दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...
… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…
लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel).
जमिनीलगतचा कोवळा पाला खुणावत होता, म्हणून शेकरू खोडावरून झपझप उतरत निघाले.
जमिनीवर अजिबात न उतरता शीर्षासन करत स्वारी कोवळा कोंब मोठ्ठ्या रसिकतेनं चाखत होती.
जरा कुठेतरी खट्याळ वानराची उडी चुकल्याने काटकी तुटण्याचं निमित्त ते काय झालं, तर हे लाजरू शेकरू लगबगीनं उंच झाडाच्या शेंड्याकडे सुसाटलं.
नादिष्टपणे परत एकदा शीर्षासन करून कोवळा पाला चघळणे सुरू…
खरंतर, "असुरक्षित प्रजाती" म्हणून घोषित असलेले शेकरू, म्हणजे सह्याद्रीच्या जैववैविध्याचं प्रतिकंच!
शेकरू हा 'खार' प्राणिगटात येतो. गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांबलचक शेपूट असते.
भीमाशंकर - महाबळेश्वर आणि सह्याद्री पश्चिम घाटात शेकरू आढळतात.
शेकरूच्या निवांत दर्शनाने मन एकदम एकदम प्रसन्न झालं. जणू आमचा सह्याद्रीचं पावला
पहा दृकश्राव्य:: https://www.youtube.com/watch?v=Uw7ZxFkukek
-पूर्वप्रकशित: http://www.discoversahyadri.in/2014/05/ShyShekaru-IndianGiantsquirrel.html
- © Discoverसह्याद्री, २०१४
मस्त....सूंदर. कूठे दिसलं
मस्त....सूंदर.
कूठे दिसलं शे़करु ?
आम्ही आहूपे - भिमाशंकर केला होता, तेव्हा असाह खेळ बघायला मिळाला होता....तेव्हा कॅमेरा नव्हता बरोबार त्याची रुखरुख आजूनही आहे
तुझी वाईल्डलाईफ फोटोग्राफी
तुझी वाईल्डलाईफ फोटोग्राफी सुद्धा इतकी अप्रतिम आहे हे आजच समजलं… काय सुरेख रंग आले आहेत… कमाल !!!
सुंदर
सुंदर
अरे काय सही फोटो आहेत !!!
अरे काय सही फोटो आहेत !!!
अरे वा मस्त फोटो. मी मागच्या
अरे वा मस्त फोटो.
मी मागच्या वर्षी महाबळेश्वरला शेकरू पाहीला होता. अगदी जवळून. दोन दिवस पहात होते. पण तो इतका चपळ असतो की फोटो घेणे महाकठीण काम असते.
शोभा१: नरेश माने: विजय
शोभा१:
नरेश माने:
विजय आंग्रे:
झकासराव:
रायगड:
वेल:
जाई.:
छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून... खूप धन्यवाद!
हर्पेन:
कित्ती सुन्दर प्रतिक्रिया...
वाचून खूप खूप छान वाटलं.. मनःपूर्वक धन्यवाद!
तन्मय शेंडे:
ह्या शेकरूची महाबळेश्वरला गाठभेट झाली धन्यवाद!
ओंकारः
'वाईल्डलाईफ फोटोग्राफी' वगैरे इतकं भारी खरं तर काही जमत नाही रे...
नशिब थोर म्हणायचं.. आणि शेकरूनी खूपंच भाव दिला..
प्रतिक्रिया वाचून मस्त वाटलं..
जागू:
तुम्ही काढलेले फोटोज सुद्धा किती सुन्दर!
लकी आहात
मस्तच रे साई.. जबरी क्लोजप
मस्तच रे साई.. जबरी क्लोजप मिळाले तुला..मुख्यतः भिमाशंकर आणी महाबळेश्वरमध्ये हे साहेब जास्त दिसतात आणी दोघांच्या रंगांमध्ये खूप फरक आहे... मला ह्याला दोन्ही ठीकाणी खूप जवळून जवळून बघता आलेय
अहूपे गाव ते सिद्धगडाच्या वाटेवरच्या जंगलात तर ट्रीट मिळालीय.. ३ शेकरू चक्क झाडांवरून पकडा-पकडी खेळत होते.. आम्ही त्या जंगलाच्या मध्यभागी चक्क २० मिनीटे तो खेळ बघत होतो.. आपल्याला कोणीतरी बघते आहे ह्याची पर्वा न करता रिमझीम पावसात जमीनीपासून ३०-४० फुटांवर त्यांचा दंगा चालू होता. शेवटी दुर कुठेतरी एका हुप्प्याने आवाज दिल्यावर सर्वजण नाहीसे झाले..आमचा सगळा ट्रेक तिथेच वसूल झाला वाईट एवढेच वाटले की पाऊस चालू असल्याने कॅमेरा सॅकमध्ये होता व मोबाईलच्या कॅमेरावर त्याचे फोटो काढावे लागले...
मनोजः तुम्ही म्हणताय ते बरोबर
मनोजः
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. भीमाशंकर आणि महाबळेश्वरमध्ये दिसणार्या शेकरूमध्ये नक्कीच फरक आहे.
तुम्ही लिहिलेला अनुभव कसला भारी आहे. फोटो निघो वा ना निघो, आठवणी कोणी हिरावून घेवू शकत नाही.. खूप मस्त!!!
नशीबवान आहेस बाबा. सिद्धगडावर
नशीबवान आहेस बाबा. सिद्धगडावर १ आक्खा दिवस याच्या मागे घालवला याला कॅमेऱ्यात पकडायला पण मनासारखा मिळाला नाही. सर्वप्रथम याला ढाक भैरीला पहिला होता.
हो, ढाक भैरीला पाहिलेलं शेकरू सिद्धगडावर पाहिलेल्या शेकरूपेक्षा रंगाने उजळ आणि आकाराने मोठ होत.
सुंदर. नशिबवान आहेस. फोटोज्
सुंदर. नशिबवान आहेस. फोटोज् झकासच.
मस्त! कधी कधी ताम्हिणीला
मस्त! कधी कधी ताम्हिणीला दर्शन होते ... पण इतके निवान्त कधी नाही ... तुम्ही खरेच नशीबवान!
सिद्धगड हून भीमाशंकर ला जातना
सिद्धगड हून भीमाशंकर ला जातना आम्हला ' शेकरुच; दर्शन झालं होतं . तो क्षण अविस्मरणीय असा होता. नि आहे. हे सुंदर फोटो पाहून त्या क्षणाची पुन्हा आठवण आली .
रणजीत देसाई ह्यांची ' शेकरू' हि कादंबरी अवश्य वाचावी ..(ज्यांनी कुणी वाचली नसेल :):) ) . फारच सुंदर आहे.
मस्तच आलेत प्रचि...
मस्तच आलेत प्रचि...
प्रथम तुझं मनःपुर्वक
प्रथम तुझं मनःपुर्वक अभिनंदन!
मला वासोट्याच्या जंगलात आणि सावंतवाडीच्या नरेंद्राच्या डोंगरावर या साहेबांनी दर्शन दिलंय.
तुझं नांव सार्थ आहे..
सूनटून्या:: धन्यवाद शेकरू
सूनटून्या::
धन्यवाद
शेकरू लाजरू आणि लहरी.. त्यात खूप उंच झाडं असली, की फोटू चांगलं मिळणं अवघड.
शेकरूच्या दोन-तीन प्रजाती महाराष्ट्रात दिसत असाव्यात...
मार्को पोलो:
गप्पेश::
आबासाहेब.::
मन:पूर्वक खूप खूप धन्यवाद!!!
खरंय, नशिबाने कधीकधी सहजीच दुर्मिळ गोष्टी सापडतात. सुदैवाने कॅमेरा हाती होता.
वेडसह्याद्रीचे::
खूप धन्यवाद
रणजीत देसाई ह्यांची ' शेकरू' हि कादंबरी अवश्य वाचावी ..(ज्यांनी कुणी वाचली नसेल स्मित:) ) . फारच सुंदर आहे. >> वाचायला पाहिजे..
हेम::
खूप धन्यवाद
अग्गदी खरं सांगू,
'Discoverसह्याद्री' करताना, सह्याद्री समजून घ्यायची क्षमता - अभ्यास विलक्षण कमी पडतीये, असं हल्ली प्रकर्षाने जाणवतंय...
Pages