निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खास शाकाहारी लोकांसाठी ( जागू, वर्षू, साधना वगैरेंनी वाचूच नये Happy )

माशामध्ये ट्रायमिथाइलअमाइन किती तयार झालं आहे, यावरून तो मासा किती ताजा आहे, हे शोधता येतं. माशाला शीतपेटीत ठेवलं तर जिवाणूंची वाढ कमी होते. परिणामी ट्रायमिथाइलअमाइन ऑक्साइडचं विघटन होण्याची क्रिया मंदावते; म्हणजेच मासळी कुजण्याची क्रिया मंदावते.

अमाइन्स हे अल्कली गुणधर्माचे आहेत. त्यांचा प्रभाव नाहीसा करायचा असेल तर त्यात आम्ल घालतात. आपल्याकडं फार पूर्वीपासून हेच केलं जातंय. मासे शिजवताना किंवा शिजवण्यापूर्वी लिंबाचा रस, चिंचेचा कोळ किंवा कोकमाचं आगळ घातलं जातं. पाश्चात्त्य देशांत माशांना बरेचदा व्हिनेगर चोळलं जातं. या आम्लपदार्थाशी माशातील अमाइन्सची अभिक्रिया होते, म्हणजेच उदासीनीकरण होतं आणि माशाला तो 'वईस' वास येत नाही.

http://www.loksatta.com/navneet-news/curiosity-fish-smells-461403/

वरचे फोटो छान आहेत सर्व.

दिनेशदा विड्याची आणि पुदीन्याची माहीती शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

शशांकजी आता कसे आहात दोघे.

वर्षू... मला उगाचच भिती वाटत होती, मासे खाणे सोडशील अशी Happy

पूर्वाचलात खास करून असममधे माश्याचा एक प्रकार केला जातो. मेजवानीसाठी अत्यावश्यक असतो तो.
खास मासे आणून एका मडक्यात भरतात. ते मडके परसात मातीत पुरुन ठेवतात. मग आठ दहा दिवसांनी ते
चांगले XXले कि मसाले घालून वाटतात. आग्रह करकरून हा प्रकार जेवणात वाढतात. त्याचे नाव बहुतेक वरुंबा का असेच काहीतरी आहे. ( संदर्भ - "पूर्वाचल" लेखक अविनाश बिनीवाले )

वर्षू, मस्कतमधला मासळीबाजार हे माझे आवडीचे ठिकाण होते. त्यासारखा स्वच्छ बाजार कुठे बघितला नाही मी. अनेक प्रकारचे ताजे मासे तिथे असत. बाजार समुद्रकिनारीच होता. तो बाजार रोज स्वच्छ धुतला जात असे.
अजिबात दुर्गंधी नसे तिथे.

शिवाय मासे विकणार्‍याला तिथेच साफ करून द्यायची परवानगी नव्हती. त्यासाठी वेगळी व्यवस्था होती. मी तर तिथे मासे खरेदी करायला पण जात असे. ( मित्रांसाठी ) ओमानी किंग फिश आणि क्वीन फिश ही तिथली खासियत. खुप मोठा मासा असतो तो आकाराने गोल. त्याची एक तुकडी सहज आपल्या चहा प्यायच्या बशीएवढी.

बाराकुडा पण तिथला खास ( लांबलचक निमुळत्या तोंडाचा सपाट मासा. त्यात फारसे काटे नसतात. ) आपल्या
पॉम्फ्रेटला तिथे झुबेदी म्हणतात. अगदी स्वच्छ समुद्रामूळे मोठे मोठे मासे किनार्‍याजवळही दिसत.
ओमानच्या सुपरमार्केट्समधेही भाज्या आणि मटणच काय, मटण आणि मासेही वेगळे ठेवावे लागतात.

०००००००००००००

बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीच्या जाहीराती सध्या मायबोलीवर दिसताहेत. बरीच नवी पुस्तके प्रसिद्ध केली आहेत असे दिसतेय.

शशांकली यांना काय झालं?
<<<<<<<<शशांकजी आता कसे आहात दोघे.>>>>>>>>>
पुदिना आणि पान आणि मासे(न खाताही) मस्त माहिती.
सरिवा फोटो खूप छान.

पुण्यात सारसबागेत गुलाबी तामण आणि हडपसर रस्त्यावर जॅकरांदा (नीलमोहर) मस्त फुललाय. हडपसरलाच एके ठिकाणी गुलमोहर, सोनबहावा आणि नीलमोहराचा बहर दिसला. एकाच ठिकाणी लाल, पिवळा आणि निळ्या रंगाचा देखावा अप्रतिम दिसत होता. Happy

शशांक, शांकली काही दिवस आले नाहीत इथे तर त्यांची आपुलकीने विचारपूस झाली. मी तर अगदी भारावून गेले आहे यामुळे. नि ग च्या यशाच हेच इंगित आहे .
आता हळूहळू बरे होताय ना दोघेही ?
दिनेशदा माशांची महिती छान. पण वाचताना काय वाटलं सांगू नाही शकत.
जिप्सी, तिरंगी संगम अपतिम दिसला असेल ना?

जिप्सी त्या तिरंगी संगमाचा फोटू नाही काढला, काढला असेल तर टाका इथे.

हेमाताई छान नाव दिलंत, 'तिरंगी संगम'.

शशांक, शांकली काही दिवस आले नाहीत इथे तर त्यांची आपुलकीने विचारपूस झाली. मी तर अगदी भारावून गेले आहे यामुळे. नि ग च्या यशाच हेच इंगित आहे .
आता हळूहळू बरे होताय ना दोघेही ? >>>>> हो हो, आता खूपच बरे आहोत दोघेही .... खरोखरच आम्ही दोघेही या आपुलकीच्या वि पू ने भारावून गेलो आहोत - नि ग मुळे आपणा सर्वांमधे एक अतूट नाते निर्माण झाले आहे खरे ...
कुठल्याही ऋतूत हे नाते बहरलेलेच असते हेही एक विशेषच ... Happy

जिप्सी, तिरंगी संगम अपतिम दिसला असेल ना?>>>>>अगदी अगदी Happy

जिप्सी त्या तिरंगी संगमाचा फोटू नाही काढला, काढला असेल तर टाका इथे.>>> नाही ना. कॅमेरा नव्हता नेला. Happy

उद्या राणीबागेत अजुन कोण कोण येणार आहे. Happy आज आम्ही शनिवर्कर्स Sad

पुण्यात सारसबागेत गुलाबी तामण आणि हडपसर रस्त्यावर जॅकरांदा (नीलमोहर) मस्त फुललाय. >>>>> वसंत ऋतूमुळे पुण्यात अनेक ठिकाणी अनेक वृक्ष फुलून आलेत अगदी ... कित्येक रस्त्यांवर रंगीबेरंगी फुलांचे नुसते सडे पडलेत .... माझ्या ऑफिसच्या खिडकीबाहेरच दिसणार्‍या विलायती चिंचेला अनेक चिंचा लटकल्यामुळे खूप सारे पक्षी ते खायला येताहेत ... वडाच्या झाडावरही वडांगळे खाण्याकरता पक्ष्यांची नुसती झुंबड उडालेली असते ... Happy

वसंत ऋतूमुळे पुण्यात अनेक ठिकाणी अनेक वृक्ष फुलून आलेत अगदी ... कित्येक रस्त्यांवर रंगीबेरंगी फुलांचे नुसते सडे पडलेत .... >>>>अगदी अगदी. Happy

सुमारे १५ वर्षांपूर्वी आम्ही परसबागेत सीडलेस लिंबाचे एक रोप लावले.रोप मिळाले होते रु.१५ ला फक्त.गेली किमान १० वर्षे तरी वर्षाला निदान १००० लिंबे तरी देते आहे हे झाड!बिया नसल्याने कशातही त्याचा वापर करणे सोयीचे होते.लिंबे अगदी मोठी व रसाळ आहेत.माझे आवडते झाड आहे हे आणि त्याबद्दल मला अतिशय ममत्व वाटते.

आमच्या घरची सीडलेस लिंबे

1.

2.

स्लर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्प.................... सरिवा.........किती रसरशीत लिंबं........

प्रतिसाद टाकत असण्या मागचे कारण काय असेल बरं?>>>>काहीच कारण नाही. Proud

सरीवा, मस्त फोटो.
सीडलेस लिंबाचे एक रोप लावले.रोप मिळाले होते रु.१५ ला फक्त.गेली किमान १० वर्षे तरी वर्षाला निदान १००० लिंबे तरी देते आहे हे झाड!>>>>>:-) Happy

जिप्स्या - उद्या काय करनेका जल्दी सांग>>>>>>नितीन, उद्या सकाळी ९:३० वाजता राणीबाग मुख्य प्रवेशद्वाराजवळ भेटायचे.
सध्या जिप्सी, साधना, उजु आणि ईममिनतिन येणार आहे. Happy Happy

वर्षूदी, मनीमोहर येणार आहात का? ?????

हसायला काय झालं रे जिप्स्या.. मै सिरियसली इन्वाईट कर रही हूँ

अर्रे चौथ्या भागात अजून १३ फोटो अ‍ॅड करून आले आत्ता.. आय थिंक इतके खूप झाले चिउ ची कल्पना यायला

मानुषी च्या भाषेत.. चिउकाउ ची गोष्ट संपली एकदाची.. Lol

Pages