द्या मग मि सोडेन ती व्यक्ती असे म्हणत.
भजीची पुडी झाडाखाली ठएवली असता ती व्यक्ती शुद्घीवर येत असे.
त्या व्यक्तीला काही आठवत नसे. आम्हाला झाडाखालुन जाताना भितिच वाटायची.
एकजण झाडावर बसुन भजी खात असताना पडुन मेला. तेव्हापासुन हे सुरु होते.
पुडीचा धागा तसाच झाडावर काही महीने अडकुन होता. नंतर हे प्रकार बंद झाले.
बायंगी काय आहे? प्लीज डिटेल
बायंगी काय आहे?
प्लीज डिटेल लिही की नंदिनी.
तेथुन जात असताना दुपारी १२
तेथुन जात असताना दुपारी १२ च्या आसपास धरत असे. >> क्काय ?
भजीची पुडी त्या झाडाखाली द्या मग मि सोडेन ती व्यक्ती असे म्हणत.>> कोणती व्यक्ती. ?
भजीची पुडी झाडाखाली ठएवली असता ती व्यक्ती शुद्घीवर येत असे. >> परत...कोणती व्यक्ती. ?
हे भजी खाणारे भुत आहे तर काहीतरी चवदार लिव्हा की.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
Pages