Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29
झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुजा | 22 April, 2014 -
सुजा | 22 April, 2014 - 18:07
<<मेघना या नावाच्या उलट्या बाजूने(मेघना नाव उलट दिशेने लिहून) तो सही करतो त्याच्या चित्रावर>>
याचा अर्थ माझा पण तो एपिसोड हुकला वाटत
<<<
असतं एकेकाचं नशीब बलवत्तर!
असतं एकेकाचं नशीब बलवत्तर!
असतं एकेकाचं नशीब बलवत्तर! >>>
बेफी धम्माल करताय... चितळू
बेफी धम्माल करताय... चितळू वाचून मीपण गडाबडा लोळले...
सुमो ने झापलेलं काय मेघनाला, अॅड मध्ये दाखवत होते.... नंतर सुधारणा झाली का?
मेघना मस्त सगळ्यांना वापरून घेते>> तर काय! काय निर्लज्ज बाई आहे!! घोड चूका करून वर एरंडेल प्यायलेलं तोंड करून बसते, काहीच कसं वाटत नाही? वर आईलाच झापत असते...
अग्गं बाई नशीबाने एवढी चांगली साबा मिळालेय, घे की कोडकौतुकं करून!! त्या फाटक्या चड्डी वाल्याकडे काय आहे?
नवीन पाकृ कुठली दाखवताहेत सध्या? की मुरत ठेवलेल्या पन्ह्यावरच गाडी अडकलेय?
आदित्य आणि मेघना काही
आदित्य आणि मेघना काही दिवसांनी 'चाळिशीनंतरचे कामजीवन' हा कार्यक्रम बघायला जातील बहुतेक!
तेव्हाही मेघना त्याच्या कानात कुजबुजेलः
"पुढच्यावेळी आदुलाही घेऊन यायचं का?"
उलटी मेघना... उसवून टाके
उलटी मेघना...
उसवून टाके रेशीमगाठी'....
बेफी.. आवरा..
बेफि
बेफि
बेफी खरंच आवरा
बेफी खरंच आवरा
उसवून टाके रेशीमगाठी'...
उसवून टाके रेशीमगाठी'...
मेघना मस्त सगळ्यांना वापरून घेते>> तर काय! काय निर्लज्ज बाई आहे!! घोड चूका करून वर एरंडेल प्यायलेलं तोंड करून बसते, काहीच कसं वाटत नाही?>>>घोड चूका केल्यात म्हणूनच एरंडेल प्यायलेलं तोंड करून बसते. मस्त मजेत आहे असे दाखविले तर 'काय निर्लज्ज बाई आहे!!' असे लोक म्हणतील. मला तर ती लबाड वाटायला लागली आहे.
बेफी
बेफी
बेफि
बेफि
अरेरे....मेघनाची पार वाटच
अरेरे....मेघनाची पार वाटच लागलीय इथे....पण तीला न हसण्यासाठी पैसे मिळत असतील...तर ती जी जान लगाके ते करणारच ना.....न तो अदु...सिरीयसली डोक्यात जायला लागलाय....उनाड, उंडगा, ऐदी
बेफी.. हा बीबी फक्त
बेफी..
हा बीबी फक्त वाचनमात्र होता माझ्यासाठी पण तुमच्या पोस्टमुळे आवर घालताच आला नाही..
काल लपाछपीचा खेळ चाललेला.
काल लपाछपीचा खेळ चाललेला. मेघना हापिसात, आदे घरी आदु बागेत,
मग मेघना दोन तास वाट पाहुन घरी आदेकडे तरीही आदु बागेतच.
गैरसमजुत मिटली मग दुपारचे जेवण थोडा आराम करुन आदे आणि मेघना फिरायला तरीही आदु बागेतच.
काल फक्त आणि फक्त आदु बागेत यावर एपिसोड संपला तोंडी लावायला सुमो आणि नानांची लुटुपुटुची रुटीन संभाषणे, मेघनाच्या डोळ्यातले साडेतीन अश्रु, आदेचा खरा पण आपल्याला लटका वाटलेला रागिष्ट चेहरा.
मला एक प्रश्न पडतो की नेहमी मेघना आदेच्या हापिसात गेल्यावर आणि तो त्याचा मित्र शेखरच बहुतेक त्याला फोन करुन तिच्याबद्दल सांगतो. हिला फोन करायला काय धाड भरलिये.
अदु फुकट आहे........
अदु फुकट आहे........
बेफि, खरच आवरा गुब्बे, मग
बेफि, खरच आवरा
गुब्बे, मग आदु बागेत आहे न आदे मेघनाला त्याच्याकडे पाठवतो अस काहीस जाहीरातीत दाखवत होते त्याच काय झाल???
आता तीला आ दे च्या प्रेमाचा
आता तीला आ दे च्या प्रेमाचा साक्षातकार वगैरे होईल...मग जाईल परत आ दे च्या पाठी लांडोरीसारखी पिसारा फुलवत.... माझ्या डोक्यात जातेय सगळ.....इथे येउन राग काढु शकते.....
आ दे साठी मी ती शीरेल बघते....
हो सचिन त्याचातला अदे (अजय
हो सचिन त्याचातला अदे (अजय देवगण) जागा झालाय आणि तो त्याच्या बायकोला तिच्या प्रियकरापर्यंत घेऊन आलाय दाखवायला की बये उगा मुसमुसु नकोस सारखी तुझा तो ऐद्या जिवंत आणि सुखरुप आहे. बाजा वाजवतोय सकाळपासुन.
आदे मेघनाला आदुकडे पाठवतो
आदे मेघनाला आदुकडे पाठवतो त्याचं काय झालं? >>>>>> फॉल्स अलार्म :फिदीफिदी:
एखादी लांबपल्ल्याची स्लो ट्रेन महत्वाच्या फास्ट ट्रेन्सच्या ट्रॅफिकसाठी साईड्लाइनवर टाकून देतात तशी कथानकं ठप्प पडल्यासारखी वाटतात आता जवळजवळ सगळ्या मालिका पाहताना. कुणीतरी ५ मिनिटे आधी बोललेल्या वाक्यावरचे प्रत्येक पात्राच्या चेहर्यावरचे भाव दाखवणे हे तर थेट रामानंद सागरांची आठवण करून देणारे आहे.
आदित्य आणि मेघना काही
आदित्य आणि मेघना काही दिवसांनी 'चाळिशीनंतरचे कामजीवन' हा कार्यक्रम बघायला जातील बहुतेक! >>>
८००
८००
देसाई बच्चेकंपनी, देसाई
देसाई बच्चेकंपनी, देसाई वाडीतली पुरुष मंडळी, मेघनाची मावशी मालिकेतुन गायब झाले का?
आदुल - उनाड, उंडगा, ऐदी - असं
आदुल - उनाड, उंडगा, ऐदी - असं का म्हणताय तुम्ही. बिचारा आधीच दु:खी आहे.
बेफी अशक्य आहात ___/\____
बेफी अशक्य आहात ___/\____
अने लांडोरीला कुठे असतो गं पिसारा??
देसाई बच्चेकंपनी, देसाई वाडीतली पुरुष मंडळी, मेघनाची मावशी मालिकेतुन गायब झाले का? >> ते पानवेलीच्या बागेत सावली खात असतील... उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या नै...
आदित्य आणि मेघना काही
आदित्य आणि मेघना काही दिवसांनी 'चाळिशीनंतरचे कामजीवन' हा कार्यक्रम बघायला जातील बहुतेक! >>>>> बेफीजी सॉरी, पण हे जरा अती होतय...
आदित्य आणि मेघना काही
आदित्य आणि मेघना काही दिवसांनी 'चाळिशीनंतरचे कामजीवन' हा कार्यक्रम बघायला जातील बहुतेक! >>>>> बेफीजी सॉरी, पण हे जरा अती होतय...
+1111
मुग्धटली, किती मोदक हवेत ते
मुग्धटली, किती मोदक हवेत ते बोला.
सिरीअल न आवडणे अन् त्याची खिल्ली उडवणे ठीक आहे. पण ते करताना जरा कंट्रोल ठेवावा, ही सगळ्यांनाच विनंती.
बेफी अशक्य आहात ___/\____
बेफी अशक्य आहात ___/\____ हाहा>>+१११११११
बेफि होसुमीयाघ या धाग्यावर तुमची गरज आहे........
क्रुपया परत या........
मुग्धटली, किती मोदक हवेत ते
मुग्धटली, किती मोदक हवेत ते बोला.>>>> मोदक नको पण अहो-जाहो थांबवा..
सिरीअल न आवडणे अन् त्याची खिल्ली उडवणे ठीक आहे. पण ते करताना जरा कंट्रोल ठेवावा, ही सगळ्यांनाच विनंती.>>> धागाकर्तीने हे वाक्य डिस्क्लेमर म्हणुन शीर्षकातच टाकायला हव खरतर
मुग्धटली, किती मोदक हवेत ते
मुग्धटली, किती मोदक हवेत ते बोला.
सिरीअल न आवडणे अन् त्याची खिल्ली उडवणे ठीक आहे. पण ते करताना जरा कंट्रोल ठेवावा, ही सगळ्यांनाच विनंती.+११११११११११११११
प्राची,मुग्धा अगदी योग्य मुद्दा तुम्ही मान्डल्या बद्दल धन्यवाद.
विनोद निर्मिती करताना ती अश्लिलते कडे झुकु न देणे केव्हाही चाग्लेच.
प्राची,मुग्धा अगदी योग्य
प्राची,मुग्धा अगदी योग्य मुद्दा तुम्ही मान्डल्या बद्दल धन्यवाद.
विनोद निर्मिती करताना ती अश्लिलते कडे झुकु न देणे केव्हाही चाग्लेच.<<<
निव्वळ कामजीवन वगैरेसारखे शब्द आले की लेखन अश्लील ठरू नये.
एक साधी गोष्ट कृपया विचारात घ्यावीत.
एक नवीन लग्न झालेले आहे. हे लग्न एखाद्या अपघातासारखे नव्हे तर व्यवस्थित सर्व काही ट्।अरून झालेले आहे. हे लग्न ठरण्याच्या कोणत्याही पातळीला बायको आपल्या भावी नवर्याला सर्वात महत्वाची असलेली बाब सांगू शकत नाही. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री नवर्याला सांगते की तिचे त्याच्यावर नव्हे तर वेगळ्याच एकावर प्रेम आहे. हा धक्का बसल्यानंतर संयम बाळगून नवरा तिच्या विचारांचा आदर ठेवतो व अनेक आठवड्यांच्या कालावधीत तिच्यावर ह्या मूळ कारणास्तव कधीही चिडत नाही. उलटपक्षी तिला तिचा प्रियकर कसा प्राप्त होईल ह्यासाठी कार्यरत राहतो किंवा सहाय्यभूत ठरत राहतो. एवढे करून दोघे घरातल्या सर्वांसमोर सारे काही आलबेल असल्याचे नाटकही अनेक आठवडे चालूच ठेवतात.
एक काल्पनिक कथा म्हणून हे सगळे ठीक आहे. मनाचे औदार्य, संयम, स्त्रीच्या मनातील हळव्या व नाजूक भावनांचा प्रचंड आदर ठेवणे हे सर्वच एक कथा म्हणून रंजक आहे.
पण हे सगळे आज रिलेव्हंट आहे असे तुम्हाला वाटते का? तर्कसुसंगत वाटते का?
बरे, केवळ ते तर्कसुसंगत नाही म्हणून त्याची खूप थट्टा चाललेली आहे असेही समजू नका. हे जोडपे मनाने एकमेकांच्या जवळ आलेले दाखवणे हे मूळ कथानक आहे हे शीर्षकावरून व शीर्षकगीताच्या शेवटी दोघांच्या होणार्या प्रेमळ नजरानजरीवरून सहज समजते. म्हणजे सुखान्त कथानक आहे.
मग जर दोघे जवळ येणारच आहेत, तर ते नेमके कधी येणार? हा उमेदीचा, नवतारुण्याचा काळ घालवून मध्यमवयीन झाल्यावर? आत्ताच अनेकजण मेघनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री थोराड दिसत असल्याचे म्हणत आहे.
ह्या सगळ्याची परिणती माझ्याकडून 'चाळिशीनंतरचे कामजीवन' हा अभिप्राय लिहिला जाण्यात झालेली आहे. कामजीवन हा शब्द उच्चारला की ते अश्लील झाले असे काहीच नाही.
अर्थात, माझा हेतू 'विनोदनिर्मीतीच' होता, पण हा विनोद 'जरा अती' होत आहे असे मला तरी वाटले नाही.
बाकी, एक मत म्हणून माझे मत दिले, ह्याचा अर्थ इतर मतांचा आदर नाही असे नाही.
धन्यवाद व चु भु द्या घ्या
Pages