दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...
… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…
लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel).
जमिनीलगतचा कोवळा पाला खुणावत होता, म्हणून शेकरू खोडावरून झपझप उतरत निघाले.
जमिनीवर अजिबात न उतरता शीर्षासन करत स्वारी कोवळा कोंब मोठ्ठ्या रसिकतेनं चाखत होती.
जरा कुठेतरी खट्याळ वानराची उडी चुकल्याने काटकी तुटण्याचं निमित्त ते काय झालं, तर हे लाजरू शेकरू लगबगीनं उंच झाडाच्या शेंड्याकडे सुसाटलं.
नादिष्टपणे परत एकदा शीर्षासन करून कोवळा पाला चघळणे सुरू…
खरंतर, "असुरक्षित प्रजाती" म्हणून घोषित असलेले शेकरू, म्हणजे सह्याद्रीच्या जैववैविध्याचं प्रतिकंच!
शेकरू हा 'खार' प्राणिगटात येतो. गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.
भीमाशंकर - महाबळेश्वर आणि सह्याद्री पश्चिम घाटात शेकरू आढळतात.
शेकरूच्या निवांत दर्शनाने मन एकदम एकदम प्रसन्न झालं. जणू आमचा सह्याद्रीचं पावला
पहा दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=Uw7ZxFkukek
-पूर्वप्रकशित: http://www.discoversahyadri.in/2014/05/ShyShekaru-IndianGiantsquirrel.html
- © Discoverसह्याद्री, २०१४
मस्त फोटो.. पहिल्यांदाच
मस्त फोटो.. पहिल्यांदाच बघितला मी शेकरु.. बरेच फोटो काढु दिलेत त्याने लाजरु असुनही
भन्नाट आहेत फोटोज. मजा आली.
भन्नाट आहेत फोटोज. मजा आली.
शेकरू म्हणजेच उडती खार असं
शेकरू म्हणजेच उडती खार असं पुर्वी ऐकलेलं. ते खर आहे का?
ही खार उडते का?
फोटोज मस्त!!!!!!!!!!!!!
मी पहिल्यांदा केरळमध्ये पाहिलेली ही
शेकरु ची मस्त चित्रकथा..
शेकरु ची मस्त चित्रकथा..
अरे सही ... नशीबवान आहात
अरे सही ... नशीबवान आहात तुम्ही ..
फारच छान फोटो. रंग काय सुरेख
फारच छान फोटो. रंग काय सुरेख क्लीयर आले आहेत
मस्त फोटो. कसला गोड दिसतोय
मस्त फोटो. कसला गोड दिसतोय
मी पण पहिल्यांदाच बघीतला शेकरू.
अप्रतिम फोटो!
अप्रतिम फोटो!
फार सुरेख फोटो!
फार सुरेख फोटो!
क्लास फोटो..
क्लास फोटो..
मस्त फोटोज !
मस्त फोटोज !
काय मस्त फोटो मिळालेत.
काय मस्त फोटो मिळालेत. महाराष्ट्र सरकारच्या योग्य त्या विभागाकडे अवश्य पाठवा.
जब्बरदस्त फोटोकथा!!!
जब्बरदस्त फोटोकथा!!!
काय मस्त फोटो मिळालेत.
काय मस्त फोटो मिळालेत. महाराष्ट्र सरकारच्या योग्य त्या विभागाकडे अवश्य पाठवा>>>
त्यांच्या कडे पण फोटो नसतील
हो संदीप त्यासाठीच. इतके
हो संदीप त्यासाठीच. इतके सुंदर फोटो तर मी पर्यटन खात्याच्या जाहीरातीतही बघितले नाहीत.
क्या बात है!!! मस्त फोटो
क्या बात है!!! मस्त फोटो स्टोरी
युट्युबवरच्या व्हिडियोचीही लिंक दे ना इथे.
जबरदस्त फोटो. मस्तच. व्हिडीओ
जबरदस्त फोटो. मस्तच. व्हिडीओ पण सुरेख.
नक्की कुठे गेला होतात? भिमाशंकरला का? तिथे बर्याच वेळा दिसतात शेकरु.
छान फोटो मिळाले आहेत .आता
छान फोटो मिळाले आहेत .आता भांडत असतात भिमाशंकरच्या पायऱ्यांजवळच्या उंबरांवर .कच्ची उंबरे खातात .सात जूनला पाऊस लागल्यावर दूर रानात जातात .पावसाळ्यात दिसत नाहीत .अंजनीच्या झाडांवरची(माथेरानला आहेत तशी ) फळे येतात तिकडे जातात .
हे एकदम सह्ही आहे. काय
हे एकदम सह्ही आहे. काय नशिबवान आहात असे फोटो मिळाले म्हणजे.
खारीपेक्षाही ससासदृश दिसतंय.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सुपर्ब फोटो
सुपर्ब फोटो
सुंदर फोटो! गोजिरवाणा प्राणी
सुंदर फोटो! गोजिरवाणा प्राणी आहे. परफेक्ट पोजेस पकडल्या आहेत!
शेकरू फोटोतसुध्दा कधी बघितलं नव्हतं.
साईप्रकाश, भाग्यवान
साईप्रकाश,
भाग्यवान आहात!
अतिशय सुरेख शेखराचे निवांत प्रकाशचित्रण करण्याची संधी तुम्हाला मिळाली आणि तुम्ही तिचे चीज केलेत.
वन्य, शाखारोही प्राण्यांच्या चपळ हालचालींहूनही सत्वर हालचाली करून जी दृश्ये टिपावी लागतात, त्या कलेतील तुमचे उपजत कौशल्य आणि चपळताही ह्या प्रकाशचित्रांतून प्रच्छन्नपणे व्यक्त होत आहे. शेखराच्या स्वरूपातील ईश्वरी सृजन आणि तुमचे प्रकाशचित्रणातील हे अनोखे सृजन पाहून मन प्रसन्न झाले.
असेच निसर्ग पाहत राहा. असेच त्यास चौकटीत बसवा! स्वतः आनंद मिळवा, दुसर्यांसही असाच वाटून द्या!!
चनस rmd रिया. निशिगंध84 रोहित
चनस
rmd
रिया.
निशिगंध84
रोहित ..एक मावळा
मेधा
मी नताशा
sariva
स्वाती२
हिम्सकूल
श्री
दिनेश.
अत्रुप्त आत्मा
संदीप पांगारे
जिप्सी
कांदापोहे
Srd
मामी
कंसराज
अश्विनी के
मृण्मयी
नरेंद्र गोळे
दोस्तहो,
खरंतर, शेकरूनं आपणहून इतका भाव देणं, हा आश्चर्याचा धक्का होता.
पटापट जुजबी फोटोज काढलेत. तुम्हाला ही शेकरूची छोटीशी गोष्ट आवडली, हे वाचून भारी वाटलं.
खूप खूप धन्यवाद
प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर देत नाहीये, म्हणून प्लीज प्लीज रागवू नका.
व्वा! मस्त शेकरू, फ़ोटो, आणि
व्वा! मस्त शेकरू, फ़ोटो, आणि वर्णनही . धन्यवाद!
मी प्रथमच पाहतेय. तोही फ़ोटोत.
गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.>>>>>>>>सुंदरच दिसतोय हा शेकरू.
मस्त फोटोज. शेकरू पाहणे
मस्त फोटोज. शेकरू पाहणे म्हणजे पर्वणीच असते. मी तिरुपतीला तिरूमलाच्या जंगलात पाहिला होता अत्यंत चपळाईने झाडावर हालचाल करतात.
खूपच मस्त फोटो... जणू आमचा
खूपच मस्त फोटो...
जणू आमचा सह्याद्रीचं पावला>> अगदी अगदी
आपण निसर्गाशी एकतान झाल्याचे प्रमाण म्हणजे आपल्याला मिळालेले हे फोटो असे मी मानतो.
पुढील डिस्कवरी साठी अनेकानेक शुभेच्छा
मस्त प्रकाशचित्रे.
मस्त प्रकाशचित्रे.
अप्रतिम! खरंच शेकरू कधी पहिलं
अप्रतिम! खरंच शेकरू कधी पहिलं नव्हत!
काय गोड आहे शेकरू. आणि
काय गोड आहे शेकरू.
आणि तुम्ही मस्त फोटो काढलेत.
Pages