झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो कविता, तो प्रकार अगदीच डोक्यात गेला सोमवारी.
आणि मुलांनी काय घोडं मारलंय? त्यांनी फे.ल. लावलं नाही तर त्यांचा आत्मविश्वास कसा वाढणार? Wink

"फेअर & लव्हली प्रायोजक आहेत म्हणून..." - मुळात ते प्रॉडक्ट आणी त्याच्या जाहिराती मला तरी खूप रेसिस्ट वाटतात.

मला कार्यक्रम, गाणी, स्पर्धक आवडले. निवेदन नाही फारसं आवडलं. त्याचा आवाज आणी व्यक्तिमत्व चांगलं आहे. पण स्क्रिप्ट (कोण लिहितं माहीत नाही) बालिश वाटतं. तोच-तोच पणा जाणवतो. प्रत्येक वाक्यात त्या प्रायोजकांचं नाव (हे सरसकट सर्वच कार्यक्रमांच्या बाबतीत) घेण्यानी रसभंग होतो.

कौशिक आत्ता पर्यत कायम पहिल्या दहा/बारात होताच . आत्ता पर्यत याच्या आधीच्या पर्वात तो एकदा/ का दोनदा सिलेक्ट झाला होता माझ्या मते . पण तो खास गायक नाहीये Happy जुईली खर तर चांगली गायलेय आत्ता पर्यंत पण ती डेंजर झोन मध्ये ? माझ्या मते रेश्मा जिंकेल या वेळी Happy

कौशिक बाहेर गेल्याने मोगँबो खुश हुवा Proud

आजची गाणी फारच आवडली मला. आज मला गणेश मेस्त्रीचा गोविंदा खूप आवडला ऐकायला, मस्त फील येत होता एकदम. म्हणजे तो खरंच जोश मध्ये गायल्यासारखा वाटला. जुईलीने म्हटलेले तर आवडतंच आहे, आणि ती गायलीही छान.

महेश कंटेने 'दाटुन कंठ येतो' मस्त म्हणले पण बिचार्‍याला ध मिळाला. कालच्या रेश्माच्या घननिळा लडीवाळामधे नी देण्यासारखे काय होते देव व परीक्षकच जाणे.

जयंतचे गेल्या दोन आठवड्यातले परफॉर्मन्स मला तर फार गरीब वाटले. त्याला उगाच डोक्यावर घेतल्यासारखे वाटत आहे.

>>कालच्या रेश्माच्या घननिळा लडीवाळामधे नी देण्यासारखे काय होते देव व परीक्षकच जाणे.

अगदी अगदी.
आणि म्युझिक रि-अरेंजमेंटही तितकी प्रभावी नाही वाटली मला तरी..

लगेचच आटपते घेतले हे पर्व! बरेच झाले म्हणायचे. अतिशय विस्कळीत संकल्पना आणि त्याहून सुमार गायक! मेकओव्हर, परीक्षकांचे खटकेबाज प्रतिसाद असे सगळे वगळून सूर, गाण्याचे योग्य परीक्षण आणि मर्यादीत प्रमाणात परफॉर्मन्स यावर आधारीत एक पर्व झी ने केले तर मजा येइल.

जुईली जोगळेकर जिंकणार आहे या वेळेला..

बाय द वे तिने या वेळेला म्हटलेले (अगदी आरडाओरडा करत) आणि ज्याने अवधुत अगदी भयंकर इंप्रेस झाला ते गाणे कुठले आहे? कोणाचे आहे? मी पहिल्यांदाच ऐकले.

स्वर पावसात भिजतात का?
ते वैशाली सामंतच आहे
स्वर पावसात भिजतात अल्बम मधलं
आमच्या कॉलेजच्या एका कार्येक्रमात त्याचं उत्घाटन झालेलं.
त्या दिवशी मी पुर्ण दिवस तिच्या सोबत होते .ती एक अतिशय सुंदर मन असलेली लेडी आहे यावर मी शिक्का मारते आहे
तेंव्हापासून ती माझी खुप लाडकी गायिका झाली आहे

त्या लिट्ल चॅम्प्स नंतर ह्यांचे गाणे अजूनच भयंकर वाटले. अवधूतचे एक वेळ समजू शकतो पण तौफिक कुरेशींसारखे खूप काही कमावलेले आणि स्वतःला सिद्ध केलेले दिग्गजही जेव्हा ह्या फालतू फॉरमॅट्ला अनुसरून खोटे खोटे गोग्गोड बोलतात तेव्हा कळत नाही ह्यामागे काय विचार असेल.

पाचवा: महेश कंटे
चौथा: प्रल्हाद जाधव
तिसरी: रेश्मा कुलकर्णी
दुसरा: जयंत पानसरे
विजेती: जुइली जोगळेकर

अरे वा, अभिनंदन जुईली. आमची डोंबिवलीची रेश्मा पण चांगली होती.

भुंगा तुमचे पण अभिनंदन, ती तुमची मेव्हणी आहे ना. घरातल्या सर्वांचेच अभिनंदन.

जुईलीला इतकं डोक्यावर घेतलं होतं तेव्हाच रिझल्ट आला होता लक्षात. >>>>>>>>>>> ऑडिशन पासुनच अवधुत काकांनी तीला डोक्यावर घेउन ठेवलेली..... रेश्मा आणि अजुन कोणतरी मुलगा मला नाव माहित नाही...तो मस्त होता....त्या दोघांपैकी एकाला मिळायला हवं होतं

हा निकाल अधिकृतरित्या जाहिर केला का झी मराठीने?>>
झी मराठीने नाही पण झी च्या न्युज चॅनल ने आज सकाळी जाहिर केले...

मतांची भीक? Uhoh
सिरिअसली?
आय मीन मला मुळातच हे एसेमेस ने विजेते ठरवणं कधीच पटलेलं नाही
स्पेशली तेंव्हापासुन जेंव्हा मोस्ट डिजर्विंग राहूल सक्सेना विजयी झाला नव्हता.
तरीही आता हेच चालतय.
तरीही मतांची भिक हा शब्द आवडला नाही.

सारेगमपचा ओरिजिनम फॉरमॅट मस्त होता.. इंडियन आयडॉल आले आणि ह्यांनी फॉरमॅट बदलला...

सर्वात कमी गोंधळाचं पर्व होतं हे.. कम बॅकचे नाटक नाही.. बाकी धावपळ नाही.. रडारडीची नाटकं नाहीत.. मिनिमम एपिसोड्स मधे गुंडाळलेल पर्व.. लोकप्रियता घसरलेली आहे सारेगमपची हे नक्कीच दिसून आलं..

हिंदीतही सध्या एकही गाण्याचा कार्यक्रम चालू नाहीये.. हिंदी सारेगमप करतील बहुतेक आता चालू डीआयडी संपले की..

सध्या डीडी सह्याद्रीवर नादभेद म्हणून एक शास्त्रीय संगीतावर आधारित स्पर्धात्मक कार्यक्रम असतो.. गुरुवारी रात्री ११ वाजता आणि शुक्रवारी दुपारी १२ वाजता.. फक्त आणि फक्त शास्त्रीय संगीत.. गायन आणि वादन..

सुरुवातीला कैवल्यकुमार गुरव आणि जोगळेकर परिक्षक आहेत.. नंतरच्या फेर्‍यात सगळे दिग्गज कलाकार परिक्षक म्हणून आहेत..

स्पिक मॅके मुख्य संयोजक आहेत कार्यक्रमाचे...

२००४ मध्ये, बरोबर १० वर्षांपुर्वी, सोनी वरच्या 'इंडियन आयडॉल' कार्यक्रमापासुन हि एसएमएस मधुन प्रेक्षकांची मते मागवण्याचे खुळ चालु झाले. कार्यक्रम चालु असताना प्रत्येक स्पर्धक मला पुढे सोनु निगम/श्रेया घोषाल व्हायचे असे म्हणतो. प्रेक्षकांच्या मतांमधुन विजेता/विजेती म्हणुन निवडलेल्या गायक/गायिकेला स्पर्धा जिंकल्यावर पुढली १-२ वर्षे मिडिया डोक्यावर घेते. नंतर कोणीही विचारत नाही त्यांना. एका वाहिनीवरचा कार्यक्रम झाला की मग इतर वाहिन्यांवरच्या कार्यक्रमात भाग घेणे इथंपर्यंतच मजल यांची. गेल्या १० वर्षात झालेल्या इतक्या वाहिन्यांवरच्या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि विजेते कुठे आहेत आज? या स्पर्धक आणि विजेत्यांपैकी (काही मोजके अपवाद वगळता) किती जण पार्श्वगायक/ गायिका म्हणुन पुढे आले आहेत?

नुकत्याच झालेल्या इंडियन आयडॉल ज्युनिअर कार्यक्रमामध्ये चांगल्या स्पर्धकाला, केवळ प्रेक्षकांची मते मिळाली नाहित म्हणुन, बाहेर काढले होते आणि परिक्षकांनी तसे निर्लज्जपणे जाहिरसुध्दा केले होते.

Pages