नमस्कार,
'विद्युल्लता' - जागतिक महिला दिनानिमित्त एक फोटोस्टोरी प्रदर्शन! फोटो सर्कल सोसायटीच्या महिला प्रकाशचित्रकार ( सुमारे ५५) दरवर्षी विविध क्षेत्रात काम करणार्या महिलांना भेटुन त्यांचे कार्य चित्रीत करतात. जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन भरवुन अशा यशस्वी महिलांना प्रकाशचित्रकारांकडुन एक प्रकारची मानवंदनाच दिली जाते.
२०१४ हे विद्युल्लता प्रदर्शनाचे तिसरे वर्ष. यावर्षी महाराष्ट्राबरोबरच पूर्वांचलातील चार राज्ये, असम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या ठिकाणच्या सामाजिक, शैक्षणिक, कला आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणार्या ३१ जणींना आमची यावर्षी कार्यरत असणारी सतरा जणींची टिम भेटली आणि त्यांचे प्रकाशचित्रण केले.
त्यातीलच आमची सहाजणांची छोटी टिम पूर्वांचलातला पंधरा दिवसात अडीचहजार किमी पेक्षा जास्त प्रवास करुन तिथल्या स्त्रियांना भेटुन, त्यांच्या घरी राहुन आली. अतिशय दुर्गम भागात रहात असुनही हिरिरीने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणार्या या चौदा स्त्रीयांना भेटुन आम्ही सगळेच भारावुन गेलो होतो.
त्या पूर्वांचलातल्या चौदाजणी आणि महाराष्ट्रातल्या सतरा जणींचे कार्य प्रकाशचित्रांच्या रुपाने विद्युल्लता या प्रदर्शनात पहाता येईल. प्रदर्शनाचे उद्घाटन ७ मार्च रोजी संध्याकाळी ५:३० वाजता कलाभवन, ठाणे येथे अरुणाचल प्रदेशच्या पद्मश्री बिन्नी यांगा यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या दिवशी मायबोलीकरांनी उपस्थित रहावे असे आवर्जुन वाटते.
हे प्रदर्शन ७ मार्च ते ९ मार्च या कालावधीत सकाळी १०:०० पासुन रात्री ७:०० वाजपर्यंत सर्वांनाच खुले आहे.
त्याचबरोबर या महिलांशी बोलताना, त्यांच्याबद्दल जाणुन घेताना आम्हाला ते अनुभव शब्दबद्ध करावेसे वाटले. या सगळ्यांच्या कार्याची माहिती, आमच्या पूर्वांचलातल्या प्रवासातले अनुभव हे पुस्तिका रुपाने या प्रदर्शनाच्या वेळेस प्रकाशित करणार आहोत. पूर्वांचलातल्या महिलांना महाराष्ट्रात चाललेले काम आणि इथल्यांना पूर्वांचलातल्या कार्याबद्दल माहिती असा दुहेरी उद्देश असल्याने ही पुस्तिका इंग्रजीमधुन तयार करण्यात आलेली आहे. ही पुस्तिका देणगीमूल्य रु.१०० फक्त या किमतीत प्रदर्शनाच्या ठिकाणी उपलब्ध होईल.
हे प्रदर्शन आणि पुस्तिका हे महाराष्ट्र आणि पूर्वांचलाला जोडणार्या सेतुमधला एक छोटासा दगड ठरेल अशी अपेक्षा आहे.
प्रदर्शनाला नक्की या!
अरे वा, उद्घाटन अन
अरे वा, उद्घाटन अन प्रदर्शनासाठी शुभेच्छा. जे कोणी मायबोलीकर जातील त्यांनी सविस्तर, सचित्र वृत्तांत लिहा प्लीज .
मेधा +१. शुभेच्छा
मेधा +१.
शुभेच्छा
थँक्यु मेधा, सिंडरेला
थँक्यु मेधा, सिंडरेला
पूर्वाचलातल्या मुलींना असे
पूर्वाचलातल्या मुलींना असे व्यासपिठ मिळवून दिल्याबद्दल संयोजकांचे आभार.
वा छान. मेधास अनुमोदन.
वा छान.
मेधास अनुमोदन.
अरे वा! मस्तच.
अरे वा! मस्तच.
प्रदर्शनाला नक्की येणार
प्रदर्शनाला नक्की येणार
उपक्रमासाठी शुभेच्छा!
उपक्रमासाठी शुभेच्छा!
दिनेशदा, सुनिधी,केपी,
दिनेशदा, सुनिधी,केपी, शोभनाताई थँक्यु.
ललिता, उद्घाटनाच्या दिवशीच ये. खुप जणींची भेट होईल.
पूर्वाचलातल्या मुलींना >> पूर्वांचलात आम्ही ज्यांना भेटलो त्या सगळ्या जेष्ठ समाजसेविका आहेत. आणि गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्य करत आहेत.
आजच्या महाराष्ट्र टाईम्स, ठाणे नवी मुंबई पानावर या प्रदर्शनाची बातमी आली आहे.
प्रदर्शनाला नक्की येणार
प्रदर्शनाला नक्की येणार
उद्घाटनाला यायला आवडलं असतं पण तेव्हा नाही जमणार मला. मी शनिवारी/ रविवारी येईन
शुभेच्छा !!!
शुभेच्छा !!!
प्रदर्शनाला शनिवार
प्रदर्शनाला शनिवार रविवारमध्ये नक्की येणार.
वा वा अभिनन्दन आणि अनेक
वा वा अभिनन्दन आणि अनेक शुभेच्छा !!!
प्रदर्शनाला नक्की भेट देणार.
प्रदर्शनाला नक्की भेट देणार.
अरेवा, अभिनंदन. सविस्तर
अरेवा, अभिनंदन. सविस्तर वृत्तांत येऊ द्यात.
सावली , ठाण्या व्यतिरिक्त इतर
सावली , ठाण्या व्यतिरिक्त इतर शहरातही प्रदर्शनाच मनावर घ्या प्लिज.
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनन्दन आणि अनेक शुभेच्छा !
अभिनन्दन आणि अनेक शुभेच्छा !
अरे वा.. मस्तच ! प्रदर्शन
अरे वा.. मस्तच !
प्रदर्शन संपल्यानंतर काही फोटो इथे टाकता येणं शक्य आहे का बघ..
अभिनंदन व शुभेच्छा!!
अभिनंदन व शुभेच्छा!!
सावली, अभिनंदन आणि शुभेच्छा!
सावली, अभिनंदन आणि शुभेच्छा!
पुस्तिका मागवायची असेल तर कोणाशी संपर्क साधायचा? (ऑनलाइन घेता येईल का?)
छान ! उपक्रमासाठी शुभेच्छा!
छान !
उपक्रमासाठी शुभेच्छा!
सावली, हार्दिक अभिनंदन आणि
सावली, हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!!
अभिनंदन सावली. वृत्तांत
अभिनंदन सावली. वृत्तांत वाचायला आवडेल.
सावली, अभिनंदन!
सावली, अभिनंदन!
थँक्यु लोकहो वृत्तांत
थँक्यु लोकहो
वृत्तांत >>प्रदर्शनाला भेट देणार्या मायबोलीकरांनी त्यांचे अनुभव लिहीलेत तर मलाही वाचायला आवडेल.
ठाण्या व्यतिरिक्त इतर शहरातही प्रदर्शनाच >> ४/५/६ एप्रिलला नाशिक येथे हे प्रदर्शन असणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर शहरातले अजुन नीटसे ठरले नाहीये. फक्त पूर्वांचलातले फोटो मात्र देशात इतर शहरात प्रदर्शित करण्यात दुसर्या एका संस्थेला इंटरेस्ट आहे असे बोलणे झाले आहे.
पुस्तिका मागवायची असेल तर कोणाशी संपर्क साधायचा? >> मला सांगितलेत तर मी काढुन ठेवेन, आणि कुणी तुमच्या इथे जाणारे असेल त्यांच्यामार्फत पाठवायची व्यवस्था करु शकेन.
उपक्रमासाठी खुप शुभेच्छा!!
उपक्रमासाठी खुप शुभेच्छा!!
थँक्यु माधुरी. आज लोकसत्ता
थँक्यु माधुरी.
आज लोकसत्ता पुरवणी ( सर्व जिल्हे), पुढारी आणि सकाळ या वृत्तपत्रातही याविषयी बातमी आली आहे.
इन्ना +१ आमच्या भागात पण होवू
इन्ना +१
आमच्या भागात पण होवू द्या प्रदर्शन.
शुभेच्छा.
सावली, मी शनिवारी सकाळी ११
सावली, मी शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास येईन. काही बदल झाल्यास तुला कळवते.
सात तारखेला ५:३० वाजता
सात तारखेला ५:३० वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन आहे याची आठवण करुन देण्यासाठी ही पोस्ट
Pages