Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<ग्रूपमधल्या एकाने जरी
<<ग्रूपमधल्या एकाने जरी त्यावर अविश्वास दाखवत भाग घेतला असेल तर वाटी फिरत नाही रिये माझ्या किश्श्यात भयानक कै नैये.<< अगदी अगदी. आमच्या रुममेटने असच काहीसं बोलुन दाखवलं. आणि म्हणे वाटी तुमच्या बोटांमुळे फिरतेय.
मी नुकतीच ४थीची स्कॉलरशीप परिक्षा दिली होती तेव्हा आजोळी मामाने केलं होतं. तेव्हा इतकं कळलं नाही. पण आमच्या आजोबांच्या आत्म्याला बोलवलं होतं आणि मामाने आधी त्यांचे महत्वाचे प्रश्न विचारुन शेवटी 'त्या'ला माझ्या स्कॉलरशीप रिझल्ट्बद्द्ल विचारलं तेव्हा ग्लास yes वर गेला(आत्म्यांना इंग्रजी कळत असावं
). मग शाळेत कितवा नंबर येइन विचारलं तर ७ नंबरकडे ग्लास गेला. अर्थात रिझल्ट असाच लागला होता! ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
योगायोगाने मी ७वीत असतांना आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाकडे गेलो तेव्हाही मामाने केलं. आणि त्यावेळेस मी बर्यापैकी मोठी असल्याने खुपसं लक्षात राहिलं.
पण ते दिवे घालवुन फक्त मेणबत्ती लावुन जो माहौल क्रियेट होतो ना तो खरच थरकाप उडवतो. विशेष करुन आम्हां सर्वांना ग्लासवर बोटं ठेवायला सांगितली तेव्हा. एकतर सर्वांचे चेहरे तेव्हा भयानक सिरियस असतात. आणि जेव्हा वेगळाच आत्मा येतो...आमच्या आजोबांऐवजी दुसराच आत्मा आला. मग मामाने त्यांना त्यांच्या गाडीचा नंबर विचारला, नातवंडांबद्दल विचारुन, सारखं सारखं 'त्या'चं नाव विचारुन खात्री केली आणि तो दुसरा असल्याचं कळताच, ओरडुन 'कृपया तुम्ही परत जा, तुम्हाला .....ची शप्पथ वै. असं वारंवार सांगितल्यावर परत गेला. 'तो' जात नाही तोपर्यंत जीवात जीव नव्हता मामाच्या!
खरं तर आता हा सगळा पोरखेळ वाटतो. ग्लासातील मेणबत्ती विझल्यानंतर त्यात राहिलेला कार्बन डाय ऑक्साईडमुळे ग्लास फिरतो असं वाटतं. पण 'ते' करतांना जाम टरकते.
पण उत्तर खरी आली का रे?
पण उत्तर खरी आली का रे?
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का ???? एवढे किस्से वाचुन पन मला खरं वाटत नाहीये...
मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही बहुधा...
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का ???? << अजिब्बात नाही. पोरखेळ असतो.
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का
ए खरंच प्लँचेट खरं खरं असत का ????
नसतो खरा, असे कोणीही सातवी आठवीच्या वयात आपल्या घरच्या अंगणात आत्मे वगैरे बोलवायला लागले तर आयुष्यभर तप साधना केलेल्या आणि जंगलात जाऊन मंत्र-तंत्राच्या साहाय्याने भूत बोलावणार्या मांत्रिकाची काय इज्जत राहीली असती??
तसेच असे येणारा भूत एवढ्या सहजपणे उत्तरे देऊ लागला तर कित्येक, नव्हे सर्वच मर्डर केस असेच सॉल्व्ह केले नसते का? मग सोनीवर आहट आणि सीआयडी या वेगळ्या सिरीअल नसून एकच असत्या..
असो, प्लांचेट हे खरे नाही असे माझे मानने असले तरी आत्मा आणि भूत या संकल्पनेवर माझा ठाम विश्वास आहे.
माझा ही प्लँचेट वर विश्वास
माझा ही प्लँचेट वर विश्वास नाही. पण माझ्या आत्याच्या सोसायटीत एका बर्यापैकी मोठ्या (नोकरीला आलेल्या) मुलाच्या घरी आम्ही हा प्रयोग केला होता. आश्चर्य म्हणजे त्या वेळेला जॉईनिंगची तारिख काय असेल? किंवा अपॉईंटमेंट लेटर केव्हा मिळेल? तेव्हा जी तारिख मिळाली तेव्हाच त्या मुलाची नोकरी पक्की झाली होती. हा योगायोग असू शकतो अर्थात.
मी नुकतीच ४थीची स्कॉलरशीप
मी नुकतीच ४थीची स्कॉलरशीप परिक्षा दिली होती तेव्हा केलं होतं.>>>>>>>>>![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
सॉरी पण ह्या वरच्या प्लँचेटच्या स्टोर्या कैच्याकै वाटताहेत.
Smite, jenvha 4thi
Smite,
jenvha 4thi scholarship chi pariksha dileli tenvha tichya mamane kelel g !
tyat kay doubtful ahe?
ओहोहो...आता आली माझी चुक
ओहोहो...आता आली माझी चुक लक्षात. लगेच दुरुस्त करते.
खरं तर यापुर्वीच्या प्रतिसादात मी लिहिलेलं होतं की " पण माझ्या मामाने आम्ही लहान असतांना आजोळी केलं होतं, ते मात्र चांगलच लक्षात आहे."
हे बघा इथे:
मी_आर्या | 19 June, 2014 - 11:23
आम्ही पण २०वर्षांपुर्वी हॉस्टेलला असतांना करुन पाहिलं प्लँचेट! पण मैत्रीणीच्या आगाउपणामुळे फसलं होतं.
पण माझ्या मामाने आम्ही लहान असतांना आजोळी केलं होतं, ते मात्र चांगलच लक्षात आहे. लिहिते थोड्याच वेळात.
आणि हाच धागा पकडुन आमचं म्हणजे मी नि रियाचं संभाषण चालु होतं त्यामुळे मी लिहायला विसरले.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
लोकहो... सॉरी!! गै.स. नसावा. मी ४थीत असतांना प्लँचेट मी केलं नाही तर माझ्या मामाने केलं होतं हो. मला कुठे तेवढी अक्कल त्यावेळेस.
(No subject)
बायंगी : बापरे !! माहिती
बायंगी : बापरे !! माहिती वाचून च भिती वाटतेय.
प्लँचेट ची क्रुती द्या.मी
प्लँचेट ची क्रुती द्या.मी करुन पाहणरे.
आपला काही गोष्टींवर मूळात
आपला काही गोष्टींवर मूळात विश्वास नसला तरी डोळ्यासमोर कोणाच्या बाबतीत घटना घडताना बघून अविश्वास ही करता येत नाही. घराचा प्लॉट सिंहमुखी नसावा असं म्हणतात. आमच्या शेजारचा बंगला सिंहमुखी प्लॉट वर होता. तिथे जी मंडळी रहायची त्यांचं उत्तरोत्तर आयुष्यात वाईट होत गेलं. खूप श्रीमंत आणि मोठं कुटुंब होतं. बायका नॉर्मली बरेच दागिने वगैरे घालून असायच्या. पुढे पुढे श्रीमंती ओसरली, कुटंब फुटलं, कुणाचा अपघाती मृत्यू.. मग बर्याच वर्षांनी ते लोक बंगला विकून निघून गेले वेगवेगळी कडे.
ज्या बिल्डर नी तो प्लॉट घेतला त्यानी बंगला पाडून तिथेच बिल्डिंग बांधली. त्यातले काही फ्लॅट्स अजूनही (१० -१२ ) वर्षांनंतरही विकले गेले नाहितेय.
अर्थात उरलेल्या फ्लॅट्स मधे रहाणार्यांना काहीच त्रास झाला नाहियी. सिंहमुखी प्लॉट चा त्रास मूळ मालकालाच होतो म्हणे.
सिंहमुखी म्हण्जे नक्की कसा?
सिंहमुखी म्हण्जे नक्की कसा?
सिंहमुखी प्लॉटः प्रवेशाला
सिंहमुखी प्लॉटः प्रवेशाला रूंद आण आत निमुळता होत गेलेला.
याच्या विरूद्ध गोमुखी प्लॉट: प्रवेशाला अरूंद आणि नंतर मोठा होत गेलेला.
सिंहमुखी म्हणजे पुढे मोठा आणि
सिंहमुखी म्हणजे पुढे मोठा आणि मागे छोटा होत गेलेला(सिंहाचं डोकं/आयाळ मोठं आणि मागे शरीर बारीक असतं त्याप्रमाणे) असतो. आणि गोमुखी म्हणजे पुढे छोटा आणि मागे मोठा होत गेलेला. तसच 'कोस' म्हणजे तिरपा कट असलेला प्लॉट पण घेत नाही म्हणे.
झकासा, बायंगी कोकणातच असते
झकासा, बायंगी कोकणातच असते असे नाही, कोल्हापूरला त्याला "वडीचं भूत" म्हणतात. प्रभाव तसाच असतो.
त्यांच्या घरी आणि शेजारच्या घरी जर एकाच वेळी एखादा पदार्थ शिजत असला तर शेजार्यांच्या घरातला कमी होऊन त्यांच्या घरातला वाढतो.. असे म्हणतात.
तसच 'कोस' म्हणजे तिरपा कट
तसच 'कोस' म्हणजे तिरपा कट असलेला प्लॉट पण घेत नाही म्हणे.>>> इतक्यातच आमच्या घराजवळ्चा एक प्लॉट २२०० स्क्वे. फू. ९७ लक्ष रू. ना विकला गेला. तो ही असाच आहे कोच वाला... ! कोचाचा भाग रस्त्याकडे आहे.
हो , मग तेवढा भाग सोडुन
हो , मग तेवढा भाग सोडुन उरलेल्या चौकोनी प्लॉटवर घर बांधतात. तिथे काहीही बांधत नाही. आमच्या ऑफीसचा आहे तसाच रस्त्यात घुसलेला त्रिकोणी भाग.
कासा, बायंगी कोकणातच असते असे
कासा, बायंगी कोकणातच असते असे नाही, कोल्हापूरला त्याला "वडीचं भूत" म्हणतात. प्रभाव तसाच असतो.<<< नाही, वडीचं प्रकरण दुसर्याच्या घरातले (ज्यावर प्रभाव केलेला अस्तो) त्याच्या घरातले खेचून आपल्याकडे आणते. बायंगी दुसर्यचं नुकसान करत नाही ( ये उसूलोंवाला भूत है)
वडीचं म्हणजे लाडूबर्फ्यामधील
वडीचं म्हणजे लाडूबर्फ्यामधील वड्या नव्हेत... ओढणारं म्हणून ते (कोल्हापुरी भाषेत) वडीचं.
लई भारी माहिती आमच्या गावात
लई भारी माहिती![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आमच्या गावात एका वाड्यात भरलेलं धान्य नाहिसं व्हावयाचं म्हणे.
ओह्ह ओढीचं!
ओह्ह ओढीचं!
मग बायंगी आणतं कुठून ? हे
मग बायंगी आणतं कुठून ?
हे वडीचं असतं त्याची मुदत संपल्यावर जर ते परत केलं नाही तर " आता मी काय खाऊ ?" असं किंचाळतं ( म्हणे )
माझी आजी देवभक्त होती.. तिच्यामूळे आमच्या घरावर कधी याचा प्रभाव पडला नाही. ( तिच्या मते )
पण नवल म्हणजे तिची सासू ( आईची आजी ) विज्ञाननिष्ठ होती. ती सुईण होती. तिचा या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. अवघडातले अवघड बाळंतपण करण्यात ती कुशल होती. पण एखादी केस तिच्या आवाक्याबाहेरची असेल तर ती सरळ पेशंटला डॉक्टरकडे न्यायला सांगायची. अंगारे धुपारे यावर अजिबात विश्वास नव्हता तिचा.
वडीच भुत म्हणल्यावर मला
वडीच भुत म्हणल्यावर मला श्रावणात करतात त्या पिवळसर बेसन वड्या आठवल्या की राव.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
इन्टेरेस्टिन्ग माहिती मिळत आहे.
बा द वे, जयश्री गडकर अभिनीत
बा द वे, जयश्री गडकर अभिनीत एक चित्रपट आहे.
त्यात करणी प्रकरण दाखवलय.
व्हिलन की कोणी एक खवट म्हातारा डोक्यावर फेटा बांधत असतो तर त्याचा अजगर होतो.
जयश्री गडकर / हिरॉइन च्या चेहर्यावर सर्वत्र गोन्दल्यासारखे डाग येतात वै वै.
बायंगी आणि चेडा हे दोन्ही
बायंगी आणि चेडा हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत. बायंगी मुख्यत्वेकरून आर्थिक उन्नतीसाठी आणले जाते तर चेडा हा अन्य कामे जसे एखाद्याला नषट करणे आदी कामासाठी वापरला जातो. हा प्रकार अधिक विध्वंसक आहे.
मग बायंगी आणतं कुठून ?<<< ते
मग बायंगी आणतं कुठून ?<<< ते मला कसे ठाऊक असणार?? बायंगीला विचारा.
छंदी, चेडा म्हणजे जारण करतात ते का?
दादर मधे एके ठिकाणी ( मी
दादर मधे एके ठिकाणी ( मी एरिया सांगत नाही कारण खरं खोटं मला माहीत नाही ) तिथे फार पुर्वी म्हणजे १९५० च्या वेळेस आमच्या एका नातेवाईकांनी मस्स्त घर घेतल होतं ( आधीच बांधलेले होते ). अगदी ऐसपैस... तिथे रहायला जाण्याआधी नीट पुजा . वास्तुशांत करुन ते रहायला गेले तिथे.
काही दिवसांनी तिथे काही वेगळे प्रकार सुरु झाले...जस की रात्री उरलेलं जेवण आपोआप संपणे, कपडे कातरले जाणे, अचानक चुल पेटायला लागणे..
ते लोक घाबरुन गेले..भुताटकी चा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आलं...तेव्हा त्यांनी कोणाला तरी या संदर्भात विचारलं तेव्हा ते बाबा की कोण होते त्यांनी म्हटलं की घराच्या पायात काहीतरी आहे...आता पुर्ण घर कस खोदणार घराच्या पायात काय आहे ते पहायला?
त्यांनी ते घर विकुन टाकलं...आणि समोरच्याच एका वाडे वजा चाळीत राहायला गेले..काही दिवसांनी अजुन कुणीतरी ते घर घेतले..त्यांना ही सेम त्रास...त्यांनी मात्र पाया उचकटुन पाहिला..तेव्हा त्यात एक मानवी सांगाडा सापड्ला..त्याचं क्रियाकर्म वगैरे केले ... मग त्यांनी ती जागा विकली....
नंतर ज्याने तिथे घर बांधलं त्याला काहीच त्रास झाला नाही.....
ही गोष्ट मी आजोबांकडुन ऐकली आहे....खर खोटं माहीत नाही...पण ऐकायला मज्जा आलेली...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही गोष्ट मी आजोबांकडुन ऐकली
ही गोष्ट मी आजोबांकडुन ऐकली आहे....खर खोटं माहीत नाही...पण ऐकायला मज्जा आलेली... >>>> अनिश्का, दिवसा ढवळया वाचताना पण भीती वाटली , तुला मज्जा आली, एकदम धीराची आहेस गं.. :स्मितः
Pages