Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 22:14
भाजणीचे थालीपीठ
थालीपीटाचे साहित्य व कृती : थालिपीठ करतेवेळी थालीपिठाच्या भाजणीत खालील साहित्य कांदा,लसूण,कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,हिंग व पाणी घालून पीठ भिजवावे व त्याचे गोळे करून घ्यावेत व तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर भाकरीप्रमाणे थालिपीठ थापावे व बोटाने मध्यभागी एक व बाजूला तीन-चार भोके पाडावीत व त्यात चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे व गॅसवर ठेवावे काही वेळानंतर थालीपीठ पलटावे व दुसर्याड बाजूने भाजून घ्यावे.
भाजणीचे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन त्यावर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून कैरीचे लोणचे / खाराच्या मिरच्या किंवा गोड दहयासोबत खाण्यास द्यावे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख! मी लसूण घालत
सुरेख!
मी लसूण घालत नाही.थोडीशी साखर घालते.
सुरेख! मी लसूण घालत
सुरेख!
मी लसूण घालत नाही.थोडीशी साखर घालते.<<<
सहमत आहे. मीही लसूण नाही घालत. बायको घालत असली तर कल्पना नाही.
सर, मस्त चित्र आणि तोंपासू व ब्रीफ पाकक्रिया!
भाजणीच्या पिठात घातलेले
भाजणीच्या पिठात घातलेले लसणाच्या पाकळ्यांचे बारीक तुकडे जेंव्हा तेलावर परतले जातात तेंव्हाचा त्यामुळे थालीपीठाला येणारा स्वाद अवर्णनीयं असतो. तो फक्त खाल्यावरच कळेल. याच एकदा माझ्या घरी माझ्या हातचे थालीपीठ खायला.
याच एकदा माझ्या घरी माझ्या
याच एकदा माझ्या घरी माझ्या हातचे थालीपीठ खायला.>>>> अरे वा! नक्कीच.
काय हुबेहुब करता अगदी...
काय हुबेहुब करता अगदी... खालच्या फोटोतली प्लेटपण तुमच्या प्लेट्सारखीच आहे
http://shopforhoney.com/showRecipe.asp?rid=74
>>>याच एकदा माझ्या घरी माझ्या
>>>याच एकदा माझ्या घरी माझ्या हातचे थालीपीठ खायला.<<
कधी यायचं?
प्रमोद ताम्बे, कृपया
प्रमोद ताम्बे,
कृपया पाककृतींबरोबर स्वतः काढलेलेच फोटो द्या. वरचा फोटो दुसर्या ब्लॉगवरून तुम्ही घेतला आहे. तसं करणं हा गुन्हा आहे. तेव्हा कृपया हा फोटो काढून टाकून स्वतः काढलेला फोटो टाकाल का?
काय चाल्लय? आवरा! उद्या वरण
काय चाल्लय?
आवरा!
उद्या वरण भाताची रेसीपी येऊ नये म्हनजे मिळवलं (त्याचीही शक्यता आहेच)
रिया., वरणभात मी टाकू का?
रिया., वरणभात मी टाकू का? एकाच रेसिपीत चालेल की दोन वेगळ्या रेसिपी हव्यात तुला?
सायो, वरणभात या नावात अनेक
सायो, वरणभात या नावात अनेक रेसीपीज आहेत हो
वरणाचे प्रकार, भाताचे प्रकार, त्यासोबत खाण्याच्या पापडाचे प्रकार.
बघ आहे का एवढे बाफ काढायची, नेट वरुन ते ते फोटो शोधायची ताकद ?
शुSSS इथे नाही हं!!
शुSSS इथे नाही हं!!
आमच्याकडे वरण फक्त एकाच
आमच्याकडे वरण फक्त एकाच पद्धतीने करतात. दुसरं काही घालून केलेल्या सगळ्या आमट्या. त्यामुळे माझी रेसिपी फक्त प्लेन वरणाचीच असेल. बाकी तोंडीलावणं म्हणून आत्तापर्यंतच्या माबो रेसिप्यांच्या लिंक देऊन चालेल.
सायो, थालिपिठासारखे धागे
सायो, थालिपिठासारखे धागे वरणावर चर्चा करून कृपया क्लिष्ट करू नका. वरण म्हंटले की पार डाळ, कूकर, इच्छा, वेळ ह्यापासून सगळे साहित्य आले त्यात!
मीदेखील देवकीप्रमाणे लसूण
मीदेखील देवकीप्रमाणे लसूण कधीच घालत नाही. आता घालून बघेन!
नवशिक्यांना, बॅचलर्सना वगैरे करता येण्यासारखी ही सोपी रेसिपी आहे. दरवेळी नवख्या कुक्सना शिकवायला आई, सासूबाई वगैरे आसपास असतीलच असं नाही. परदेशात वगैरे असाल तर रेसिपीज ची मराठी पुस्तकं वगैरेही नसतात. अशावेळी या पारंपारिक रेसिपीज इथे बघून पटकन करता येतील.
वेदिका२१ >>+१
वेदिका२१ >>+१
टीप: पीठ भिजवताना कोमट
टीप: पीठ भिजवताना कोमट पाण्यात भिजवल्यास अजून खुसखुशीत होतात! सोर्स- साबा.
नवशिक्यांना, बॅचलर्सना वगैरे
नवशिक्यांना, बॅचलर्सना वगैरे करता येण्यासारखी ही सोपी रेसिपी आहे. दरवेळी नवख्या कुक्सना शिकवायला आई, सासूबाई वगैरे आसपास असतीलच असं नाही. परदेशात वगैरे असाल तर रेसिपीज ची मराठी पुस्तकं वगैरेही नसतात. अशावेळी या पारंपारिक रेसिपीज इथे बघून पटकन करता येतील.
+ १००
आपण जवळजवळ गृहित धरलेल्या कित्येक गोष्टी कित्येकांना माहित नसतात. मला तांदळाची उकडपेंड मायबोलीवरच प्रथम कळली. ती एकदा करुन बघितली, लेकीला आवडली आणि आता ती स्वतः करुन खाते. इथल्या कित्येकांसाठी उकडपेंड ही अगदीच ही... रेसिपी असेल.
मला तांदळाची उकडपेंड
मला तांदळाची उकडपेंड मायबोलीवरच प्रथम कळली>>>> हो मला पण! मला फक्त उपमाच माहित होता
मला तांदळाची उकडपेंड
मला तांदळाची उकडपेंड मायबोलीवरच प्रथम कळली>>>> अरे वा.. आहे माझ्यासारखे लोक्स पण
>>>> टीप: पीठ भिजवताना कोमट
>>>> टीप: पीठ भिजवताना कोमट पाण्यात भिजवल्यास अजून खुसखुशीत होतात! सोर्स- साबा. <<<<
टीप २: पीठ भिजवताना त्यात थोडे तेल घातल्यास (त्यास मोहन असे म्हणतात) अजुनात अजुन खुसखुशीत कुरकुरीत होतात! सोर्स - आई(कडून माझा कान उपटून)/आज्जी/तमाम कोब्रा माताभगिनी
टीप ३: तव्यावर पीठ थापुन मग तो तवा गरम करायला ठेवण्या ऐवजी, तमाम कोब्रामाताभगिनी एकीकडे तवा आधीच गरम करत ठेवुन, व तवा पुरेसा गरम झाला असताना त्यावर नारळाचे शेन्डीने तेल लावुन (काटकसर बर ही! ), एकीकडे केळीचे/कर्दळीचे पान अथवा कागद वापरुन त्यावर पीठ थापुन घेऊन,,मग हाता चे पन्ज्यावर ते कागदावरील थालिपीठ कागदासहित खालिल बाजुने हे असे उचलुन घेऊन धप्पदिशी तव्यावर पालथे थापतात, कागद काढुन घेतात अन गरम तव्यावर त्यास पाच भोके पाडून मग जास्तीचे तेल वगैरे घालतात. अर्थातच कोब्रामाताभगिनी त्यात लसुणआले वगैरे घालत नाहीत. कारण भाजणीच इतकी खमंग असते की त्यात हे भरीचे लसुण वगैरे घालणे गरजेचे नसते. कान्दा देखिल आवडीप्रमाणे घालतात वा नाहीही घालत.
घाटावर नुस्त्या ज्वारीच्या पीठाची थालिपीठे करतात, त्यात मात्र कान्दा लसुण घालणे योग्य ठरते. घाटावर (अगदी लिम्बी देखिल) तवा खाली उतरवुन घेऊन, त्यावर हाताने थापतात अन पुन्हा तवा चुलीवर चढवतात.
आता भाजणीच्या विविध
आता भाजणीच्या विविध प्रमाणान्च्या रेसिपीज येऊदेत. म्हणजे कोब्रा भाजणी, देब्रा भाजणी, मराठवाडी भाजणी, खानदेशी भाजणी, कारवारी भाजणी, कोळी/आगरी/भन्डारी भाजणी, ९६कुळी भाजणी, तान्दुळाची भाजणी, डाळी वगैरेन्ची भाजणी, धान्याची भाजणी......
जोडीने मेतकुटाचिही रेसिपी येऊद्यात.
पहिल्यान्दा भाजणी अन मेतकुटाच्या वोर्रिजनल कोकणी रेसिप्या द्या बोवा.... या दोन पदार्थान्च्या घाटी नक्कलान्च्या रेसिप्या नन्तर दिल्यात तरी चालतील.
ओ लिम्बुभाव आहोत आमी घाटी.
ओ लिम्बुभाव आहोत आमी घाटी.:राग: मग्?:फिदी:
लिंब्या, इतके सांग्रसंगीत
लिंब्या, इतके सांग्रसंगीत सांगितलेच आहेस सगळे तर भाजणीच्या ओरिजिनल रेसिपीज पण येवूदेत की
थालिपीठ माझे ऑल टाईम
थालिपीठ माझे ऑल टाईम फेव्हरेट. अजुन पर्यंत आई बनवणार व आम्ही खाणार. पण उद्या मतदानाची सुट्टी आहेच उद्दा स्वतः बनवणार. अर्थात मातोश्रींची मदत घेउनच. प्रमोद तांबेजी रेसिपीबद्दल धन्यवाद.
आम्ही कापडाच्या चौकोणी रुमाल
आम्ही कापडाच्या चौकोणी रुमाल ओला करुन त्यावर थापतो
>>>>> आम्ही कापडाच्या चौकोणी
>>>>> आम्ही कापडाच्या चौकोणी रुमाल ओला करुन त्यावर थापतो <<<<
हो हो, मी बघितलय आईला कापडावरही करताना तुम्ही म्हणालात ना की लग्गेच आठवल.
नरेशभाऊ, कराच, जोडीला सायीचे दही असुद्यात.
रश्मी, इतके लालिलाल व्हायला काय झाले? आम्ही नै बोवा लालेलाल होत आम्ही कोके आहोत म्हणुन सान्गताना!
गुब्बे, आईकडून विचारुन घेणारे लिहुन ठेवणारे.
<मला तांदळाची उकडपेंड
<मला तांदळाची उकडपेंड मायबोलीवरच प्रथम कळली.> कुठे आहे ही?
भाजणी आणि मेतकूट कोकणी
भाजणी आणि मेतकूट कोकणी ओरिजिनचे हा जावईशोध कुणाचा म्हणे?
आमच्याकडे थालिपीठ स्वच्छ प्लास्टिकच्या तुकड्यांवर थापताना बघितलं आहे कायम.
मयेकर, तांदुळाची उकड(पेंड) कशी करायची ते तांबेकाकांनीच लिहिलं आहे.
लिंब्या, इतके सांग्रसंगीत
लिंब्या, इतके सांग्रसंगीत सांगितलेच आहेस सगळे तर भाजणीच्या ओरिजिनल रेसिपीज पण येवूदेत की
+१००००
बाकिच्यांच्य भाजण्या येतील तेव्हा येवोत, लिंबु, तुमची कोब्रामाताभगिनीवाली तरी येऊदे आधी. आम्ही तोवर त्याचा आस्वाद घेऊ
>>>>> आमच्याकडे थालिपीठ
>>>>> आमच्याकडे थालिपीठ स्वच्छ प्लास्टिकच्या तुकड्यांवर थापताना बघितलं आहे कायम. <<<<<<
बहुधा या दुधाच्या उघडलेल्या पिशव्या असतात, हो ना?
>>>>> भाजणी आणि मेतकूट कोकणी ओरिजिनचे हा जावईशोध कुणाचा म्हणे? <<<<<
अर्थात माझ्या देशस्थी सासुरवाडीचा
Pages