निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता रोज घड्याळ लावल्यासारखे २ ते ५.३० झोपतात आणि इतर वेळी अगदी माणसांच्या सख्या भावंडांसारखे भांडत असतात. Uhoh
खुश आहेत ती दोघं आता. नुसता दंगा चालू असतो. Happy

तू यु ट्यूब वरचे फनी कॅट व्हिडिओ पाहिलेस का?
हो… पाहते ना… कितीतरी वेळी अगदी पोट दुखलये हसून हसून तरी परत हसू येतेच ते पाहून
हे माझे फेवरेट आहे Biggrin

वसंत ऋतूत कोवळी पिंपळपाने,तिची तांबूस छटा,पानांवरील तकाकी किती लोभसवाणी दिसते!
1.

2.

3

4

5

साधना, जागू धन्यवाद. मला तो पळसच वाटत होता.

जागू, तुझे पेरुचे फुल सुन्दर.

सरिवा, कोवळे पिंपळ पान मला नेहमीच मोहविते. मस्त फोटो

मानुषी, मस्त आकाश.

मनुषी, मस्त फोटो, ईन्द्रधनुष्याची उधळणं जणु....

जरबेरा.. ह्याट्स ओफ!

पेरुच्या आणि चहाच्या फुलात खरोखर खुप साम्य आहे!

सगळेच फोटो अप्रतिम. Happy

सरीवा, मोरांचा आणि पिंपळपानाचा फोटो झकास. वर्षा, मानुषीताई मस्त फोटो.

जागू, शशांक तो सिग्नेचर स्पायडरच आहे.

मामी, चहाच्या फुलाचा फोटो आणि माहिती मस्तच. मला सुद्धा चहाच्या फुलाचा फोटो नागकेशर आणि पेरूच्या फुलांसारखाच वाटला.

मनीमोहर तो पांगाराच आहे. Happy

झरबेरा, एस Sad

डिस्कव्हर सह्याद्रीच्या या लेखात जो पहिला फुलांचा कोलाज आहे त्यात उजव्या बाजुला "वारस"च फुल आहे ना? Happy

लेख आवर्जुन वाचा खुप छान लिहिलंय आणि फोटो तर क्या बात है!!!!

कसली सुंदर दिसतायत पिंपळपानं!!
मोर, चहाचं फुल, पेरुचं फुल सगळच सुरेख!

हो रे ते वारसच आहे.

खरेतर एस गेल्यानंतर बरेच काही झाले कारण एकतर तो अचानक गेला आणि त्याच्याशी खुपच अ‍ॅटॅचमेंट झालेली असल्याने तो गेल्यावर सगळेच कठिण होऊन बसले. शुक्रवारी रात्री साडेदहाला तो गेला. इथे काही लिहिण्याआधीच मला घाईघाईत एसची जागा भरुन काढायचा निर्णय घ्यावा लागला. खरेतर या दोन पिल्लांना आम्ही दत्तक घेतले म्हणण्याऐवजी योग्य वेळी ती आमच्या नजरेस पडुन आमच्याकडे आली याचे आम्ही आभार मानायला हवेत. ती जर शनवारी मिळाली नसती तर माझे काही खरे नव्हते.

परवा एक कावळा कबुतराला बराच वेळ छळत होता शेवटी कबुतराची खरच पिसं काढली . कबुतर शेवटी उडून गेलं. आणि कावळा अंड घेऊन गेला.

k1.jpgk2.jpg

चांगला आहे तो कावळा. कबुतरे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत माहित आहे काय? लोक मुर्खासारखे त्याना फुकटचे धान्य घालवुन त्यांची प्रजा वाढवताहेत. त्यांच्या पंख फडफडवण्यातुनही जंतुप्रसार होतो. त्यांची विष्ठा अ‍ॅसिडिक आहे, जिथे पडेल तिथे डाग पाडते. एकुण कबुतरे बेक्कार आहेत पण मुंबईत त्यांना मोकळे रान मिळालेय. Angry

साधना, आमच्या इथे तर काही लहान मुलं कबुतरं पाळण्याचा आणि विकण्याचा बिझनेस करतात.
६वी - ७वी मधली मुलं Sad
त्यांना काही होईल का?

चांगला आहे तो कावळा. कबुतरे आपल्या आरोग्यासाठी किती घातक आहेत माहित आहे काय? लोक मुर्खासारखे त्याना फुकटचे धान्य घालवुन त्यांची प्रजा वाढवताहेत. >>>>>>>>>>>>>

इथे मायग्रेटेड कॅनडा गीज बरेच मुक्काम ठोकून आहेत. (काही काही तर परत जातच नाहीत)तर इथल्या लोकांना त्याचा खूपच न्यूसन्स होतो. कारण हे कधीकधी अ‍ॅग्रेसिव्ह होतात. यांची विष्ठा पण खूपच प्रमाणात असते कारण ते अति चरतात. त्यांना खूप खाऊन एका झपाट्यात खूप उडून लांबचा पल्ला गाठायचा असतो म्हणून.
पण यांच्याविषयी गुगलताना ....यांची गॅस चेम्बरमधे सामूहिक हत्या करतात ....हे समजल्यावर मात्र वाईट वाट्लं.
पिंपळ्पान मस्त.

झरबेरा तू दिलेला व्हिडिओ निवांत बघीन हां!
(मांजर पिल्लोंके खेलमे अपनी पीयेच्डी हय....क्या बोलती? Wink

सरिवा, पिंपळ पानांचा फोटो मस्त आहे. पु.भा.भावेंचा एक ग्रीष्मावर लेख आहे. थोडक्यात म्हणजे रणरणत्या उन्हात जीव नकोसा होत असतो.पण पिंपळपाने त्याचवेळी तरारून उठतात अशा अर्थाचा.

सरीवा पिंपळाची पाने आहाहा.

जिप्स्या मी डिस्कव्हर सह्याद्री यांना रिक्वेस्ट केली आहे तो फोटो इथे टाकण्यासाठी.

ह्याचे नाव काय नक्की? अशा आकाराचे आमच्याकडे २-३ प्रकारचे पक्षी येतात.

आमच्या झुंबरावर पुन्हा बुलबुलने घरट करायला सुरुवात केली आहे. आज मी सकाळी फोटो काढण्यासाठी झुम केले तर मला प्रत्यक्ष बुलबुल घरट विणताना पहायला मिळाल. मला फार नवल वाटल त्या एवढ्याशा पक्षाच्या कलाकारीच. नारळाच्या झावळीच्या सुरुवातीला जी गोणपाटासारखी जाळी असते त्यातील एक एक काडी आणून हा पक्षी चोचीने घरटे विणत होता. आज पाव भाग झाला पण. उद्या व्हिडीओ काढण्याचा प्रयत्न करेन. पण अशाने ते घरटे बांधायचे नाहीत अशीही शंका येते.

कैर्‍या घ्या.




माझ्या चालण्याच्या रस्त्यावरचे झाडांचे ़ खराटे आता दुतर्फा बहरायला लागलेत.

मला ना इथली सगळी फुले ह्सत आहेत असे वाटत असते. हसू शकणारा प्राणी अशी माणसाची व्याख्या मी वाचली होती. ( फ्रोझन प्लॅनेटमधे अस्वले हसताना दाखवली आहेत. ) सुंदर हास्य बघितले तर ती व्य्क्ती आवडून जाते... मधुबाल, लिना चंदावरकर, जुही चावला अशी नावे वाचली तरी आधी आठवतो तो त्यांचा हसरा चेहरा.

आणि दात जर सुंदर असतील तरे हास्य जास्तच खुलते ( मुद्दाम रणवीर सिंगचे हास्य बघा. )
पण हास्य आणि दात यांचा काय संबंध आहे ?

मानवाला भाषेपुर्वी हास्य करता आले हे तर निश्चित्त. त्या काळात मानवाकडे दात हे एक अस्त्र होते. नखे आणि हातपाय यांच्यापेक्षा ते प्रभावी होते. शिजवण्याची कला शिकण्यापुर्वी तर अन्न चावण्यासाठी दात आवश्य्क होते.

म्हणजे एखाद्यावर हल्ला कराय च्या आ धी दात दाखवायलाच हवेत. पण तसे दात दाख वूनही हल्ला केला नाही
याचाच्च अर्थ मी तूला खाउ शकलो असतो पण खात नाही कारण तू मला priy ahes, aavDatos / aavaDates vagaire vagaire Happy ( sandarBh : Carl Sagan )

PimpaL paanaache phoTo mastach aalet.

jyaanchyaa ghree maajare aahet tyaanee he nirixaN jarun karaa. jyaaveLee don maanjaree ekamekaanshee bhaanDataa, tyaaveLee nusata aavaajach faar asato. kadaachit javaL yeNehee TaaLale jaate. agadeech hataapayee (ki paayaapaayee )
jhaalee tar jaraa japunach kelee jate. thoDyaafaar jakhamaa hotaatahee paN tyaa
jeevagheNyaa nasataat karaN jeev gheNe haa hetu nastoch mule. ang aaNi shepaTee fugavun aapaN kittee moThe aahot tech daakhavayache asate.

pN hech jar ekhaadhee shikaar karaayachee asel, ma tee kaalpanik kaa asenaa, paN aavaaj agadeech band asato. angaavarache kes angaabarobar taaNUn dharalele. paavlehee japun Taakalee jaataat. sarv lax tyaa bhaXyaavar. paavalanchaahee aavaaj kelaa jat naahee. agadee shevaTachyaa Tappyaat nemakee uDee, achuk nem dharun panjaa aaNi jaaDaa.. kaaraN hetu khunasheech asato..

he sagaLe shikayala tyaalaa baRyaach piDhyaa kharch karaavyaa laagalyaa aahet.

( malaa aajakaal maayboli var maraaThi type karataach yet naahee Sad )

Pages