Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2014 - 07:09
अनाहूत सारी किती अंतरे ही तुझे गीत माझ्या न कानी पडे
तरी त्या सुरांनी असे काय केले कि गेले इथे चांदण्याला तडे
अपेक्षा मला ना तुझ्या आठवांतून येण्याचि वा भासण्याची सुधा
तरीही जरा सांज होताच माझी निघे साऊली त्याच वाटेकडे
तुझा चंद्र होता तुझ्या चांदण्या, नील आकाश होते तुझे... मी कुठे?
पहाटे दंवाचे मुके थेंब झाले, तुला वाहिले कुंद ओले सडे!
कधी धावतो प्राशुनी स्वैर वारा कधी शांत तो रोवल्यासारखा
कधी तो मला भेटतो सांजवेळी... नि देतो उन्हाचे रुपेरी कडे!
मला ठाऊके की तुझ्या काळजातून मी वाहते, साठते, राहते...
तरी एकदा बोल ना रे सख्या... की तुझे विश्व माझ्याविना बापडे...!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
आवडेश
आवडेश
वाह! शेवटच्या ओळीला एक
वाह!
शेवटच्या ओळीला एक क्युटशी स्माईल आली
मस्त्त्त!!...आवडली!
मस्त्त्त!!...आवडली!
Dhanyawaad!!!
Dhanyawaad!!!
आवडली!... <मला ठाऊके की
आवडली!...
<मला ठाऊके की तुझ्या काळजातून मी वाहते, साठते, राहते...
तरी एकदा बोल ना रे सख्या... की तुझे विश्व माझ्याविना बापडे...!> this is the BEST.
धन्यवाद!
धन्यवाद!
खुप खुप आवडली...!
खुप खुप आवडली...!
मला ठाऊके की तुझ्या काळजातून
मला ठाऊके की तुझ्या काळजातून मी वाहते, साठते, राहते...
तरी एकदा बोल ना रे सख्या... की तुझे विश्व माझ्याविना बापडे...! >>>>>खल्लास ...
सगळी कविता अप्रतिमच .......
धन्यवाद लतांकुर, शशांक.
धन्यवाद लतांकुर, शशांक.
सुंदर सुमंदारमाला । आवडली खुप
सुंदर सुमंदारमाला । आवडली खुप
उत्तम आपल्या कवितेच्या अगदी
उत्तम
आपल्या कवितेच्या अगदी आतून आणि आपोआप आलेल्या ओघांचा गझलेच्या दिशेने सुरू असलेला प्रवास मला नेहमीच आवडतो आजही आवडला
धन्यवाद
शुभेच्छा
आवडली.. खूप सुन्दर प्रवाही
आवडली.. खूप सुन्दर प्रवाही शब्द रचना..:)
पु. ले. शु.
केवळ अप्रतिम!!
केवळ अप्रतिम!!
च्च... (वेड लागलं)
च्च...
(वेड लागलं)
वा वा सुंदर !
वा वा सुंदर !
वै व कुं शी सहमत
वै व कुं शी सहमत
सुंदर!
सुंदर!
अहाहा! नितांत सुंदर!!
अहाहा! नितांत सुंदर!!
'पृथ्वीचे प्रेमगीत' आठवले यावरून!
"अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्याला परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण!"
दिवस मस्त जाणार आता!!!
धन्यवाद सर्वांना! ओवी>>>
धन्यवाद सर्वांना!
ओवी>>> भलतीच मोठी तुलना केलीस बाई! काजव्याची सुर्याशी.....
मस्त ...
मस्त ...
तुलना नाही गं! सहज ह्यावरून
तुलना नाही गं! सहज ह्यावरून ते आठवले!
आणि दोन्ही कलाकृतींनी दिलेला आनंद .... तो सारखाच! नाही कां?!
अगदी व्हॅलेंटाईन स्पेशल कविता
अगदी व्हॅलेंटाईन स्पेशल कविता आहे. आवडली.
वाह! छान!
वाह! छान!
धन्यवाद!
धन्यवाद!
व्वा, खर्रच नितांत सुंदर...
व्वा, खर्रच नितांत सुंदर... विकांत सुरू झाला!
धन्यवाद!!
धन्यवाद!!
(No subject)