निसर्गाच्या गप्पा (भाग १६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 11 October, 2013 - 03:53

निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी,
अगदी.. आमच्या टेक्स्ट बूक मधे तर औषधालाही चित्र नसायचे. ती कसर आता भरून काढतोय.
मस्त बर्फ़ पडलाय. एखादा सनसेट टिपता आला तर छान दिसेल.
हे आर्थुरीयम ना ? दुबई एअरपोर्टवर हीच फ़ुले आहेत. आपल्याकडे पूर्वाचलात भरपूर व्हरायटी आहे म्हणे. एप्रिल मधे याचा महोत्सव असतो तिथे. आपले जाणेच होत नाही.

अगदी.. आमच्या टेक्स्ट बूक मधे तर औषधालाही चित्र नसायचे. ती कसर आता भरून काढतोय.>>>>>>
१००% सहमत.
ओह...हे नाव का विंग्रजीत? माहिती नव्हतं.

बहुतेक हेच ! खरं तर अळूचाच वर्ग हा. आपल्या साध्या अळूला पण असे पिवळेधमक तुरे येतात. एकच जाड पाकळी आणि आत असा सूक्ष्म फुलांचा दांडा हे मूळ रुपडं. मग कुणाचं पान पांढरं तर कुणाच लाल.. यापैकी काही जातीची फुले तर चक्क जमिनीखाली असतात. इंगळहाळीकरांच्या पुस्तकात छान वर्णन आहे त्याचे.

या फुलाच्या कुंडीवर पीस peace लिली असं छापलंय.
हो ....सनसेट मलाही ट्राय करायचाय पण दुपारी २, ३ नंतर जे ढगाळतंय....सूर्य गायब.
कधी तरी असं होतं.....

मानुषी फोटो मस्तच आहेत्सगळे...

आ णि अँथ्युरियमला नागफणी हे नाव तर मस्तच आहे... खरेच नागाच्या फण्या सारखी वाटते.

अँथ्युरियमला नागफणी हे नाव तर मस्तच आहे >>>>>> ते बहुधा spathiphyllum आहे, anthurium वेगळे आहे ... त्याला टोपडे नसते - या नागफणीला असते तसे ...

साधना, तुझी मागणी माळ्यांकडे मांडणार आहे. नक्की उत्तर देतील.
माझे ऑफिस मुंबईच्या दक्षिण टोकाला कुलाब्याला आहे. आत्ताच entrance ला वांग्याची झाडे ठेवलेली पाहिली. छान वांगी लागली आहेत. मागे त्याच्या पानाचा फोटो टाकला होता. दुपारी जाऊन फोटो काढीन. नंतर निग वर टाकीनच.

स_सा खूप सुंदर आहे फूल..

मानुषी , डोळ्याचं पारणं फिटवणारे फोटू टाकतेयस मस्त!!!!!!!!!

अँथ्युरियमला नागफणी हे नाव तर मस्तच आहे >>>>>> ते बहुधा spathiphyllum आहे, anthurium वेगळे आहे ... त्याला टोपडे नसते - या नागफणीला असते तसे ...

आले आले, आमचे ऑथेंटिक निगएक्स्पर्ट आले सोबत ऑथेंटिक कमेंटी घेऊन.... Happy

खरेतर त्याची पाने पाहुनच शंका यायला हवी होती, पण इतके देखणे फुल असताना पानाकडे कशाला लक्ष जाईल कोणाचे??

तरी मला फुलामधला दांडा पाहुन शंका आलेलीच.. अँथ्युरिअम्चा इतका खडबडीत नसतो..

(गिरे भी तो टांग उप्पर है हमारी, पुरी तरह से कहा गिरे है.... Wink )

ससा आणि वर्षू, फुलं खूपच सुंदर! पटकन उचलावीशी वाटतायत. Happy

१००० प्रतिसादांबद्दल अभिनंदन!
Copy of RSCN6134.jpg

जागु, तयारीला लाग. Happy

बापरे ७५ च्या वर गप्पा कालपासून??????? नि.ग. पुन्हा फुलायला लागला. Happy

जिप्स्या तुला आता वॉर्निंग देण्यात येत आहे. निग चा हा भाग संपत येत आहे तेव्हा दुसर्‍या भागासाठी एक चांगला कोलाज फोटो मेन पेज साठी मला त्वरीत पाठव आणि सुरुवातही प्रदर्शनाच्या फोटोने कर. अथवा नि.ग. चा पुढचा भाग प्रतिक्षेत राहील. मंजूर आहे का सगळ्यांना? की माझ्याच हुकुमावरुन ? Lol

मानुषी फोटो मस्तच. Happy
(गिरे भी तो टांग उप्पर है हमारी, पुरी तरह से कहा गिरे है.... डोळा मारा ) >>> Lol

हो. गुलमोहरच आहे. Happy

अरे पण माझा हुकुम मंजूर आहे की नाही??? >>>>> आमचं र्‍हाउ द्या ओ ...... ते जिप्सीभौ सद्या कोनाचा हुकूम मानत्यात त्यांच तेच जाने !!!!!!!!!!!!!!!!!!!

जिप्स्या तुला आता वॉर्निंग देण्यात येत आहे. निग चा हा भाग संपत येत आहे तेव्हा दुसर्‍या भागासाठी एक चांगला कोलाज फोटो मेन पेज साठी मला त्वरीत पाठव आणि सुरुवातही प्रदर्शनाच्या फोटोने कर. अथवा नि.ग. चा पुढचा भाग प्रतिक्षेत राहील. मंजूर आहे का सगळ्यांना? की माझ्याच हुकुमावरुन ? >>>>>>>>.मले मंजूर हाय! Happy

काल आमच्या जवळच रहात असलेल्या श्रावणीच्या मैत्रीणीकडे गेले. त्यांच्या दारावरची फुललेली वेल पाहून खुप आनंद झाला. रात्री गेले होते त्यामुळे निट न्याहाळता नाही आला. पण एक दिवस सकाळी खास फोटो काढण्यासाठी जाईन.

दिनेशदा तुम्ही मागे सांगितल होता तो लाल कृष्ण्कमळाचे वेल होता तो. कसा बसा एक फोटो काढला रात्री. जवळच सायलीचा वेल होता त्या फुलांचा वास दरवळत होता आणि ही लाल फुले भरलेली खुप छान वाटत होत. मी श्रावणीच्या मैत्रीणीच्या आईची परवानगी घेऊन एक कळी घरी नेण्यासाठी काढली. तिनेही मला त्या झाडाला येणारे फळ बी साठी देण्याचे आश्वासन स्वतःहुनच दिले. Happy घरी नेउन मी काचेच्या ग्लास मध्ये पाणी टाकुन त्यात ती कळी ठेवली आणि सकाळी फुललेली पाहण्यासाठी उत्स्तुकतेने ठेउन दिली. सकाळी उठून पाहते तर कळी गायब. फार दु:ख झाल. बहुतेक उंदीरमामा घरात येउन गेला असणार. उंदराला पण ते फुल आवडल असणार.

रात्री काढलेला फोटो.

जागू तो वेल मिळवच. यात जांभळाही प्रकार असतो. तो पण छान दिसतो.
मला वाटतं, जिप्स्याच्या निर्णयाचा मान आपण सगळ्यांनी राखायला हवा. त्यानी काढलेले फोटो आपल्याला इतरत्र बघायला मिळतीलच फक्त ते इथे असणार नाहीत. मी त्याला पुर्वीच लिहिले होते.

शिवाय वर्षाचा सण गुढीपाडवा तोंडावर आलाय... जावईबापू रुसायला नकोत.

मला वाटतं, जिप्स्याच्या निर्णयाचा मान आपण सगळ्यांनी राखायला हवा. त्यानी काढलेले फोटो आपल्याला इतरत्र बघायला मिळतीलच फक्त ते इथे असणार नाहीत. मी त्याला पुर्वीच लिहिले होते. >>>>>>>>>.काय हे दिनेशदा, तुम्हीपण त्यालाच पाठिंबा देताय Uhoh

हो शोभा, ज्या पद्धतीने ती चर्चा झाली ती मला अपमानास्पद वाटली. त्याच्या भावना मी समजू शकतो.

प्राची, नक्कीच कलौंजी मिळेल यातून.

हो शोभा, ज्या पद्धतीने ती चर्चा झाली ती मला अपमानास्पद वाटली. त्याच्या भावना मी समजू शकतो.

प्राची, नक्कीच कलौंजी मिळेल यातून.

Pages