झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सारिका, फक्त इंडियन आयडॉल बद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही पर्वातले गायक (विजेते नव्हे) चांगलेच पुढे आलेत सध्या.शेवटी नुसत्या मतांनी जिंकुन काहीच उपयोग नाही. भुमी त्रिपाठी आणि श्रिराम हे एक बेस्ट उदाहरण आहे Happy
शिवाय अरजित सिंग आहेच.

सुनिधी अपवादात्मकरित्या रिअ‍ॅलिटी शोतून पुढे आली. मेरी आवाज सुनो ची विजेती होती. साल आठवत नाही. १४ वर्षांची होती फक्त. तु चंदा मैं चाँदनी गायली होती.

मला आवडला हा कार्यक्रम.

मतं / sms फारसं पटत नाही. त्यातली महत्वाची कारणं म्हणजे , expertise, पारदर्शकतेचा आणी विश्वासार्हतेचा अभाव.

जुईली चं गाणं आवडलं. voice modulation खूप प्रभावी होतं आणी सूर ही पक्के वाटले. जे बाहेर पडले त्यातल्या कौशिक चं गाणं आवडलं होत. पण ते ठरवायला तज्ञ होते, so that's OK.

निवेदकाची भाषा, आवाज आणी body language चांगलं आहे. पण, तोच-तोचपणा, माहितीपूर्णतेचा अभाव आणी not so funny विनोदांमुळे प्रभावी नाही वाटला.

परिक्षकांच्या अधिक अभ्यासू / गाण्यातले बारकावे सांगणार्या अभिप्रायांची अपेक्षा होती. थोडसं objective परिक्षण बघायला / ऐकायला आवडलं असतं.

सर्व स्पर्धकांचं अभिनंदन!

श्रेया घोषाल, बेला शेंडे ह्याही रिअ‍ॅलिटी शो मधूनच पुढे आल्या आहेत.
श्रेया ही रिअ‍ॅलिटी शो ने आपल्याला दिलेली सगळ्यात मोठी भेट असं कुणी सेलिब्रिटी म्हणून गेली होती मागे ! अर्थात बालकलाकार आणि नंतर मोठ्यांच्या पर्वातून झालेला तिचा प्रवास आपल्यासमोर आहेच.
श्रेयाबरोबर स्नेहा पंत नावाची मुलगीही तेव्हा फार प्रॉमिसिंग वाटायची पण पुढे नाही आली फार !

हे पर्व आधीच्या पर्वांइतकं गाजलं नाही.
आय होप की झी मराठी यांतून धडा घेतील.
१. इतर स्पर्धांमधून आलेले स्पर्धक गोळा करण्याऐवजी फ्रेश चेहरे, नवीन स्पर्धक आणा.
२. मराठी गाणी गायला सांगा. हिंदीची कधीतरी एखादी राऊंड ठीक आहे. हिंदीच गाणी ऐकायची तर आम्ही हिंदी वाहिन्या बघू शकतो. तिथेही असे कार्यक्रम होतात.
३. अवधूतने आता खूप वर्षं परीक्षण केलंय त्याला ब्रेक दया आणि नवीन परीक्षक आणा.
४. जमल्यास देवकीजीना परत आणा.
५. जे कोणी कायमस्वरुपी परीक्षक असतील त्यांची आधी मराठी बोलण्याची टेस्ट घ्या. कुरेशींना मराठी बोलताच येत नव्हतं. महाराष्ट्रात नाही का मिळाले कोणी परीक्षक जे मराठी बोलू शकतील? कुरेशींना एखादया एपिसोडला गेस्ट म्हणून बोलवा.
६. पल्लवीसारखी संचालिका दुसरी नाही. तिला परत आणा.

वेदिका,
तुझे सगळे मुद्दे पटले मला.

आपण इथे झी मराठीच्या जवळपास सगळ्या मालिकांमधल्या चुका काढत आहोत. पण त्या झी मराठीच्या मालिकांमध्ये काही फरक पडला आहे का? त्यांच्याकडुन सुधारण्याची खरच अपेक्षा ठेवता येईल का?
सारेगमप पद्धलच बोलायचे झाले तर…
१. अर्धे नवे स्पर्धक आणि अर्धे आधी इतर स्पर्धांमधून आलेले स्पर्धक हे गणित नक्कीच चुकीचे आहे. इतर स्पर्धांमधून आलेल्या स्पर्धकांना या कार्यक्रमातले सगळे छक्केपंजे माहित असतात; त्यामुळे नविन स्पर्धकांवर अन्याय होतो. (याच पर्वाविषयी सांगायचे झाले तर अंतिम ५ मध्ये रेश्मा कुलकर्णी सोडली तर बाकीचे सगळे आधी इतर स्पर्धांमधून आलेले आहेत. मग तिच विजेती होत नाही का?)
२. हे पर्व कदाचित सर्वात जास्त हिंदी गाण्यांचे पर्व म्हणुन ओळखले जाईल. सर्व स्पर्धक मराठी असुनसुद्धा हिंदी गाण्यांचा अट्टाहास का? केवळ एक परीक्षक अमराठी आहे म्हणुन? अमराठी वाहिन्यांवर (तेलगु, तामिळ, पंजाबी इ.) हेच झी वाले इतकी हिंदी गाणी दाखवण्याची हिमंत करतील का?
३. अवधुत गुप्ते! कदाचित झी मराठीला त्याच्याशिवाय नक्कीच दुसरा कोणी परीक्षक मिळत नसावा. त्याला बदलणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या गाण्याला वेडेवाकडे चेहरे करत 'चाबुक' म्हणणे हेच का त्याचे परीक्षण?
४. देवकी पंडित परत झी मराठीवर आल्या तर छानच!
५. हे संपुर्ण पर्वच गंडले असल्यामुळे पाहुणा परीक्षक (गायक, संगीतकार) बोलावण्याची शक्यताच नव्हती. अमराठी परीक्षक बोलावण्याची झी मराठीवर वेळ आली हे त्यांचे दुर्दैव. बहुदा त्यांच्याकडचे मराठी परीक्षक संपले असावेत.
६. 'एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत'.

ह्या स्पर्धेच्या सिलेक्शनच्या फायनल राउंडच्या वेळेस मीही माझ्या स्पर्धक नातेवाईकांबरोबर तिथे होते. मी जवळपास सगळ्यांचीच गाणी ऐकली. बरीच मुले, जी फायनल राउंडमधे एलिमिनेट झाली, ती "अ फा ट" गाणारी होती आणि तरीही ती रिजेक्ट झाली. (पुण्यातला एक मुलगा, ज्याला तो बराच लहान असल्यापासून मी ओळखते, ज्याचे सांगीतीक करिअर सुद्धा खूप चांगले आहे) तो सुद्धा रिजेक्ट झाला. मजा म्हणजे ह्या उत्तम गायलेल्या लोकांची सिलेक्शन राउंडची गाणी टेलिकास्ट मधे कणभरही दिसली नाहीत. काही रिजेक्ट झालेल्या मुलांपेक्षा सिलेक्ट झालेली मुले बरीच सुमार होती. हेच कारण होते, की ज्यामुळे हे शेड्युल लोकांना गुंगवून ठेवू शकले नाही. आणि मग सुमार कार्यक्रमाला उचलून धरण्याकरिता, अवधूतला जवळपास प्रत्येक गाण्याला, गाणे चाबूक झाल्यासारखा अभिनय करावा लागत होता.

देवकी पंडीत जी निदान सिरीयसली परिक्षण करतील अवधुत पेक्षा......आणि गाण्यात सुधारणा काय करुन करावी हे ही सांगतील....नुसता तु चुकलायस हे न सांगता...चाबुक न वापरता.....

हा कार्यक्रम आता रिअ‍ॅलिटी शो न राहता पूर्णपणे 'दिग्दर्शित' होऊ लागला आहे. ज्या स्पर्धकांचं नशीब जोरावर, ते कार्यक्रमात निवडाले जातील. ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे ते अंतिम फेरीत पोचतील. लोकप्रियता एन्कॅश करणे हे नित्याचेच झालेले आहे. पण अर्थातच बाकी कुठल्याही मराठी वाहिनीपेक्षा झीचे सादरीकरण अत्युच्च दर्जाचे असते हे मान्य करायलाच हवे.
असो!

कालच्या कार्यक्रमात हरीहरनची अप्रतिम सुंदर गाणी ऐकता आली हेच काय ते समाधान.

वेदिका आणि सारिका, दोघींच्याही मताशी अक्षरशः सहमत आहे.

हे पर्व गाजलं तर नाहीच... शेवटी प्रसिद्धी आणि टीआरपीसाठी झी मराठीच्या सगळ्या मालिकांमधून मालिका संपली की त्यातली मुख्य पात्रे अतिशय खोटा अभिनय करत कोण जिंकणार? कोण जिंकणार करत होते. वैताग नुसता.

जुनी गाणी नव्या स्वरसाजात ही कन्सेप्ट बर्‍यापैकी झेपली लोकांना. म्हणजे ही कन्सेप्ट खूपच नवी होती म्हणून पर्व गंडलं असं अजिबात नाही. मुळात निवडीचे निकष गंडलेले होते...
त्यामुळे- जुइली काय अजून कुणीही जिंकलं असतं तरी "वासरात लंगडी गाय शहाणी" हा न्याय लागू झाला असता.
जुइलीमध्ये गायनकौशल्य नाही असं मुळीच म्हणणं नाही.

झी मराठीने सीरियसली काहीतरी बोध घ्यायला हवाय ह्यातून.

जुनी गाणी नव्या स्वरसाजात ही कन्सेप्ट अजिबात झेपली नहि. तुम्हाला नवीन काही करायला झेपत नसेल तर जुने आहे तसेच सदर करा. उगाच आपली ( नसलेली / कमकुवत ) प्रतिभा नको त्या ठिकाणी वापरू नका. ताजमहाल ला तुमच्या विटा जोडू नका असे मधी कोणीतरी म्हणाले होते . एखादे हिट गाणे देणे वर्षातून म्हणजे काही प्रतिभाशाली संगीतकार नाही. ज्या कोणाला पुळका असेल त्याने फक्त एकाच मराठी संगीतकाराची ( अर्थात नवीन संगीतकारच फक्त ) १० हिट गाणी इथे द्यावी.
तसेच trophy दिल्यावर तौफिक ने जुईलीला मारलेली मिठी डोक्यात गेली. हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हते.

ज्यांची पैसे देण्याची तयारी आहे ते अंतिम फेरीत पोचतील. >>> खरंच ? Uhoh
इतक्या पातळीपर्यंत घसरली असतील 'आपली मराठी माणसं' ? गेल्या काही पर्वांतले विजेते किंवा उपविजेते पाहिले ( अभिजीत कोसंबी, आनंदी जोशी, वैशाली माडे, सायली पानसे, कार्तिकी गायकवाड, आर्या आंबेकर, राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, उर्मिला धनगर ते अगदी जुईली जोगळेकर, रेश्मा कुलकर्णी ) तर ह्यावर विश्वास ठेवणं अत्यंत अवघड आहे.
शो दिग्दर्शित आहे आणि ज्याच्यावर निर्माते मेहेरबान त्यांना संधी मिळते हे पटण्यासारखे आहे पण त्याबद्दल स्पर्धकांना दोष देता येणार नाही.

खरंच ? अ ओ, आता काय करायचं>>> अगो, हो! लिटिल चॅम्प्स पर्वातली शमिका भिडे डिझर्विंग असूनही याच कारणामुळे स्पर्धेबाहेर पडली होती. आठव कॉल बॅक एपिसोड, ज्यात फायनल राऊंडमध्ये आऊट झालेल्या स्पर्धकांना पुन्हा संधी देण्यात येते. त्यात शमिका आलीच नाही. तिने (म्हणजे तिच्या पालकांनी) झीला बाँड देण्यास नकार दिला होता.

अभिजित कोसंबी, कार्तिकी गायकवाड,उर्मिला धनगर यांच्याबरोबरीचे स्पर्धक ह्या तिघांपेक्षा उजवे होते (हे माझं वैयक्तिक मत).

करेक्ट मंजूडी, कार्तिकी गायकवाड जिंकली तेव्हा असे पैसे दिले गेल्याचं बर्‍याच ठिकाणाहून कळलं होतं.

ई टीव्हीवर कार्तिकीचा छोटा भाऊ विनर होता. कार्तिकी जिंकली तेव्हा खूप दिवस आधी तिलाच जिंकवणार असे ऐकू येत होते.

ती अ‍ॅटिट्युड आणि भाषा यांची स्पर्धा नव्हती, गाण्याची स्पर्धा होती आणि त्यात आर्या खचितच कार्तिकीपेक्षा सरस होती. हे मावैम. Happy

प्राची मान्य. पण आर्या सतत इतर स्पर्धकांवर तु. क. टाकायची. कलेत इतका अहं कशाला हवा?
हे झालं टिव्हीवर मी तिला इतरत्र ही दोन वेळेला पाहिलं आहे. आणि तिच्या दुर्दैवाने दोन्ही वेळा प्रसंग घडले आणि मनातूनच उतरली ती. Sad

ती अ‍ॅटिट्युड आणि भाषा यांची स्पर्धा नव्हती >> ऑन द आदर हॅन्ड एका स्पर्धकाकडे सर्व अँगलमधून पाहिले जाते. भाषा गाताना योग्य हवीच. खास करून उच्चार. कार्तिकी सरळ सरळ आनी पानी लोनी करायची. आर्या गाण्यात नक्कीच उजवी होती (भाषा उच्चार यांच्या सकट) पण पर्सनॅलिटी सुदिंग नाही तिची. (दिसणं नव्हे, एकूण अ‍ॅपियरन्स) Sad

भाषा गाताना योग्य हवीच. खास करून उच्चार. कार्तिकी सरळ सरळ आनी पानी लोनी करायची.>>>
ओह. याबाबतीत तुला मोदक.(तुला हवे तेवढे.:))

Pages