Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02
झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!
यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री
परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.
दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"
पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दक्षिणा एक आठवणः सारेगमप
दक्षिणा
एक आठवणः
सारेगमप च्या एका भागाच्या शुटींगला आम्ही एकदा गेलो होतो. हृदयनाथ मंगेशकर आणि सुरेश वाडकर परिक्षक म्हणून होते. मधुरा दातार आणि ऋषिकेश रानडे वगैरे मंडळी स्पर्धक म्हणून होती.
एपिसोड सुरु व्हायच्या आधीच प्रेक्षकांना जोरजोरात टाळ्या वाजवायला सांगितल्या गेल्या... असे दोनतीनदा झाल्यावर आता हात वर करु टाळ्या वाजवा असे सांगितले. त्यांना हवा तसा आवाज येईस्तोवर हे टाळ्या प्रकरण चालले होते.
जाम कंटाळा आला नंतर टाळ्या वाजवायचा. त्यात त्या पल्लवीच " एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत" हे एक आणि अधूनमधून!
बाकी स्पर्धक चांगले गायले म्हणून जरा सुसह्य झाले!
दक्षिणा के अंजली मी पण गेले
दक्षिणा
के अंजली मी पण गेले होते एकदा शुटींग ला . पल्लवी असताना . हो असच खुपदा टाळ्या वाजवून घेतात आणि त्याच शुटींग करतात. त्यामुळे प्रत्येक गाण झाला कि तेच टाळ्यांच शुटींग टाकतात
हायला कसलं इरिटेटिंग होतं
हायला
कसलं इरिटेटिंग होतं असेल हे
पैसे नाही, बाँड म्हणायचं >>>
पैसे नाही, बाँड म्हणायचं >>>
बाकी लिटील चँप्समधे प्रथमेश लघाटे व आर्या आंबेकर भारी होते.
सुजा हो रिया.. नंतर नंतर
सुजा
हो रिया.. नंतर नंतर कोणी टाळ्या वाजवायला लागलं तरी इरिटेट होत होतं
काल पर्वातली हायलाइट 'नव्या
काल पर्वातली हायलाइट 'नव्या साजातली जुनी गाणी' दाखवली. बरं झालं आख्खं पर्व पाहिलं नाही ते. त्यातल्या त्यात चांगलं काय होतं ते काल न आज पहायला मिळेल
अवधूत चे तेच तेच एक्स्प्रेशन्स
मी ही गेले होते एका एपिसोडला.
मी ही गेले होते एका एपिसोडला. टाळ्या प्रकरण फार नव्हतं. पण कुणी खोकायचं नाही, शिंकायचं नाही अशी सक्त ताकिद दिली होती
सर्वात कमी गोंधळाचं पर्व होतं
सर्वात कमी गोंधळाचं पर्व होतं हे.. कम बॅकचे नाटक नाही.. बाकी धावपळ नाही.. रडारडीची नाटकं नाहीत.. मिनिमम एपिसोड्स मधे गुंडाळलेल पर्व.. लोकप्रियता घसरलेली आहे सारेगमपची हे नक्कीच दिसून आलं..
>>>>>>>>>>>>>>>>
निवडणुका असल्याने यावेळचे पर्व नेहमीसारखे न लांबवता कॉल बॅक न घेता पटापट गुंडाळलं..... इति राहुल रानडे.
त्यामुळेच सेम डे फायनल प्रोग्राम न ठेवता १० तारखेलाच ठाण्यात फायनल झाली आणि दाखवली १३ तारखेला.....
एव्हन यावेळी आचारसंहितेमुळे कुठेही पोस्टर्स लावू दिले नव्हते.... काही हौशी मंडळांनी पुण्यात लावलेले पोस्टर्स काढायला लावले एका दिवसात.
गेल्या १० वर्षात झालेल्या
गेल्या १० वर्षात झालेल्या इतक्या वाहिन्यांवरच्या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि विजेते कुठे आहेत आज? या स्पर्धक आणि विजेत्यांपैकी (काही मोजके अपवाद वगळता) किती जण पार्श्वगायक/ गायिका म्हणुन पुढे आले आहेत?
>>>>>>>>>>>>>>
सारिका, इंदिआयडीऑडॉल मधले बहुतांश चांगले गायक सतत परदेश दौरे करून आणि कार्यक्रम करून अगदी एका आयटी इंजिनिअर एवढा व्यवस्थित पैसा कमवतायत..... तेच त्यांच्या द्रुष्टीने त्यांचे करीअर आहे.....!!!
ऑल आर हॅप्पी डुइंग व्हाट दे वँटेड अँड गेटिंग पेड फॉर दॅट...... शिवाय प्रसिध्धी मिळतेच आहे.
आचारसंहितेमुळे कुठेही
आचारसंहितेमुळे कुठेही पोस्टर्स लावू दिले नव्हते>>
कालच्या सोहळ्याची साधारण २००-३०० पोस्टर्स होती आमच्या सिंहगड रोडला. कसली बोडक्याची आचारसंहीता?
रेश्माला वोटिंग खूप कमी
रेश्माला वोटिंग खूप कमी मिळाले, जाऊदे मला बोलायचा हक्क नाही कारण मी यंदा हे पर्व बघितले नाही आणि वोटिंगहि केले नाही, माझ्यासारखंच बहुतेक डोंबिवलीकरांनी केलं वाटतं, नाहीतर ती आली असती.
ज्यांची पैसे देण्याची तयारी
ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे ते अंतिम फेरीत पोचतील. >
>>>>>>>>>>>>>>>>>
हे आपण ऐकीव माहितीवर ठरवतोय..... मी पण आतापर्यंत आपल्याला हवा असलेला स्पर्धक आला नाही की "सेटिंग" केलेय हेच म्हणणार्यातला होतो....... अगदी कार्यक्रमाच्या दुपारपयंत सर्वत्र रेश्माच जिंकणार अशीच शक्यता वर्तवली जात होती.....
पण यंदा घरातप्लच व्यक्ती असल्याने हे प्रत्यक्ष अनुभवता आलं.... आम्हाला कोणालाही एकही कॉल किंवा सुचक काहीहीविचाररणा झाली नाही..... एकछादामही दिलेला नाही..... खरंतर ती जिंकेल ही इइछा असली तरी अपेक्षा नव्हती..... मुळात हा प्लॅटफॉर्म मिळाला हीच एक चांगली संधी होती.....
मंजूडी, कदाचित कोणीही यावर विश्वास ठेवणार नाही किंवा असं पैसे देणारं कधी उघडपणे सांगतं का वगैरे कमेंटही येतील.... पण खरोखर एक रुपयाही द्यावा लागलेला नाही अंतिमफेरिपय्र्यंत यायला किंवा जिंकायला..... तसं असतं तर आम्ही बाहेर पडलो असतो थेट......!!!
ओव्हरऑल हे पर्व तसं सुमारच होतं आणि जिंकणरा वासरात लंगडी गाय होणार हे होतंच.... शिवाय सुमेधाजींकडून चांगले स्पर्धक कसे आधीच एलिमिनेट केले ते ऐकून होतोच.
काम्देपोहे.... गावातली
काम्देपोहे.... गावातली पोस्टर्स काढायला लावलेली असं कळंल.....
काही ठिकाणी पोस्टर्सवर पक्ष किंवा संबंधित संस्थांची नावे लिहिली गेली ती पोस्टर्स काढायला लावली होती .... पूर्ण भागात काय झकलपान्ल्पना नाही
सारेगमची नाही रे. मी दुसर्या
सारेगमची नाही रे. मी दुसर्या पोस्टर्सबद्दल बोलतो आहे. असो.
सारेगमची नाही रे. मी दुसर्या
सारेगमची नाही रे. मी दुसर्या पोस्टर्सबद्दल बोलतो आहे. असो.
ओके.... :स्मितः
ओके.... :स्मितः
भुंग्या, मला 'तुम्ही' वगैरे
भुंग्या, मला 'तुम्ही' वगैरे कधीपासून म्हणू लागलास?
मी ऐकीव बातमीवरून माझं मत बनवलेलं नाही. खूप जवळून अनुभव घेतलेला आहे.
तुझा अनुभव तू लिहिलास ते वाचून जरा बरं वाटलं.
पण एक सांग, पैसे प्रत्यक्ष दिलेले नाहीत, पण बाँड, अॅग्रीमेंट यापैकीसुद्धा काहीही नाही का?
सारेगमची नाही रे. मी दुसर्या
सारेगमची नाही रे. मी दुसर्या पोस्टर्सबद्दल बोलतो आहे. असो.>> पण तो सारेगमच्या पोस्टर्सबद्दल बोलतो आहे ना आधीपासून? उगाच विषय बदलू नकोस!
अंतिम फेरीत रेश्माची गाणी अगदीच हुकली. पानसरे साहेबांचाही आवाज गंडला. जुईलीच त्यांच्यात चांगली होती. माझं मत अर्थात कोल्लापूरच्या ढाण्या वाघाला होतं
मंजूडी, जिंकणार्या गायकाशी
मंजूडी, जिंकणार्या गायकाशी बाँड करतात एक ते दोन वर्षाचा पण त्याबद्दल अजून काहकल्प्ल्पना किंवा बोलणी झालेली नाहीत...........
पण बाँड स्विकाराल तरच जिकून देतो अशी अट नसते...... झी च्या सर्व प्रोग्राम्सना प्रमोशनल सिरियल साँग्जना तुम्हाला संधी मिळते.... ऑलरेडी एका सिरियलचं प्रमोशनल साँग रेकॉर्डही झालं......
पण यात सगळ्याचपाव्च जणांना संधी मिळतेय..... पुढे आता कसं काय असतं ते जवळून कळेलच.... रंजक माहिती जरूर कळवेन
बादवे..... नावच एवढं भारदस्त आहे की तोंडातून तुम्ही आलं
शिवाय बाँड स्विकारणं यात
शिवाय बाँड स्विकारणं यात फारसं जाचक काही नसावं बहुधा......
कारण शेवटी आपल्या वाहिनीच्या प्रोग्राम्सना प्रमोट करायला महागायक किंवा गायिकेचा आपल्या चॅनलच्या वापर करणार हे स्पष्टच आहे..... आणि इंडिअयन आयडॉलसारखं झी नक्कीच ताबडवत नाही सतत इकडेतिकडे प्रोग्राम्स ठेवून...... गायकासाठीसुद्ध्हा ती एक चांगली संधी आहे इंदस्ट्रीमध्ये ओळख वाढवायची.
असो!! तोंडातून तुम्ही आलं>>>
असो!!
तोंडातून तुम्ही आलं>>> याच बाफवर आधीच्या पोस्टीत कधी नाही म्हटलं ते...
पण तो सारेगमच्या पोस्टर्सबद्दल बोलतो आहे ना आधीपासून? >>> तेच्की!!
अब क्या बच्चे की जान लोगे....
अब क्या बच्चे की जान लोगे....
सगळेच चॅनल्स नंतर ताबडवतात..
सगळेच चॅनल्स नंतर ताबडवतात.. दोन विजेते अगदीच जवळचे असल्याने नक्की माहिती आहे... दुसरीकडे कुठे काही करता येत नाही.. प्रत्येक परफॉरमन्स साठी परवानगी घ्यावी लागते.. मिळणार्या रक्केमेतील काही रक्कम संबंधित चॅनेल कडे द्यावी लागते.. अर्थात हे सगळे बॉंड मध्ये लिहून घेतलेले असते.. त्यामुळे स्पर्धकाला ह्याची माहिती असते... हे बहुदा पहिल्या पाच जणांसाठी.. अर्थात अंतिम फेरीत पोहोचणार्यांसाठी असते.. फक्त विजेत्यासाठी नाही.
भुंग्याला अनुमोदन. बरेच
भुंग्याला अनुमोदन. बरेच सिलेक्ट झालेले लोक जवळच्या ओळखीत आहेत. पैसे मगितल्याचे किंवा दिल्याचे ऐकले नाही. सिलेक्शन प्रोसेस मधे काळेबेरे असावे, पण पैसे घेऊन सिलेक्ट करणे, किंवा जिंकून देणे हे खरंच नसावे.
सा रे ग म प ...नव्याने सुरु
सा रे ग म प ...नव्याने सुरु झालेलं कुणी बघतंय का? अति बोअरे! रोहीत राऊत फ्लर्टींग चा अतीरेक करतो व वात आणतो.
बेला शेंडे अतिविशाल झाली आहे. सध्या प्राथमिक राऊंड्स सुरु आहेत.
रवी जाधव परीक्षक आहे!!
रवी जाधव परीक्षक आहे!!
संगीतक्षेत्राशी संबंधित कोणी मिळालं नसतं का झीला!
हो ना... ऑफ ऑल पिपल!
हो ना... ऑफ ऑल पिपल!
Pages