८) जाणिवेचे झाड फोफावू द्या - Grow the Awareness!

Submitted by Mother Warrior on 1 April, 2014 - 18:29

growawareness.jpg२ एप्रिल हा 'जागतिक ऑटीझम अवेअरनेस डे' आहे, तर पूर्ण एप्रिल महिना हा 'ऑटीझम अवेअरनेस मंथ' आहे.

लोकहो, अलिकडेच सीडीसीने ऑटीझमचा नवा प्रीव्हॅलंस रेट प्रकाशित केला तो आहे १:६८. म्हणजे ६८ पैकी एका मुलाला ऑटीझम होतो. यापूर्वीचा रेट १:८८ होता. खालील ग्राफ पाहील्यास फारच भीतीदायक माहीती दृष्टीस पडेल.

prevalence-graph1.jpgautism_stat.jpg
इतके जास्त प्रमाण का वाढत आहे हा संशोधनाचाच विषय आहे. अलिकडे ते होतही आहे. परंतू याचबरोबर आपल्याला हवे आहे भान. या डिसॉर्डरबद्दलचे भान. आजूबाजूल अशी मुलं दिसली तर त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवा. त्यांना नॉर्मल मुलांसारखंच वागवा. आपल्या मुलांबरोबर त्याच्या प्लेडेट्स अ‍ॅरेंज करा.. तसेच आपल्या मित्रपरिवारात कुणाचे मूल ऑटीझमचे सिम्प्टम्स दाखवत असेल तर प्लीज पालकांना लवकरात लवकर थोडीतरी जाणीव करून द्या. जितकं लवकरात लवकर रेड फ्लॅग्स लक्षात येतील, तितकं त्या मुलाच्या भविष्यावर चांगला परिणाम दिसून येईल.

आणि मला हा बदल दिसतो आहे. समाज अजुन जास्त प्रगल्भ होत आहे, नक्कीच. या अवेअरनेस मंथच्या निमित्ताने तुम्ही दाखवत असलेल्या आधाराबद्दल, आमच्या मुलांना आपल्यात सामावून घेतल्याबद्दल मी सर्व ऑटीझम कम्युनिटीकडून तुमचे आभार मानते.
आम्हाला इतकंच हवं आहे, अवेअरनेस. आपुलकी. आत्मियता. बस्स.

ceeda7d28db6a978937cae927e7edc64.jpgc88bc102642ba2316e2042daadabf6f2.jpghttp://marathi.journeywithautism.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृण्मयी तुम्ही खरंच अवेअरनेस वाढवत आहात. ही देखील लिंक छान. थॅंक्स.

ललिता-प्रीति, तुमचे निरिक्षण अगदी बरोबर आहे. आम्हीही थोड्या प्रमाणात असेच वागलो होतो.
म्हणूनच पालाकांसाठी अवेअरनेस व प्रोअ‍ॅक्टीव्हनेस फार गरजेचा आहे. इथे तर काही पालकांचे अनुभव मी वाचले आहेत, डॉ. अजुन काही काळ थांबा म्हणत असताना पालकांनी गप्प न बसता अ‍ॅसेसमेंट करून घेतली. आम्ही तसे नाही केले.आही थांबलो २ वर्षापर्यंत. असो..

परत थँक्स!

जगात Autism चे प्रमाण वाढत आहे ह्याबद्दल दुमत नाही पण हा अमेरिकेतील ग्राफ लक्षात घेताना Autism साठीचे Insurance Coverage आणि औषधीनिर्मिती ह्या सारखे घटकपण लक्षात घेतले पाहिजेत. जर Autism साठी Insurance Coverage नसेल तर डॉक्टर हे निदान पटकन आपल्या पेशण्टला देणार नाहीत. इतर देश जिथे सरकारी वैद्यकीय सुविधा आहेत तिथेहि Autism चे प्रमाण वाढत आहे पण ती वाढ इतकी लक्षणीय नाही.

वाह!!! खूपचं छान लिहिलं आहे सर्वांनी. अगदी मनापासून आवडलं हे वाचन! धन्यवाद.

स्व. ए.: तुला मी मागे लिहिले होते की माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आठवी नववीत गेला तेंव्हा तो ऑटीझममधून बाहेर पडला. त्याला सर्वांनी सामावून घेतले. दोन्ही पालक मुलाला घेऊन सोबत यायचे. कधीच त्यांनी आपला मुलगा ऑटीझम आहे असे दर्शवले नाही. आमचे मंडळ इतके छान आहे की लोक एकमेकांना सामावून आणि समजवून घेत असतात.

तुला मी मागे लिहिले होते की माझ्या एका मैत्रिणीचा मुलगा आठवी नववीत गेला तेंव्हा तो ऑटीझममधून बाहेर पडला.
>>
असं ही होतं?
मग ग्रेटच Happy
सगळ्या पिल्लांचं असंच होवो Happy

.... प्रदुषण, स्पर्धा, सबुरीचा अभाव हे तिन घटक बर्‍याच मानसिक विकारांना जन्माला घालत आहेत, शहरातिल गर्दी, वाढलेले कामाचे तास, यामुळे पालकांना मुलांना हवा तेवढा वेळ देता येत नाही. मी अच्चुत गोडबोले यांचे पुस्तक वाचेले तेव्हा माझ्या लक्षात आले की आपण नको तेवढ्या स्पर्धेत उतरत आहोत.
.... जाणिवेचे झाड खुपच छान आहे.

बी, ऑटीझम मधून बाहेर पडला म्हण्जे काय? डॉक्टरांनी अ‍ॅसेसमेंट करून सांगित्ले का तसे? हे असं होणं बरंच दुर्मिळ आहे. बर्याच मुलांच्याबाब्तीत थोडं स्पीच सुरू झालेले ऐकले आहे. परंतू ऑटीझमबरोबर येणारे इतर बरेच सिम्प्टम्प्स सहज जात नाहीत. कृपया त्या कुटुंबाशी बोलून नीट माहीती द्याल का?

Pages