झी मराठी - सा रे ग म प - सूर नव्या युगाचा

Submitted by मंजूडी on 28 January, 2014 - 02:02

झी मराठी वाहिनीवर सा रे ग म पचे नवे पर्व सुरू झाले आहे - सूर नव्या युगाचा!

यावेळी फक्त १४ स्पर्धक निवडून ही स्पर्धा चालू केलेली आहे -
महेश कंटे, श्रीनिधी घटाटे, कौशिक देशपांडे, जयंत पानसरे, भाग्यश्री टिकले, जुईली जोगळेकर, मनोज क्षिरसागर, रसिका गानू, संज्योती जगदाळे, प्रल्हाद जाधव, शंकर गिरी, मृण्मयी पाठक, रेश्मा कुलकर्णी, गणेश मेस्त्री

परीक्षक आहेत अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशी, तर सूत्रसंचालन करतोय अभिजीत खांडकेकर.

दर सोमवार आणि मंगळवार रात्री साडेनऊ ते साडेदहा झी मराठी वाहिनीवर - "सा रे ग म प - सूर नव्या युगाचा"

पुनःप्रक्षेपण - मंगळवार आणि बुधवार दुपारी चार वाजता आणि शनिवारी रात्री साडेनऊ वाजता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुलू,
>>'पधारो म्हारे देस' हे वाक्य ऐकताना अंगावर काटा उभा राहिला हवा..
जे ब्बात ! असा अंगावर काटा यायला सूर त्या ताकदीचे पाहिजेत.
आणि तुम्ही म्हणालात तसे-
>>मुळात मला ही मुलं तितकीशी talented वाटत नाहियेत. चांगली आहेत, वाद नाही पण अजून उत्तम मिळू शकली >>असती. निवड नक्कीच चुकलीये. त्यातून त्यांची गाणी इतक्या आठवड्यांनंतरही मनावर ठसत नाहीत म्हणजे >>मेहेनतही कमी पडतेय.
हे तर अगदीच पटलं.

तरीही एक वेडी आशा असते की एखादे तरी छान सुराला धरून आणि त्या गाण्याच्या भावनांना पूर्ण वाव देणारं असं ऐकायला मिळेल. म्हणून पटत नसूनही हा कार्यक्रम बघतो झालं.

'पधारो म्हारे देस' हे वाक्य ऐकताना अंगावर काटा उभा राहिला हवा.. दुर्दैवाने तसे झाले नाही.. म्हणून लेखनालाप!>>> पण 'लेकिन'मधल्या 'केसरीया बालमा' गाण्यात 'पधारो म्हारे देस' कुठे आहे? Uhoh

रेश्मा? लता मंगेशकर! >>> 'केसरीया बालमा' हे गाणे 'लेकिन' सिनेमात लता मंगेशकर यांनी गायले आहे, ते गाणे झी मराठी सारेगमपमधे रेश्मा कुलकर्णीने सादर केले त्याबद्द्ल आम्ही बोलत होतो.

मंजूडी, मला क्षमा करा, तुम्हाला उद्देशून नव्हते. जे कोण 'कट्यार' कुलकर्णी च्या केसरीयावर खूष झालेत त्यानी एकदा वर सांगितलेल्यांचे मांड ऐकावेत आणि मग मत बनवावीत हा उद्देश सांगण्यामागे. नाहीतर, अश्वत्थाम्याच्या दुधासारखे व्हायचे. जे आपण आता ऐकतोय तेच सर्वोत्तम वाटायला लागते.>>> मला वाटतं अस्सल आणि नक्कल यामधला फरक जाणण्याइतपत इथले सगळे श्रोते सुजाण आहेत.

मचं म्हणणं बरोबरच आहे पण मी स्पर्धकांची तुलना करतच नव्हतो. मी ऐकणार्यांची तुलना करत होतो. स्मित
खरं सांगायचं तर, "तुलना, स्पर्धा करू नये, स्वतःशीच करावी" हा नियम असामान्य कलाकारापुरताच खरा असतो. आपल्या सारख्या सामान्यांनी सतत असामान्य लोकांशी तुलना करत आपापली क्षेत्रं उंचावत राहिलं पाहिजे.- माझे मत. मग ते गाणारे असोत किंवा ऐकणारे! >>> बरं!

बाकी आपल्याला फारच एडिट होऊन परिक्षकांचे प्रतिसाद दिसतात प्रत्यक्षात दोघेही परिक्षाक प्रत्येक गायकाला इन डिटेल काय चुकलं काय आवडलं काय असायला हवं होतं हेनीत्ट समजवतात.... एडिट्मध्ये मात्र नेमक्या सुमार त्याच त्याच "तोडलंस फोडलेस" सारख्या प्रतिक्रिया दाखवल्याने फक्त टीव्हीवर पाहणार्‍या श्रोत्यांचा गैरसमज होणंह्की हे नक्की काय चाललय परिक्षकांचे असं वाटणं स्वाभाविक आहे..... पण परिक्षक खूपच डिटेल्ड परिक्षण करतात प्रत्यक्षात.>>> भुंग्या, बरं वाटल रे वाचून Happy

पण परिक्षक खूपच डिटेल्ड परिक्षण करतात >>> पूर्वी जेंव्हा पर्व वगैरे नव्हती (हिंदी सारेगममध्ये) तेंव्हा पण अगदी मोजकीच वाक्य दाखवायचे परीक्षकांची. पण ती अगदी अचूक असत. मराठी कार्यक्रमातही देवकी पंडीत 'पण.....' नंतर जे काही सांगायच्या ते अत्यंत मार्मिक असायचे. त्यातून गायकांना तर शिकता यायचेच पण आमच्यासारख्या कानसेनांना पण शिकता यायचे. आता तसे का नाही होत / दाखवत?

महेश कंटेने काल एकदम आश्चर्यकारक धक्का दिला Happy
रेश्माचं गाणं नेहमीप्रमाणेच छान, आणि संज्योतीनंतर दाखवल्याने आणखीनच जास्त आवडलं.

हो... त्याने गाणं चांगलं म्हटलं पण ते दोन 'नी' त्याला मिळाले की ते गाणं कौशल-कमलेशचं होतं म्हणून दिले कोणास ठाऊक Wink

अरे देवा! काल मी सारेगमप बघितले नाही. कालच्या एपिसोडपद्धल काही कळेल म्हणुन इथे आले तर इथेही काहीच नविन माहिती नाही! कदाचित काल माझ्यासारख्या सगळ्या माबोकरांनी सारेगमप बघितले नसावे! खरचं सारेगमप आणि या बीबीचा टीआरपी घसरलाय!

सारिका,
काल मी पहिली ३ गाणी ऐकली.
काल सतारवादक श्री रवि चारी आणि सरोदवादक सारंग कुलकर्णी पाहुणे वादक म्हणून आले होते.

रेश्मा कुलकर्णीने कोणते तरी हिंदी गाणे म्हटले. गाणे आठवत नाहिये, पण ठीकठाक झाले.
ती नेहमीच अर्धा स्वर वरच्या पट्टीत गाते असं मला वाटतं. त्यामुळे तिचे वरचे सूर चिरके लागतात. अर्धा सूर जरी खाली करून ती गायिली तर अजून बरे वाटेल असे मला वाटते.

त्यानंतर गणेश मेस्त्रीने झन झननन छेडिल्या तारा गायिले. (बहुतेक सतार आहे त्यात म्हणून घेतले असावे हे गाणे)
चांगले म्हटले त्यानेही.

नंतर कोल्हापूरच्या प्रल्हाद जाधवने भीमराव पांचाळेंची गझल गायिली.
अंदाज आरशाचा वाटे खरा असावा |
गझलची सुरुवात काहीशी अ‍ॅब्रप्ट वाटली, पण अंतरा त्याने फार छान गायिला.
जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला. ह्यातला जखमा हा शब्द त्याने खरंच छान आळवला.
||इति शम् ||

येस्स, बरखा बहार आई..
म्हणे हे गाणे ऐकले (रात्री झोपताना) तर सकाळी पोट ओक्के Proud (इति बा.तां)
म्हणजे शारंगधर सुखसारक वटीलाही रामराम Proud Proud

प्रत्येक भागात एक तरी हिंदी गाणं पाहिजेच, असा अट्टाहास का असतो या कार्यक्रमात ?????
मराठी मध्ये पुरेशी गाणी नाहियेत असं वाटतं का झी मराठी चॅनलला ?????????

अंजली,
हो रस्मे उल्फत बरंच पेललं म्हणायचं जुइलीला.
पण तरीही उल्फत मधल्या फ चा उच्चार अजून नीट यायला हवा होता असे वाटले (वै. मत)

कालही ड्युएट चांगलं म्हटलं तिने. गोमु संगतीनं..
काल तेवढंच ऐकलं. बाकीचं काही नाही.
कोण बाहेर गेलं काल?

गोमु संगतीनं मधली सगळ्यात वाईट चूक केली की पण काल... शेवटच्या कडव्यात नाचायच्या नादात हाय म्हणायच्या ऐवजी नाय म्हणाली...

पण गायकांनी परफॉमर असलेच पाहिजे का?
ते गिरकी घेताना हाय चे नाय झाले. गाण्याचे सार काय राहिले मग?
मला नाही पटत ते.

हो ना... हे मतदारांनी लक्षात घ्यावे झाले >>>:हाहा:

जुईलीच्या बाबतीत पहिल्यापासून झुकतं माप दिलंय. काय विशेष आहे त्यात? ती सराईत स्टेज शो करणारीच वाटते मला कायम.

गोमु संगतीनं मध्ये आणखीन एक चूक माझ्या कानांनी टिपली .. (का?)

गं तुजं टपोरं डोलं
जसं कोल्याचं जालं ( तो इथंच झालं म्हणाला Proud )

माझं कालीज भोलं
त्यात मासोली झालं...

काल मी फक्त रेश्माचे गाणे ऐकले, कसली कमाल गायली ती... अश्या मूडच गाणं मला वाटतं पहिल्यांदाच गायली ती. मला खूपच आवडलं.
जयंतने कुठलं गाणं गायलं?

रेशमा काल खूपच नाकात आणि वेगळ्याच प्रकारे गात होती. मला तर मधेमधे तिचे शब्दच कळत नव्हते. Uhoh

कंटेबुवा, मागेच गायलेले 'गुंतता हृदय हे' गायले. त्याचे ते होमपिच होते त्यामुळे चांगलेच झाले गाणे. पण जयंतचे गाणे त्याच्याहून खूप सुंदर झाले.

मी काल फक्त जुइलीचं 'तरुण आहे रात्र अजूनी' ऐकलं. मला तरी चांगलं वाटलं ऐकायला. पण परिक्षक नाखुश होते Uhoh ते गाणं मुळात अवघड आहे. जुइलीने सगळ्या जागा/ ताना तिच्यापरीने व्यवस्थित गायल्या होत्या खरंतर.

फेअर & लव्हली प्रायोजक आहेत म्हणून त्यांनी त्या मुलींना त्याची काय जाहिरात करायला लावलेय त्यात. बकवास कल्पना. काय वाट्टेल ते करायला लावतात

Pages