जुळुन येती रेशीमगाठी- नवीन मराठी मालिका

Submitted by मुग्धानंद on 12 December, 2013 - 04:29

झी मराठीवर दि. २५ नोव्हेंबर, २०१३ ला सुरू झालेली एक वेगळी वाटणारी मराठी मालिका, " जुळुन येती रेशीमगाठी".
एस्सेल व्हिजन प्रॉडक्शनची निर्मीती असणार्या या मालिकेचे दिग्दर्शन हेमंत देवधर यांचे असुन, कथा- विवेक आपटे यांची आहे.
मालिकेतील कलाकार-: ललित बदाने, प्राजक्ता माळी, उदय टिकेकर, गिरीश ओक, सुकन्या कुलकर्णी, मधुगंधा कुलकर्णी, दुर्वा सावंत, लोकेश गुप्ते, विघ्नेश जोशी, शर्मिष्ठा राउत, योगीनी चौक इ.
शिर्षक गीत गायक- स्वप्नील बांदोडकर, निहिरा जोशी
या मालिकेवर चर्चा करण्यासाठी हा धागा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी पाटवड्या सुरळीच्या वड्या असे कॉम्प्लिकेटेड पदार्थ नाही हो आले अजून पुढचे ५० भाग ते शिकवतील मेघनाला, आपण आपले बघतोय....

मागच्या आठवड्यात मी कधीपण टीव्ही ऑन केला की आदित्य मेघना आपले सारेगमप ची रेकॉर्ड वाजवतानाचेच समोर यायचे, सिरियल बघायचेच सोडून दिले

हो हो त्या सारेगमपच्या रेकॉर्डने नुसता ऊत आणलेला प्रत्येक सिरेलीत. किती ते प्रमोशन???

तांदळाची उकड,
मऊसुत पोळ्या,
बिनसाखरेचा शिरा
बिना मिठाची आमटी आणि खारट भाजी
जिर्‍याची कोशिंबीर
आंब्याचे डाळ
आदल्यादिवशी करुन मुरायला ठेवलेलं पन्ह

असले अवघड पदार्थ करणारे लोक्स आहेत ते उद्या कलिंगडाच्या जिलब्या आणि खरबुजाचे आईसक्रीम पण दाखवतील आपल्याल्या.

ए पूर्वा, मी पण ट्राय केली. इथे लिहायचे राहिले वाटतं Happy
फक्त दोन वाट्या कांदे + अर्धी वाटी कोथिंबीर ह्याला पाव वाटी जिरेपावडर जरा जास्तच वाटली. दोन टेबलस्पून चांगली लागेल.

700

बाकी ती सुतकी चेहर्‍याची मेघना आणि २४/७ तिला सावरणारा आदित्य पहायचा आता कंटाळा आलाय. >>>+१११
ज्याने आपल्याशी लग्न केले, जो आपल्यावर प्रेम करतो हे माहिती आहे तरी मित्र मित्र म्हणून छळते आहे आदित्यला.....तिने त्याचा पण सुतकी चेहरा करून टाकला आहे.
आता तर स्वतः काही ठरवणार नाही म्हणते...नियती जे ठरवेल तसे करणार....म्हणजे नक्की काय? कॉलेजला गेल्यावर तिथे आ. न. भेटला कि त्याबरोबर गप्पा मारणार? आणि घरी आल्यावर आ दे ला ठेंगा दाखवून घरात सून म्हणून मिरणार?

आज सु मो तीला मस्त कान पिचकी दीणारे रागाने.....अर्थात मेघनाच्या चेहर्यावर एक्स्प्रेशन्स नवीन नसणारेत...त्यामुळे सु मो ला च बघेन.... हाहाहा

सुमो सदानकदा भिऊ नकोस, मी पाठीशी आहे टाईप्स लुक्स का देत असते? भाजी खारट झाली, तरी हाच लुक्... आणि मुलाची नोकरी गोत्यात आली तोच लुक.

मेघेनाला हे बरय, जाता येता आदेला, 'तू मित्र ना माझा..' म्हणायचं आणि उंडारायचं.. म्हणजे याला सारखा बाबाजीका थुल्लू आणि हिच्या नियतीच्या इशार्‍याची वाट पाहात बसायचं त्याने? कम्माल आहे.

अगदी अगदी पराग. प्रचंड भोचक आहेत त्या दोघी. माझी सासु असती तर ना ..... वगैरे सुनावणे म्हणजे अतिचं होते.

मला वाटते आपल्या सगळ्यांचा दृष्टिकोन चुकत आहे ही मालिका बघताना. आपण एक विनोदी सदर म्हणून त्याकडे पाहायला हवे.

मेघना दोन्हीकडची मजा घेणार नियतीच्या नावाने.
शेजारची आचरट लोकांना उगाच ज्यास्त भाव दिलाय... मी तर उभं सुद्धा नसतं केलं अश्या शेजारच्यांना. Proud

नवीन काही घडतंय असं इथल्या धाग्यावरून वाटत नाही आणि आता चुकून कधी पाहूया म्हटली तरी बघता यायची नाही कालपासून आठ वाजल्यापासून रिमोटचा ताबा गमावला मी भ्याआआआआ
(रात्री जागून रिपीट टेलिकास्ट बघायची हिम्मत नाय रे बाबा आपली)
जाऊदे... पण हा धागा मात्र धम्माल पळतोय.... Happy

<<म्हणजे याला सारखा बाबाजीका थुल्लू आणि हिच्या नियतीच्या इशार्‍याची वाट पाहात बसायचं त्याने? कम्माल आहे.>> Lol

देसाईंच्या घरची खादाडी, सणवार, मेघनाचे सारखे सारखे सॉरी आणि बाबाजी यांच्याभोवतीच सारखी मालिका फिरत आहे. एक पाऊल पुढे दोन पावले मागे असे चालु राहिले तर कथा कशी पुढे सरकणार?

तरीही इतर मालिकांप्रमाणे ह्यात बाया घरी भरजरी साड्या + मेकप मधे नसतात. तसेच पत्र अग्दी टोकाची चांगली नी टोकाची वाईट वागत नाहीत. विजया आणि अर्चु पण आता रागवल्या तर दुसर्‍या क्षणी नऑर्मल असतात. सुकन्या मोने आणि गिरीश ओक साबा साबु म्हणुन फीट.

>>हा एकच बाफ मला एक वाचक म्हणुन (सदस्य म्हणुन आत आल्याशिवाय) का दिसत नाही?>>
सारीका, बाफ फक्त ग्रुप सभासदांसाठी आहे. सार्वजनिक नाही.

सारीका, बाफ फक्त ग्रुप सभासदांसाठी आहे. सार्वजनिक नाही.<<<

मलिकाही अशी असती तर बरे झाले असते.

आज मेघना मनात म्हणे "याला(आदे) मी या घरापासून दूर जायला हवी आहे."
मी हसून हसून फुटायची बाकी होते. हिचाच चॉईस आहे ना? हिलाच हौस आहे ना आन कडे जायचा? आदे कुठे हाताला धरून बाहेर काढतोय? Uhoh

आणि आदे समोर पण त्या आन ला सारखं आदु आदु काय? Angry डोक्यात जातं ते.

Pages