ज्योतिष्य, भविष्य, पत्रिका

Submitted by admin on 6 April, 2008 - 21:34

मंडळी, हा public forum आहे. तेव्हा इथे स्वतःच्या जन्मतारखा, जन्मवेळा, पत्रिका वगैरे पोस्ट करताना आधी विचार करा. कुणी त्याचा दुरुपयोग करणार करु शकेल ही शक्यता गृहित धरुन जे काही पोस्ट करायचं ते करा. असा दुरुपयोग झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्तीची असेल. मायबोली व्यवस्थापन अथवा मायबोली त्याबाबतीत काही करु शकत नाही. तेव्हा ज्याने त्याने आपापल्या जबाबदारीवर आणि योग्य ती काळजी घेऊनच पत्रिका आणि तत्सम माहिती इथे पोस्ट करावी ही सूचना वजा विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

suhasg , मी अमेरिकेत असताना तिकडे एक' Long Island Medium ' नावाचा show लागायचा कदाचित तुम्हाला ह्या show विषयी माहित असेल. त्यात जे दाखवायचे ते खरे असू शकते का? असे असेल तर त्या व्यक्तीचा नेपच्यून शी सबंध असेल का? show विषयी माहिती google / youtube वर मिळेल .

अन्वीता:

मला त्या शो बद्द्ल फारशी माहीती नाही, पण त्या धर्ती वरचे बरेच काही बघितले आहे, वाचले आहे. अनुभव घेतला आहे.
याच्या जवळपास जाणा-या विषया वरची दोन पुस्तकें माझ्या संग्रहात आहेत.

१> Seth Speaks
2>The Nature of Personal Reality

दोन्ही पुस्तके जेन रॉबर्टस या लेखिकेनी लिहली आहे (वस्तुत: तिच्या हातुन लिहवण्यात आली आहेत!)

ओघानेच आठ्वले म्हणून:
What the Beep Do We Know? ही स्पेशल डॉक्युमेँटरी पद्धतीची फिल्म कोठे मिळाली तर आवर्जुन पाहा.

आणखी एक

The Holographic Universe - Michael Talbot यांचे हे पुस्तक व डिव्हीडी मिळाली तर आवर्जुन वाचा / पाहा.

वाचण्या सारखे बघण्या सारखे बरेच आहे, वेळच कमी पडतो.

सुहास

http://suhasgokhale.wordpress.com/

Suhasg, वाचायला तर हवेच आहे बरेच काही पण नेपच्यून च्या दृष्टीने अभ्यास करायला पत्रिका तशा कमी मिळतात . त्यामुळे काही वेगळा अनुभव येणाऱ्या लोकांच्या पत्रिका व त्यातील ग्रहस्थिती तपासून बघणे हे तितके सोपे वाटत नाही.
तरीपण तुम्ही उल्लेख केलेली पुस्तके मिळाली तर जरूर वाचेन .

गुरुवर्य श्री वसंतराव भटांनी त्यांच्या काही ग्रथांमधुन अशा पद्धतीच्या काही पत्रिकां दिल्या आहेत,पण अचूक जन्मवेळ दिली नसल्याने / उपलब्ध नसल्याने ते सारे विवेचन काहीसे जुळवलेले वाटते. पण थोडातरी अंदाज येतो, अशा पत्रिकांचा अभ्यास करताना विचारांची दिशा काय ठेवायची हे कळते, हे ही काही कमी नाही.

याला समांतर विषयावर Mitchell Earl Gibson या डॉक्टर (Psychiatrist) महोदयांच्या दोन ग्रंथां मध्ये तुम्हाला साधारण पणे 500 पत्रिका अभ्यासायला मिळ्तील!

Signs of Mental Illness: An Astrological and Psychiatric Breakthrough

Psychiatrist Mitchell E. Gibson, M.D., demonstrates new astrological techniques for predicting mental illness, based on his study of more than 400 astrological birth charts and the use of scientific stastical research models.


Signs of Psychic and Spiritual Ability

book based on Dr. Mitchell E. Gibson's research in the new and exciting field of Modern Astrology. In this edition, Dr. Gibson outlines a new astrological method for exploring psychic and spiritual potential hidden within the birth chart.

डिसक्लेमर: मी हे ग्रंथ अजून वाचलेले नाहीत

-
सुहास
http://suhasgokhale.wordpress.com/

गुरुवर्य सी ई ओ कार्टर (प्रख्यात ब्रिटीश ज्योतिर्वद) यांचे 'Astrological Aspects' हा ग्रंथ प्रत्येक ज्योतिर्वदाच्या अभ्यासात असलाच पाहिजे इतका अमूल्य आहे. (गुरुवर्य श्री वसंतराव भट व गुरुवर्य श्री श्री के केळकर यांनीही तसे आग्रहाने सुचवले आहे)

ह्या ग्रंथात 'बुध नेपच्युन ' या दोन ग्रहां मधील अशुभ योगां (केंद्र योग ९० अंश व प्रतीयोग १८० अंश) वर गुरुवर्य सी ई ओ कार्टर काय म्हणताहेत पहा:

"The configuration usually indicates an astute and cunning type of person, capable of deep scheming and in fact generally hardly able to avoid some degree of deception, though not necessarily for evil purposes. Sometimes the deception is of a quite innocent order.

It is probable that this characteristic arises from the delicate perceptions of the aspects which enable the native to divine what others will do or try to do.

..................
..................

Sometimes it leads to easy discouragement and lack of self-confidence, because the native is too thin-skinned and worries unduly. Sometimes the same sensitiveness causes fierce outbursts of resentful anger. Like all Neptunian aspects, it is not easy to say in what precise way the contact will manifest; much will depend on the Rising Sign. It is clear that lack of real self-confidence may easily induce a person to resort to deceit.
..................
..................

"

--------

सुहास
http://suhasgokhale.wordpress.com/

Suhasg ,बरेच संदर्भ आणि अधिक वाचनासाठी पुस्तकांची नावे दिलीत छान .

नेपच्यूनसारख्या हळू परिभ्रमण करणाऱ्या ग्रहाचे फल जलद चालणाऱ्या ग्रहांशी केलेल्या योगांवर आणि स्थानावरच अवलंबून असणार ना ?

नेटवरचे धडे कल्पना छान .

srd:

धन्यवाद.

तुमची शंका रास्त आहे , तुमच्या पोष्ट च्या आधीच मी बुध नेपच्युन साठीचा संदर्भ त्यासाठीच दिला आहे.

>>>> It is clear that lack of real self-confidence may easily induce a person to resort to deceit. <<< हे वाक्य व एकुणच परिच्छेद खोलवर विचार करायला लावणारा आहे. अन समजायला / ग्रहगुणांसापेक्ष आकलन करायला तितकेच अवघड.

कायम द्विधा (द्विधाच काय त्रिधा अन अजुन असतील तितक्या सन्ख्या) मनःस्थितीमुळे, जे नेमके करायचे त्याबद्दलच खात्री नसते. पण अशी खात्री जागविण्याकरता / व रास्त/सत्कर्म करण्याकरता मंगळ/ गुरू चा प्रभाव विचारात घ्यायला लागेल. मंङळाचा प्रभाव पुरेसा असेल, तर कृति तरी होईल, गुरू ग्रहाचा शुभप्रभाव असेल, तर सत्कर्म होईल, पण तसे नसेल्,तर वरील वाक्य जसेच्च्यातस्से लागू होईल.
बुध कूटीलता देतोच देतो, फक्त असलेली बुद्धी "काय कारणे" प्रत्यक्षात वापरली जाईल हे मात्र बुधाचे ऐवजी, चंद्र/गुरू याचे योगात बघावे लागेल, लग्नरासही महत्वाची ठरेल.

छ्या बोवा.... भारीच विचार होऊन हे की ते की कोणते असे होतय....! Wink

आताच पकडलेल्या संशयिताच्या कुंडलीत(परवाचा मुं मिरर ) लग्नी मिथून रवि मंगळ .
१)बुध नेप संदर्भ वाचतो .

२)आताच पकडलेल्या संशयिताच्या कुंडलीत(परवाचा मुं मिरर ) लग्नी मिथून रवि मंगळ .
३)मिथुनेचा(बुधाची रास) मंगळ दिसला की भिंगातून बघावे लागते .
४)लक्ष्मिपुजन वगैरे अमावस्येला संध्याकाळी =अहंमपणा(रवि) आणि लहरीपणा (चंद्र) अस्ताला गेल्यावर लक्ष्मि येते ?

पाश्चात्त्य प्रश्नशास्त्रा (होरारी अस्ट्रोलॉजी) वरच्या काही ग्रंथांची यादी (आणि काही टिपण्यां) माझ्या ब्लॉग वर डकवली आहे . या यादीतले एक दोन वगळ्ता सर्व ग्रंथ माझ्या वैयक्तीक संग्रहात आहेत.

आपल्याला आपल्या प्राचीन पारंपरिक ज्योतिषशास्त्राचा कितीही अभिमान असला तरी ‘आमचे चांगले बाकीचे ते वाईट’ असा दुराग्रह नसावा. पाश्चात्त्यांनीही या शास्त्रात कमालीची प्रगती केली आहे. त्यांच्या मागे आपल्यासारखा ५००० वर्षांचा इतिहास नाही,मान्य, पराशर, गर्ग, वराहमिहीर त्यांच्या कडे झाले नाहीत हे ही खरे , पण संशोधक वृत्ती, बाप दाखव नाहीतर श्रादध घाल अशी रोखठोक पण रास्त विचार सरणी, प्रत्येक गोष्ट ती कुणा ढूढढाचार्याने सांगितली म्हणून जशीच्या तशी न स्वीकारता तर्काच्या कसोटीला घासूनच घ्यायची त्यांची वृत्ती वाखाणण्यासारखीच आहे. जेव्हा १०,००० पत्रिकांचा अभ्यास करून काही विधाने केली जातात (Modern Horary Astrology – Doris Doane ) त्याला महत्त्व द्यायचे का कसलाही आगापिछा नसलेली , हवेत केलेली विधाने पाठ करायची जे ज्याचे त्यानेच ठरवावे!

“हरी हरी , काय काळ आला आहे पहा, घ्या आता या पाश्चात्या कडून आमचेच पवित्र शास्त्र पुन्हा शिकायची वेळ आली का?” असा कुत्सित टोमणाही काही जण मारतील, पण लक्षात घ्या आयुर्वेद , योग, ध्यानधारणा या खास ‘आपल्या’ क्षेत्रात आज ही वेळ जवळजवळ आलेलीच आहे , तीच उद्या ज्योतिष शास्त्राच्या बाबतीत ही येऊ शकेल .

काही जणांना पाश्चात्त्यांचे काही ही नको असेल तर काही जणांना ‘होरारी’ मध्ये फारसा रस नसेल , तरी पण या ग्रंथांत असे काय आहे जे आपल्याला उपयोगी पडू शकेल?

  • या ग्रंथांतून पत्रिका विश्लेषणाच्या पद्धती विस्ताराने दिल्या आहेत.
  • ग्रहयोगांचा अचूक अर्थ कसा लावायचा ते सांगितले आहे.
  • ग्रहांचे बलाबल कसे ठरवायचे ते सोदाहरण स्पष्ट केले आहे.
  • टप्प्या टप्प्याने पत्रिकेची उकल कशी करायची, अनेक पर्यायातून योग्य तो पर्याय कसा निवडायचा ते समजावून सांगीतले आहे.
  • प्रत्येक ग्रह आपल्याशी कसा बोलतो, त्याचे म्हणणे कसे समजून घ्यायचे याचे विवेचन अतिशय संदररित्या केले आहे.
  • ज्योतिषशास्त्राची पायाभूत तत्त्वे सर्वत्र सारखीच पण त्यांचा समोरच्या पत्रिकेत कसा खुबीने वापर करायचा हे यातून शिकायला मिळते.
  • जातकाची व त्याच्या प्रश्नाची हाताळणी कशी करावी लागते , त्याच्या भावभावनांचा कसा सन्मान करायचा असतो यांचे सुंदर मार्गदर्शन यातून मिळते. (खास करुन जॉन फ्रावलेंचा ग्रंथ)

मला वाटते भारतीय ज्योतिष असो वा के.पी. वा पाश्चात्त्य, हे सर्व ज्ञान ज्योतिर्विदाला असलेच पाहिजे ना?

सुहास

http://suhasgokhale.wordpress.com/

बरोबर आहे .
भाकित वर्तवण्यासाठी सर्व गोष्टी वाचारात घ्यायलाच हव्यात .ह ना काटवे तर त्यांच्या पुस्तकात या योगाबद्दल प्रत्येकाचे मत देऊन शेवटी माझे विचार सांगतात .

ग्रहांच्या स्वराशी ,बल स्थाने ,वगैरे मुळातच पारंपारिक भारतीय नसून तीन हजार वर्षांपूर्वी असिरिआ देशाकडून ग्रिक ,यावनी ,कुषाणांनी भारतात आणली .

बरोबर आहे .
भाकित वर्तवण्यासाठी सर्व गोष्टी वाचारात घ्यायलाच हव्यात .ह ना काटवे तर त्यांच्या पुस्तकात या योगाबद्दल प्रत्येकाचे मत देऊन शेवटी माझे विचार सांगतात .

ग्रहांच्या स्वराशी ,बल स्थाने ,वगैरे मुळातच पारंपारिक भारतीय नसून तीन हजार वर्षांपूर्वी असिरिआ देशाकडून ग्रिक ,यावनी ,कुषाणांनी भारतात आणली .

गुरुवर्य सी ई ओ कार्टर (प्रख्यात ब्रिटीश ज्योतिर्वद) यांचे 'Astrological Aspects' ह्या ग्रंथा बद्दल आधीच्या पोष्ट मध्ये लिहीले आहेच. गुरुवर्य श्री वसंतराव भट यांचा 'फलज्योतिषातले समग्र ग्रहयोग ' हा अप्रतिम ग्रंथ आहे , तो आणि 'Astrological Aspects' या ग्रंथात बरेच साम्य (?) आहे , अर्थात श्री वसंतरावांनी सर्वच ग्रहयोगांना सुंदर भारतीय बाज चढवला आहे.
हे दोन ग्रंथ तर प्रत्येक ज्योतिर्विदाच्या संग्रहात असायलाच हवेत त्याच्या बरोबर :

  • कोसी
  • जेम्स ब्राहा

पण संग्रहात असायलाच हवेतच . मला जर फक्त एकच ग्रंथ घेऊन निर्जन बेटा वर जायची वेळ आली तर तो असेल कोसी.

सुहास

srd:

आपल्या कडे राशी , १२ भाव नव्हतेच , एव्ह्ढेच काय वार (रवीवार ... शनीवार इ) पण नव्हते , नक्षत्रे व तिथी होत्या. राशी व झोडीयाक चे बारा भाग या संकल्पनाच मुळात आपण सुमेरियान. खाल्डीयन, ग्रीक लोकांच्या कडून उचलल्या आहेत.

नवमांशा बाबत आपण किती बढाया मारतो पण त्यावरचे ग्रंथ बघीतले तर कळेल की हे प्रकरण कोणालाच कळलेले नाही नुस्ता केऑस आहे , संकल्पनेच्या मूळ गाभ्यापर्यंत कोणी जातच नाही!
उत्सुकता म्हणुन मी

  • Harmonics in Astrology - John Addey
  • Harmonic charts - David Hamblin
  • Working with Astrology - Haevey - Hardings

हे ग्रंथ वाचले (माझ्या संग्रहात हे तीन्ही आहेत!) आणि सगळा खुलासा झाला , किती व्यवस्थित लिहतात हो हे लोक !

आपल्या कडे सुरवात बरोबर होते पण नंतर जे काही भरताड चालु होते ज्याचे नाव ते , जाउ द्या , मला विषय समजावून घ्यायचा होता तो या तिनही ग्रंथांनी उत्तम करुन दिला.

सुहास

Suhasg , बरोबर .भटांनी समग्र पूर्ण तयारीने लिहिलाय .बरेच इतर "सुरूवात आणि भरताड ".दिलेल्या नवीन यादीतलेही कुठे मिळाले तर वाचेनच .विशेषत: Kosi/Cosi .
Alen Leo याचे हाउ टु जज अ नेटविटि वाचले .
मला असे समजले की यातले बरेच हौशी अभ्यासक होते .

आपल्याला कोणी जन्मतारीख आणि वेळ सांगितली (आणि स्थळ मुंबई/पुणे धरा) तर आपण थोड्या सरावाने बुध शुक्र चंद्र मंगळ सोडून बाकीचे ग्रह असलेली कुंडली मनात मांडू शकतो . त्यातून किती ज्योतिष पटकन सांगू शकतो ?

जन्मतारीख आणि वेळ माहीती असेल तर चंद्राची पोझीशन थोडी आकडेमोड (गुणाकार. भागाकार) करुन ठरवता येणे सहज शक्य आहे. राहू (केतु) मांडणे त्याहूनही सोपे. शुक्र आणि बुध सुर्या पासून फारसे लांब कधीच अ‍सत नाहीत.जन्मलग्न बिंदू सुद्धा सहज ठरवता येतो. सायंटिफीक क्वालक्युलेटर (साईन कॉस टॅन )उपलब्ध अ‍सेल तर मंगळाची पोझीशन सुद्धा ठरवता येते.

मी अचूक जन्मवेळ अ‍सेल तरच पत्रिका पाह्तो. त्यासाठी जातकाच्या आयुष्यातल्या घडलेल्या घटनांच्या अनुरोधाने जन्मवेळ बरोबर आहे का त्याची खातरजमा करुन घेतो , जन्मवेळचे शुद्धिकरण करता येते, मी त्यासाठी टरशरी प्रोग्रेशन व युरेनियन प्लॅनेटरी पिक्चर्स चा वापर करतो काही वेळा एज हार्मोनिक्स तंत्र वापरावे लागते.,एक खास (शिक्रेट!) सॉफ्टवेअर चा ही वापर करतो, पण त्यासाठी अ‍क्षरश: ढोरमेहेनत करावी लागते, आख्खा दिवस जातो, पण मोबद्ला म्हणाल तर शून्य ! म्हणून नी जास्तीकरुन प्रश्नकुंड्लीचा वापर करतो

पंचांग कंम्प्युटर साधने वापरून सर्व अचूक कुंडली मिळतेच .

मला असं म्हणायचं होतं की जलद चालणारे चार ग्रह सोडून आठ ग्रह आणि कुंडली कोणतेही साधन न घेता आपण काढू शकतो तेवढ्यावरच किती भाकिते करता येतील ?

[एकदा माझ्या मामेभावाच्या एका मित्राने मला विचारले "तुला ज्योतिष येते का ?"."नाही ,धाकट्या भावाला येते ".
मी म्हणालो तुमचा जन्म साधारण किती वाजताचा आहे ते सांगा ."साधारण अकरा साडे अकरा वाजता ".
"मग तुम्ही सरकारच्या बाजूचे" असं पटकन सांगितल्यावर तो अतिशय खुश झाला .
"मी आताच वकिलीची सनद घेतली आणि मला प्रसिक्युटर म्हणून करिअर करावे असं वाटतंय ,तेच विचारणार होतो ".
]
मला असं वाटतं की रवि शनी गुरू या फक्त तीन ग्रह मांडलेल्या कुंडलीतून आयुष्याचे यशापयश सांगता येईल .
नवग्रहांपलीकडे यु-ने-प्लु पर्यँत जाण्याच्या विरूध्द टोक आहे .
तुमचे काय विचार आहेत ?

बाकीचे तपशील नसताना केवळ दोन चार ग्रहांच्या ( त्याही स्थूल ) पोझीशन्स वरुन आयुष्याचे यशापयाची भाकितें करण्या इतपत अभ्यास माझा अजून झाला नाही.संपूर्ण अंशात्मक पत्रिका उपलब्ध असेल तरच मला थोडाफार प्रयत्न करता येइल.

एसार्डी, तुमच्या प्रश्नामधे प्रचंड तथ्य दडलेले आहे.
ढोबळमानाने जातकाचे जन्मतारखेचे गुरु/शनि काढता येतात, जन्मवेळ व महिना यानुसार लग्न व रवि निश्चित करता येतो. आयुष्याला "आकार / दिशा" देण्यामधे याच ग्रहांचा वाटा महत्वपूर्ण असतो व जातकाचे प्रश्नानुसार, चालू ग्रहस्थितीच्या प्रश्नकुंडलीची जोड दिली, तर तुम्ही म्हणता तसे ढोबळमानाने यशापयश सान्गता यायला हवे.
पण माझे मते चंद्र कळला नाही, तर हे व्यर्थ आहे, जसे की, बाकि ग्रह काही देऊ पहातात, पण मुळचा बिघडलेला चंद्र त्या मिळालेल्या बाबींचे, माकडाच्या हातात मिळालेल्या मोत्यान्च्या माळेप्रमाणे होत असेल, तर तुमचे सर्व अंदाज/भाकिते चूकणार. त्यामुळे कितिही शक्य वाटले/मोह झाला तरी मी सहसा याप्रकारे जाऊ पहात नाही.
माझे मते, दूसरा काही पर्यायच नसेल, तर अन तरच अशा प्रकारे जावे, व जोडीला हस्तसामुद्रिक/पूर्वायुष्यातील महत्वाच्या घटना याचेही सहाय्य घ्यावे.

(बराच अन्य मजकुर लिहीलेला खोडून टाकला असे.)

अपुर्‍या माहीतीच्या आधारावर काही बाही सांगण्या पेक्षा मी गप्प बसणे पसंत करेन.मी ज्या व्यवसायात सध्या आहे ( कॉर्पोरेट ट्रेनर) तिथे मी ही दोन तत्वे कसोशिने पाळतो.

1> Nothing is better than Nonsense
2> No demonstration is better than bad demonstration.

थोडकयात : 'No information is better than wrong information"

limbutimbu ,चंद्राबद्दलचे पटले .
एकीकडे शास्त्र अंशात्मक अथवा नक्षत्र/उप चे प्रभावांचा विचार करत आहे तर काही फले कार्यकत्वाच्या आधारावर ढोबळपणे सांगण्याचेही पाहायला काय हरकत आहे ?
(माझ्या उदाहरणात रवी लाभात येईल यावरून एक पटकन सांगितले ) .चांगला अभ्यास असलेले ज्योतिषी नक्कीच अधिक भर घालू शकतील .

पुस्तक परीक्षण; ‘Light on Life: An Introduction to the Astrology of India ‘

“ज्योतिष शिकायचेय एखादे चांगलेसे प्राथमिक पुस्तक सुचवा ना” अशी विचारणा झाली नाही असा दिवस जात नाही. माझा होरारी ( प्रश्नशास्त्र ) चा बर्‍या पैकी अभ्यास असल्याने वरकरणी अशा साधासुध्या वाटणार्‍या प्रश्ना मागे आणखी बरेच प्रश्न असतात हे मी जाणून असतो. 'प्राथमिक पुस्तक' म्हणजे स्वारी ज्योतिष प्रांतात अगदी नवखी आहे, 'एखादे' हा शब्द सुचवतो की सायबांना फक्त पाय भिजवायचेत , खोल डुबकी मारायला अजून बराच अवकाश आहे, 'चांगलेसे' हा शब्द चांगलेच वजन बाळगून येतो, हयात 'कमी किंमत- परवडेबल', 'सगळं काही त्या एकाच पुस्तकाच असायला हवे -सर्वसमावेशक’', 'सहज समजेल अशा सोप्या भाषेत असलेले' , 'या एकाच पुस्तकावर काम भागले पाहिजे, उगाच घराची लायब्ररी व्हायला नको' आणि ' हे सर्व सस्त्यात पण हवे आहे”, मला मजा वाटते आणि काही वेळेला संतापही येतो, ‘दुनियादारी' चे तिकीट ३०० -४०० रुपये खर्च करून हसत हसत काढले जाते पण एखादं चांगलेसे पुस्तक संग्रहात ठेवताना मात्र बजेट आडवे येते आणि मग कोठे फुकटात म्हणजेच चोरी करून ‘डाऊनलोड’ करता येते का याचा निर्लज्ज शोध चालू होतो. असल्यां चोरट्यांना ज्योतिषच काय इतर कोणतीच विद्या वश होणार नाही. जाऊदे..

संपूर्ण परीक्षण माझ्या ब्लॉग व्रर...

http://suhasgokhale.wordpress.com/

>>>> तर काही फले कार्यकत्वाच्या आधारावर ढोबळपणे सांगण्याचेही पाहायला काय हरकत आहे ? <<<<<<

हरकत अशी काही नाही, काळवेळेप्रमाणे तारतम्य बाळगुन ते करावे. पण........

पण अशा प्रकारे ढोबळमानाने सान्गुन जातकाचे तत्कालिक समाधान नक्की होत असले तरी, जातकान्ना तीच सवय लागुन, चक्क पानपट्टीवर जाऊन दोनचार रुपड्याचे बिडीकाडी वा पान घेण्याच्या व्यवहाराप्रमाणे ते "ज्योतिषाकडे" येतात, व पानपट्टीवरील बिडीकाडीचाच व्यवहार करतात असा स्वानुभव आहे. सबब, माझ्या विषयाचे गांभिर्य मीच ठेवायला हवे व ते सखोल अभ्यासानेच पुरेसा वेळ देऊन यथामति शक्य आहे.

अनुभव असा की गुणमेलनाबरोबर (मंगळासहितचे) सर्वग्रहमेलनही आवश्यक असताना, लोकान्ना केवळ गुणमेलन, ते देखिल सोईसोईने हवे अस्ते,
वर-वधुच्या जन्मतारखा माहित असल्या तरी नावावरुन वेळ मारुन हवी असते, कुण्डली मांडण्यायेवढा वेळ देणेही कुणाकुणाला मान्य नसतो, तरी हल्ली कॉम्प्युटरमुळे कुन्डली तर लगेच बनते, पण सगळे कसे "रेडीमेड" हवे असते.
वीजेच्या दिव्याचा स्विच /बटण दाबल्याबरोब्बर जसा झटक्यात दिवा लागतो, तसे एकतर ज्योतिष्याने जादुगाराप्रमाणे/अन्तर्ज्ञानी व्यक्तिप्रमाणे, धाड धाड सान्गावे अशीही अपेक्षा अस्ते,
ते सगळेच खरे ठरावे अशी अपेक्षा तर असतेच असते,
अन विवाहासारखा महत्वपूर्ण निर्णय फसला तर वेळेस खापर फोडण्याकरता ज्योतिषाचे बुजगावणे हवे लागते,
वर तास तास घालवुन केलेला अभ्यासपूर्ण, नि:ष्कर्ष शब्दशः लखोपतिन्नाही पाचदहा रुपयान्च्या चिरीमिरी बदल्यात व कित्येकदा फुकट हवा असतो.
मला तर असेही सान्गणारे भेटलेत की गुरुजी कशाला येवढे खोलात जाऊन बघताय, बघा की आपल वरवरच अन सान्गा!
आता हे वरवरच बघण या विरुद्ध सखोल ज्ञात सर्व आडाखे लावुन बघणे यात जो फरक आहे, तोच तुम्ही तुमच्या हरकतीत समाविष्ट होतोय असे माझे मत. Happy असो.

मी जातकांची कुंडली बघतो, पण ती माझे / माझ्या बुद्धिचे समाधान होईस्तोवर. Happy जर काही वर्तविणे जमत नसेल, अवघड जात असेल, तर स्पष्टपणे तसे सान्गतो, कारण "सत्यवचन" हे तर ज्योतिषाचे सर्वात प्रथम व कायमस्वरुपी "आयुध" आहे.
व्यक्ति सत्यवचनी नसेल, साध्यासाध्या बाबतीतही / वेळ मारुन नेण्याकरता वगैरे जे बोलते ते खोटॅ या सदरातच असेल, तर अशा व्यक्तिने सांगितलेले भविष्य खरे ठरत नाही/ प्रचितीत येत नाही असाही एक प्रवाद आहे. असो.

सुहास, जाम हसलो बोवा वरली तुमची पोस्ट वाचून.
योगायोग बघा, मी देखिल जवळपास त्याच धर्तीवर लिहीले आहे.

माझा पहिला पगार चार रुपये रोजाने १०० रुपये झाला, तेव्हा त्यातुन पहिल्यान्दा पन्चवीस रुपयान्चे एक चित्रकलेवरील पुस्तक घेऊन उरलेल्याती पन्चाहत्तर पैकी पन्नास रुपये आईकडे दिले होते असे स्मरते. Happy

“We Shall Build Good Ships Here; At A Profit If We Can, At A Loss If We Must, But Always Good Ships.”

Collis Potter Huntington.

When Huntington elected to build a shipyard in 1886 to serve the world’s greatest harbor, he determined that it should be known the world over for the quality of its products. In 1916 this business philosophy was distilled by then shipyard president Homer L. Ferguson for the so-called Shipyard Monument. This specified for his shipbuilders in no uncertain terms that there should be no scrimping on the product—profit or loss should be minor considerations as long as Good Ships were the result.

लिंबूटिंबू आणि सुहासजी तंतोतंत पटतंय .

ज्यावेळी ज्योतिषाच्या सल्ल्याने कोणाला निर्णय करायचा असतो त्यावेळी ती व्यक्ती योग्य ठिकाणीच जाते .काही फुकटे जे येतात ते इतर गोष्टी मिळवतांनादेखील क्लुप्त्या लढवतात .जे व्यावसायिक आहेत ते आपल्या शास्त्राशी एकनिष्ठ राहाणार आणि
"माझा काही फारसा विश्वास नाही पण थोडंफार वरवर काय आहे ते म्हटलं जरा बघू "
अशी सुरूवात करणाऱ्यांना बरोबर ओळखतात .

यशापयशाच्या बाबतीत रवी गुरू शनी फारच जबाबदार मला वाटतात असं माझं मत मांडलं .

Pages