८) जाणिवेचे झाड फोफावू द्या - Grow the Awareness!

Submitted by Mother Warrior on 1 April, 2014 - 18:29

growawareness.jpg२ एप्रिल हा 'जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे' आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा 'ऑटीझम अवेअरनेस मंथ' आहे.

लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल.

prevalence-graph1.jpgautism_stat.jpg
इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा संशोधनाचाच विषय आहे. अलिकडे ते होतही आहे. परंतू याचबरोबर आपल्याला हवे आहे भान. या डिसॉर्डरबद्दलचे भान. आजूबाजूल अशी मुलं दिसली तर त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवा. त्यांना नॉर्मल मुलांसारखंच वागवा. आपल्या मुलांबरोबर त्याच्या प्लेडेट्स अ‍ॅरेंज करा.. तसेच आपल्या मित्रपरिवारात कुणाचे मूल ऑटीझमचे सिम्प्टम्स दाखवत असेल तर प्लीज पालकांना लवकरात लवकर थोडीतरी जाणीव करून द्या. जितकं लवकरात लवकर रेड फ्लॅग्स लक्षात येतील, तितकं त्या मुलाच्या भविष्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

आणि मला हा बदल दिसतो आहे. समाज अजुन जास्त प्रगल्भ होत आहे, नक्कीच. या अवेअरनेस मंथच्या निमित्ताने तुम्ही दाखवत असलेल्या आधाराबद्दल, आमच्या मुलांना आपल्यात सामावून घेतल्याबद्दल मी सर्व ऑटीझम कम्युनिटीकडून तुमचे आभार मानते.
आम्हाला इतकंच हवं आहे, अवेअरनेस. आपुलकी. आत्मियता. बस्स.

ceeda7d28db6a978937cae927e7edc64.jpgc88bc102642ba2316e2042daadabf6f2.jpghttp://marathi.journeywithautism.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>आम्हाला इतकंच हवं आहे, अवेअरनेस. आपुलकी. आत्मियता.
तुमच्या लेखांमुळे अवेअरनेस वाढायला खूप मदत झाली. ऑटिझमबद्दल समज वाढली की ही अशी वेगळी ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या व्यक्तींबद्दल त्रागा, वैताग नाहिसा होऊन आपुलकी, आत्मियता नक्की वाढेल.

पहिल्या चित्रातला सीम्बलिझम अफाट सुंदर आहे!

खरेच तुमच्या लेखनामुळे फक्त अवेरनेस वाढत नाहीये तर एक परिस्थिती स्वीकारण्यातील व त्यातून ती सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि ह्यासाठी लागणारा positive attitude पण लोकांपर्यंत पोहचतो आहे .
त्यामुळे तुमच्या लेखातून ह्याबाबतीत माहिती तर मिळतेच तसेच स्वमग्न पालकांना समुपदेशन पण नक्कीच होत असेल.

खरेच तुमच्या लेखनामुळे फक्त अवेरनेस वाढत नाहीये तर एक परिस्थिती स्वीकारण्यातील व त्यातून ती सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि ह्यासाठी लागणारा positive attitude पण लोकांपर्यंत पोहचतो आहे .>>>> +१००..

ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८ >>>> याची काही प्रॉबेबल कारणे दिलेली आहेत का कुठे ??

शेवटुन दुसरे कार्ड प्रचंड आवडले.

पण या वाढीचा 'रेट' भयावह आहे. अगदी स्केअरी... पण कदाचित सध्या रिपोर्टींग / आयडेंटीफिकेशन आणि रेकॉर्ड अगोदर पेक्षा चांगले आहे त्याचा काहि हात्भार आहे का ही वाढ जाणवण्यामधे?

(तसं बघायला गेलं तर गेल्या दहा वर्षात सगळीकडे एक्स्ट्रीमली चेंज झालेली एक गोष्ट म्हणजे :प्रचंड वाढलेला स्टेस फॅक्टर आणि वाढलेले प्रदूषण. )

खरेच तुमच्या लेखनामुळे फक्त अवेरनेस वाढत नाहीये तर एक परिस्थिती स्वीकारण्यातील व त्यातून ती सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि ह्यासाठी लागणारा positive attitude पण लोकांपर्यंत पोहचतो आहे . >> +१

जागृती चालू आहे ही समाधानाची बाब आहे. आजच म टा मधे प्रसन्न ऑटिझम सेंटर च्या पद्मजा गोडबोले यांची मुलाखत आली आहे http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/meditation/artic...

मागच्या आठवड्यामधे ऊसगावात याबद्दल वाचले,
त्यात वाढत्या संखेबद्दल पालकाचे मुलाच्या जन्मावेळचे वय आणि गर्भारपणातील निष्कालजी पणा हि कारणे दिली होती.
ही कारणे फक्त वाढत्या संखे बद्दल आहेत् ,फक्त याच कारणांमुळेच ऑटिजम होतो असे नाहि.

सर्वांचे मनःपूर्वक आभार!

meeradha , मला माहीत आहे तुम्ही जनरल लिहीले आहे.. तरीही मी लिहीते. तुम्ही लिहीलेले कारण काही माझ्याबाबतीत खरे नाही. तुम्ही हे कुठे वाचले? मी मध्ये असेही वाचले लोकांकडून की ऑटीझम आई अ‍ॅनिमिक असल्याने होतो. ही सगळी कारणं मला खोटी/ अफवेसारखी वाटतात. मी थोडी स्पष्ट बोलतीय, कारण आम्ही तळहातावरच्या फोडासारखं जपलं आहे प्रेग्नन्सीपासून मुलाला. सर्व मेडीकल रेकॉर्ड्स, इम्युनायझेन्स जेजे काही करणं अपेक्षित असतं त्याच्या कांकणभर जास्तच केले आहे. त्यामुळेच ऑटीझमची मिस्टरी आम्हाला जास्त जाणवते. ऑटीझमची कारणं आम्ही २-३ वर्षं शोधतो आहोत. कशामुळे झाले असेल इत्यादी. अर्थात आता तो नाद सोडला. कारण, कारण काहीही असले तरी रिझल्ट्स काही बदलणार नाही आहेत. परंतू अशी वाक्यं वाचली की जरा तुटतं आतमध्ये.

निवांत पाटील, तुम्ही म्हणता ते मात्र खरे आहे. स्ट्रेस, पोल्युशन हे नक्कीच जबाबदार आहेत. ऑटीझमच्या कॉझेस मध्ये एन्वायर्नमेंटल व जेनेटीक अशी कारणं सांगतात. किती पेस्टीसाईड्स असतात आपण खातो त्या भाज्यांवर! ऑर्गॅनिक खाणे किंवा शेतात भाज्या पिकवणे हाच उपाय दिसतोय. ह्यावर भरपूर आहे लिहीण्यासारखे!

फार चांगला लेख स्वमग्नता. मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पेस्टिसाईड्स हे अ‍ॅटिझम , फुड अ‍ॅलर्जीज वगैरे वाढण्याच एक कारण आहे अस म्हटल जात. नक्की लिहा यावर. वाचायला खूप आवडेल.

http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/24577047

मीराधा म्हणतात त्यात तथ्य आहे. वरील लिंक बघा. स्वमग्नता, पूर्वी कारणे शोधण्याची आपली धडपड सहाजिक आहे आणि तो पालकत्वाच्या प्रवासातील एक टप्पा होता. तिथून पुढे निघालात हे चांगले झाले. पण मीराधा सारखे कुणी जर अजून शास्त्रीय कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करीत असेल तर संदर्भ विचारावा. संदर्भ मिळण्याआधीच अफवा किंवा खोटे ठरवण्याची घाई नसावी. तुम्ही तुमच्या अपत्याच्या संगोपनासाठी परिश्रम घेतले, घेताय ह्याबद्दल सगळ्यांना निश्चितच आनंद आहे.

सिमन्तिनी, पॅटर्नल एज , मुलाच्या जन्माच्या वेळेस हे कारण मी ही वाचले आहे. मी वरील प्रतिसाद मुख्यत्वेकरून गर्भारपणातील निष्काळजी यावरच लिहीले आहे.

मी अफवा शब्द वापरला तेव्हा मला इतकेच म्हणायचे होते, की असं वाचून घाबरायला होते. एखादे पालक अजुन भांबावलेले असतील तर फार त्रास होतो. मला नाही सांगता येणार माझ्या भावना. मी त्या फेज मधून गेले आहे. मी प्रेग्नन्ट असताना प्रीनॅटल घ्यायला नको होते का? माझ्या दातातील मर्क्युरी फिलिंग मुळे मुलाकडे मर्क्युरी गेले का? तो लहान असताना फ्लोराईड वालं पाणी आणून दिले होते कधीतरी, त्याने काही प्रॉब्लेम झाला का? एक न दोन, हजार शंका असतात. बर्‍याचदा काही बाबतींबद्दल आपण काही करूही शकत नाही.उदा: पालकांचे वय इत्यादी.
परंतू पेस्टीसाईड्स टाळणं आपल्या हातात आहे. अशा गोष्टींवर जास्त फोकस ठेऊन प्रिव्हेन्ट कसं करता येईल ते कदाचित बघता येईल.

माझा मुद्दा हा आहे की, अवेअरनेस वाढवताना भिती नको वाढायला. प्रत्येक बाबतीत जाणीवपूर्वक पाऊल उचलणे हे गरजेचे आहे. (आय होप, मी फार कन्फ्युज्ड नाही लिहीलेले).

जिज्ञासा ही मानवाला / किंबहुना प्राणिमात्राला मिळालेली देणगीच आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याचे अ‍ॅनॅलिसेस करणे त्यातुन ते का झाले याचा शोध घेणे हे निरंतर चालु असते. पण त्याला शास्त्रिय बैठक मिळते तेंव्हा ते युनिवर्सल बनते. वरचा ग्राफ बघितल्यावर माझ्या डोक्यात एक विचार आला तो म्हणजे नेमक काय बदलल आहे गेल्या १० वर्षात तर स्ट्रेस आणि प्रदूषण. म्ह्णुन ते माझ्याकडुन खाली कंसात लिहल गेलं. यातल्या कोणत्याही गोष्टीतला मला ओ कि ठो कळत नव्हता/ नाही. ऑटीझम हा शब्द मी अच्युत गोडबोलेंच्या व्याख्यानात पहिल्य्यांदा ऐकला. पण तरीही वरचे वाक्य लिहले गेले. पण वरचा लेखिकेचा प्रतिसाद वाचल्यावर आपण ते लिहायला नको पाहिजे होते असे प्रक्र्षाने वाटले.
कारण

संदर्भ मिळण्याआधीच अफवा किंवा खोटे ठरवण्याची घाई नसावी. >>> हे जेवढे खरे आहे तेवढेच संदर्भ मिळण्याआधीच त्याची कारणे फायन्ल करणे हे देखिल चुकिचे आहे.

र्भारपणातील निष्कालजी पणा हे नेमके कारण आहे कि ठपका असा प्रश्न यातुन जाणार्‍या पालकांना पडु शकतो.

पित्याचे किंवा मातेचे वय हा जर महत्वाचा फॅक्टर असेल तर ऑटिझमचे प्रमाण १९व्या, शतकात , विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात लक्षणीय असायला हवे होते. घरोघरी आठ दहा मुले सह्ज असायच्या काळात स्त्रियांना रजोनिवृत्तीपर्यंत अन पुरुषांना उतारवयात मुले होण्याचे प्रमान नक्कीच लक्षणीय असणार.

>>खरेच तुमच्या लेखनामुळे फक्त अवेरनेस वाढत नाहीये तर एक परिस्थिती स्वीकारण्यातील व त्यातून ती सुधारण्यासाठी तुमचे प्रयत्न आणि ह्यासाठी लागणारा positive attitude पण लोकांपर्यंत पोहचतो आहे .>> +१

मृण्मयी, लिंकसाठी धन्यवाद!

मेधा, अगदी बरोबर मुद्दा आहे तुमचा! Happy

निवांत पाटील, मला उलट तुमचा मुद्दा पूर्णपणे पटला आहे. तुम्ही जे म्हणता आहात ते खरे आहे. गेल्या दहा वर्षात किती बदल झाले आहेत आपल्या आजूबाजूला. स्ट्रेस वाढला आहे, इटींग हॅबिट्स बदलल्या आहेत. नक्कीच हे कारण असणार. (आहेच).

मृण्मयी, त्या लिंकसाठी धन्यवाद. ६८ लोकांची वाक्यं हा इंटरेस्टींग प्रोजेक्ट आहे. प्रत्येक पालकांनी सांगितलेला शब्द न शब्द खरा आहे तो. ऑटीझमला इतके आयाम आहेत ना, की खरंच लिहावं तितकं कमी आहे.

सर्वांच्या प्रतिसादासाठी धन्यवाद!

मेधा बरोब्बर मुद्दा पण त्या लोकांचे दुर्दैव की अमेरिकेत Autism शब्द/ वैद्यकीय निदान १९४० साली पहिल्यांदा वापरला गेला. भारतात कधी सुरुवात झाली ते माहित नाही. त्यामुळे कुणाला हे वैद्यकीय निदान त्यापूर्वी दिले गेले नाही.

मी लिहलेल्या वाक्यातुन ठपका सुचवने अजिबात नाही....मी फक्त न्यु यॉर्क मधे मागच्या आठ्वड्यामधे माझ्या कार्यालयात दिलेल्या पत्रकात वाचले...दुर्दैवाने त्या सेमिनारला मी उपस्थित नाहि राहु शकले...

मी लिहलेल्या वाक्याने तुम्हाला मी दुखावले आहे म्हणुन मी मनापासुन माफि मागते...
कुणालाहि दुखवावे असा माझा खरच हेतु नव्हता...

मलाहि ही जाणीव आहे कि ऑतिजम ला याशिवाय हि खुप ज्ञात व अज्ञात कारणे आहेत्,जी या वाढ्त्या सन्खेलाहि कारणीभुत आहेत.

परत एकदा..क्षमस्व!

काल च्या सकाळ मधे वाचले कि पिम्पले सौदागर मधे एक ऑटिझम सेंटर सुरु केले आहे. डिटेल्स दिली नव्हती त्या बातमीत...

I hope and pray the scientists find out the cause of this autism so that more children can be saved from this tough life..
My best regards to you – warrior mom !!

जाणिवेचे झाड सुंदर.

मेधाचा मुद्दा बिनतोड आहे. मला वाटते आता निदान होऊ शकते आहे म्हणून संख्या वाढते आहे असे वाटत असावे. चिनूक्सने दिलेला गार्डियनमधला लेख हेच दर्शवतो. (त्या लेखकाचे ऑटिझमचे निदान व्हायला त्याची तिशी उलटून गेली, तोवर सगळ्यांनी त्याला खडूस, माणुसघाणा, लहरी ठरवले होते.)

पित्याचे आणि मातेचे वय हा फॅक्टर बर्‍याचदा चर्चेत येतो. त्याबद्दल मध्यंतरी कुठेतरी वाचले त्या नुसार वय जास्त असेल तर जीन म्युटेट होण्याचा चान्स अधिक असे काहीतरी होते. पूर्वीच्या काळी अगदी ५०+ ला शेवटचे मूल होणे हे सर्रास होते. अशावेळी पूर्वी कदाचित प्रदुषण आणि इतर अनेक ट्रीगर्स नसल्याने हे म्युटेशन होत नसावे असे काही असावे का? किंवा अशा मुलांच्या बाबतीत ऑटिझम ऐवजी काहीतरी दुसरेच निदान होत असावे.

तुमच्या लेखनाने जाणीवजागृती तर झालीच. नक्कीच!

आपल्या मित्रपरिवारात एखाद्या मुलात अशी लक्षणं दिसून आली, तर त्याच्या पालकांना लवकरात लवकर त्याची जाणीव करून द्या >>>

तुमचा मुद्दा अगदी योग्यच आहे. पण माझी एक मानसशास्त्रज्ञ मैत्रीण आहे, (गेली २० वर्षं स्पेशल चिल्ड्रनसाठीच काम करते) तिला या बाबतीत काही कटू अनुभव आलेले आहेत. त्या व्यवसायात असल्याने अशी काही मुलं दिसली, तर तिला त्यांच्यातली लक्षणं फार लवकर जाणवतात. पूर्वी ती तळमळीनं पालकांना सांगायला जायची. त्यावर अनेकदा पालकांकडून तिचा थेट तोंडावर अपमान केला गेला. (आमच्या घरगुती गोष्टींत नाक खुपसायचं कारण नाही वगैरे..:( )
असे काही अनुभव आल्यानंतर आता ती नाईलाजास्तव गप्प बसते. आपल्याकडे जे मूल उपचारार्थ येईल त्याच्यावर झोकून देऊन काम करायचं एवढीच खूणगाठ आता तिनं मनाशी बांधली आहे. Sad
एका मानसशास्त्रज्ञावरच ही वेळ येते, तर इतरांचं तर काही विचारायलाच नको Sad

७ एप्रिलला चिलीजमधे गेला तर तुमच्या बिलाचे १०% नॅशनल ऑटिझम असोसिएशनला मिळणार.

चिलीजला हे करण्यामागची प्रेरणा: स्टोरी ऑफ अ ब्रोकन चीजबर्गर.

chillisnaahelp.jpg

Pages