निसर्गाच्या गप्पा (भाग १८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 March, 2014 - 07:34

निसर्गाच्या गप्पांच्या १८ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील फोटो दिनेशदांकडून.

रखरखीत उन्हाला सुरूवात झाली आहे. ह्या नको वाटणार्‍या उन्हाळ्यात हव्या हव्या वाटणार्‍या चैत्रपालवीच्या पाऊलखुणा उमटू लागल्या आहेत. तिक्ष्ण सुर्यकिरणांच्या झोतात करंजाची हिरवीगार पालवी, सळसळणारी सोनेरी पिंपळाची पाने, फुललेली शाल्मली, पांगारा, गिरीपुष्प निसर्गप्रेमींसाठी तापलेल्या सूर्यही शितल भासवत आहे. सोबतीला सुट्यांचा हंगामही येत आहे तेंव्हा आपल्या कुटूंबीय, मित्रपरीवारा सोबत ह्या निसर्गाच्या उधळणीचा आनंद लुटा. तसेच उन्हाळा म्हणजे पाण्याची समस्या. पाणी जपून व आवश्यक तेवढेच वापरा, पशू, पक्षांसाठी थोडीफार पाण्याची व्यवस्था ठेवा हा संदेशही सगळीकडे पसरवूया.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो साधना मला पण तो मोगराच वाटतोये.

सरिवा कुठे रहाता आपण? कधी येऊ तिकडे? असे मुक्त बागडताना मोर दिसतात म्हणजे निव्वळ अहाहा Happy

मला पण तो मोगराच वाटतोय.
जो एस वॉव.....कॅशिया कसला मस्त फुललाय. मुंबइत कुठे कुठे आहे गुलाबी कॅशिया? जाणकारांनी सांगा म्हणजे जमवता येईल जायचे.
मानुषी, मस्त फोटो.
<<<< सरिवा कुठे रहाता आपण? कधी येऊ तिकडे? असे मुक्त बागडताना मोर दिसतात म्हणजे निव्वळ अहाहा स्मित>>>>>> +१ आता नि ग गटगला अजून एक जागा मिळाली आपल्याला.

moraanche kaay sundar phoTo aahet ? kuThale aahet ?
me ase mukt baagaDaNaare mor naaNeghaaTachaa paaythaa, govyaateel Parvaree, peDaNe,
Kolhapur saangalee rastaa yethe bghitale aahet.

गुलाबी, पांढरे जॅकरेंडा पण असतात

कुठे दिसले ग तुला?

गुलाबी टॅबेबुयाची फुले जॅकरांदासारखीच दिसतात. उन्हात ती गुलाबी फुले फिकटुन अगदी रया गेलेली पांढुरकी बनतात. सो, तु टॅबेबुयाला गुलाबी जॅकरांदा म्हणत असशील.

जिप्स्या, मलाही पाहावी लागतील ही फुले. कदाचित वायुवर्ण वगैरे सुचवले असते पण त्याची पाने लहान असतात.

साधना, असू शकतं Uhoh
माझ्या ऑफिसात दिसलं मला. तसही मला पानं फूल ओळखता येत नाहीतच Proud
मी फोटो काढुन पुन्हा तुझं डोकं खाईन Proud
त्या पक्ष्याचं काय झालं? :कमरेवर हात ठेवुन विचारणारी बाहुली:

कुठे सापडला तो पक्षी तुला? इथला नाहीय तो.

साधारण ह्या पक्षाचे पिल्लु असेल असे वाटतेय. तु दिलेला फोटो टाकते इथे रात्री.

http://farm7.staticflickr.com/6081/6049815867_46592f6297_z.jpg

गुलाबी टॅबेबुया हा बघ

http://caintaplantnursery.files.wordpress.com/2011/03/tabebuia411.jpg

आणि हा जॅकरांदा. फुले जरी थोडीफार आकाराने सारखी वाटली तरी पाने खुप वेगळी आहेत.

http://en.wikipedia.org/wiki/File:Jacaranda_mimosifolia_flowers_and_leav...

हाय राम, मृनीश तु बकुळ म्हटल्यावर मी परत जाऊन पाहिले फुल. Happy

असेही बकुळ असेल तर मी तरी पाहिले नाही कधी. पाहायला आवडेल. कोकण/मुम्बईतली बकुळफुले अगदी स्टारसारख्या आपल्या पाकळ्या टोकेरी करुन असतात. अशा गोलसर पाकळ्या नसतात त्यांना.

Happy मी पण परत एकदा जाउन पाहिले..अग आमच्या इथे तरी (हैदराबाद)झाडावरुन नुकती पडलेली बकुळ फुले अशी फ्रेश आणि गोलसर दिसतात..
आता मनीमोहोर च येउन काय तो गौप्यस्फोट करेल Happy

बकुळफुले मी बघितलेली पण टोकेरी पाकळ्या असणारी, इथे आमच्या जवळपण आहेत झाडे,त्याचीपण टोकेरी पाकळ्यांचीच आहेत.

Mobile varun direct ithe photo takta yetat ka? Majhyakade aahe bakulphulache photo.

आमच्या बकुळी नीटनेटक्या, टापटीप आहेत बाई. अशा पाकळ्या फिस्कारुन नाही बसत. नीट व्यवस्थित रांगेत लावतात पाकळ्या, मधला पाकळ्यांचा समुह मस्त त्रिकोणीच दिसेल अशी काळजी घेतात. आणि बाहेर पडण्याआधी सगळीकडे मस्त इस्त्री मारुन घेतात.

आमच्या बकुळीच आम्हाला आवडतात. कारण आम्ही टापटीपीत जगाच्या मागे आहोत. आमची कसर आमच्या बकुळी भरुन काढतात. Happy

सुदुपार. काही दिवस आलं नाही इथे की किती वाचायचं बघायचं राहून जातं.

ही पानं कसली आहेत?:

गोगलगाय पोटात पायः

नाही येत गं/ त्यचेच तर दु:ख आहे. माझ्या मोबीलवरुन पिकासाला ही लवकर अपलोड होत नाही. शेवटी मीच कंटाळून नाद सोडाते. पण त्यावरचे फोटो मात्र माझ्या गॅलरीत दिसतात.

Varsha gogalgaichya phototali ropti aahet na tuala hat lavla tar khaj yete. Khupach khaj yenari pane astat ti.

सरिवा, मोरांचे फोटो मस्त. बघायला मजा आली.
मृनिश, अभिनंदन. बकुळीचेच आहे ते फुल आणि विसावलेय ही बकुळीच्याच पानावर.

हे फूल मी झाडावरुन तोडलेले आहे. बकुळीचे झाड जनरली खूप उंच असते आणि त्याची फुलं हातानी तोडता येत नाहीत. खाली पडलेलीच फुले वेचावी लागतात. पण हे झाड असे होते की हातानी तोडता येत होती फुलं. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात आहे ते झाड. मागच्या आठ्वड्यात मी तिकडे गेले होते. मी एकच फुल तोडले.

हे फूल त्याच्या खालच्या देठासकट होतं. फूल छोट असल तरी अगदी ताज टवटवीत, गोलसर आणि सुन्दर दिसत होतं, वास ही अप्रतिम येत होता. त्यामुळे फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. हातावर फोटो काढ्ण्यापेक्षा पानावर काढला तर जास्त छान येईल असे वाटले म्हणुन मग त्याच छोटसं देठ खोचलं पानात आणि काढला फोटो. ( फोटो बहिणीने काढला आहे) नि ग वर मी शेअर केला.

धन्यवाद, तुम्ही सगळ्यांनी ह्यात इतका इंटरेस्ट घेतलात त्याबद्दल. साधना, बरोबर आहे मुंबईत ह्या आकाराची बकुळफुले नसतात. जागु, तुझी पोस्ट अणि माझी पोस्ट क्रॉस झाल्यात.

साधना, तुम्हे ऐसा नही लगता की तुम कुछ ज्यादाही स्मार्ट हो Wink
येस तो टॅबेबुया च आहे पण त्याची फुलं बघ ना जॅकरांदाला कोपी करतायेत Sad
म्हणून मला वाटलं जॅकरांदाच असेल Sad

ऑफिसमध्ये या फुलांचा सडा पडलेला दिसतो Happy
आणि खुप क्युट दिसतं ते Happy

बाकी तो पक्षी त्याला भारतातच दिसलाय. कुठे ते आज विचारते Happy

साधना, तुम्हे ऐसा नही लगता की तुम कुछ ज्यादाही स्मार्ट हो

बचपनसेही हु यार, लेकिन कोई नोटीसही नही करता, क्या करु??????????

ऑफिसमध्ये या फुलांचा सडा पडलेला दिसतो

अग ती फुले पडताना बघ. इतर फुलांसारखी बावळटपणे फांदीवरुन सुटली न जमिनीवर आदळली अशी नाहीयेत ही. अग्दी मस्त गिरकी घेत घेत खाली येतात. Happy

धन्स ग मनीमोहोर.. बरोबर आहे तुझे..इतकी सहजपणे ही फुले दिसत ही नाहित आणि हाताला ही येत नाहीत..

इथे मात्र रस्त्याच्या कडेने प्रचंड संख्येने बकूळाची झाडे आहेत..अगदी रोड डिव्हायडर वर सुद्धा आणि कमरे ईतक्या रोपानापण फुले आहेत..
आणि गंमत म्हणजे तरिही ईथे बकुळीचे गजरे मिळत नाहीत..कुणी घालतच नाही ती डोक्यात..
बहुधा अती परिचयात अवज्ञा असा प्रकार असावा..

Pages