भाजणीचे थालीपीठ

Submitted by pltambe@yahoo.co.in on 20 April, 2014 - 22:14

भाजणीचे थालीपीठ
 थालीपीठ शेपू-भात-पोळी वापरुन.jpg
थालीपीटाचे साहित्य व कृती : थालिपीठ करतेवेळी थालीपिठाच्या भाजणीत खालील साहित्य कांदा,लसूण,कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,हिंग व पाणी घालून पीठ भिजवावे व त्याचे गोळे करून घ्यावेत व तव्यावर थोडेसे तेल घालून त्यावर भाकरीप्रमाणे थालिपीठ थापावे व बोटाने मध्यभागी एक व बाजूला तीन-चार भोके पाडावीत व त्यात चमच्याने थोडे थोडे तेल सोडावे व गॅसवर ठेवावे काही वेळानंतर थालीपीठ पलटावे व दुसर्याड बाजूने भाजून घ्यावे.
भाजणीचे गरमागरम थालीपीठ एका डिशमध्ये घेऊन त्यावर लोण्याचा गोळा किंवा साजूक तूप घालून कैरीचे लोणचे / खाराच्या मिरच्या किंवा गोड दहयासोबत खाण्यास द्यावे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे थालिपीठ स्वच्छ प्लास्टिकच्या तुकड्यांवर थापताना बघितलं आहे कायम. <<< टाकताना गरम तव्याला प्लॅस्टिक चिकटत नाही Uhoh

मग चुकीचा आहे तुझ्या सासुरवाडीचा शोध. ... Proud हां, आता तांदुळाची उकड कोकणी आणि ज्वारीची उकडपेंड देशावरची, किंवा वरणफळं देशावरची आणि मोदक कोकणातले हे मान्य आहे. पण थालिपीठ सगळीकडे कॉमन आहे.

नाही, आमच्याकडे रतीबाचे दूध असल्याने दुधाच्या पिशव्या प्रकरण नव्हते. बाजारातून खास स्वच्छ जाड प्लास्टिक कधीतरी मासाहेबांनी आणून ठेवलेले असे. थालिपीठ लावायला, चकल्या घालायला, वाळवणं घालायला अशा अनेक कामांसाठी.

आमच्याकडे थालिपीठ स्वच्छ प्लास्टिकच्या तुकड्यांवर थापताना बघितलं आहे कायम. <<< टाकताना गरम तव्याला प्लॅस्टिक चिकटत नाही

कसे चिकटणार?? तुम्ही मंडळी पानच उचलुन तव्यात टाकता, आम्ही प्लॅस्टिकवाल्यांनी ते थापलेले थालिपिठ हाताने उचलुन तव्यात टाकण्याइतकी प्रगती केलीय. Happy

बाजारातून खास स्वच्छ जाड प्लास्टिक कधीतरी मासाहेबांनी आणून ठेवलेले असे>> प्लास्टिक विकत? रिसायकल करता आले असते ना? तव्यावर मस्त थापता येते . रुमाल अन प्लास्टिक लागतच नाही. गॅस आधी ऑन करून ठेवायचा. मग तव्यावर थालिपीट थापायचे आणि तवा गॅसवर ठेवायचा. झाकण ठेवायचे. हे झाकण उचलता आले पाहिजे. नाहीतर हा त भाजतो. मग हाय हीट वर थालिपीट असताना तीनदा वाफेचा चुर चुर असा आ वाज येतो. झाकण काढले कि कळते झालेले एका बाजूने मग पलट्वायचे.

तव्यासकट पलटवायचे का?>> नै हो. आपण कोलांटी उडी मारायची एक. मग उलथन्याने थालिपीट पलट्वायचे.
तवा तसाच आदुबाळासारखा ग्यासवर राहतो. आज सुट्टी का?

< गॅस आधी ऑन करून ठेवायचा. मग तव्यावर थालिपीट थापायचे आणि तवा गॅसवर ठेवायचा. > प्रत्येक थालिपीठाला वेगळा तवा घ्यायचा का? (इटीव्हीवरच्या मेजवानीतही हीच पद्धत दाखवली होती. एकच थालिपीठ करायचे असेल तर ठीक आहे.)

'आज सुट्टी का' हे पलटलेल्या थालिपीठाला विचारायचे की तुम्ही मला विचारताय? मला सुट्टीच असते रोज!

आज सुट्टी का' हे पलटलेल्या थालिपीठाला विचारायचे की तुम्ही मला विचारताय? मला सुट्टीच असते रोज!>
आम्हाला आज व्होटिंग डेची सूट्टी .

मयेकर दोन तवे वापरायचे एक गॅसवर ( आ दे) एक ओट्यावर ( आन)

अमा, मी माझ्या लहानपणाविषयी बोलत होते. सत्तर-ऐंशीच्या दशकात दुधाच्या पिशव्या सोडल्या तर आणखी कशाबरोबर जाड प्लास्टिकच्या पिशव्या यायच्या असं वाटत नाही. त्यामुळे रिसायकल कुठलं प्लास्टिक करणार?

मामी आज आदे आणि आनला काही विसरायला तयार नाही Lol

थालिपिठाचे ओरिजिन कुठले हे माहिती नाही पण आमच्यात कोकणी, देशस्थी, वर्हाडी सगळ्याप्रकारची थालिपिठे होतात.
तांदुळ आणि कडधान्ये (यात काळे उडीद अनिवार्य) भाजणी म्हणजे कोकणी (आईकडुन साभार)
सगळी धान्ये (ज्वारी, बाजरी, गहू, तांदुळ आणि हरभरा) ही देशस्थी (बाबांकडुन साभार)
किलोभर बाजरी, मुठभर तांदुळ, मुठभर नाचणी, मुठभर ज्वारी असेल तर आणि हरभर्‍याची डाळ मुठभर (साबांकडुन साभार)

बाकी काहीही असले तरी माझ्या घरी वरच्या तिन्ही भाजण्या असतात. आणि वेगवेगळी थालिपिठेही होतात. फुलक्या एवढी थालिपिठे, ओल्या रुमालावर्/कागदावर थापुन तव्यात टाकलेले धपाटे इतकाच काय तो फरक.

Happy वरील निरनिराळी मते वाचून खूप हसू आलं! लिंबूटिंबू चा एक देब्रा मुद्दा मी अनुभवलाय-आई नेहमी तव्यावर थालपीठ लावते पण फक्त ज्वारीची होतात तसं नाही.. आणि प्लास्टिक/केळीचे पान ह्यावर लावण्याची पद्धत कोब्रा ट्रेडमार्क म्हणण्यापेक्षा कोकणातला ट्रेडमार्क म्हणूया! माझ्या सासूबाई माहेरच्या कोकणस्थ गुजराथी आहेत त्यामुळे प्लास्टिक पिशवी / केळीचे पान आहे आणि सासरच्या देशस्थी गुजराथी असल्याने कांदा, लसूण, भाजलेलं सुकं खोबरं आणि ज्वारी+ भाजणी मिक्स अशी थालपीठे होतात घरी Wink हायब्रीड वातावरणात मजाच मजा!

ज्वारी, बाजरी, तांदूळ ,मूगडाळ,अख्खे उडीद किंवा सालासकट उडीदडाळ आणि चणाडाळ .त्यात जिरे,ओवा, दालचिनी(ऐच्छिक),धणे भाजून घालायचे.

दिनेशदा, खर की कॉय?????? कधी मधी तवे रिकामे नसतील तर आई कढईत लावायची थालिपिठे हे आठवतय पण हे पातेल्याच काहीतरी नविन प्रकरण दिसतय Uhoh

पातेल्यातही करतात थालिपिठं?:अओ:
नशीब तांब्यात नाही करत... नाहीतर बर्फासाठी घेतलाच आहे लोकानी, आता थालिपिठासाठी पण Lol

हो, पातेल्याच्या कडेला लावतात. एका बाजूने सुटली कि तळाशी उलटून भाजतात. पातेल्याच्या आकारानुसार एकावेळी दोन तीन थालिपिठे लावता येतात. ( नान लावतात तसे ) अर्थात बरेच कौशल्य लागते त्याला.

मी बघितली पण आहेत आणि खाल्लीतही. पण करायचे धाडस नाही केले. गरम तव्यावर थेट लावणे मात्र मला जमते. दोन दोन तवे घ्यावे लागत नाहीत.

मीही लसूण नाही घालत. बायको घालत असली तर कल्पना नाही.
<<
वहिनींच्या हातचं थालिपीठ तुम्हाला मिळत नाही वाट्टं Proud

पितळेचे पातेले. कडेने लावतात आणि शिजले कि आपोआप सुटुन तळाशी पडते. मग ते काढून घ्यायचे.
मी ज्यांच्या हातचे खाल्ले त्या बाई पटापट करत होत्या. त्यामूळे प्रत्येकाला गरमागरम थालिपिठ वाढता येत होते.

पातेल्यात/ कढईत पण करता येतात थालिपीठे. आम्ही मात्र तव्यावर थापतो. साबा आणी मी आलटुन पालटुन थालीपिठ लावतो, कारण मग गॅस कोण पेटवणार्?:फिदी: मी थालीपिठ लावताना साबा शेजारीच उभ्या असतात.किन्वा मग व्हाईस वर्सा.

खमन्ग भाजणीचे थालिपीठ आता खायला मिळणार या आनन्दात मी असते, पण जेव्हा खाण्याची वेळ येते, तेव्हा भूक पळुन गेलेली असते.:अरेरे:

मी आता याच भाजणीच्या पीठाची उकडपेन्डी करणार आहे. ताम्बे काकानी उकडपेन्डी लिहीली नाही? विदर्भात कणकेची करतात, आम्ही भाजणीची करतो.:स्मित:

>>>>> गॅस आधी ऑन करून ठेवायचा. मग तव्यावर थालिपीट थापायचे आणि तवा गॅसवर ठेवायचा. <<<<<<
हे बघा आले घाटी पद्धतीचा प्रचार करायला..........

गायू >>>> अहो कोब्रादेब्रा हे कोकेघाटी या ऐवजी वापरले हो!
घाउकरित्या जातीशिवाय वापरायचे तर नुस्ते कोकणस्थ अन देशस्थ असे चालेल.

हो, पातेल्यामधेही करतात. पण तव्यावर आधी थापुन, वा पातेल्यात आधी थापुन वर्सेस कोक्या पद्धतीचे गरम तव्यावर टाकलेले यातिल चवीमधे फारच फरक अस्तो!
अस्स्ल कोक्या भाजणीचे थालिपीठ जर आधी थापुन मग गरम करत ठेवले तर तिखटामिटाच्या भाकरी सारखेच लागते Proud जो कोणत्याच कोक्याला पटणे शक्य नाही अन म्हणून मी देखिल लिम्बीला कधी थालिपीठ करायचा आग्रह करत नाही अन सरळ आईकडे जातो.
असो.

पितळेचे पातेले. कडेने लावतात आणि शिजले कि आपोआप सुटुन तळाशी पडते. मग ते काढून घ्यायचे.
मी ज्यांच्या हातचे खाल्ले त्या बाई पटापट करत होत्या. त्यामूळे प्रत्येकाला गरमागरम थालिपिठ वाढता येत होते.

म्हणजे हे तंदुर मध्ये तंदुरी रोटी केल्यासारखे आहे. बाजुने रोट्या लावत जा, भाजल्या की खाली पडतील, त्या काढुन घ्या. पातेले मात्र मोठे पाहिजे Happy

थालिपिठे, आंबोळ्या, घावणे इत्यादी गोष्टी खुप हळूहळू बनतात. मोठी आणि मजबुत खाणारी फॅमिली असेल तर त्यांच्यासाठी हे पदार्थ करणारी व्यक्ती मेलीच समजा. Happy

Pages